जाहिरात कमाईची विश्लेषणे समजून घेणे

तुम्ही YouTube विश्लेषण मधील मेट्रिक वापरून चॅनलचा परफॉर्मन्स आणि तुमची YouTube कमाई तपासणे हे करू शकता. काही मेट्रिक एकसारखीच दिसतात, पण तुमची YouTube जाहिरात कमाई समजून घेण्यासाठी त्यांमधील फरक समजणे महत्त्वाचे आहे.

RPM

दर हजारी कमाई (RPM) ही तुम्ही प्रति १००० व्हिडिओ व्ह्यूमागे किती कमाई केली आहे ते दाखवणारे मेट्रिक आहे. RPM ही पुढील गोष्टींच्या समावेशासह कमाईच्या अनेक स्रोतांवर आधारित आहे: जाहिराती, चॅनल सदस्यत्वे, YouTube Premium मधून केलेली कमाई, सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स.

माझी RPM माझ्या CPM पेक्षा कमी का आहे?

RPM ही CPM पेक्षा कमी आहे, कारण RPM:
  • हिची गणना ही YouTube ने कमाईची वाटणी केल्यानंतर केली जाते.
  • त्यामध्ये कमाई न केलेल्या व्ह्यूसह सर्व व्ह्यूचा समावेश असतो.
RPM मेट्रिकच्या जोडणीचा भाग म्हणून तुम्ही कमाई केलेली रक्कम बदलली गेली नाही.

RPM आणि CPM यांमध्ये काय फरक आहे?

CPM म्हणजे YouTube ने कमाईची वाटणी करण्याआधी प्रति १००० जाहिरात इंप्रेशनमागील शुल्क. RPM म्हणजे (YouTube च्या कमाईची वाटणी केल्यानंतर) प्रति १००० व्ह्यूमागील तुमची एकूण कमाई.

RPM

CPM

  • निर्माणकर्त्यावर ‍केंद्रित केलेले मेट्रिक
  • जाहिराती, YouTube Premium, चॅनल सदस्यत्वे, सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स यांसह YouTube विश्लेषण मध्ये नोंद केलेल्या एकूण कमाईचा समावेश आहे
  • कमाई न केलेल्या व्हिडिओसह, तुमच्या व्हिडिओवरील एकूण व्ह्यूचा समावेश आहे
  • कमाईची वाटणी केल्यानंतर मिळालेली प्रत्यक्ष कमाई.
  • जाहिरातदारावर केंद्रित केलेले मेट्रिक
  • फक्त जाहिराती आणि YouTube Premium मधील कमाईचा समावेश आहे
  • फक्त कमाई केलेल्या (म्हणजे ज्याच्या बाबतीत जाहिराती दाखवल्या गेल्या होत्या अशा) व्हिडिओच्या व्ह्यूचा समावेश आहे
  • कमाईची वाटणी करण्याआधीची कमाई

RPM का महत्त्वाची आहे?

RPM तुम्हाला प्रति १००० व्ह्यूमागे तुम्ही किती कमाई करत आहात हे पाहू देते. तुमची कमाई कितपत परिणामकारक आहे हे समजण्यातदेखील ती तुम्हाला मदत करते.

मला माझी RPM कशी वाढवता येईल?

तुमच्या RPM मध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही तुमच्या एकूण कमाईमध्ये सुधारणा केली पाहिजे. RPM वाढवण्यासाठी येथे काही पायर्‍या दिल्या आहेत:
  • सर्व व्हिडिओवर कमाई सुरू करा.
  • व्हिडिओदरम्यान आपोआप प्ले होणाऱ्या जाहिराती सुरू करा
  • तुमचे कमाईचे स्रोत बदलण्यासाठी AltMon वैशिष्ट्ये (उदाहरणार्थ, सदस्यत्वे, सुपर चॅट) सुरू करा.

लक्षात ठेवा, की प्रत्येक वैशिष्ट्याच्या स्वतःच्या आवश्यकता आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

माझ्या RPM मध्ये वाढ किंवा घट होत असल्यास, त्याचा अर्थ काय आहे?

RPM म्हणजे तुम्ही YouTube वर किती दराने कमाई करत आहात याचा स्नॅपशॉट आहे. त्यामध्ये वाढ झाल्यास, तुम्ही प्रत्येक १००० व्ह्यूमागे जास्त कमाई करत आहात आणि ती घटल्यास, तुम्ही कमी कमाई करत आहात असा अर्थ होतो. लक्षात घ्या, की तुमच्या कमाईमध्ये कोणताही बदल झालेला नसला, तरीही कमाई न केलेल्या व्ह्यूमध्ये वाढ झाल्यावर तुमची RPM कमी होऊ शकते.
RPM मध्ये वाढ किंवा घट झाली, तरीही ती तुमच्या कमाईच्या धोरणामधील कोणती गोष्ट काम करत आहे किंवा नाही याचा एक चांगला संकेत आहे. RPM वर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो हे समजून घेणे तुम्हाला तुमच्या कमाईच्या धोरणामध्ये सुधारणा करण्यासंबंधी संधी ओळखण्यात मदत करू शकते.

RPM मला माझ्या कमाईबद्दल कोणती माहिती देत नाही?

RPM निर्माणकर्त्यांसाठी एक उपयुक्त कमाई मेट्रिक आहे, पण ती तुमच्या संपूर्ण कमाईसंबंधी माहिती सांगू शकत नाही. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश नसतो:

  • व्यापारी माल विकून किंवा व्यापारी माल शेल्फ वापरून केलेली कमाई.
  • ब्रँड डील आणि प्रायोजकत्वे (YouTube BrandConnect वगळून) यांद्वारे केलेली कमाई.
  • YouTube (सेवा, बोलणे, सल्लामसलतीसंबंधी शुल्क) द्वारे अप्रत्यक्षपणे जनरेट केलेली इतर कोणतीही कमाई.

तुमच्‍या एकूण कमाईमधील बदलासाठी कमाईचा कोणता स्रोत जबाबदार आहे हे RPM तुम्हाला सांगू शकत नाही

RPM अनेक मेट्रिक एकत्र करत असल्यामुळे, ती तुमच्या कमाईतील बदलासाठी कमाईचा कोणता स्रोत जबाबदार आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही.

उदाहरणार्थ, कदाचित तुमचे व्ह्यू वाढल्यामुळे तुम्हाला RPM मध्ये घट झाल्याचे दिसू शकते, पण सर्वच व्ह्यूच्या बाबतीत जाहिरात सुरू केलेली नसते. किंवा प्रेक्षक हे चॅनल सदस्यत्वे यांसाठी साइन अप करत असल्यामुळे व्ह्यूमध्ये कोणतेही लक्षणीय बदल न होता तुम्हाला तुमच्या RPM मध्ये वाढ झालेली दिसू शकते.

तुमच्या RPM मधील बदल पूर्णपणे समजून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला YouTube ने दिलेली सर्व वेगवेगळी विश्लेषणे वापरण्याची शिफारस करतो.

CPM

प्रति १००० इंप्रेशनमागील शुल्क (CPM) हे YouTube वर जाहिराती दाखवण्यासाठी जाहिरातदार किती पैसे खर्च करत आहेत ते दाखवणारे मेट्रिक आहे. तुम्हाला YouTube विश्लेषण मध्ये पुढीलप्रमाणे काही वेगवेगळी CPM मेट्रिक दिसतील:

  • CPM: जाहिरातदार १००० जाहिरात इंप्रेशनसाठी देतो ते शुल्क. जाहिरात प्रदर्शित केली जाते, तेव्हा जाहिरात इंप्रेशन मोजले जाते.
  • प्‍लेबॅकवर आधारित CPM: जाहिरात प्रदर्शित केलेल्या १००० व्हिडिओ प्लेबॅकसाठी जाहिरातदाराने भरलेले शुल्क.

CPM आणि प्‍लेबॅकवर आधारित CPM यांमध्ये काय फरक आहे?

YouTube वरील व्हिडिओमध्ये एकापेक्षा जास्त जाहिराती असू शकतात. CPM हे जाहिरात इंप्रेशनसाठी जाहिरातदाराच्या खर्चावर लक्ष केंद्रित करते. प्लेबॅकवर आधारित CPM हे व्हिडिओ प्लेबॅकसाठी जाहिरातदाराच्या खर्चावर लक्ष केंद्रित करते, ज्यामध्ये एक किंवा त्याहून अधिक जाहिरातींचा समावेश असतो. तुमचे प्‍लेबॅकवर आधारित CPM हे अनेकदा तुमच्या CPM पेक्षा जास्त असते.
उदाहरणार्थ, तुमचा व्हिडिओ ५००० वेळा पाहिला गेला आहे, असे समजू या. जाहिरात असलेल्या एकूण १५०० व्ह्यूपैकी १००० व्ह्यूमध्ये एका जाहिरातीचा आणि ५०० इतर व्ह्यूमध्ये दोन जाहिरातींचा समावेश आहे. या उदाहरणाचा अर्थ असा, की २००० वैयक्तिक जाहिरात इंप्रेशन होती, पण त्यांपैकी कमाई केली जाणारे प्लेबॅक फक्त १५०० होते.
जाहिरातदाराने एकूण $७ भरले असे समजू या. व्हिडिओचे प्रति इंप्रेशन शुल्क हे $७ या जाहिरातदार शुल्काला २००० जाहिरात इंप्रेशननी भाग दिल्यानंतर असलेले किंवा $०.००३५ इतके असेल. CPM किंवा प्रति १००० इंप्रेशन शुल्क हे $०.००३५ च्या १००० पट किंवा $३.५० इतके असेल. प्‍लेबॅकवर आधारित CPM हे $७ ला कमाई केली जाणाऱ्या १५०० प्लेबॅकने भाग दिल्यानंतर, १००० पट किंवा $४.६७ इतके असेल.

CPM महत्त्वाचे का आहे?

तुमच्‍या व्हिडिओवर जाहिरात दाखवल्‍यावर, तुम्हाला जाहिरातदारांनी केलेल्या पेमेंटमधील वाटणी मिळते. जाहिरातदार त्या जाहिरातीसाठी जितके जास्त पेमेंट करतो तितके जास्त पैसे तुम्हाला मिळतात. तुमचे CPM हे जाहिरातदारांना त्यांच्या व्यवसायाची ध्येये गाठण्यासाठी तुमचे व्हिडिओ आणि प्रेक्षक किती महत्त्वाचे समजतात याचे चांगले निदर्शक आहे.
तुमची कमाई ही तुमच्या व्ह्यूच्या CPM इतकी असणार नाही, कारण CPM हे जाहिरातदार किती पेमेंट करतात ते दाखवते, तुम्ही किती कमाई करता ते दाखवत नाही. तसेच, सर्व व्ह्यूमध्ये जाहिराती नसतील. काही व्हिडिओ जाहिरातदारस्नेही नसल्यास, ते जाहिरातींसाठी पूर्णपणे अपात्र आहेत. उपलब्ध जाहिरातींच्या अभावामुळे इतर व्हिडिओ व्ह्यूमध्ये कदाचित जाहिरातींचा समावेश नसेल. जाहिरातींचा समावेश असलेल्या व्ह्यूना कमाई केली जाणारे प्लेबॅक असे म्हटले जाते.

माझे CPM का बदलत आहे?

तुमच्या CPM मध्ये काळानुसार होणारे चढउतार ही सामान्य गोष्ट आहे आणि हे अनेक कारणांमुळे होते, जसे की:
  • वर्षातील कालावधी: जाहिरातदार हे वर्षातील कालावधीनुसार जास्त किंवा कमी बोली लावतात. उदाहरणार्थ, अनेक जाहिरातदार सुट्ट्यांच्या आधी जास्त बोली लावतात.
  • दर्शकाच्या भौगोलिक स्थानामधील बदल: जाहिरातदारांना त्यांच्या जाहिरातींच्या मदतीने कोणत्या भौगोलिक स्थानापर्यंत पोहोचायचे आहे हे ते नियंत्रित करू शकतात. जाहिरात बाजारामध्ये विविध स्थानांमध्ये विविध पातळ्यांवर स्पर्धा असतील, त्यामुळे भौगोलिक स्थानानुसार CPM बदलतील. तुमचे बहुतांश व्ह्यू ज्या स्थानावरून मिळत आहेत त्यामध्ये बदल झाल्यास, तुम्हाला CPM मध्ये बदल दिसू शकतो. उदाहरणार्थ, तुम्हाला याआधी जास्त CPM असलेल्या भौगोलिक स्थानावरून व्ह्यू मिळाले असल्यास, पण आता कमी CPM असलेल्या भौगोलिक स्थानावरून जास्त व्ह्यू मिळत असल्यास, तुम्हाला तुमच्या CPM मध्ये घट दिसू शकते.
  • उपलब्ध असलेल्या जाहिरातीच्या फॉरमॅटच्या वितरणामधील बदल: विविध जाहिरात प्रकारांमध्ये विविध CPM असतात. उदाहरणार्थ, जाहिरात इन्व्हेंटरीमध्ये वगळता न येणाऱ्या जाहिराती उपलब्ध असल्यास, CPM जास्त असू शकते.

अंदाजे कमाई वि. जाहिरात कमाई

  • अंदाजे कमाई: चॅनल सदस्यत्वे, YouTube Premium संबंधित कमाई आणि सुपर चॅट अनेकसह कमाईच्या सर्व प्रकारांद्वारे केलेली कमाई. तुम्हाला हे मेट्रिक कमाई टॅबवर दिसेल.
  • अंदाजे जाहिरात कमाई: तुमच्या व्हिडिओवरील फक्त जाहिरातींमधून मिळालेली कमाई. तुम्हाला हे मेट्रिक कमाईच्या स्रोतांच्या अहवालामध्ये दिसेल.

व्ह्यू, जाहिरात इंप्रेशन आणि अंदाजे कमाई केली जाणारे प्लेबॅक

  • व्ह्यू: तुमचा व्हिडिओ जितक्या वेळा पाहिला गेला ती संख्या.
  • जाहिरात इंप्रेशन: तुमच्या व्हिडिओवर वैयक्तिक जाहिराती जितक्या वेळा पाहिल्या गेल्या ती संख्या.
  • अंदाजे कमाई केली जाणारे प्लेबॅक: तुमचा व्हिडिओ जाहिरातींसह जितक्या वेळा पाहिला गेला ती संख्या.

तुमचा व्हिडिओ १० वेळा पाहिला गेला असल्यास आणि त्यांपैकी ८ व्ह्यूमध्ये जाहिराती असल्यास, तुमच्याकडे १० व्ह्यू आणि अंदाजे ८ कमाई केली जाणारे प्लेबॅक असतील. त्या अंदाजे कमाई केली जाणाऱ्या प्लेबॅकपैकी एका प्लेबॅकमध्ये प्रत्यक्षात २ जाहिराती असल्यास, तुम्हाला ९ जाहिरात इंप्रेशन मिळतील.

YouTube वरील सर्व व्ह्यूमध्ये जाहिरात नसते. पुढील बाबतींत व्ह्यूमध्ये जाहिरात नसू शकते:

  • व्हिडिओ जाहिरातदारस्नेही नाही.
  • त्या व्हिडिओसाठी जाहिराती बंद केल्या आहेत.
  • त्या ठरावीक दर्शकाला दाखवण्यासाठी जाहिरात उपलब्ध नसल्यास. जाहिरातदार हे विशिष्ट डिव्हाइस, लोकसंख्याशास्त्र आणि स्वारस्यांना लक्ष्य करणे निवडू शकतात. तुमचा दर्शक कदाचित या लक्ष्यीकरणाशी जुळत नाही. व्हिडिओ जाहिरातींसाठी उपलब्ध असलेल्या लक्ष्यीकरण पद्धती यांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • दर्शकाचे भौगोलिक स्थान, त्यांनी अलीकडे जाहिरात कधी पाहिली, त्यांच्याकडे Premium सदस्यत्व आहे का यांसह इतर विविध प्रकारच्या घटकांमुळे.

या वेगवेगळ्या व्ह्यूमुळे, तुम्हाला अंदाजे कमाई केली जाणाऱ्या प्लेबॅकपेक्षा जास्त व्ह्यू मिळण्याची शक्यता आहे.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17781552167533433603
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false