मी डाउनलोड केलेला व्हिडिओ मला पाहता येत नाही

व्हिडिओ डाउनलोड कसे करावेत याबद्दल जाणून घ्या आणि तुमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी खालील पायऱ्यांचे पुनरावलोकन करा.

अनेक सामान्य समस्यांचे निराकरण करणारी पहिली पायरी म्हणून, YouTube अ‍ॅप किंवा ब्राउझर विंडो बंद करून पुन्हा उघडा. यानंतर, तुमचे डिव्हाइस रीस्टार्ट करण्याचा प्रयत्न करा.

नवीन डिव्हाइसवर व्हिडिओ पुन्हा डाउनलोड करणे

तुम्ही अलीकडे नवीन डिव्हाइस घेतले असल्यास, तुम्हाला पाहायचे असलेले कोणतेही व्हिडिओ तुम्हाला पुन्हा डाउनलोड करावे लागतील. तुम्ही त्याच खात्यामध्ये साइन इन केले, तरीही इतर डिव्हाइसवर व्हिडिओ ट्रान्सफर केले जात नाहीत. डाउनलोड केलेले व्हिडिओ हे त्याच डिव्हाइसमध्ये राहतात.

तुमचे सदस्यत्व एक्स्पायर झाले नसल्याचे तपासणे

तुमचे YouTube Premium सदस्यत्व एक्स्पायर झाले नसल्याची खात्री करा.

YouTube ॲपमध्ये, तुमचा प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर सशुल्क सदस्यत्वे वर टॅप करा आणि खाली व्यवस्थापित करा वर स्क्रोल करा.

  • तुम्ही अलीकडेच YouTube Premium चा ॲक्सेस गमावला असल्यास आणि पुन्हा सदस्यत्व घेतले असल्यास, पुन्हा सदस्यत्व घेतल्यावर सेव्ह केलेले व्हिडिओ दिसण्यासाठी काही तास लागतील.
  • तुम्हाला एखादा व्हिडिओ लगेच पाहायचा असल्यास, मेनू  Three-dot menu vertical वर टॅप करा आणि डाउनलोड करण्याचा पुन्हा प्रयत्न करा निवडा.
  • तुमचे YouTube Premium सदस्यत्व संपल्यास, तुम्हाला यापुढे तुमच्या डाउनलोड केलेल्या व्हिडिओचा ॲक्सेस नसेल. तुमच्या डाउनलोडचा अ‍ॅक्सेस पुन्हा मिळवण्यासाठी, Premium सदस्यत्वासाठी साइन अप करणे हे करा.

तुम्ही YouTube Premium मध्ये साइन इन केले असल्याचे तपासा

तुम्ही तुमच्या YouTube Premium सदस्यत्वाशी संबंधित Google खाते मध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा:

  • YouTube Premium शी संबंधित खात्यामधून साइन आउट करून पुन्हा साइन इन करून पहा.
  • तुम्हाला (YouTube च्या लोगोऐवजी) YouTube Premium चा लोगो दिसत असल्याचे तपासा. YouTube मोबाइल ॲपमध्ये किंवा तुमच्या कॉंप्युटरवर, तुम्हाला तुमच्या ॲपच्या अथवा ब्राउझरच्या सर्वात वरती डाव्या कोपऱ्यामध्ये YouTube Premium चा लोगो दिसायला हवा.
स्मार्ट टीव्हीवर YouTube वापरत आहात का?
  • तुम्ही तुमच्या YouTube Premium सदस्यत्वाशी संबंधित खाते वापरून तुमच्या टीव्हीवर साइन इन केले असल्याची खात्री करा.
  • तुम्ही टीव्हीवर कास्ट करत असल्यास, टीव्ही आणि तुम्ही वापरत असलेला कॉंप्युटर किंवा डिव्हाइस या दोन्ही ठिकाणी साइन इन केले असल्याची खात्री करा. 
  • तुम्ही Google Home वापरत असल्यास, Google Home अ‍ॅपमध्ये योग्य खात्यात साइन इन केले असल्याची खात्री करा.

सपोर्टशी संपर्क साधणे आणि उत्पादनासंबंधित फीडबॅक सबमिट करणे

तुम्हाला अजूनही समस्या येत असल्यास, सपोर्टशी संपर्क साधणे हे करा. सपोर्टशी संपर्क साधताना पुढील गोष्टींचा उल्लेख करा:

  • तुम्हाला एरर मेसेज दिसत आहे का?
  • तो कुठे दिसत आहे आणि नेमका मजकूर काय आहे? शक्य असल्यास, स्क्रीनशॉटचा समावेश करा.
YouTube ला उत्पादनाशी संबंधित फीडबॅक पाठवणे:
  • तुम्ही तुमच्या समस्येबद्दल फीडबॅकदेखील सबमिट करू शकता. तुम्हाला प्रतिसाद मिळणार नाही, पण तुमचा फीडबॅक YouTube सोबत शेअर केला जाईल.
  • उत्पादनाशी संबंधित फीडबॅक पाठवण्यासाठी, YouTube मध्ये तुमचा प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर फीडबॅक Feedback निवडा.
  • तुमची समस्या आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यात आम्हाला मदत व्हावी, यासाठी "सिस्टीम लॉग" याकरिताचा बॉक्स नक्की निवडा.

यावर परत जा YouTube Premium चे सदस्य फायदे ट्रबलशूट करणे.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17184196093825260271
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false