YouTube वर चॅनलचे सदस्य होणे

मुख्य YouTube साइट आणि अ‍ॅपवरील चॅनल सदस्यत्वे तुम्हाला सार्वजनिक बॅज, इमोजी आणि चॅनलने देऊ केलेल्या निर्माणकर्ता लाभांचा अ‍ॅक्सेस खरेदी करू देतात.

तुमचा देश आणि तुम्ही वापरत असलेला प्लॅटफॉर्म यांनुसार सदस्यत्वांच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात.

टीप: जानेवारी २०२२ पासून, YouTube Android ॲपवर चॅनल सदस्य होणार्‍या काही सदस्यांना Google Play मार्फत बिल केले जाईल. याचा किंमत किंवा शुल्कावर परिणाम होणार नाही, फक्त खरेदी कुठून बिल केली जाते त्यावर परिणाम होईल. अलीकडील शुल्के आणि तुम्हाला कसे बिल केले गेले आहे हे पाहण्यासाठी, तुम्ही pay.google.com ला भेट देऊ शकता.
 

सामील होणे, पातळी बदलणे किंवा सदस्यत्व रद्द करणे

चॅनलचे सदस्य होणे

मुख्य YouTube साइट आणि अ‍ॅपवरील सहभागी चॅनल सदस्यत्वामध्ये सामील व्हा.
  1. youtube.com ला भेट द्या किंवा YouTube अ‍ॅप उघडा.
  2. तुम्ही ज्याला सपोर्ट करू इच्छिता त्या निर्माणकर्त्याच्या चॅनलवर किंवा त्याने अपलोड केलेल्या व्हिडिओवर जा आणि त्यांनी त्यांच्या चॅनलवर सदस्यत्वे सुरू केली आहेत का हे पहा.
  3. सामील व्हा वर क्लिक करा.
  4. तुमची पेमेंट माहिती एंटर करण्यासाठी सूचना फॉलो करा.
  5. खरेदी करा वर क्लिक करा.

तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर तुम्हाला स्वागत घोषणा दिसेल.

तुमची सदस्यत्व पातळी बदलणे

अपग्रेड करण्यासाठी

  1. तुम्हाला बदलायच्या असलेल्या सदस्यत्वाच्या चॅनल होमपेजवर जा आणि लाभ पहा वर क्लिक करा.
  2. तुम्हाला सामील व्हायचे असलेली पातळी निवडा आणि त्यानंतर पातळी बदला.
  3. अपग्रेड करा निवडा.
  4. खरेदी केल्यावर तुम्हाला अपग्रेड केलेल्या पातळीचा तात्काळ अ‍ॅक्सेस मिळेल.
    1. किमतीसंबंधी टीप: तुमच्या त्या वेळच्या बिलिंग चक्रामध्ये शिल्लक असलेल्या दिवसांसाठी, तुमच्याकडून अ‍ॅडजस्ट केलेल्या किमतीवर फक्त पातळ्यांच्या किमतीमधील फरक घेतला जाईल.
    2. उदाहरण: तुम्ही $४.९९ देत असल्यास आणि तुमच्या पुढील पेमेंटपर्यंत अर्धा महिना शिल्लक असताना तुम्ही $९.९९ वर अपग्रेड करत असल्यास, तुमच्याकडून शिल्लक राहिलेल्या महिन्यासाठी ($९.९९-$४.९९) X (०.५)=$२.५० घेतले जातील.
  5. पातळी अपग्रेड केल्यामुळे तुमची मासिक बिलिंग तारीख बदलणार नाही.

डाउनग्रेड करण्यासाठी

  1. तुम्हाला बदलायच्या असलेल्या सदस्यत्वाच्या चॅनल होमपेजवर जा आणि लाभ पहा वर क्लिक करा.
  2. तुम्हाला सामील व्हायचे असलेली पातळी निवडा आणि त्यानंतर पातळी बदला.

डाउनग्रेडसाठी बिलिंग आणि अ‍ॅक्सेसचे तपशील

  • पातळी डाउनग्रेड केल्यामुळे तुमची मासिक बिलिंग तारीख बदलणार नाही.
  • तुमच्या पुढील बिलिंग तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या मूळ पातळीचा अ‍ॅक्सेस मिळेल.
  • तुमच्या पुढील बिलिंग तारखेला तुमच्याकडून नवीन कमी किंमत घेतली जाईल.
  • निर्माणकर्त्याने देऊ केली असल्यास, तुमच्या बॅजमध्ये दर्शवलेली, जमा झालेली कोणतीही लॉयल्टी रिवॉर्ड तुमच्याकडेच राहतील.

निर्माणकर्त्याने देऊ केली असल्यास, तुमच्या बॅजमध्ये दर्शवलेली, जमा झालेली कोणतीही लॉयल्टी रिवॉर्ड तुमच्याकडेच राहतील.

चॅनल सदस्यत्व रद्द करणे
चॅनल होमपेजवर लाभ पहा वर क्लिक करून सदस्यत्व व्यवस्थापन स्क्रीन उघडा आणि त्यानंतर निवडा आणि त्यानंतर सदस्यत्व आणि लाभ संपवा वर क्लिक करा.
काँप्युटरवर खालील पायर्‍या फॉलो करूनदेखील तुम्ही कधीही तुमचे सदस्यत्व रद्द करू शकता:
  1. YouTube मध्ये साइन इन करा.
  2. youtube.com/paid_memberships वर जा.
  3. तुम्हाला रद्द करायचे असलेले चॅनल सदस्यत्व शोधा आणि सदस्यत्व व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  4. डीअ‍ॅक्टिव्हेट करा निवडा.
  5. सदस्यत्व संपवा निवडा.
  6. तुम्हाला रद्द करण्यासंबंधी कंफर्मेशन स्क्रीन दिसेल.

तुम्हाला तुमचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत समस्या येत असल्यास, येथे अधिक जाणून घ्या.

भेटीदाखल सदस्यत्व खरेदी करणे
भेटीदाखल सदस्यत्वे ही फक्त सहभागी चॅनलवर खरेदी करण्यासाठी किंवा रिडीम करण्यासाठी उपलब्ध आहेत. दर्शक हे वेब, Android किंवा iOS डिव्हाइस वापरून भेटवस्तू निवडू आणि मिळवू शकतात.

दर्शकांना भेटीदाखल सदस्यत्वांमुळे इतर दर्शकांसाठी कमाल एक महिन्याचे चॅनल सदस्यत्वाचे लाभ अ‍ॅक्सेस करण्याची संधी खरेदी करता येते. भेटीदाखल सदस्यत्वे खरेदी करण्यासाठी, तुम्ही भेटवस्तू सुरू असलेल्या चॅनलवर लाइव्हस्ट्रीम किंवा प्रिमीयर पाहत असणे आवश्यक आहे.

भेटीदाखल सदस्यत्वे ही पात्र चॅनलवरील लाइव्हस्ट्रीम आणि प्रिमीयर वर उपलब्ध आहेत. चॅनलसाठी भेटीदाखल सदस्यत्वे उपलब्ध असल्यास, तुम्ही लाइव्ह स्ट्रीम किंवा प्रिमीयर दरम्यान भेटीदाखल सदस्यत्व खरेदी करू शकता:

  1. YouTube मध्ये साइन इन करण्यासाठी काँप्युटर वापरा.
  2. तुम्हाला ज्यावर भेटीदाखल सदस्यत्वे खरेदी करायची आहेत त्या पात्र चॅनलवर जा.
  3. चॅनलचे लाइव्ह स्ट्रीम किंवा प्रिमीयर यामध्ये सामील व्हा.
  4. लाइव्ह चॅटमध्ये, वर क्लिक करा.
  5. भेटीदाखल सदस्यत्वे वर क्लिक करा.
  6. तुम्हाला भेटीदाखल सदस्यत्वे द्यायची असलेल्या दर्शकांची संख्या निवडा.
  7. व्यवहार पूर्ण करा.

भेटीदाखल सदस्यत्वे ही कमाल $५ सह आणि त्यापर्यंत उपलब्ध असलेल्या सर्वात जवळच्या किंमत पातळीवर देऊ केली जातात.

तुम्ही भेटीदाखल सदस्यत्वे खरेदी केल्यावर, काउंटडाउन टिकर लाइव्ह चॅटमध्ये मर्यादित कालावधीसाठी तुमची खरेदी हायलाइट करेल. कालावधी हा तुमच्या खरेदीच्या रकमेवर अवलंबून असतो. तुमच्या भेटवस्तूची घोषणा केली जाण्यापूर्वी निर्माणकर्ता लाइव्ह चॅट किंवा लाइव्ह स्ट्रीम संपवू शकतो, पण YouTube हे तरीही त्यानंतर काही कालावधीसाठी भेटवस्तू वितरित करणे सुरू ठेवेल.

टीप: भेटीदाखल सदस्यत्वांची संख्या, तुमच्या चॅनलचे नाव आणि तुमचा प्रोफाइल फोटो या गोष्टी सार्वजनिकरीत्या दृश्यमान असतात. ही माहिती आमची YouTube Data API सेवा याद्वारेदेखील चॅनलला उपलब्ध असू शकते आणि चॅनल तृतीय पक्ष सेवांसोबत ती शेअर करू शकते. YouTube ने दर्शकाला पहिली भेटवस्तू वितरित केल्यावर तुमची भेटीदाखल सदस्यत्वाची खरेदी पूर्ण झाली असे मानले जाते.

भेटीदाखल सदस्यत्वे निवडणे आणि मिळवणे
भेटीदाखल सदस्यत्वे ही फक्त सहभागी चॅनलवर खरेदी करण्यासाठी किंवा रिडीम करण्यासाठी उपलब्ध आहेत. दर्शक हे वेब, Android किंवा iOS डिव्हाइस वापरून भेटवस्तू निवडू आणि मिळवू शकतात.

भेटीदाखल सदस्यत्वे कशी खरेदी करावीत आणि मिळवावीत

दर्शकांनी भेटीदाखल सदस्यत्वांसाठी पात्र ठरण्याकरिता निवडणे आवश्यक आहे. तुम्ही भेटीदाखल सदस्यत्वे निवडल्यानंतर, ज्यांच्याशी अलीकडे संवाद साधला आहे (उदाहरणार्थ, त्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून), अशा भेटवस्तू देणे सुरू केलेल्या कोणत्याही चॅनलवर ती मिळवण्यासाठी आता पात्र आहात. तुम्हाला भेटवस्तू मिळाल्यावर, ती तुमच्या खात्यावर आपोआप लागू केली जाईल, ज्यामुळे तुम्हाला बॅज आणि कस्टम इमोजी यांसारख्या विशेष लाभांचा अ‍ॅक्सेस मिळेल.

तुम्ही यापूर्वी फक्त एखाद्या विशिष्ट चॅनलसाठी भेटीदाखल सदस्यत्वे निवडली असल्यास, तरीही त्या चॅनलवर भेटवस्तू मिळवण्याकरिता पात्र आहात. इतर चॅनलवर भेटवस्तू मिळवण्यासाठी पात्र ठरण्याकरिता तुम्ही तरीही जागतिक स्तरावर सर्व चॅनलसाठी भेटीदाखल सदस्यत्वे निवडणे आवश्यक आहे.

भेटीदाखल सदस्यत्वे निवडण्यासाठी, तुम्ही ब्रँड खाते नसलेले YouTube चॅनल वापरून साइन इन केलेले असणे आवश्यक आहे. तुम्ही ब्रँड खाते वापरत आहात का ते तपासणे हे करा. या क्षणी, चॅनल सदस्य भेटीदाखल सदस्यत्वे मिळवण्यास पात्र नाहीत.

भेटीदाखल सदस्यत्वे निवडणे

पुढील मार्गांच्या समावेशासह, पण त्यांपुरतेच मर्यादित न राहता भेटवस्तू निवडण्याचे अनेक मार्ग आहेत:

  • लाइव्ह चॅटमध्ये
  • व्हिडिओच्या वॉच पेजवर
  • चॅनल पेजवर
  • निर्माणकर्त्याची युनिक ऑप्ट-इन URL वापरून (शेवटी /allow_gifts असलेली चॅनल पेजची लिंक).

लाइव्ह चॅटद्वारे निवडणे

  1. पात्र चॅनलच्या लाइव्ह स्ट्रीम किंवा प्रिमीयर वर जा.
  2. लाइव्ह चॅटमध्ये:
    1. भेटवस्तूंना अनुमती द्या निवडा किंवा
    2. पिन केलेले भेटीदाखल सदस्यत्वे निवडा.
  3. “भेटवस्तूंना अनुमती द्या” स्विच सुरू करून तुम्हाला भेटीदाखल सदस्यत्वे निवडायची असल्याचे कंफर्म करा

चॅनल किंवा वॉच पेजद्वारे भेटीदाखल सदस्यत्वे निवडणे:

  1. पात्र चॅनलच्या पेजवर किंवा व्हिडिओच्या वॉच पेजवर जा.
  2. सामील व्हा  आणि त्यानंतर आणखी   आणि त्यानंतर ”भेटवस्तू सेटिंग्ज” वर क्लिक करा.
  3. “भेटवस्तूंना अनुमती द्या” स्विच सुरू करून तुम्हाला भेटीदाखल सदस्यत्वे निवडायची असल्याचे कंफर्म करा.
​​टीप: एखाद्या भेटीदाखल सदस्यत्वासाठी तुमची निवड झाली असल्यास, तुमच्या चॅनलचे नाव सार्वजनिकरीत्या दृश्यमान असेल. ही माहिती आमची YouTube Data API सेवा याद्वारे चॅनललादेखील उपलब्ध असू शकते आणि चॅनल ती तृतीय पक्ष सेवांसोबत शेअर करू शकते.

भेटवस्तूंना अनुमती देण्याची निवड रद्द करण्यासाठी, सदस्यत्‍वे सुरू केलेल्या कोणत्याही चॅनल किंवा वॉच पेजवर सामील व्हा वर क्लिक करून “भेटवस्तू सेटिंग्ज” उघडा आणि “भेटवस्तूंना अनुमती द्या” टॉगल बंद करा. तुम्ही यापुढे कोणत्याही चॅनलवर भेटवस्तू मिळवण्यासाठी पात्र असणार नाही.

भेटीदाखल सदस्यत्व मिळवणे

एखाद्या चॅनल सदस्याने किंवा निर्माणकर्त्याने भेटीदाखल सदस्यत्वे खरेदी केल्यावर, ते लाइव्ह चॅटमध्ये घोषित केले जाते. तुम्हाला एका महिन्याचे सदस्यत्व मिळवण्यासाठी निवडले गेले असल्यास, लाइव्ह चॅटमध्ये एक सूचना दिसेल आणि आम्ही तुम्हाला ईमेल सूचना पाठवू.

भेटीदाखल सदस्यत्वे परतावा न मिळू शकणारी असतात आणि रोख रकमेच्या मोबदल्यात बदलता येत नाहीत. सर्व भेटीदाखल सदस्यत्वे ही चॅनल सदस्यत्व लाभांचा एका महिन्यापर्यंत अ‍ॅक्सेस देतात आणि त्यानंतर एक्स्पायर होतात.

तुमचे सदस्यत्व फायदे आणि अ‍ॅक्सेससंबंधी लाभ पाहण्यासाठी:

  • तुम्ही ज्या चॅनलचे सदस्य झाला आहात त्यावर ‘सदस्यत्व’ टॅब निवडा किंवा
  • त्या चॅनलच्या कोणत्याही व्हिडिओ पेजवर लाभ पहा निवडा.

भेटीदाखल सदस्यत्वे आवर्ती होणारी नसतात आणि ती संपल्यानंतर तुमच्याकडून शुल्क आकारले जाणार नाही. तुम्हाला तुमचे भेटीदाखल सदस्यत्व लवकर संपवायचे असल्यास, सपोर्ट शी संपर्क साधा. तुम्ही भेटीदाखल सदस्यत्वाच्या फायद्यांचा अ‍ॅक्सेस गमवाल.

पेमेंट आणि बिलिंग माहिती

बिलिंग माहिती

नवीन आणि सध्याचे सदस्य

तुमच्याकडे अ‍ॅक्टिव्ह सशुल्क सदस्यत्व असताना, प्रत्येक मासिक बिलिंग चक्राच्या सुरुवातीला तुमच्याकडून शुल्क आपोआप घेतले जाईल.

रद्द केलेली सदस्यत्वे

तुम्ही सशुल्क चॅनल सदस्यत्व रद्द केल्यावर, तुम्ही ते पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट केल्याशिवाय तुमच्याकडून पुन्हा शुल्क घेतले जाणार नाही. तो बिलिंग कालावधी संपेपर्यंत तुम्हाला सदस्यत्व लाभ मिळणे सुरू राहील.

सदस्यत्वे पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट करणे

तुम्ही तुमचे सदस्यत्व कधीही पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. तुम्ही ज्या बिलिंग चक्रामध्ये रद्द केले त्याच बिलिंग चक्रामध्ये पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट केल्यास, सध्याचे बिलिंग चक्र संपेपर्यंत तुमच्याकडून शुल्क घेतले जाणार नाही.

तुमची पेमेंट माहिती अपडेट करणे

तुमच्या Google खाते च्या माझी सदस्यत्वे विभागामध्ये तुम्ही सशुल्क सदस्यत्वांसाठी वापरलेली क्रेडिट कार्ड बदलणे हे करू शकता. लक्षात ठेवा, की तुम्हाला प्रथम तुमच्या Google खाते वर नवीन कार्ड जोडणे हे करावे लागू शकते.
तुमच्याकडे अ‍ॅक्टिव्ह सशुल्क सदस्यत्व असताना, प्रत्येक मासिक बिलिंग चक्राच्या सुरुवातीला तुमच्याकडून आपोआप शुल्क घेतले जाईल. तुम्ही youtube.com/paid_memberships येथे तुमची पुढील बिलिंग तारीख पाहू शकता आणि तुमचे सदस्यत्व व्यवस्थापित करू शकता.

भारतामधील आवर्ती शुल्के

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या eMandate आवश्यकता यांमुळे, तुमच्या आवर्ती सदस्यत्वांचा अ‍ॅक्सेस कायम राखण्यासाठी, तुम्हाला तुमच्या पेमेंट तपशिलांची पडताळणी करणे किंवा ते पुन्हा एंटर करणे हे करावे लागेल. तसे करण्यासाठी, YouTube अ‍ॅपमधील किंवा youtube.com वरील सूचना फॉलो करा. लक्षात घ्या, की तुमची बँक या वेळी आवर्ती पेमेंटना कदाचित सपोर्ट करणार नाही. आवर्ती पेमेंटना सपोर्ट करणाऱ्या बँकची सूची पहा किंवा अधिक जाणून घ्या.

थांबवलेल्या चॅनल सदस्यत्वांचा तुमच्या पेमेंटवर कसा परिणाम होतो

“थांबवलेला मोड” याचे स्पष्टीकरण

कधीकधी, चॅनल सदस्यत्वे “थांबवलेला मोड” यामध्ये ठेवली जातात. चॅनलने MCNs बदलल्यास, त्यांचे चॅनल मुलांसाठी तयार केलेले म्हणून सेट केल्यास किंवा ते कमाई करू शकत नसल्यास, असे होऊ शकते. “थांबवलेला मोड” होतो, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे, की सदस्यत्वे वापरून चॅनल कमाई करू शकत नाही -- ही बरेचदा तात्पुरती स्थिती असते. एखादे चॅनल “थांबवलेला मोड” यामध्ये असते, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे, की ते लाभ आणि इतर फायदे डिलिव्हर करू शकत नाहीत.

पेमेंट तपशील

तुम्ही “थांबवलेला मोड” यामधील एखाद्या चॅनलचे अ‍ॅक्टिव्ह सशुल्क सदस्य असल्यास, तुमचे मासिक आवर्ती पेमेंट, बिलिंग चक्र आणि सदस्यत्वांचा अ‍ॅक्सेसदेखील थांबवला जाईल.

तुम्ही iOS किंवा Android वर चॅनल सदस्यत्वासाठी साइन अप केले असल्यास, तुमचा बिलिंग कालावधी संपल्यानंतर चॅनल थांबवलेल्या मोडमध्ये असल्यास, तुमचे मासिक आवर्ती पेमेंट कदाचित रद्द केले जाईल. असे झाल्यास, तुम्हाला तुमचे सदस्यत्व रद्द केले गेल्याचे सूचित केले जाईल आणि चॅनलचे सदस्यत्व पुन्हा सुरू केले गेल्यास/गेल्यावर, तुम्हाला पुन्हा सामील होता येईल.

चॅनलवर सदस्यत्वे कमाल १२० दिवसांसाठी थांबवलेली राहू शकतात; त्या टप्प्यानंतर, सदस्यत्वे आणि सदस्यांची मासिक आवर्ती पेमेंट रद्द केली जातील.

समाप्त केलेल्या चॅनल सदस्यत्वांचा तुमच्या पेमेंटवर कसा परिणाम होतो

चॅनल हे सदस्यत्व वैशिष्ट्यांचा अ‍ॅक्सेस समाप्त करत असल्यास किंवा गमावत असल्यास (उदा. ते आता YouTube भागीदार उपक्रम याचा भाग नसल्यास), सदस्यत्वांसाठी सर्व मासिक आवर्ती पेमेंट आणि सर्व सदस्यत्व लाभांचा अ‍ॅक्सेस तात्काळ समाप्त केला जाईल. समाप्तीच्या वेळी सदस्य असलेल्या दर्शकांना परताव्याची विनंती करण्याबाबत माहिती असलेला समाप्ती ईमेल पाठवला जाईल.

चॅनल सदस्यत्व परतावे

तुमचे सशुल्क चॅनल सदस्यत्‍व तुम्ही कधीही रद्द करू शकता. तुम्ही रद्द केल्यानंतर, तुमच्याकडून पुन्हा शुल्क घेतले जाणार नाही. बिलिंग चक्र संपेपर्यंत तुम्हाला बॅज वापरता येईल आणि निर्माणकर्ता लाभांचा अ‍ॅक्सेस असेल. लक्षात ठेवा, की तुम्ही तुमचे चॅनल सदस्यत्व रद्द करणे आणि ते अधिकृतरीत्या संपणे यादरम्यानच्या कालावधीसाठी तुम्हाला परतावा दिला जाणार नाही.
तुम्हाला तुमच्या खात्यावर चॅनल सदस्यत्वांसाठी अनधिकृत शुल्क आढळल्यास, अनधिकृत शुल्काची तक्रार करणे हे करण्यासाठी या पायर्‍या फॉलो करा. तुमच्या सशुल्क चॅनल सदस्यत्वाची निर्माणकर्ता लाभ किंवा इतर वैशिष्ट्ये सदोष असल्यास, उपलब्ध नसल्यास किंवा नमूद केल्याप्रमाणे परफॉर्म करत नसल्यास, परताव्याची विनंती करण्यासाठी तुम्ही कधीही आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधणे हे करू शकता. अंशतः संपलेल्या बिलिंग कालावधींसाठी आम्ही परतावे किंवा क्रेडिट पुरवत नाही.
तुम्ही Apple द्वारे साइन अप केलेले सदस्य असल्यास, तुमच्या सशुल्क चॅनल सदस्यत्‍वासाठी परताव्याची विनंती करण्याकरिता, तुम्हाला Apple सपोर्टशी संपर्क साधणे हे करावे लागेल. Apple चे परतावा धोरण लागू होईल.

निर्माणकर्त्यांसोबत चॅनल सदस्यत्वामधील कमाईची वाटणी

निर्माणकर्त्यांना स्थानिक विक्री कर आणि इतर शुल्के (देश आणि वापरकर्त्याचा प्लॅटफॉर्म यांनुसार) दिल्यानंतर, Google ने मान्यता दिलेली सदस्यत्वांमधील ७०% कमाई मिळते. पेमेंट प्रक्रिया शुल्के (क्रेडिट कार्ड शुल्कांसह) सध्या YouTube कव्हर करते

तुमचे सदस्यत्व फायदे वापरणे आणि व्यवस्थापित करणे

सर्व सदस्यांसाठी चॅनल सदस्यत्व फायदे

तुम्ही सदस्य झाल्यावर, तुम्हाला ठरावीक फायद्यांचा अ‍ॅक्सेस मिळतो. तुम्ही ज्या वेगवेगळ्या पातळ्यांवर सामील होता त्यांनुसार तुम्हाला वेगवेगळे लाभ मिळतील.
  • फक्त सदस्यांसाठीच्या समुदाय पोस्ट: तुम्ही चॅनलच्या समुदाय टॅबवर फक्त सदस्यांसाठीच्या पोस्ट पाहू शकता. विशेष आशय हा “फक्त सदस्यांसाठी” म्हणून टॅग केला जातो आणि त्यामध्ये मजकूर पोस्ट, GIFs, मतचाचण्या, व्हिडिओ आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो.
  • सदस्यांसाठी प्रशंसाफलक: निर्माणकर्त्याने हे शेल्फ सुरू केलेले असल्यास, चॅनलच्या पेजवरील इतर अ‍ॅक्टिव्ह सदस्यांसोबत तुमचा अवतार दाखवला जाऊ शकतो. हे शेल्फ म्हणजे निर्माणकर्त्याचा तुम्हाला चॅनलचे सदस्य झाल्याबद्दल सार्वजनिकरीत्या धन्यवाद म्हणण्याचा मार्ग आहे. तुम्ही तुमचे सदस्यत्व रद्द केल्यास, यापुढे तुम्ही शेल्फवर दिसणार नाही.
  • सदस्याचे माइलस्टोन चॅट: तुम्ही सदस्य राहता त्या प्रत्येक महिन्यासाठी (तुमच्या दुसर्‍या लागोपाठच्या महिन्यापासून) तुम्हाला एक सदस्याचे माइलस्टोन चॅट मिळेल. सदस्याचे माइलस्टोन चॅट हे हायलाइट केलेले विशेष मेसेज असतात, जे लाइव्ह स्ट्रीम किंवा प्रिमीयर यांवरील लाइव्ह चॅटमध्ये वापरले जाऊ शकतात. हे विशेष मेसेज तुम्ही या चॅनलचे एकूण किती काळापासून सदस्य राहिला आहात ते हायलाइट करतात आणि सर्व दर्शकांना दिसतात.
  • चॅनलचे बॅज: हा सार्वजनिकपणे दिसणारा विशेष सदस्यत्व बॅज आहे, जो तुम्ही त्या चॅनलवर आणि लाइव्ह चॅटमध्ये करता त्या सर्व टिप्पण्यांमध्ये तुमच्या चॅनलच्या नावाशेजारी दिसतो.
    • काही चॅनलवर, वेगवेगळ्या रंगांच्या डीफॉल्ट बॅजद्वारे किंवा कस्टम बॅजद्वारे तुम्ही किती काळ सदस्य आहात हे दर्शवले जाईल.
  • फक्त सदस्यांसाठीचे व्हिडिओ: विशेष व्हिडिओ हे फक्त योग्य पातळीवरील चॅनल सदस्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कोणीही फक्त सदस्यांसाठीचा व्हिडिओ शोधू शकते, पण फक्त योग्य पातळ्यांवरील सदस्य तो पाहू शकतात. हे व्हिडिओ चॅनलच्या सदस्यत्व, आशय आणि समुदाय टॅबवर दिसू शकतात. हे व्हिडिओ सदस्याच्या होम आणि सदस्यत्वे फीडमध्येदेखील दिसू शकतात. 
  • नवीन सदस्य मेसेज: तुम्ही त्या चॅनलवरील लाइव्ह स्ट्रीमदरम्यान चॅनल सदस्य झाल्यास, लाइव्ह चॅटमध्ये “नवीन सदस्य” असा प्रखर हिरवा मेसेज पाठवला जाईल. तुमचा प्रोफाइल फोटो ५ मिनिटांसाठी चॅटच्या सर्वात वरती पिनदेखील केला जातो.
  • फक्त सदस्यांसाठीचे लाइव्ह चॅट: सार्वजनिक लाइव्ह स्ट्रीम दरम्यान, निर्माणकर्ते चॅटला फक्त सदस्यांसाठीचे चॅट बनवू शकतात. सर्वजण अजूनही लाइव्ह स्ट्रीम पाहू शकत असले, तरीही फक्त सदस्य चॅट पोस्ट करू शकतात. 
  • कस्टम इमोजी: निर्माणकर्त्याने इमोजी अपलोड केला असल्यास, चॅनल सदस्य हे चॅनलच्या व्हिडिओ आणि लाइव्ह चॅटवरील टिप्पण्यांमध्ये विशेष इमोजी वापरू शकतात. तुम्ही लाइव्ह चॅटमध्ये इमोजी ऑटोकंप्लीट करण्यासाठी निर्माणकर्त्याने असाइन केलेले कुटुंबाचे नाव वापराल. 
  • इतर निर्माणकर्ता लाभ: चॅनलद्वारे सुविधा दिल्या गेल्यास, तुम्हाला निर्माणकर्त्याच्या इतर विशेष लाभांचादेखील अ‍ॅक्सेस मिळू शकतो.

टीप: "स्लो मोड" - जो तुम्ही लाइव्ह चॅटमध्ये किती वेळा टिप्पणी देऊ शकता ते मर्यादित करतो - अ‍ॅक्टिव्ह सशुल्क सदस्यांना लागू होत नाही.

वेगवेगळ्या पातळ्यांसाठी निर्माणकर्ता लाभ

प्रत्येक पातळीला तिची स्वतःची कमाल किंमत आहे. तुम्ही प्रत्येक पातळीवर जाता तसतसे तुमचे लाभ जमा होत जातात. याचा अर्थ असा आहे, की तुम्ही सर्वात महाग पातळीवर सामील झाल्यास, तुम्हाला खालच्या सर्व पातळ्यांवर लाभांचा अ‍ॅक्सेस मिळेल.

मला प्रत्येक पातळीसाठी काय मिळते आणि मी सामील कसे व्हावे?

हे प्रत्येक चॅनलनुसार बदलते. तुम्ही सामील व्हा वर क्लिक केल्यावर तुम्हाला वेगवेगळे लाभ दिसू शकतात.

मी आधीपासून सदस्य आहे, तेव्हा मला उपलब्ध असलेले वेगवेगळे लाभ कसे दिसतील?

तुम्ही आधीच सामील झालेल्या चॅनलच्या होमपेजवर जा आणि त्यानंतर लाभ पहा निवडा.

चॅनल सदस्यत्व सूचना सुरू किंवा बंद करणे

चॅनल सदस्य म्हणून, तुम्हाला समुदाय टॅब, सदस्यत्व टॅब किंवा चॅनलचा आशय टॅब यांमध्ये फक्त सदस्यांसाठी असलेला आशय सापडू शकतो. तुम्हाला तुमच्या होम आणि सदस्यत्वे फीडमध्ये फक्त सदस्यांसाठीचे व्हिडिओ दिसत असल्याचेदेखील लक्षात येईल. चॅनल पुढील गोष्टी करते, तेव्हा तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही सूचना किंवा ईमेलदेखील वापरू:

  • फक्त सदस्यांसाठी असलेली नवीन पोस्ट तयार करणे 
  • फक्त सदस्यांसाठी असलेला नवीन व्हिडिओ अपलोड करणे 
  • फक्त सदस्यांसाठी असलेले लाइव्ह स्ट्रीम सुरू करणे
  • ३० मिनिटांमध्ये सुरू होणारे फक्त सदस्यांसाठी असलेले लाइव्ह स्ट्रीम शेड्युल करणे

तुम्ही फक्त सदस्यांसाठी असलेल्या आशयासाठी सूचना आणि ईमेल मिळवण्याची निवड रद्ददेखील करू शकता.

सूचना बंद करणे

तुम्हाला फक्त सदस्यांसाठी असलेल्या नवीन आशयाबद्दल जाणून घ्यायचे नसल्यास, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुम्ही ज्यांचे सदस्य आहात अशा स्वतंत्र चॅनलसाठी सूचना आणि ईमेलची निवड रद्द करणे.
    • फक्त सदस्यांसाठी असलेल्या आशयाकरिता सूचनांची निवड रद्द करण्यासाठी: सेटिंग्ज आणि त्यानंतर सूचना वर जा आणि त्यानंतर फक्त सदस्यांसाठी च्या बाजूला असलेले स्विच बंद करा.
    • फक्त सदस्यांसाठी असलेल्या आशयाकरिता ईमेलची निवड रद्द करण्यासाठी: तुम्हाला मिळालेल्या कोणत्याही फक्त सदस्यांसाठी ईमेलमधील सदस्यत्व रद्द करा लिंक वापरा. तुम्हाला ईमेल सूचनांसाठी पुन्हा सदस्यत्व घ्यायचे असल्यास, सेटिंग्ज आणि त्यानंतर सूचना वर जा आणि त्यानंतर “ईमेल सूचना” या अंतर्गत “सदस्यत्व रद्द केलेले ईमेल” निवडा आणि तुम्हाला कोणते ईमेल मिळवायचे आहेत ते निवडा.
  • स्वतंत्र चॅनलसाठी सर्व सूचनांची निवड रद्द करणे:
    • तुम्ही सदस्यत्व घेतलेले चॅनल आणि त्यानंतर सूचना  आणि त्यानंतर काहीही नाही वर जा. यामुळे या चॅनलसाठी सर्व सूचना बंद होतील, फक्त सदस्यांसाठी असलेल्या आशयाकरिता नाही.
  • तुमच्या खात्यावर सर्व सूचना बंद करणे हे करा.

समुदाय टॅबमध्ये विशेष आशय पाहणे

समुदाय टॅबमध्ये विशेष आशय हा “फक्त सदस्यांसाठी” म्हणून टॅग केला जातो. यामध्ये मजकूर पोस्ट, GIFs, मतचाचण्या, व्हिडिओ आणि आणखी बर्‍याच गोष्टींचा समावेश असतो.

अयोग्य लाभांची तक्रार करणे

तुम्हाला YouTube ची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे (लैंगिक, हिंसक किंवा द्वेषपूर्ण आशय, दिशाभूल करणार्‍या ऑफर अथवा स्पॅम यांसह) यांचे उल्लंघन करत आहे असे वाटणारी एखादी ऑफर दिसल्यास, सामील व्हा बटणावर क्लिक केल्यावर ऑफर स्क्रीनमधील लाभांची तक्रार करा वर क्लिक करून तुम्ही तिची तक्रार करू शकता. (किंवा तुम्ही आधीपासून सदस्य असल्यास, लाभ पहा).

गोपनीयतेसंबंधी माहिती

दृश्यमान सदस्यत्व स्टेटस

तुम्ही चॅनलमध्ये सामील झाल्यावर, पुढील माहिती YouTube वर सार्वजनिकरीत्या दिसेल आणि चॅनल तृतीय पक्ष कंपन्यांसोबत माहिती शेअर करू शकेल:
  • तुमची चॅनल URL
  • तुमच्या YouTube चॅनलचे नाव
  • तुमचा प्रोफाइल फोटो
  • तुम्ही सदस्य म्हणून चॅनलमध्ये कधी सामील झालात
  • तुम्ही कोणत्या पातळीवरील सदस्य आहात
टीप: चॅनलचे लाभ पुरवण्यासाठी, चॅनल ही माहिती तृतीय पक्ष कंपन्यांच्या लहान, निवडक गटासोबत शेअर करू शकते.

तुमची माहिती कशी वापरली जाऊ शकते

इतर दर्शक तुमची वरील माहिती पाहू शकतात. शेअर केलेली माहिती तुम्ही सामील झालेल्या चॅनलवर अवलंबून असू शकते. ही सूची सर्व घटकांचा समावेश नसलेली आहे:
  • सर्व सदस्यांकडे दृश्यमान बॅज असतो, जो टिप्पण्या आणि चॅटमध्ये तुमच्या चॅनलच्या नावाच्या बाजूला दिसतो.
  • तुम्ही त्या चॅनलवरील लाइव्ह स्ट्रीमदरम्यान चॅनल सदस्य झाल्यास, लाइव्ह चॅटमध्ये प्रखर हिरवा “नवीन सदस्य” मेसेज पाठवला जाईल आणि तुमचा प्रोफाइल फोटो ५ मिनिटांसाठी लाइव्ह चॅटच्या सर्वात वर पिन केला जाईल, ज्यावर कर्सर फिरवल्यावर तुमच्या चॅनलचे नाव दिसेल.
  • काही चॅनल तुमची माहिती त्यांच्या व्हिडिओमधील “धन्यवाद” सूचीमध्ये जोडू शकतात किंवा तुमची माहिती चॅनलच्या प्रशंसाफलकामध्ये जोडली जाऊ शकते.
  • काही चॅनल तुमची वरील माहिती सेवा (उदाहरणार्थ, एखाद्या तृतीय पक्ष कंपनीने होस्ट केलेल्या चॅटरूमचा फक्त सदस्यांसाठी असलेला अ‍ॅक्सेस) देण्यासाठी शेअर करू शकतात.

तृतीय पक्ष साइट किंवा अ‍ॅपला असलेला अ‍ॅक्सेस तपासणे आणि काढून टाकणे

तृतीय पक्ष साइट किंवा अ‍ॅपला असलेला अ‍ॅक्सेस काढून टाकणे

तुम्ही आता तुमचा विश्वास नसलेल्या एखाद्या साइट किंवा अ‍ॅपला खात्याचा अ‍ॅक्सेस दिला असल्यास, तुम्ही त्याला असलेला तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस काढून टाकू शकता. साइट किंवा अ‍ॅप तुमच्या Google खाते मधील आणखी कोणतीही माहिती अ‍ॅक्सेस करू शकणार नाही, पण त्यांच्याकडे आधीच असलेला डेटा त्यांनी हटवावा अशी तुम्हाला विनंती करावी लागू शकते.
  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डाव्या नेव्हिगेशन पॅनलवर, सुरक्षा निवडा.
  3. खाते अ‍ॅक्सेस पॅनलसह तृतीय पक्ष अ‍ॅप्स यावर, तृतीय पक्ष अ‍ॅक्सेस व्यवस्थापित करा निवडा.
  4. तुम्हाला काढून टाकायची असलेली साइट किंवा अ‍ॅप निवडा.
  5. अ‍ॅक्सेस काढून टाका निवडा.

तृतीय पक्ष साइट किंवा ॲपची तक्रार करणे

एखादी साइट किंवा अ‍ॅप तुमच्या डेटाचा गैरवापर स्पॅम तयार करणे, तुमची तोतयेगिरी करणे किंवा तुमचा डेटा हानिकारक पद्धतीने वापरणे यांसारखा करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, या पायर्‍या फॉलो करा.

  1. तुमच्या Google खाते चा तुमच्या खात्याचा अ‍ॅक्सेस असलेली अ‍ॅप्स विभाग यावर जा. तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
  2. तुम्हाला तक्रार करायचे असलेले अ‍ॅप आणि त्यानंतर या अ‍ॅपची तक्रार करा निवडा.

तृतीय पक्ष साइट आणि अ‍ॅप्ससाठी खात्याचा अ‍ॅक्सेस याबद्दल अधिक जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18048305617405868591
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false