मी व्हिडिओ डाउनलोड करू शकत नाही

टीप: तुमच्याकडे YouTube Premium नसल्यास किंवा डाउनलोड करणे तुमच्यासाठी उपलब्ध नसल्यास, डाउनलोड करा हे बटण उपलब्ध नसेल आणि मुलांकरिता तयार केलेल्या व्हिडिओवर ते निकामी केलेले असेल. तुमचे YouTube Premium सदस्यत्व संपल्यास, तुम्हाला यापुढे तुमच्या डाउनलोड केलेल्या व्हिडिओचा ॲक्सेस नसेल.

तुम्ही YouTube Premium मध्ये साइन इन केले असल्याचे तपासा 

तुम्ही तुमच्या YouTube Premium सदस्यत्वाशी संबंधित Google खाते मध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा. लक्षात ठेवा, की हे खाते तुमच्या Apple आयडीपेक्षा वेगळे असू शकते.
  • YouTube Premium शी संबंधित खात्यामधून साइन आउट करून पुन्हा साइन इन करून पहा.
  • ​तुम्हाला (YouTube च्या लोगोऐवजी) YouTube Premium चा लोगो दिसत असल्याचे तपासा. YouTube मोबाइल ॲपमध्ये किंवा तुमच्या कॉंप्युटरवर, तुम्हाला तुमच्या ॲपच्या अथवा ब्राउझरच्या सर्वात वरती डाव्या कोपऱ्यामध्ये YouTube Premium चा लोगो दिसायला हवा.
स्मार्ट टीव्हीवर YouTube वापरत आहात का?
  • तुम्ही तुमच्या YouTube Premium सदस्यत्वाशी संबंधित खाते वापरून तुमच्या टीव्हीवर साइन इन केले असल्याची खात्री करा.
  • तुम्ही टीव्हीवर कास्ट करत असल्यास, टीव्ही आणि तुम्ही वापरत असलेला कॉंप्युटर किंवा डिव्हाइस या दोन्ही ठिकाणी साइन इन केले असल्याची खात्री करा. 
  • तुम्ही Google Home वापरत असल्यास, Google Home अ‍ॅपमध्ये योग्य खात्यात साइन इन केले असल्याची खात्री करा.

तुमचे सदस्यत्व एक्स्पायर झाले नसल्याचे तपासणे

तुमचे YouTube Premium सदस्यत्व एक्स्पायर झाले नसल्याची खात्री करा.

YouTube अ‍ॅपमध्ये, तुमचा प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर खरेदी आणि सदस्यत्‍वे वर टॅप करा.

  • तुम्ही अलीकडेच YouTube Premium चा ॲक्सेस गमवला असल्यास आणि पुन्हा सदस्यत्व घेतले असल्यास, पुन्हा सदस्यत्व घेतल्यावर सेव्ह केलेले व्हिडिओ दिसण्यासाठी काही तास लागतील.
  • तुम्हाला एखादा व्हिडिओ लगेच पहायचा असल्यास, मेनू Three-dot menu vertical वर टॅप करा आणि डाउनलोड करण्याचा पुन्हा प्रयत्न करा निवडा.
  • तुमचे YouTube Premium सदस्यत्व संपल्यास, तुम्हाला यापुढे तुमच्या डाउनलोड केलेल्या व्हिडिओचा ॲक्सेस नसेल. तुमच्या डाउनलोडचा अ‍ॅक्सेस पुन्हा मिळवण्यासाठी, Premium सदस्यत्वासाठी साइन अप करणे हे करा.

तुमच्या स्थानावरील YouTube Premium ची उपलब्धता तपासणे 

YouTube Premium फायदे हे फक्त YouTube Premium उपलब्ध असलेल्या देशांमध्ये काम करतात. तुम्ही YouTube Premium लाँच केलेल्या स्थानी आहात का ते तपासणे हे करा.

तुमची डाउनलोड सेटिंग्ज तपासा

तुम्ही मोबाइल डेटावर असताना डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असल्यास आणि तसे करू शकत नसल्यास, डाउनलोड करणे हे फक्त वायफायसाठी मर्यादित केलेले नाही ना याची खात्री करण्याकरिता ॲपमधील तुमची डाउनलोड सेटिंग्ज तपासणे हे करा.

तुमच्या YouTube ॲपची आवृत्ती तपासा

तुम्ही YouTube ॲपची नवीनतम आवृत्ती वापरत असल्याची खात्री करा. तुमच्या डिव्हाइसच्या ॲप स्‍टोअरला भेट द्या आणि तुमच्याकडे YouTube ॲपशी संबंधित कोणतीही प्रलंबित अपडेट आहेत का ते तपासा.

तुमच्याकडे नवीन फोन असल्यास किंवा तुम्ही अलीकडेच तुमचा फोन रिस्टोअर केला असल्यास, त्यामध्ये YouTube ॲपची जुनी आवृत्ती असू शकते (उदा. 12.0 च्या खालील आवृत्त्या या कालबाह्य मानल्या जातात).

वापरून पाहण्यासाठी ट्रबलशूटिंगशी संबंधित अतिरिक्त पायऱ्या

तुमच्या इंटरनेट कनेक्शनची क्षमता तपासणे

व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी मजबूत इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. तुमचे डिव्हाइस हे ३mbps किंवा अधिक वेगवान वाय-फाय नेटवर्कशी अथवा 3G, 4G किंवा LTE च्या वेगाला सपोर्ट करणारा डेटा प्लॅन असलेल्या मोबाइल नेटवर्कशी कनेक्ट केलेले असल्याची खात्री करा. तुमचा सध्याचा इंटरनेटचा वेग किती आहे याची तुम्हाला खात्री नसल्यास, तुम्ही तुमचा वेग तपासणे हे ऑनलाइन करू शकता.

तुम्ही किती डिव्हाइसवर डाउनलोड केले आहे हे तपासणे

तुम्ही अनेक डिव्हाइसवर व्हिडिओ डाउनलोड केले आहेत का? तुम्ही किती डिव्हाइसवर व्हिडिओ डाउनलोड करू शकता यासाठी मर्यादा आहे. तुम्ही ती मर्यादा गाठल्यावर, तुम्हाला "हा व्हिडिओ ऑफलाइन सेव्ह केला जाऊ शकत नाही" असा एरर मेसेज मिळेल. तुम्ही तरीही आधी वापरलेल्या डिव्हाइसवर व्हिडिओ डाउनलोड करू शकता. YouTube Premium वरील डिव्हाइस मर्यादा यांविषयी अधिक जाणून घ्या.

तुमच्या फोनची मोबाइल डेटा सेटिंग्ज तपासा

तुम्ही YouTube साठी बॅकग्राउंड डेटा सुरू केला असल्याची खात्री करण्याकरिता तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरील सेटिंग्ज तपासा.

सपोर्टशी संपर्क साधणे आणि उत्पादनासंबंधित फीडबॅक सबमिट करणे

तुम्हाला अजूनही समस्या येत असल्यास, सपोर्टशी संपर्क साधणे हे करा. सपोर्टशी संपर्क साधताना पुढील गोष्टींचा उल्लेख करा:

  • तुम्हाला एरर मेसेज दिसत आहे का?
  • तो कुठे दिसत आहे आणि नेमका मजकूर काय आहे? शक्य असल्यास, स्क्रीनशॉटचा समावेश करा.
YouTube ला उत्पादनाशी संबंधित फीडबॅक पाठवणे:
  • तुम्ही तुमच्या समस्येबद्दल फीडबॅकदेखील सबमिट करू शकता. तुम्हाला प्रतिसाद मिळणार नाही, पण तुमचा फीडबॅक YouTube सोबत शेअर केला जाईल.
  • उत्पादनाशी संबंधित फीडबॅक पाठवण्यासाठी, YouTube मध्ये तुमचा प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर फीडबॅक Feedback निवडा.
  • तुमची समस्या आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यात आम्हाला मदत व्हावी, यासाठी "सिस्टीम लॉग" याकरिताचा बॉक्स नक्की निवडा.

 

यावर परत जा YouTube Premium चे सदस्य फायदे ट्रबलशूट करणे 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2239258419951425307
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false