जाहिरात मार्गदर्शक तत्त्वांसंबंधी आगामी आणि अलीकडील अपडेट

हे पेज आमची जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील जाहिरात मार्गदर्शक तत्त्वांसंबंधी आगामी आणि अलीकडील अपडेटचे अवलोकन पुरवते. YouTube धोरणांमधील इतर अपडेटबद्दल येथे अधिक जाणून घ्या.

नवीनतम अपडेट

मागील ३ महिन्यांमधील अपडेट

 

एप्रिल २०२४

आमचे सध्याचे धोरण अधिक स्पष्ट करण्यासाठी आम्ही जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील "जाहिरात कमाई नाही" विभागामध्ये अत्याधिक असभ्य भाषा आणि द्वेषपूर्ण भाषा किंवा अपशब्दांची उदाहरणे देत आहोत. आम्ही कोणते शब्द "अत्याधिक असभ्य भाषा" मानतो यासंदर्भातील धोरणामध्ये किंवा जाहिरातदारस्नेही असण्यासाठी तुमच्या व्हिडिओचे पुनरावलोकन करण्याच्या पद्धतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
 

जानेवारी २०२४

संवेदनशील इव्‍हेंट चा फायदा घेणाऱ्या किंवा वापर करणाऱ्या आशयाद्वारे कमाई करू शकत नाही हे स्पष्ट करण्यासाठी आम्ही भाषेच्या समावेशासह, संवेदनशील इव्‍हेंट यांविषयीची आमची मार्गदर्शक तत्त्वे अपडेट केली आहेत. धोरणामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, याचा अर्थ जाहिरातदारस्नेही असण्यासाठी तुमचे व्हिडिओ ज्याप्रमाणे तपासले जात होते, त्याप्रमाणेच ते तपासले जातील.
 

नोव्हेंबर २०२३

विशेषतः प्रौढांसाठी असलेल्या आशयाशी संबंधित आमची मार्गदर्शक तत्त्वे आम्ही पुढील दोन भागांमध्ये अपडेट केली आहेत:

  • स्तनपान: जिथे लहान मूल उपस्थित आहे अशा स्तनपानाच्या संदर्भातील आशयामध्ये स्तनमंडल दिसत असले, तरीही त्यावरून आता जाहिरात कमाई केली जाऊ शकते. पूर्वी, स्तनमंडल दिसत नसेल, तरच असा आशय कमाई करण्यायोग्य असायचा. तसेच, स्तनमंडल दिसत नसलेल्या स्तनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या स्तनपान दाखवणाऱ्या थंबनेलवरून आता जाहिरात कमाई केली जाऊ शकते.
  • कामुक नृत्य:  ट्वर्किंग किंवा ग्राइंडिंगसारख्या शरीराच्या लयबद्ध हालचालींचा समावेश असलेल्या लैंगिक नसलेल्या ग्राफिक स्वरूपातील नृत्यावरून, तसेच कमीत कमी कपडे ओझरते दाखवणाऱ्या नृत्यावरून आता जाहिरात कमाई केली जाऊ शकते. पूर्वी असा आशय कमाई करण्यायोग्य मानला जात नव्हता.

ट्वर्किंगसारखे लैंगिक नसलेले ग्राफिक स्वरूपातील नृत्य दाखवणारा आशय, तसेच स्तनपानाशी संबंधित आशय यांवरून निर्माणकर्त्यांना जाहिरात कमाई करू देण्यासाठी आम्ही प्रौढांकरिता असलेल्या आशयाशी संबंधित आमच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये हा बदल करत आहोत.

ही धोरण अपडेट लागू करण्यासाठी गेमिंग आणि कमाई हा लेखदेखील अपडेट केला गेला आहे.

मागील अपडेट

३ महिन्यांपेक्षा जुनी अपडेट

२०२३

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांसंबंधित अपडेट (ऑक्टोबर २०२३)

आम्ही आमच्या “हानिकारक किंवा धोकादायक कृत्ये” या धोरणाचे नाव “हानिकारक कृत्ये आणि अविश्वासार्ह आशय” असे अपडेट केले आहे. खोटे असल्याचे सिद्ध करता येणारे आणि निवडणूक किंवा लोकशाही प्रक्रियेमधील सहभागाला अथवा विश्वासाला लक्षणीयरीत्या हानी पोहोचवू शकतात असे दावे असणार्‍या आशयामधून जाहिरात कमाई केली जाऊ शकत नाही, हे स्पष्ट करण्यासाठी आम्ही काही माहितीदेखील जोडली आहे. उदाहरणार्थ, सार्वजनिक मतदान प्रक्रिया, वय किंवा जन्मस्थानावर आधारित राजकीय उमेदवाराची पात्रता, निवडणूक निकाल किंवा जनगणनेमधील सहभाग यांविषयीची अशी माहिती, जी अधिकृत सरकारी नोंदींशी जुळत नाही. या भागातील कोणत्याही आशयामध्ये खोट्या दाव्यांचा संदर्भ दिला असल्यास, पण त्यामध्ये हा आशय खोटा असल्याचे नमूद केले असल्यास, त्यामधून जाहिरात कमाई केली जाऊ शकते, जसे की समालोचन, शैक्षणिक किंवा माहितीपर आशय.

आम्ही या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, याचा अर्थ जाहिरातदारस्नेही असण्यासाठी तुमचे व्हिडिओ ज्याप्रमाणे तपासले जात होते, त्याप्रमाणेच ते तपासले जातील.

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांसंबंधित अपडेट (सप्टेंबर २०२३)

 आम्ही वादग्रस्त समस्या यांसंबंधित आमची मार्गदर्शक तत्त्वे अपडेट केली आहेत. 

  • निर्माणकर्ते यांना गर्भपात आणि प्रौढ लैंगिक अत्याचार यांसारख्या विषयांवर चर्चा करणार्‍या आशयाद्वारे अधिक जाहिरात कमाई करण्याची अनुमती देणे. याचा अर्थ असा, की जो आशय ग्राफिक तपशील न दाखवता या विषयांवर चर्चा करतो, तो पूर्णपणे कमाई करू शकतो. आम्हाला माहीत आहे, की यांसारखे विषय कव्हर करणारे व्हिडिओ हे वापरकर्त्यांसाठी उपयुक्त स्रोत असू शकतात, त्यामुळे आम्हाला खात्री करायची आहे, की शक्य असेल तिथे, वर्णनात्मक नसलेल्या आणि ग्राफिक नसलेल्या पद्धतीने चर्चा केलेल्या वादग्रस्त समस्या दाखवणाऱ्या आशयावरील कमाई थांबवून निर्माणकर्त्यांना ते तयार करण्यापासून परावृत्त केले जाणार नाही. आम्हाला याचीदेखील पूर्णपणे जाणीव आहे, की काही निर्माणकर्ता समुदायांना असे वाटते, की त्यांच्यावर विषम परिणाम करणाऱ्या विषयांबद्दल आशय अपलोड केल्यामुळे त्यांना अधिक पिवळे आयकन मिळतात. आम्हाला आशा आहे, की या बदलांमुळे सर्व निर्माणकर्ते यांना जाहिरात कमाईच्या पात्रतेसह या विषयांवर चर्चा करण्यासाठी अधिक जागा मिळू शकेल. 
  • याव्यतिरिक्त, आम्ही YouTube समुदाय मार्गदर्शक तत्त्वे सह आमची खाण्याशी संबंधित विकार याची जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे अलाइन केली आहेत. खाण्याशी संबंधित विकारांवर लक्ष केंद्रित करणार्‍या आणि बिंज करणे, लपवणे किंवा अन्न साठवून ठेवणे अथवा रेचकाचा गैरवापर करणार्‍या मार्गदर्शकांसारखे ट्रिगर शेअर करणार्‍या आशयाला जाहिरात कमाई मिळणार नाही. 
    • या बदलामुळे अशा आशयाला जाहिरातींद्वारे प्रोत्साहन दिले जाणार नाही याची खात्री होईल आणि आमची कमाई व समुदाय मार्गदर्शक तत्त्वे सिंक केलेली राहतील. 
    • लक्षात ठेवा की शैक्षणिक किंवा माहितीपर आशय तसेच, अशा अ‍ॅक्टिव्हिटीना प्रमोट न करता खाण्याशी संबंधित विकारामधून वाचलेल्या व्यक्तींकडून या पैलूंचा संदर्भ देणाऱ्या आशयावर या बदलाचा परिणाम होणार नाही.

ही धोरण अपडेट लागू करण्यासाठी गेमिंग आणि कमाई लेखदेखील अपडेट केला गेला आहे.

या अपडेटविषयीच्या अधिक माहितीसाठी, आमचा निर्माणकर्ता इन्सायडर व्हिडिओ पहा.

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांसंबंधित अपडेट (मार्च २०२३)

आम्ही अनुचित भाषेच्या संदर्भातील आमची मार्गदर्शक तत्त्वे अपडेट केली आहेत. खाली यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे, व्हिडिओच्या पहिल्या सात सेकंदांमध्ये किंवा बहुतांश भागामध्ये असभ्य भाषा (उदाहरणार्थ, एफ-वर्ड) वापरल्यास, तुमच्या व्हिडिओवरून कोणतीही जाहिरात कमाई न होण्याऐवजी ती मर्यादित केली जाऊ शकते. व्हिडिओच्या आशयामधील “बिच”, “डूशबॅग”, "ॲसहोल" आणि “शिट” यांसारख्या शब्दांचा वापर हिरव्या रंगाच्या आयकनसाठी पात्र आहे. व्हिडिओच्या पहिल्या आठ ते १५ सेकंदांमध्ये असभ्य भाषा वापरल्यास, आता जाहिरात कमाई होऊ शकते. आम्ही संगीत यामधील असभ्य भाषा कशी हाताळली जाते याबद्दलचे आमचे मार्गदर्शनदेखील स्पष्ट केले आहे. बॅकग्राउंड संगीत, बॅकिंग ट्रॅक, व्हिडिओच्या सुरुवातीला/शेवटी वापरलेले संगीत यांमध्ये अतिशय असभ्य भाषा वापरली असल्यास, जाहिरात कमाई होऊ शकते.

2022

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील अपडेट (नोव्हेंबर २०२२)

स्पष्ट भाषा, विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांमधील बदल आणि जाहिरात अनुरूपता बदलण्यासाठी आम्ही आमची मार्गदर्शक तत्त्वे अपडेट केली आहेत. परिणाम झालेली मार्गदर्शक तत्त्वे तसेच काय बदलत आहे यासंबंधित सर्व घटकांचा समावेश नसलेली उदाहरणे खाली पहा:

  • प्रौढांसाठी असलेला आशय
    • थंबनेल, शीर्षके आणि व्हिडिओ ज्यामध्ये लैंगिक मजकूर (जसे की लिंक, १८ वर्षांहून अधिक वयाच्या दर्शकांसाठी असलेला आशय), अश्लील भाषा, इमेज (जसे की वास्तविक किंवा ॲनिमेटेड स्वरूपात असलेले कमीतकमी झाकलेले नितंब), ऑडिओ (जसे की लैंगिकतेशी संबंधित टिपा किंवा अनुभव शेअर करणे) आणि आनंद देणारी कृत्ये (जसे की प्राण्‍यांचा संभोग किंवा गर्भित लैंगिक कृत्ये) असल्यामुळे जाहिरात कमाई मिळू शकत नाही.
    • प्रेक्षकांना उत्तेजित करण्याचा उद्देश नसलेली अभिजात कलेमधून दर्शवलेली लैंगिक कृत्ये, कामुक नृत्य, लैंगिक शिक्षण यांसाठी लागू होणाऱ्या धोरणामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही आणि यांमधून जाहिरात कमाई मिळू शकते.
  • हिंसा 
    • कोणत्याही संदर्भाविना दाखवलेली ग्राफिक स्वरूपात नसलेली प्रेते, खरे नाव असलेल्या व्यक्तीला लक्ष्य करणारी गेममधील हिंसा किंवा धक्कादायक अनुभव तयार करण्यासाठी निर्माण केलेली कृत्ये (जसे की क्रूर नरसंहार), मृत्यूचा गर्भित क्षण (जसे की लोक असलेल्या इमारतीमध्ये बॉम्बस्फोट करणे) असल्यास जाहिरात कमाई मिळू शकत नाही.
    • रक्तरंजित जखमा पहिल्या आठ सेकंदांनंतर दाखवल्या आहेत असे सामान्य गेम प्ले, ग्राफिक स्वरूपात नसलेल्या शोकांतिका आणि त्यांचे परिणाम (जसे की पूरग्रस्त शहराचे फुटेज) किंवा कायद्याची अंमलबजावणी म्हणून पोलिसांनी व्यक्तीला अटक करणे असल्यास कदाचित जाहिरात कमाई मिळू शकते.
  • हानिकारक किंवा धोकादायक कृत्‍ये 
    • ज्या धोकादायक कृत्यांमध्ये अल्पवयीन मुले सहभागी होतात किंवा बळी पडतात (जसे की मुलांसाठी अयोग्य स्टंटचा समावेश असलेल्या प्रयोगांमध्ये अथवा आव्हानांमध्ये सहभागी होणारी अल्पवयीन मुले) दाखवल्यामुळे जाहिरात कमाई मिळू शकत नाही.
  • संवेदनशील घटना
    • ड्रग ट्रेड ऑर्गनायझेशन (DTO) आणि फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन (FTO) शी संबंधित सर्व विषय संवेदनशील घटना यांऐवजी हानिकारक किंवा धोकादायक कृत्ये या अंतर्गत असतील.
    • संवेदनशील घटनांशी संबंधित धोरणांबाबतची भाषा स्पष्ट आणि समजण्याजोगी आहे याची खात्री करण्यासाठी अपडेट केली गेली आहे, पण धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. 
  • अनुचित भाषा
    • असभ्य भाषेसंदर्भातील आमचा दृष्टिकोन बदलत आहे. असभ्य भाषेच्या सर्व प्रकारांना आता एकाच प्रकारे हाताळले जाईल, याचा अर्थ असा की भाषेच्या तीव्रतेच्या पातळ्यांनुसार त्यांमध्ये फरक केला जाणार नाही (उदा. कमी, मध्यम, तीव्र किंवा अत्यंत तीव्र) आणि यापुढे आम्ही "हेल" आणि "डॅम" हे शब्द असभ्य भाषा असे मानणार नाही. त्यामुळे, शीर्षक, थंबनेल किंवा व्हिडिओच्या पहिल्या सात सेकंदांमध्ये किंवा संपूर्ण व्हिडिओमध्ये सातत्याने वापरल्या जाणार्‍या असभ्य भाषेमुळे जाहिरात कमाई मिळू शकत नाही.
    • व्हिडिओच्या पहिल्या आठ सेकंदांंनंतर असभ्य भाषा वापरली असेल तर, कदाचित जाहिरात कमाई होऊ शकते. संपूर्ण व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या बहुतांश भागामध्ये असभ्य भाषा वापरल्यास, त्या आशयावरून कमाई न करण्याचे आमचे धोरण बदलत नाही.
  • अमली पदार्थ आणि अमली पदार्थासंबंधित आशय
    • गेमिंग आशयामध्ये अमली पदार्थांचा वापर आणि सेवन, जसे की इंजेक्शन किंवा जॉइंट स्मोकिंग दाखवले असल्याच कदाचित जाहिरात कमाई मिळू शकणार नाही. 
    • गेमिंग आशयामध्ये अमली पदार्थांचे व्यवहार किंवा अमली पदार्थांचा उल्लेख असल्यास कदाचित जाहिरात कमाई मिळू शकते.

अप्रामाणिक वर्तनाला प्रोत्साहन देणे यासंबंधित मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत आम्ही नवीन मार्गदर्शक तत्त्वेदेखील सादर करत आहोत. खालील आशय आता "या आशयाला जाहिरात कमाई मिळणार नाही" या व्याप्तीमध्ये असेल: 

  • मालमत्तेच्या मालकाच्या परवानगीशिवाय किरकोळ विक्रेत्याच्या दुकानातील कर्मचारी असल्याचे भासवणे किंवा त्यांच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणे (जसे की त्यांच्या व्यवसाय तासांनंतर राहणे). 
  • स्पर्धात्मक ई-स्पोर्टमध्ये सॉफ्टवेअर हॅकिंगच्या पद्धतीचा वापर करणे किंवा प्रोत्साहन देणे.

ही धोरण अपडेट दर्शवण्यासाठी गेमिंग आणि कमाई लेखदेखील समांतररीत्या अपडेट केला गेला आहे.
 

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील अपडेट (ऑक्टोबर २०२२)

VOD (दीर्घ स्वरूपातील व्हिडिओ) आणि Shorts फॉरमॅट या दोन्हींसाठी आजची व्हिडिओ पातळीवरील कमाईशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे लागू होतात हे निर्माणकर्ता समुदायाला स्पष्ट करण्यासाठी जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे पेज अपडेट केले गेले आहे. धोरणामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, याचा अर्थ असा आहे, की तुमचे व्हिडिओ जाहिरातदारस्नेही असण्यासाठी ज्याप्रकारे तपासले जात होते त्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणताही फरक आढळणार नाही. अपडेट केल्यावर आम्ही पुढील अपडेट देऊ. Shorts वरील जाहिरात कमाईची वाटणी कधी सुरू होते याबद्दल तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता.

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील अपडेट (ऑगस्ट २०२२)

हानिकारक किंवा धोकादायक असू शकणार्‍या आशयाबाबत कमाईसंबंधी मार्गदर्शन आम्ही अपडेट केले आहे. व्हिजिलान्तिझम दर्शवणारी अपलोड जाहिराती रन करू शकत नाहीत. 

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे पेज अपडेट केले आहे. धोरणामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, याचा अर्थ असा आहे, की तुमचे व्हिडिओ जाहिरातदारस्नेही असण्यासाठी ज्याप्रकारे तपासले जात होते त्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणताही फरक आढळणार नाही.

मुले आणि कुटुंबांसाठी अयोग्य आशय याकरिता जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील अपडेट (एप्रिल २०२२)

जाहिरातींसाठी काय अनुकूल आहे आणि काय नाही याबाबत निर्माणकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात मदत करण्यासाठी, “मुलांसाठी तयार केलेला” आशय याकरिता जाहिरात मार्गदर्शक तत्त्वे आम्ही नुकतीच अपडेट केली आहेत. आम्ही “मुले आणि कुटुंबांसाठी अयोग्य आशय” या नावाचे एक नवीन मार्गदर्शक तत्त्व तयार केले आहे, यामध्ये तीन वर्गवार्‍या आहेत: नकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन देणारा आशय, मुलांना लक्ष्य करणारा प्रौढांसाठी असलेला आशय आणि मुलांना लक्ष्य करणारा धक्कादायक आशय. 

युक्रेनमधील युद्धाशी संबंधित अपडेट (मार्च २०२२)

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भात आम्ही जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे पेजवर मार्गदर्शन पोस्ट केले आहे: 

युक्रेनमधील युद्धामुळे, युद्धाचा फायदा घेणारा, तो फेटाळणारा किंवा त्याचे समर्थन करणारा आशय पुढील सूचनेपर्यंत कमाईसाठी अपात्र आहे. या अपडेटचा उद्देश या युद्धाशी संबंधित आमचे मार्गदर्शन स्पष्ट करणे आणि काही बाबतींमध्ये त्याचा विस्तार करणे हा आहे.

२०२१

प्रौढांसाठी असलेल्या आशयासाठी जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील अपडेट (डिसेंबर २०२१)

लिंगाधारित ओळख असलेल्या डिव्हाइसचा समावेश असणार्‍या आशयाबाबत कमाईसंबंधी मार्गदर्शन आम्ही अपडेट केले आहे. निर्माणकर्ते त्यांचा लिंगासंबंधी अस्वस्थतेचा प्रवास स्पष्ट करत असताना त्यांना साहाय्य करणारी, नग्नता न दाखवता स्तन किंवा लिंग यांसारख्या जननेंद्रियांशी साम्य असणार्‍या वस्तू दर्शवणारी अपलोड जाहिराती रन करू शकतात.

हानिकारक किंवा धोकादायक कृत्ये यांसाठी जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील अपडेट (ऑक्टोबर २०२१)

पुढील धोरण क्षेत्रांमध्ये अधिक स्पष्ट उदाहरणांचा समावेश करण्यासाठी, आम्ही आमची मार्गदर्शक तत्त्वे अपडेट केली आहेत: प्रौढांसाठी असलेला आशय, हिंसा, धक्कादायक आशय, द्वेषपूर्ण आणि मानहानीकारक आशय, संवेदनशील घटना, बंदुकांशी संबंधित आशय व मनोरंजनासाठीचे अमली पदार्थ आणि अमली पदार्थांशी संबंधित आशय. संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वांमध्ये वापरलेल्या प्रमुख संज्ञा स्पष्ट करण्यासाठी, आम्ही नवीन व्याख्या विभागदेखील जोडला आहे.

त्यासोबतच, आम्ही एक नवीन मार्गदर्शक तत्त्व सादर करत आहोत: अप्रामाणिक वर्तनाला प्रोत्साहन देणे. वैयक्तिक कारणासाठी किंवा पैशांसाठी केलेले अतिक्रमण, फसवणूक अथवा काँप्युटर हॅकिंग यांच्याशी संबंधित आशयासाठी जाहिरातविषयक सेवेच्या पात्रतेसंबंधी हे मार्गदर्शन पुरवते.

पुनरावलोकनाच्या सुलभतेसाठी, COVID-19 शी संबंधित आशयावरून कमाई करण्याबाबतचे आमचे मार्गदर्शनदेखील आम्ही यापूर्वीच्या स्वतंत्र पेजवरून थेट जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमध्ये हलवत आहोत. पूर्वीच्या पेजला दिलेल्या भेटी जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यावर रीडिरेक्ट होतील.

ही धोरण अपडेट दर्शवण्यासाठी गेमिंग आणि कमाई लेखदेखील समांतररीत्या अपडेट केला गेला आहे.

हानिकारक किंवा धोकादायक कृत्ये यांसाठी जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील अपडेट (ऑक्टोबर २०२१)

नोव्हेंबरमध्ये आम्ही हवामान बदलाविषयीच्या चुकीच्या माहिती संदर्भातील कमाईसंबंधी मार्गदर्शन अपडेट करून हे अधिक स्पष्ट करत आहोत, की हवामान बदलाविषयीच्या चुकीच्या दाव्यांना प्रोत्साहन देणारा, वैज्ञानिक सहमतीला विरोध दर्शवणारा आशय जाहिराती रन करू शकणार नाही. याबद्दलच्या शैक्षणिक, माहितीपर किंवा बातम्यांसंबंधी आशयावर जाहिराती रन होणे सुरू राहू शकेल.

या अपडेटबाबत अधिक माहितीसाठी येथील Google Ads मदत केंद्र ला भेट द्या.

बंदुकांशी संबंधित आशयासाठी जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील अपडेट (सप्टेंबर २०२१)

बंदुकांशी संबंधित आशयाबाबत आमची सध्याची कमाईसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे आम्ही स्पष्ट करत आहोत. देखभालीसाठी शस्त्रांचे भाग वेगळे करणे आणि पुन्हा जोडणे असे दाखवणार्‍या आशयावर जाहिराती रन होऊ शकतात. बंदुकांशी संबंधित आशयाच्या इतर प्रकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वेदेखील आम्ही मजबूत करत आहोत.

हे दर्शवण्यासाठी, ऑक्टोबरमध्ये बंदुकांशी संबंधित आशय या अंतर्गत जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे पेज अपडेट केले जाईल.

हिंसेसाठी जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील अपडेट (जुलै २०२१)

आम्ही हिंसेशी संबंधित कमाईबद्दलचे मार्गदर्शन अपडेट करणार आहोत, ज्यामुळे मानवी हस्तक्षेपामुळे संकटात असलेले प्राणी दाखवणारे फुटेज जाहिराती रन करू शकणार नाही हे अधिक स्पष्ट होईल.

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे आणि गेमिंग व कमाई यांमधील एकाहून अधिक धोरणांसाठी अपडेट यांसंबंधी लेख (एप्रिल २०२१)

जाहिरातदार औद्योगिक मानके कायम ठेवणे सुरू ठेवत असतानाच, निर्माणकर्ता आणि जाहिरातदार आउटपुटच्या आधारावर, पूर्ण कमाईसाठी (हिरवा आयकन) पात्र ठरण्याकरिता आणखी आशयाला अनुमती देण्यासाठी, आम्ही आमची मार्गदर्शक तत्त्वे अपडेट केली आहेत. 
 
प्रथम, आम्ही शैक्षणिक, माहितीपर किंवा बातम्यांशी संबंधित आशयावर कमाईचा विस्तार करत आहोत, ज्यामध्ये कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत हिंसक संघर्ष, मनोरंजनासाठीचे अमली पदार्थ आणि अमली पदार्थांशी संबंधित आशय अथवा संवेदनशील घटना यांचा समावेश असू शकतो. जिथे व्हिडिओमध्ये वादग्रस्त समस्यांच्या ग्राफिक नसलेल्या, वस्तुनिष्ठ चर्चा आहेत अशा वादग्रस्त समस्यांसाठीदेखील आम्ही कमाईचा विस्तार करत आहोत. 
 
दुसरे, आम्ही विनोदाचा संदर्भ (उदा. रोमान्स, डेटिंगबद्दलचे विनोद) आणि पहिल्या ३० सेकंदांमध्ये पुरेश्या असभ्य भाषेचा (उदा. शिट, बिच) वापर यांमार्फत डिलिव्हर केलेल्या प्रौढांसाठीच्या थीमना अनुमती देण्यासाठीदेखील कमाईचा विस्तार करत आहोत.

त्यासोबतच, आम्ही पुढील विभागांमध्ये त्यांचे मार्गदर्शन अधिक स्पष्ट करण्यासाठी आणखी उदाहरणांचा समावेश केला आहे: जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील प्रौढांसाठी असलेला आशय, हानिकारक किंवा धोकादायक कृत्ये आणि बंदुकांशी संबंधित विभाग.
 
गेमिंग आणि कमाई लेखाचा गेमिंग व्हिडिओवरून कमाई करण्यासाठी टिपा हा विभागदेखील धोरण अपडेट दर्शवण्यासाठी समांतररीत्या अपडेट केला गेला आहे.

अनुचित भाषा, हिंसा, मनोरंजनासाठीचे अमली पदार्थ आणि अमली पदार्थांशी संबंधित आशयाबाबत मार्गदर्शक तत्त्वे यांसाठीच्या मार्गदर्शनामधील भर, त्याचप्रमाणे आमच्या COVID-19 शी संबंधित कमाईबाबतच्या धोरणामधील अपडेट (फेब्रुवारी २०२१)

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे लेखामध्ये आता अनुचित भाषा, हिंसा, मनोरंजनासाठीचे अमली पदार्थ आणि अमली पदार्थांशी संबंधित आशयाबाबत मार्गदर्शक तत्त्वांसाठी “तुम्ही या आशयासाठी जाहिराती सुरू करू शकता” विभागांमध्ये अतिरिक्त उदाहरणांचा समावेश आहे.

त्यासोबतच, लसीकरणासंबंधी आशयाबाबत अधिक मार्गदर्शन पुरवण्यासाठी, COVID-19 विषयीच्या आशयावरून कमाईसंबंधी अपडेट लेखामध्ये, त्याचप्रमाणे आमच्या जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांच्या हानिकारक आणि धोकादायक कृत्ये विभागामध्ये अपडेट केली गेली आहेत.

गेमिंग आशयासाठी जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे संदर्भित करणार्‍या नवीन पेजची निर्मिती (जानेवारी २०२१)

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात गेमिंग आशयाच्या YouTube निर्माणकर्त्यांना मदत करण्यासाठी, गेमिंग आणि कमाईचा विषय संदर्भामध्ये आणण्यात मदत करण्याकरिता आम्ही नवीन पेज प्रकाशित केले आहे. 

विशेषतः गेमिंग आशयाचा विषय येतो, तेव्हा आमची मार्गदर्शक तत्त्वे अधिक स्पष्ट करणे आणि गेमिंग आशयाच्या YouTube निर्माणकर्त्यांसाठी स्वप्रमाणीकरण समजून घेण्यात सुधारणा करणे या उद्देशाने हे नवीन पेज तयार केले गेले आहे. 

धोरणामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, याचा अर्थ असा आहे, की तुमचे व्हिडिओ जाहिरातदारस्नेही असण्यासाठी ज्याप्रकारे तपासले जात होते त्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणताही फरक आढळणार नाही. 

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांच्या विविध विभागांमधील आणखी माहिती आणि उदाहरणे पुरवणारी अपडेट, स्वप्रमाणीकरणासह तुमचा आशय रेट करणे हा लेख आता डेप्रिकेट केला गेला आहे (जानेवारी २०२१)

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे लेख आता अतिरिक्त मार्गदर्शन आणि स्वप्रमाणीकरणाच्या उदाहरणांसह अपडेट केला गेला आहे. याच्याशी सुसंगत राहून, स्वप्रमाणीकरणासह तुमचा आशय रेट करा हा लेख आता डेप्रिकेट केला गेला आहे. 

प्रौढांसाठी असलेला आशय आणि द्वेषपूर्ण व मानहानीकारक आशय धोरणांसाठी “तुम्ही जाहिराती सुरू करू शकता, पण फक्त निवड करणारे ब्रँड जाहिरात रन करतील” (मर्यादित जाहिराती) आणि “तुम्ही या आशयासाठी जाहिराती बंद केल्या पाहिजेत” (शून्य जाहिराती) या अंतर्गत नवीन, व्यापक उदाहरणे ही कोणता आशय व्याप्तीमध्ये आहे हे अधिक स्पष्ट करतात. आम्ही धोरणाशी संबंधित तपशीलवार आणि पारदर्शक मार्गदर्शन पुरवत असल्याची खात्री करण्यासाठी, संवेदनशील घटना आणि वादग्रस्त समस्या यांसंबंधी धोरणेदेखील वेगळी केली आहेत. 

ज्यांचा परिणाम मर्यादित किंवा शून्य जाहिरातींमध्ये होऊ शकतो अशा आशयाची अतिरिक्त उदाहरणे दर्शवण्यासाठी, हानिकारक किंवा धोकादायक कृत्यांसंबंधी धोरणांमध्ये किरकोळ भर घातली गेली आहे. 

YouTube Studio मधील स्वप्रमाणीकरणाशी संबंधित प्रश्नावलीमध्ये इतर धोरणांच्या अंतर्गत ही धोरणे बंडल केली गेली आहेत हे वाचकांना कळवण्यासाठी, कुटुंब आशय धोरणांमध्ये भडकवणारा आणि तिरस्कार करणारा, तंबाखूशी संबंधित आशय व प्रौढांसाठीच्या थीम यांवर नवीन टीप जोडली गेली आहे.

धोरणामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, याचा अर्थ असा आहे, की तुमचे व्हिडिओ जाहिरातदारस्नेही असण्यासाठी ज्याप्रकारे तपासले जात होते त्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणताही फरक आढळणार नाही.

2020

अधिक माहिती आणि उदाहरणे पुरवणारी, स्वप्रमाणीकरणासह तुमचा आशय रेट करणे याच्या अनेक विभागामधील अपडेट (ऑक्टोबर २०२०)

व्याप्तीमध्ये कोणता आशय आहे हे अधिक स्पष्ट करण्यासाठी, स्वप्रमाणीकरणासह तुमचा आशय रेट करणे लेखामध्ये आता “तुम्ही या आशयासाठी जाहिराती सुरू करू शकता” या अंतर्गत हिंसा आणि प्रौढांसाठी असलेल्या आशयासंबंधी धोरणांच्या अधिक व्यापक उदाहरणांचा समावेश केला गेला आहे. वादग्रस्त समस्या आणि संवेदनशील घटना विभागामध्ये आम्ही “संवेदनशील घटना” व “फोकस” यांच्या व्याख्यादेखील स्पष्ट केल्या आहेत.

भावनिक त्रास होऊ शकेल अशा खोड्यांची उदाहरणे दर्शवण्यासाठी आणि अतिशय असभ्य भाषेच्या वारंवार केलेल्या वापरामुळे मर्यादित किंवा शून्य जाहिराती मिळू शकतात हे स्पष्ट करण्यासाठी, हानिकारक किंवा धोकादायक कृत्ये व अनुचित भाषा विभागांमध्ये किरकोळ भर घातली गेली आहे. 

धोरणामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, याचा अर्थ असा आहे, की तुमचे व्हिडिओ जाहिरातदारस्नेही असण्यासाठी ज्याप्रकारे तपासले जात होते त्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणताही फरक आढळणार नाही.

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमध्ये विशेषतः बातम्यांसाठी असलेल्या मार्गदर्शनाची भर (ऑगस्ट २०२०)

आमच्या धोरणांचा सद्य घडामोडींबाबतच्या बातम्या देण्यावर कसा परिणाम होतो याचा समावेश करण्यासाठी, हिंसा आणि वादग्रस्त समस्या व संवेदनशील घटना यांसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली जातील. 

ऑगस्टमध्ये हे अपडेट लाइव्ह केले जाईल.

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमध्ये धक्कादायक आशयाची भर (ऑगस्ट २०२०)

धक्कादायक आशयासंबंधी मार्गदर्शक तत्त्व हे सद्य धोरणाचे स्पष्टीकरण दर्शवते आणि दर्शकांना अस्वस्थ करणे, त्यांच्या मनात किळस निर्माण करणे किंवा त्यांना धक्का देणे हे करू शकणार्‍या आशयावर लक्ष केंद्रित करते. कोणत्या प्रकारच्या आशयासाठी जाहिराती रन करू शकत नाही हे चांगल्या रीतीने समजून घेण्यात निर्माणकर्त्याला मदत व्हावी याकरिता आम्ही स्रोतांमध्ये हा बदल करत आहोत.

स्वप्रमाणीकरण प्रश्नावलीमध्ये नवीन विभाग जोडला जाईल. निर्माणकर्ता समुदायाला शक्य तितके तपशील देण्यासाठी, ऑगस्टमध्ये जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे आणि स्वप्रमाणीकरणासह तुमचा आशय रेट करणे यांमध्येदेखील अपडेट जोडली जातील. 

धोरणामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, याचा अर्थ असा आहे, की तुमचे व्हिडिओ जाहिरातदारस्नेही असण्यासाठी ज्याप्रकारे तपासले जात होते त्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणताही फरक आढळणार नाही.

अनुचित भाषेशी संबंधित अपडेट (जून २०२०)

अनुचित भाषा सेन्सॉर करण्यासाठी उद्देशित असलेल्या शीर्षकामध्ये किंवा थंबनेलमध्ये चुकीचे शब्दलेखन असलेल्या असभ्य भाषेमुळे मर्यादित किंवा जाहिराती दाखवल्या जाणार नाहीत हे स्पष्ट करण्यासाठी, या विभागातील शब्दरचनेमध्ये दुरुस्त्या केल्या गेल्या आहेत. निर्माणकर्ते येथे अपडेट केलेली भाषा पाहू शकतात.  

धोरणामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, याचा अर्थ असा आहे, की तुमचे व्हिडिओ जाहिरातदारस्नेही असण्यासाठी ज्याप्रकारे तपासले जात होते त्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणताही फरक आढळणार नाही.

स्वप्रमाणीकरणासह तुमचा आशय रेट करणे यासंबंधित अपडेट (मे २०२०)

लेखामध्ये आता तुमच्या खात्यामध्ये सापडणार्‍या प्रश्नावलीमध्ये नमूद केलेल्या प्रत्येक पर्यायामध्ये मोडणार्‍या आशयाच्या प्रकारांच्या उदाहरणांचा समावेश केला गेला आहे. संपूर्ण प्रश्नावलीमध्ये संदर्भ दिलेल्या, नग्नतेसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांच्या व्याख्यांचादेखील आम्ही समावेश केला आहे.

धोरणामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, याचा अर्थ असा आहे, की तुमचे व्हिडिओ जाहिरातदारस्नेही असण्यासाठी ज्याप्रकारे तपासले जात होते त्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणताही फरक आढळणार नाही.

COVID-19 शी संबंधित नवीनतम अपडेट (एप्रिल २०२०)

COVID-19 चा संदर्भ देणारा आणि/किंवा त्याचा समावेश असणारा व आमची जाहिरातदारस्नेही आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वे यांचे पालन करणारा आशय आता कमाई करू शकतो (आणि हिरवा आयकन दिसेल). COVID-19 संबंधी आशयावरून कमाई करण्याबाबत अधिक तपशीलवार मार्गदर्शन येथे पहा.

वादग्रस्त समस्या आणि संवेदनशील घटना व अनुचित भाषा यांमधील अपडेट (फेब्रुवारी २०२०)

लेखामध्ये आता वादग्रस्त समजल्या जाणार्‍या समस्यांची अधिक व्यापक सूची आणि आम्ही संवेदनशील घटनांची व्याख्या कशी करतो याचा समावेश आहे. अनुचित भाषेबाबत आमची मार्गदर्शक तत्त्वेदेखील आम्ही स्पष्ट केली आहेत.

धोरणामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, याचा अर्थ असा आहे, की तुमचे व्हिडिओ जाहिरातदारस्नेही असण्यासाठी ज्याप्रकारे तपासले जात होते त्या पद्धतीमध्ये तुम्ही कोणत्याही फरकाची अपेक्षा करू नये.

२०१९

जाहिरातदारस्नेही आशय मार्गदर्शक तत्त्वे यांमधील अपडेट (जून २०१९)

लेखामध्ये आता मर्यादित किंवा जाहिराती न दाखवल्या जाणाऱ्या आशयाच्या आणखी उदाहरणांचा समावेश आहे. 

धोरणामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, याचा अर्थ असा आहे, की तुमचे व्हिडिओ जाहिरातदारस्नेही असण्यासाठी ज्याप्रकारे तपासले जात होते त्या पद्धतीमध्ये तुम्ही कोणत्याही फरकाची अपेक्षा करू नये.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18140361214517858974
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false