बॅकग्राउंड प्ले काम करत नाही

बॅकग्राउंड प्ले फक्त YouTube मोबाइल अ‍ॅप्समध्ये काम करते आणि त्यासाठी YouTube Premium सदस्यत्व आवश्यक आहे. तुमच्याकडे चॅनल सदस्यत्व असले, तरीही काही व्हिडिओ बॅकग्राउंड प्ले करण्यासाठी किंवा ऑफलाइन डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाहीत. तुमच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत व्हावी, यासाठी खालील पायऱ्यांचे पुनरावलोकन करा.

सर्वसाधारण ट्रबलशूटिंगसंबंधित पायऱ्या

 YouTube अ‍ॅप रीस्टार्ट करा किंवा तुमचे डिव्हाइस रीबूट करा

YouTube अ‍ॅप किंवा तुमचे मोबाइल डिव्हाइस काही वेळापासून रन होत असल्यास, बॅकग्राउंड प्लेने सुरळीतपणे काम करण्यासाठी कदाचित पुरेसे स्रोत नसतील. YouTube अ‍ॅप बंद करून किंवा तुमचा फोन रीबूट करून पहा.

तुमचे सदस्यत्व एक्स्पायर झाले नसल्याचे तपासणे

तुमचे YouTube Premium सदस्यत्व एक्स्पायर झाले नसल्याची खात्री करा. YouTube अ‍ॅपमध्ये, तुमचा प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर सशुल्क सदस्यत्वे वर टॅप करा आणि खाली व्यवस्थापित करा वर स्क्रोल करा.

तुम्ही अलीकडेच YouTube Premium चा अ‍ॅक्सेस गमावला असल्यास आणि पुन्हा सदस्यत्व घेतले असल्यास, लक्षात घ्‍या, की तुम्ही पुन्हा सदस्यत्व घेतल्यावर सेव्ह केलेले व्हिडिओ परत दिसण्यासाठी काही तास लागतील. तुम्हाला एखादा व्हिडिओ लगेच पाहायचा असल्यास, आणखी '' वर टॅप करा आणि डाउनलोड करण्याचा पुन्हा प्रयत्न करा निवडा.

YouTube Premium मध्ये पुन्हा साइन इन करून पाहणे

तुम्ही तुमच्या YouTube Premium सदस्यत्वाशी संबंधित खात्यामध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा.

  • YouTube Premium शी संबंधित खात्यामधून साइन आउट करून पुन्हा साइन इन करून पहा.
  • तुम्हाला YouTube मध्ये (YouTube लोगोऐवजी) YouTube Premium लोगो दिसत असल्याचे तपासा.

तुमच्या स्थानावरील YouTube Premium ची उपलब्धता तपासणे

YouTube Premium फायदे हे फक्त YouTube Premium उपलब्ध असलेल्या देशांमध्ये काम करतात. तुम्ही YouTube Premium लाँच केलेल्या स्थानी आहात का ते तपासणे हे करा.

तुमची बॅकग्राउंड प्लेबॅक सेटिंग्ज तपासणे

तुम्ही सेटिंग बंद केले नसल्याची खात्री करण्यासाठी, YouTube अ‍ॅपमध्ये तुमचीबॅकग्राउंड प्लेबॅक सेटिंग्ज तपासा.

तुमचे YouTube अ‍ॅप अपडेट करणे

तुम्ही YouTube ॲपची नवीनतम आवृत्ती वापरत असल्याची खात्री करा. तुमच्या डिव्हाइसच्या ॲप स्‍टोअरला भेट द्या आणि तुमच्याकडे YouTube ॲपशी संबंधित कोणतीही प्रलंबित अपडेट आहेत का ते तपासा.

तुमच्याकडे नवीन फोन असल्यास किंवा तुम्ही अलीकडेच तुमचा फोन रिस्टोअर केला असल्यास, त्यामध्ये YouTube ॲपची जुनी आवृत्ती असू शकते (उदा. 12.0 च्या खालील आवृत्त्या या कालबाह्य मानल्या जातात).

तुमच्या फोनची मोबाइल डेटा सेटिंग्ज तपासणे

तुम्ही YouTube साठी बॅकग्राउंड डेटा सुरू केला असल्याची खात्री करण्यासाठी तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरील सेटिंग्ज तपासा.

वापरून पाहण्यासाठी अतिरिक्त पायऱ्या

इतर कोणतीही अ‍ॅप्स ऑडिओ प्ले करत नसल्याची पडताळणी करा

तुम्ही उघडलेली कोणतीही अ‍ॅप्स ऑडिओ प्ले करत नसल्याची खात्री करण्यासाठी ते तपासा. इतर अ‍ॅप्स ऑडिओ प्ले करत असताना बॅकग्राउंड प्ले काम करणार नाही.

तुमच्या इंटरनेट कनेक्शनची क्षमता तपासा

व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी मजबूत इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. तुमचे डिव्‍हाइस ३Mbps किंवा अधिक वेगवान वाय-फाय नेटवर्कशी अथवा 3G, 4G किंवा LTE च्या वेगाला सपोर्ट करणारा डेटा प्‍लॅन असलेल्या मोबाइल नेटवर्कशी जोडलेले असल्‍याची खात्री करा. तुमचा सध्याचा इंटरनेटचा वेग किती आहे याची तुम्हाला खात्री नसल्यास, तुम्ही तुमचा वेग ऑनलाइन तपासणे हे करू शकता.

तुमच्या फोनची सूचना सेटिंग्ज तपासणे

तुम्ही YouTube अ‍ॅपसाठी सर्व सूचना ब्लॉक केल्या नाहीत हे तपासा. तुम्ही तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जमध्ये हे कंफर्म करू शकता. तुम्ही सूचना ब्लॉक केल्या असल्यास, YouTube अ‍ॅप कदाचित सुरळीतपणे रन होणार नाही आणि/किंवा बॅकग्राउंडमध्ये इंटरनेट अ‍ॅक्सेस करू शकणार नाही.

असे झाल्यास, तुम्हाला OS पातळीवर YouTube सूचना पुन्हा सुरू कराव्या लागतील आणि तरीही तुम्हाला सूचना मिळवायच्या नसल्यास, तुम्ही त्या YouTube अ‍ॅप सेटिंग्जमधून बंद करू शकता.

सपोर्टशी संपर्क साधणे आणि उत्पादनासंबंधित फीडबॅक सबमिट करणे

तुम्हाला अजूनही समस्या येत असल्यास, सपोर्टशी संपर्क साधणे हे करा. सपोर्टशी संपर्क साधताना कृपया पुढील गोष्टींचा उल्लेख करा:
  • तुम्ही अ‍ॅपमधून बाहेर पडल्यावर, आवाज लगेच थांबतो की तो काही वेळ प्ले होतो, पण नंतर अनपेक्षितपणे थांबतो हे नमूद करा.
  • तुम्ही अ‍ॅपवर परत आल्यावर तुम्हाला दिसणारे कोणतेही एरर मेसेज कृपया नमूद करा.
  • कृपया अ‍ॅपमधील फीडबॅक सबमिट करा.
YouTube ला उत्पादनासंबंधित फीडबॅक पाठवणे:
  • तुम्ही उत्पादनामधील फीडबॅकदेखील सबमिट करू शकता. तुम्हाला प्रतिसाद मिळणार नाही, पण तुमचा फीडबॅक YouTube उत्पादन टीमसोबत शेअर केला जाईल.
  • हे करण्यासाठी, YouTube मध्ये तुमचा प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर फीडबॅक Feedback निवडा.
  • "सिस्टीम लॉग" साठीचा बॉक्स नक्की निवडा. यामुळे तुमची समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात आम्हाला मदत होते. 

 

यावर परत जा YouTube Premium चे सदस्य फायदे ट्रबलशूट करणे  

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11502155429034979014
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false