मुख्य YouTube साइट आणि अॅपवरील चॅनल सदस्यत्वे तुम्हाला सार्वजनिक बॅज, इमोजी आणि चॅनलने देऊ केलेल्या निर्माणकर्ता लाभांचा अॅक्सेस खरेदी करू देतात.
तुमचा देश आणि तुम्ही वापरत असलेला प्लॅटफॉर्म यांनुसार सदस्यत्वांच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात.
सामील होणे, पातळी बदलणे किंवा सदस्यत्व रद्द करणे
चॅनलचे सदस्य होणे
- youtube.com ला भेट द्या किंवा YouTube अॅप उघडा.
- तुम्ही ज्याला सपोर्ट करू इच्छिता त्या निर्माणकर्त्याच्या चॅनलवर किंवा त्याने अपलोड केलेल्या व्हिडिओवर जा आणि त्यांनी त्यांच्या चॅनलवर सदस्यत्वे सुरू केली आहेत का हे पहा.
- सामील व्हा वर क्लिक करा किंवा टॅप करा.
- तुमची पेमेंट माहिती एंटर करण्यासाठी सूचना फॉलो करा.
- खरेदी करा वर क्लिक करा किंवा टॅप करा.
तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर तुम्हाला स्वागत घोषणा दिसेल.
तुमची सदस्यत्व पातळी बदलणे
अपग्रेड करण्यासाठी
- तुम्हाला बदलायच्या असलेल्या सदस्यत्वाच्या चॅनल होमपेजवर जा आणि लाभ पहा वर टॅप करा.
- तुम्हाला सामील व्हायचे असलेली पातळी निवडा पातळी बदला.
- अपग्रेड करा निवडा.
- तुम्हाला अधिक वरच्या पातळीचा तात्काळ अॅक्सेस मिळेल.
- किमतीसंबंधी टीप: तुमच्याकडून अॅडजस्ट केलेल्या किमतीवर फक्त पातळ्यांच्या किमतीमधील फरक घेतला जाईल. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या बिलिंग महिन्याच्या अर्ध्यावर अपग्रेड केल्यास, तुमच्याकडून [|मूळ किंमत - नवीन किंमत|] x [५०%] घेतले जातील.
- उदाहरण: तुम्ही $४.९९ देत असल्यास आणि तुमच्या पुढील पेमेंटपर्यंत अर्धा महिना शिल्लक असताना तुम्ही $९.९९ वर बदलत असल्यास, तुमच्याकडून ($९.९९-$४.९९)X (०.५)=$२.५० घेतले जातील.
डाउनग्रेड करण्यासाठी
- तुम्हाला बदलायच्या असलेल्या सदस्यत्वाच्या चॅनल होमपेजवर जा आणि लाभ पहा वर टॅप करा.
- तुम्हाला सामील व्हायचे असलेली पातळी निवडा पातळी बदला.
डाउनग्रेडसाठी बिलिंग आणि अॅक्सेसचे तपशील
- तुमच्या पुढील पेमेंट तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या मूळ पातळीचा अॅक्सेस मिळेल.
- तुमच्या पुढील बिलिंग तारखेला तुमच्याकडून नवीन कमी किंमत घेतली जाईल.
- निर्माणकर्त्याने देऊ केली असल्यास, तुमच्या बॅजमध्ये दर्शवलेली, जमा झालेली कोणतीही लॉयल्टी रिवॉर्ड तुमच्याकडेच राहतील.
- YouTube मध्ये साइन इन करा.
- तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- "खरेदी आणि सदस्यत्वे" निवडा.
- तुम्हाला रद्द करायचे असलेले सदस्यत्व निवडा.
- डीअॅक्टिव्हेट करा वर टॅप करा.
- सदस्यत्व संपवा वर टॅप करा.
तुम्हाला तुमचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत समस्या येत असल्यास, येथे अधिक जाणून घ्या.
भेटीदाखल सदस्यत्व खरेदी करणे
दर्शकांना भेटीदाखल सदस्यत्वांमुळे इतर दर्शकांसाठी कमाल एक महिन्याचे चॅनल सदस्यत्वाचे लाभ अॅक्सेस करण्याची संधी खरेदी करता येते. भेटीदाखल सदस्यत्वे खरेदी करण्यासाठी, तुम्ही भेटवस्तू सुरू असलेल्या चॅनलवर लाइव्हस्ट्रीम किंवा प्रिमीयर पाहत असणे आवश्यक आहे.
भेटीदाखल सदस्यत्वे ही पात्र चॅनलवरील लाइव्हस्ट्रीम आणि प्रिमीयर वर उपलब्ध आहेत. चॅनलसाठी भेटीदाखल सदस्यत्वे उपलब्ध असल्यास, तुम्ही लाइव्ह स्ट्रीम किंवा प्रिमीयर दरम्यान भेटीदाखल सदस्यत्व खरेदी करू शकता:
- Android अॅपवर YouTube मध्ये साइन इन करा.
- तुम्हाला ज्यावर भेटीदाखल सदस्यत्वे खरेदी करायची आहेत त्या पात्र चॅनलवर जा.
- चॅनलचे लाइव्ह स्ट्रीम किंवा प्रिमीयर यामध्ये सामील व्हा.
- लाइव्ह चॅटमध्ये, वर टॅप करा.
- भेटीदाखल सदस्यत्वे वर टॅप करा.
- तुम्हाला भेटीदाखल सदस्यत्वे द्यायची असलेल्या दर्शकांची संख्या निवडा.
- व्यवहार पूर्ण करा.
भेटीदाखल सदस्यत्वे ही कमाल $५ सह आणि त्यापर्यंत उपलब्ध असलेल्या सर्वात जवळच्या किंमत पातळीवर देऊ केली जातात.
तुम्ही भेटीदाखल सदस्यत्वे खरेदी केल्यावर, काउंटडाउन टिकर लाइव्ह चॅटमध्ये मर्यादित कालावधीसाठी तुमची खरेदी हायलाइट करेल. कालावधी हा तुमच्या खरेदीच्या रकमेवर अवलंबून असतो. तुमच्या भेटवस्तूची घोषणा केली जाण्यापूर्वी निर्माणकर्ता लाइव्ह चॅट किंवा लाइव्ह स्ट्रीम संपवू शकतो, पण YouTube हे तरीही त्यानंतर काही कालावधीसाठी भेटवस्तू वितरित करणे सुरू ठेवेल.
भेटीदाखल सदस्यत्वे कशी खरेदी करावीत आणि मिळवावीत
दर्शकांनी भेटीदाखल सदस्यत्वांसाठी पात्र ठरण्याकरिता निवडणे आवश्यक आहे. तुम्ही भेटीदाखल सदस्यत्वे निवडल्यानंतर, ज्यांच्याशी अलीकडे संवाद साधला आहे (उदाहरणार्थ, त्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून), अशा भेटवस्तू देणे सुरू केलेल्या कोणत्याही चॅनलवर ती मिळवण्यासाठी आता पात्र आहात. तुम्हाला भेटवस्तू मिळाल्यावर, ती तुमच्या खात्यावर आपोआप लागू केली जाईल, ज्यामुळे तुम्हाला बॅज आणि कस्टम इमोजी यांसारख्या विशेष लाभांचा अॅक्सेस मिळेल.
तुम्ही यापूर्वी फक्त एखाद्या विशिष्ट चॅनलसाठी भेटीदाखल सदस्यत्वे निवडली असल्यास, तरीही त्या चॅनलवर भेटवस्तू मिळवण्याकरिता पात्र आहात. इतर चॅनलवर भेटवस्तू मिळवण्यासाठी पात्र ठरण्याकरिता तुम्ही तरीही जागतिक स्तरावर सर्व चॅनलसाठी भेटीदाखल सदस्यत्वे निवडणे आवश्यक आहे.
भेटीदाखल सदस्यत्वे निवडण्यासाठी, तुम्ही ब्रँड खाते नसलेले YouTube चॅनल वापरून साइन इन केलेले असणे आवश्यक आहे. तुम्ही ब्रँड खाते वापरत आहात का ते तपासणे हे करा. या क्षणी, चॅनल सदस्य भेटीदाखल सदस्यत्वे मिळवण्यास पात्र नाहीत.
भेटीदाखल सदस्यत्वे निवडणे
पुढील मार्गांच्या समावेशासह, पण त्यांपुरतेच मर्यादित न राहता भेटवस्तू निवडण्याचे अनेक मार्ग आहेत:
- लाइव्ह चॅटमध्ये
- व्हिडिओच्या वॉच पेजवर
- निर्माणकर्त्याची युनिक ऑप्ट-इन URL वापरून (शेवटी /allow_gifts असलेली चॅनल पेजची लिंक).
लाइव्ह चॅटद्वारे निवडणे
- पात्र चॅनलच्या लाइव्ह स्ट्रीम किंवा प्रिमीयर वर जा.
- लाइव्ह चॅटमध्ये:
- भेटवस्तूंना अनुमती द्या निवडा किंवा
- पिन केलेले भेटीदाखल सदस्यत्वे निवडा.
- “भेटवस्तूंना अनुमती द्या” स्विच सुरू करून तुम्हाला भेटीदाखल सदस्यत्वे निवडायची असल्याचे कंफर्म करा.
व्हिडिओच्या वॉच पेजद्वारे निवडणे:
- पात्र चॅनलच्या व्हिडिओवर जा.
- सामील व्हा आणखी ”भेटवस्तू सेटिंग्ज” वर क्लिक करा.
- “भेटवस्तूंना अनुमती द्या” स्विच सुरू करून तुम्हाला भेटीदाखल सदस्यत्वे निवडायची असल्याचे कंफर्म करा.
भेटवस्तूंना अनुमती देण्याची निवड रद्द करण्यासाठी, सदस्यत्वे सुरू केलेल्या कोणत्याही चॅनल किंवा वॉच पेजवर सामील व्हा वर क्लिक करून “भेटवस्तू सेटिंग्ज” उघडा आणि “भेटवस्तूंना अनुमती द्या” टॉगल बंद करा. तुम्ही यापुढे कोणत्याही चॅनलवर भेटवस्तू मिळवण्यासाठी पात्र असणार नाही.
भेटीदाखल सदस्यत्व मिळवणे
एखाद्या चॅनल सदस्याने किंवा निर्माणकर्त्याने भेटीदाखल सदस्यत्वे खरेदी केल्यावर, ते लाइव्ह चॅटमध्ये घोषित केले जाते. तुम्हाला एका महिन्याचे सदस्यत्व मिळवण्यासाठी निवडले गेले असल्यास, लाइव्ह चॅटमध्ये एक सूचना दिसेल आणि आम्ही तुम्हाला ईमेल सूचना पाठवू.
भेटीदाखल सदस्यत्वे परतावा न मिळू शकणारी असतात आणि रोख रकमेच्या मोबदल्यात बदलता येत नाहीत. सर्व भेटीदाखल सदस्यत्वे ही चॅनल सदस्यत्व लाभांचा एका महिन्यापर्यंत अॅक्सेस देतात आणि त्यानंतर एक्स्पायर होतात.
तुमचे सदस्यत्व फायदे आणि अॅक्सेससंबंधी लाभ पाहण्यासाठी:
- तुम्ही ज्या चॅनलचे सदस्य झाला आहात त्यावर ‘सदस्यत्व’ टॅब निवडा किंवा
- त्या चॅनलच्या कोणत्याही व्हिडिओ पेजवर लाभ पहा निवडा.
भेटीदाखल सदस्यत्वे आवर्ती होणारी नसतात आणि ती संपल्यानंतर तुमच्याकडून शुल्क आकारले जाणार नाही. तुम्हाला तुमचे भेटीदाखल सदस्यत्व लवकर संपवायचे असल्यास, सपोर्ट शी संपर्क साधा. तुम्ही भेटीदाखल सदस्यत्वाच्या फायद्यांचा अॅक्सेस गमवाल.
पेमेंट आणि बिलिंग माहिती
बिलिंग माहिती
नवीन आणि सध्याचे सदस्य
तुमच्याकडे अॅक्टिव्ह सशुल्क सदस्यत्व असताना, प्रत्येक मासिक बिलिंग चक्राच्या सुरुवातीला तुमच्याकडून शुल्क आपोआप घेतले जाईल.
रद्द केलेली सदस्यत्वे
तुम्ही सशुल्क चॅनल सदस्यत्व रद्द केल्यावर, तुम्ही ते पुन्हा अॅक्टिव्हेट केल्याशिवाय तुमच्याकडून पुन्हा शुल्क घेतले जाणार नाही. तो बिलिंग कालावधी संपेपर्यंत तुम्हाला सदस्यत्व लाभ मिळणे सुरू राहील.
सदस्यत्वे पुन्हा अॅक्टिव्हेट करणे
तुम्ही तुमचे सदस्यत्व कधीही पुन्हा अॅक्टिव्हेट करू शकता. तुम्ही ज्या बिलिंग चक्रामध्ये रद्द केले त्याच बिलिंग चक्रामध्ये पुन्हा अॅक्टिव्हेट केल्यास, सध्याचे बिलिंग चक्र संपेपर्यंत तुमच्याकडून शुल्क घेतले जाणार नाही.
तुमची पेमेंट माहिती अपडेट करणे
भारतामधील आवर्ती शुल्के
थांबवलेल्या चॅनल सदस्यत्वांचा तुमच्या पेमेंटवर कसा परिणाम होतो
“थांबवलेला मोड” याचे स्पष्टीकरण
कधीकधी, चॅनल सदस्यत्वे “थांबवलेला मोड” यामध्ये ठेवली जातात. चॅनलने MCNs बदलल्यास, त्यांचे चॅनल मुलांसाठी तयार केलेले म्हणून सेट केल्यास किंवा ते कमाई करू शकत नसल्यास, असे होऊ शकते. “थांबवलेला मोड” होतो, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे, की सदस्यत्वे वापरून चॅनल कमाई करू शकत नाही -- ही बरेचदा तात्पुरती स्थिती असते. एखादे चॅनल “थांबवलेला मोड” यामध्ये असते, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे, की ते लाभ आणि इतर फायदे डिलिव्हर करू शकत नाहीत.
पेमेंट तपशील
तुम्ही “थांबवलेला मोड” यामधील एखाद्या चॅनलचे अॅक्टिव्ह सशुल्क सदस्य असल्यास, तुमचे मासिक आवर्ती पेमेंट, बिलिंग चक्र आणि सदस्यत्वांचा अॅक्सेसदेखील थांबवला जाईल.
तुम्ही iOS किंवा Android वर चॅनल सदस्यत्वासाठी साइन अप केले असल्यास, तुमचा बिलिंग कालावधी संपल्यानंतर चॅनल थांबवलेल्या मोडमध्ये असल्यास, तुमचे मासिक आवर्ती पेमेंट कदाचित रद्द केले जाईल. असे झाल्यास, तुम्हाला तुमचे सदस्यत्व रद्द केले गेल्याचे सूचित केले जाईल आणि चॅनलचे सदस्यत्व पुन्हा सुरू केले गेल्यास/गेल्यावर, तुम्हाला पुन्हा सामील होता येईल.
चॅनलवर सदस्यत्वे कमाल १२० दिवसांसाठी थांबवलेली राहू शकतात; त्या टप्प्यानंतर, सदस्यत्वे आणि सदस्यांची मासिक आवर्ती पेमेंट रद्द केली जातील.
समाप्त केलेल्या चॅनल सदस्यत्वांचा तुमच्या पेमेंटवर कसा परिणाम होतो
चॅनल सदस्यत्व परतावे
निर्माणकर्त्यांसोबत चॅनल सदस्यत्वामधील कमाईची वाटणी
तुमचे सदस्यत्व फायदे वापरणे आणि व्यवस्थापित करणे
सर्व सदस्यांसाठी चॅनल सदस्यत्व फायदे
- फक्त सदस्यांसाठीच्या समुदाय पोस्ट: तुम्ही चॅनलच्या समुदाय टॅबवर फक्त सदस्यांसाठीच्या पोस्ट पाहू शकता. विशेष आशय हा “फक्त सदस्यांसाठी” म्हणून टॅग केला जातो आणि त्यामध्ये मजकूर पोस्ट, GIFs, मतचाचण्या, व्हिडिओ आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो.
- सदस्यांसाठी प्रशंसाफलक: निर्माणकर्त्याने हे शेल्फ सुरू केलेले असल्यास, चॅनलच्या पेजवरील इतर अॅक्टिव्ह सदस्यांसोबत तुमचा अवतार दाखवला जाऊ शकतो. हे शेल्फ म्हणजे निर्माणकर्त्याचा तुम्हाला चॅनलचे सदस्य झाल्याबद्दल सार्वजनिकरीत्या धन्यवाद म्हणण्याचा मार्ग आहे. तुम्ही तुमचे सदस्यत्व रद्द केल्यास, यापुढे तुम्ही शेल्फवर दिसणार नाही.
- सदस्याचे माइलस्टोन चॅट: तुम्ही सदस्य राहता त्या प्रत्येक महिन्यासाठी (तुमच्या दुसर्या लागोपाठच्या महिन्यापासून) तुम्हाला एक सदस्याचे माइलस्टोन चॅट मिळेल. सदस्याचे माइलस्टोन चॅट हे हायलाइट केलेले विशेष मेसेज असतात, जे लाइव्ह स्ट्रीम किंवा प्रिमीयर यांवरील लाइव्ह चॅटमध्ये वापरले जाऊ शकतात. हे विशेष मेसेज तुम्ही या चॅनलचे एकूण किती काळापासून सदस्य राहिला आहात ते हायलाइट करतात आणि सर्व दर्शकांना दिसतात.
- चॅनलचे बॅज: हा सार्वजनिकपणे दिसणारा विशेष सदस्यत्व बॅज आहे, जो तुम्ही त्या चॅनलवर आणि लाइव्ह चॅटमध्ये करता त्या सर्व टिप्पण्यांमध्ये तुमच्या चॅनलच्या नावाशेजारी दिसतो.
- काही चॅनलवर, वेगवेगळ्या रंगांच्या डीफॉल्ट बॅजद्वारे किंवा कस्टम बॅजद्वारे तुम्ही किती काळ सदस्य आहात हे दर्शवले जाईल.
- फक्त सदस्यांसाठीचे व्हिडिओ: विशेष व्हिडिओ हे फक्त योग्य पातळीवरील चॅनल सदस्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कोणीही फक्त सदस्यांसाठीचा व्हिडिओ शोधू शकते, पण फक्त योग्य पातळ्यांवरील सदस्य तो पाहू शकतात. हे व्हिडिओ चॅनलच्या सदस्यत्व, आशय आणि समुदाय टॅबवर दिसू शकतात. हे व्हिडिओ सदस्याच्या होम आणि सदस्यत्वे फीडमध्येदेखील दिसू शकतात.
- नवीन सदस्य मेसेज: तुम्ही त्या चॅनलवरील लाइव्ह स्ट्रीमदरम्यान चॅनल सदस्य झाल्यास, लाइव्ह चॅटमध्ये “नवीन सदस्य” असा प्रखर हिरवा मेसेज पाठवला जाईल. तुमचा प्रोफाइल फोटो ५ मिनिटांसाठी चॅटच्या सर्वात वरती पिनदेखील केला जातो.
- फक्त सदस्यांसाठीचे लाइव्ह चॅट: सार्वजनिक लाइव्ह स्ट्रीम दरम्यान, निर्माणकर्ते चॅटला फक्त सदस्यांसाठीचे चॅट बनवू शकतात. सर्वजण अजूनही लाइव्ह स्ट्रीम पाहू शकत असले, तरीही फक्त सदस्य चॅट पोस्ट करू शकतात.
- कस्टम इमोजी: निर्माणकर्त्याने इमोजी अपलोड केला असल्यास, चॅनल सदस्य हे चॅनलच्या व्हिडिओ आणि लाइव्ह चॅटवरील टिप्पण्यांमध्ये विशेष इमोजी वापरू शकतात. तुम्ही लाइव्ह चॅटमध्ये इमोजी ऑटोकंप्लीट करण्यासाठी निर्माणकर्त्याने असाइन केलेले कुटुंबाचे नाव वापराल.
- इतर निर्माणकर्ता लाभ: चॅनलद्वारे सुविधा दिल्या गेल्यास, तुम्हाला निर्माणकर्त्याच्या इतर विशेष लाभांचादेखील अॅक्सेस मिळू शकतो.
टीप: "स्लो मोड" - जो तुम्ही लाइव्ह चॅटमध्ये किती वेळा टिप्पणी देऊ शकता ते मर्यादित करतो - अॅक्टिव्ह सशुल्क सदस्यांना लागू होत नाही.
वेगवेगळ्या पातळ्यांसाठी निर्माणकर्ता लाभ
मला प्रत्येक पातळीसाठी काय मिळते आणि मी सामील कसे व्हावे?
हे प्रत्येक चॅनलनुसार बदलते. तुम्ही सामील व्हा वर क्लिक केल्यावर तुम्हाला वेगवेगळे लाभ दिसू शकतात.
मी आधीपासून सदस्य आहे, तेव्हा मला उपलब्ध असलेले वेगवेगळे लाभ कसे दिसतील?
तुम्ही आधीच सामील झालेल्या चॅनलच्या होमपेजवर जा लाभ पहा निवडा.
चॅनल सदस्यत्व सूचना सुरू किंवा बंद करणे
चॅनल सदस्य म्हणून, तुम्हाला समुदाय टॅब, सदस्यत्व टॅब किंवा चॅनलचा आशय टॅब यांमध्ये फक्त सदस्यांसाठी असलेला आशय सापडू शकतो. तुम्हाला तुमच्या होम आणि सदस्यत्वे फीडमध्ये फक्त सदस्यांसाठीचे व्हिडिओ दिसत असल्याचेदेखील लक्षात येईल. चॅनल पुढील गोष्टी करते, तेव्हा तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही सूचना किंवा ईमेलदेखील वापरू:
- फक्त सदस्यांसाठी असलेली नवीन पोस्ट तयार करणे
- फक्त सदस्यांसाठी असलेला नवीन व्हिडिओ अपलोड करणे
- फक्त सदस्यांसाठी असलेले लाइव्ह स्ट्रीम सुरू करणे
- ३० मिनिटांमध्ये सुरू होणारे फक्त सदस्यांसाठी असलेले लाइव्ह स्ट्रीम शेड्युल करणे
तुम्ही फक्त सदस्यांसाठी असलेल्या आशयासाठी सूचना आणि ईमेल मिळवण्याची निवड रद्ददेखील करू शकता.
सूचना बंद करणे
तुम्हाला फक्त सदस्यांसाठी असलेल्या नवीन आशयाबद्दल जाणून घ्यायचे नसल्यास, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
- तुम्ही ज्यांचे सदस्य आहात अशा स्वतंत्र चॅनलसाठी सूचना आणि ईमेलची निवड रद्द करणे.
- फक्त सदस्यांसाठी असलेल्या आशयाकरिता सूचनांची निवड रद्द करण्यासाठी: सेटिंग्ज सूचना वर जा फक्त सदस्यांसाठी च्या बाजूला असलेले स्विच बंद करा.
- फक्त सदस्यांसाठी असलेल्या आशयाकरिता ईमेलची निवड रद्द करण्यासाठी: तुम्हाला मिळालेल्या कोणत्याही फक्त सदस्यांसाठी ईमेलमधील सदस्यत्व रद्द करा लिंक वापरा. तुम्हाला ईमेल सूचनांसाठी पुन्हा सदस्यत्व घ्यायचे असल्यास, सेटिंग्ज सूचना वर जा “ईमेल सूचना” या अंतर्गत “सदस्यत्व रद्द केलेले ईमेल” निवडा आणि तुम्हाला कोणते ईमेल मिळवायचे आहेत ते निवडा.
- स्वतंत्र चॅनलसाठी सर्व सूचनांची निवड रद्द करणे:
- तुम्ही सदस्यत्व घेतलेले चॅनल सूचना काहीही नाही वर जा. यामुळे या चॅनलसाठी सर्व सूचना बंद होतील, फक्त सदस्यांसाठी असलेल्या आशयाकरिता नाही.
- तुमच्या खात्यावर सर्व सूचना बंद करणे हे करा.
समुदाय टॅबमध्ये विशेष आशय पाहणे
अयोग्य लाभांची तक्रार करणे
गोपनीयतेसंबंधी माहिती
दृश्यमान सदस्यत्व स्टेटस
- तुमची चॅनल URL
- तुमच्या YouTube चॅनलचे नाव
- तुमचा प्रोफाइल फोटो
- तुम्ही सदस्य म्हणून चॅनलमध्ये कधी सामील झालात
- तुम्ही कोणत्या पातळीवरील सदस्य आहात
तुमची माहिती कशी वापरली जाऊ शकते
- सर्व सदस्यांकडे दृश्यमान बॅज असतो, जो टिप्पण्या आणि चॅटमध्ये तुमच्या चॅनलच्या नावाच्या बाजूला दिसतो.
- तुम्ही त्या चॅनलवरील लाइव्ह स्ट्रीमदरम्यान चॅनल सदस्य झाल्यास, लाइव्ह चॅटमध्ये प्रखर हिरवा “नवीन सदस्य” मेसेज पाठवला जाईल आणि तुमचा प्रोफाइल फोटो ५ मिनिटांसाठी लाइव्ह चॅटच्या सर्वात वर पिन केला जाईल, ज्यावर कर्सर फिरवल्यावर तुमच्या चॅनलचे नाव दिसेल.
- काही चॅनल तुमची माहिती त्यांच्या व्हिडिओमधील “धन्यवाद” सूचीमध्ये जोडू शकतात किंवा तुमची माहिती चॅनलच्या प्रशंसाफलकामध्ये जोडली जाऊ शकते.
- काही चॅनल तुमची वरील माहिती सेवा (उदाहरणार्थ, एखाद्या तृतीय पक्ष कंपनीने होस्ट केलेल्या चॅटरूमचा फक्त सदस्यांसाठी असलेला अॅक्सेस) देण्यासाठी शेअर करू शकतात.
तृतीय पक्ष साइट किंवा अॅपला असलेला अॅक्सेस तपासणे आणि काढून टाकणे
तृतीय पक्ष साइट किंवा अॅपला असलेला अॅक्सेस काढून टाकणे
- तुमच्या Google खाते वर जा.
- डाव्या नेव्हिगेशन पॅनलवर, सुरक्षा निवडा.
- खाते अॅक्सेस पॅनलसह तृतीय पक्ष अॅप्स यावर, तृतीय पक्ष अॅक्सेस व्यवस्थापित करा निवडा.
- तुम्हाला काढून टाकायची असलेली साइट किंवा अॅप निवडा.
- अॅक्सेस काढून टाका निवडा.
तृतीय पक्ष साइट किंवा ॲपची तक्रार करणे
एखादी साइट किंवा अॅप तुमच्या डेटाचा गैरवापर स्पॅम तयार करणे, तुमची तोतयेगिरी करणे किंवा तुमचा डेटा हानिकारक पद्धतीने वापरणे यांसारखा करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, या पायर्या फॉलो करा.
- तुमच्या Google खाते चा तुमच्या खात्याचा अॅक्सेस असलेली अॅप्स विभाग यावर जा. तुम्हाला साइन इन करावे लागू शकते.
- तुम्हाला तक्रार करायचे असलेले अॅप या अॅपची तक्रार करा निवडा.
तृतीय पक्ष साइट आणि अॅप्ससाठी खात्याचा अॅक्सेस याबद्दल अधिक जाणून घ्या.