लोकांची खाती ब्लॉक किंवा अनब्लॉक करणे

नको असलेली संभाषणे टाळण्यासाठी, तुम्ही Google Chat किंवा Photos यांसारख्या ठरावीक Google उत्पादनांमध्ये इतर वापरकर्त्यांना ब्लॉक करू शकता. तुम्ही ब्लॉक करता, तेव्हा तुम्ही विशिष्ट Google खाते ब्लॉक करता.

दुसऱ्या व्यक्तीचे खाते ब्लॉक करण्यासाठी, यांपैकी एका उत्पादनामध्ये "ब्लॉक करा" ही कृती वापरा.

खाते ब्लॉक करण्यासाठी Google Chat वापरणे

तुम्ही एखाद्या व्यक्तीला Google Chat (chat.google.com) मध्ये ब्लॉक करता, तेव्हा त्या व्यक्तीचे खाते या पेजवर सूचीबद्ध केलेल्या सर्व उत्पादनांमध्ये ब्लॉक केले जाते.

Google Chat मध्ये वापरकर्त्यांना ब्लॉक कसे करायचे ते जाणून घ्या.

खाते ब्लॉक करण्यासाठी Google Photos वापरणे

तुम्ही एखाद्या व्यक्तीला Google Photos मध्ये ब्लॉक केल्यावर, त्या व्यक्तीचे खाते या पेजवर सूचीबद्ध केलेल्या सर्व उत्पादनांमध्ये ब्लॉक केले जाते.

Google Photos मध्ये वापरकर्त्यांना ब्लॉक कसे करायचे ते जाणून घ्या.

एखादे खाते ब्लॉक करण्यासाठी Google Maps वापरणे

वापरकर्ता प्रोफाइल ब्लॉक करणे

एखाद्या व्यक्तीला Maps वर तुमची प्रोफाइल शोधता येण्यापासून ब्लॉक करण्यासाठी तुम्ही मोबाइल डिव्हाइस वापरू शकता. Google Maps हे तुम्ही त्यांना ब्लॉक केले असल्याचे कळू देणार नाही. तुम्ही Google Maps मध्ये वापरकर्ता प्रोफाइल ब्लॉक केल्यावर, त्या व्यक्तीचे खाते या पेजवर सूचीबद्ध केलेल्या सर्व उत्पादनांमध्ये ब्लॉक केले जाते.

महत्त्वाचे: तुम्ही ब्लॉक केलेले लोक तरीही Google Maps वर तुमची योगदाने शोधू शकतात पण त्यांना ती तुमच्या प्रोफाइलवर शोधता येणार नाहीत. तसेच, तुम्ही ब्लॉक केलेल्या खात्यामध्ये वापरकर्त्याने साइन इन केलेले नसल्यास, त्यांना तुमची योगदाने शोधता येतील.

  1. Google Maps अ‍ॅप Maps उघडा.
  2. तुम्हाला ब्लॉक करायच्या असलेल्या वापरकर्ता प्रोफाइलवर नेव्हिगेट करा. तुम्ही वापरकर्ता प्रोफाइल पुढील ठिकाणी शोधू शकता:
    • त्या वापरकर्त्याच्या पोस्टच्या किंवा परीक्षणाच्या सर्वात वर.
    • तुम्ही त्यांना फॉलो करत असल्यास, तुमच्या "फॉलो करत आहे" टॅबवर.
    • ते तुम्हाला फॉलो करत असल्यास, तुमच्या "फॉलोअर" टॅबवर.
    • "तुमच्यासाठी" विभागामध्ये. त्यांच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  3. व्यक्तीच्या नावाच्या बाजूला, आणखी आणखी आणि त्यानंतर ब्लॉक करा वापरकर्ता वर टॅप करा.

टीप: तुम्ही एखाद्या व्यक्तीला फॉलो करत असल्यास आणि तुम्हाला यापुढे त्यांचा आशय पाहायचा नसल्यास, तुम्ही त्यांना ब्लॉक करण्याऐवजी अनफॉलो करू शकता.

स्थानाशी संबंधित विनंती ब्लॉक करणे

तुम्ही Google Maps मध्ये स्थानासंबंधी विनंती ब्लॉक केल्यावर, त्या व्यक्तीचे खाते या पेजवर सूचीबद्ध केलेल्या सर्व उत्पादनांमध्ये ब्लॉक केले जाते.

स्थान डेटा कसा शेअर करायचा ते जाणून घ्या आणि Google Maps मध्ये स्थानासंबंधी विनंत्या ब्लॉक करा.

एखादे खाते ब्लॉक करण्यासाठी YouTube वापरणे

तुम्ही एखाद्या व्यक्तीला YouTube मध्ये ब्लॉक करता, तेव्हा त्या व्यक्तीचे खाते या पेजवर सूचीबद्ध केलेल्या सर्व उत्पादनांमध्ये ब्लॉक केले जाते.

एखाद्या व्यक्तीने तुमच्या चॅनलचा उल्लेख करणे किंवा पोस्टद्वारे तुमचा आशय शेअर करणे हे केल्यास, तुम्ही त्या व्यक्तीला लाइव्ह चॅट किंवा तुमचा सूचना इनबॉक्स यांद्वारे YouTube मध्ये ब्लॉक करू शकता.

खाते ब्लॉक करण्यासाठी Google Pay India वापरणे

तुम्ही एखाद्या व्यक्तीला Google Pay India मध्ये ब्लॉक केल्यावर, त्या व्यक्तीचे खाते या पेजवर सूचीबद्ध केलेल्या सर्व उत्पादनांमध्ये ब्लॉक केले जाते.

एखाद्या व्यक्तीला Google Pay India मध्ये ब्लॉक करणे हे कसे करायचे ते जाणून घ्या.

खाते ब्लॉक करण्यासाठी Drive वापरा

तुम्ही कॉंप्युटरवर Google Drive मध्ये एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करता, तेव्हा ते खाते या पेजवर सूचीबद्ध केलेल्या सर्व उत्पादनांमध्ये ब्लॉक केले जाते.

Drive मध्ये वापरकर्त्यांना ब्लॉक कसे करावे ते जाणून घ्या.

खाते ब्लॉक करण्यासाठी Recorder वापरा

तुम्ही एखाद्या व्यक्तीला Recorder मध्ये ब्लॉक करता, तेव्हा त्या व्यक्तीचे खाते या पेजवर सूचीबद्ध केलेल्या सर्व उत्पादनांमध्ये ब्लॉक केले जाते.

Recorder मध्ये वापरकर्त्यांना ब्लॉक कसे करावे ते जाणून घ्या.

एखादे खाते ब्लॉक करण्यासाठी Meet वापरणे

तुम्ही Meet मध्ये एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करता, तेव्हा या पेजवर सूचीबद्ध केलेल्या सर्व उत्पादनांमध्ये त्यांचे खाते ब्लॉक केले जाते.

Meet मध्ये वापरकर्त्यांना ब्लॉक कसे करावे ते जाणून घ्या.

ब्लॉक केलेली खाती शोधणे किंवा एखाद्या व्यक्तीला अनब्लॉक करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  2. लोक आणि शेअरिंग वर क्लिक करा.
  3. "संपर्क" विभागामध्ये, ब्लॉक केलेले वर क्लिक करा.
  4. तुम्ही सर्व Google उत्पादनांवर ब्लॉक केलेल्या खात्यांची सूची तुम्हाला दिसेल. एखाद्या व्यक्तीला अनब्लॉक करण्यासाठी, त्या व्यक्तीच्या नावाच्या बाजूला, काढून टाका काढून टाका निवडा. 

टीप: "ब्लॉक केलेले वापरकर्ते" या सूचीमध्ये पुढील गोष्टींचा समावेश नसतो:

  • YouTube चॅनल किंवा लाइव्ह चॅटमार्फत ब्लॉक केलेली खाती.
  • ब्लॉक केलेले ईमेल अ‍ॅड्रेस.
  • तुमच्या Android फोनचे किंवा iPhone चे फोन अ‍ॅप वापरून तुम्ही ब्लॉक केलेले फोन नंबर.

ईमेल अ‍ॅड्रेस किंवा फोन नंबर ब्लॉक करणे

वापरकर्त्याचे Google खाते ब्लॉक करण्याव्यतिरिक्त, तुमच्याकडे एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर किंवा ईमेल ब्लॉक करण्याचा पर्यायदेखील असू शकतो. हे ब्लॉक करणे या पेजवर सूचीबद्ध केलेल्या सर्व Google उत्पादनांमधून वापरकर्त्यांना ब्लॉक करत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

तुमच्या Gmail मध्ये ब्लॉक केलेले ईमेल अ‍ॅड्रेस आणि तुमच्या फोन अ‍ॅपमध्ये ब्लॉक केलेले फोन नंबर हे तुमच्या खात्यामधील "ब्लॉक केलेले वापरकर्ते" विभाग यामध्ये दाखवले जात नाहीत. त्यांचा सर्व Google उत्पादनांवर परिणामदेखील होत नाही.

Google Fi, Google Voice किंवा Google Meet मध्ये ब्लॉक केलेले फोन नंबर हे तुमच्या खात्यामधील “ब्लॉक केलेले वापरकर्ते” विभागामध्ये दिसतात. त्यांचा परिणाम संपूर्ण Google Fi, Google Voice आणि Google Meet वर होतो, पण इतर Google उत्पादनांवर होत नाही.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8314450199631098475
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false