YouTube वरील “पुढील आशय या अ‍ॅपवर उपलब्ध नाही” एरर मेसेजचे निराकरण करणे

तुम्हाला “पुढील आशय या अ‍ॅपवर उपलब्ध नाही” असा एरर मेसेज मिळाल्यास, तुम्ही वापरत असलेले अ‍ॅप YouTube आशयाला सपोर्ट करत नाही. YouTube वर आशय पाहण्यासाठी, पुढील पायऱ्या वापरून पहा.

YouTube अ‍ॅपवर स्विच करणे

तुम्ही YouTube वर जाण्यासाठी तृतीय पक्ष ॲप वापरल्यास, तुम्हाला YouTube अ‍ॅपवर स्विच करावे लागेल. YouTube अ‍ॅप डाउनलोड करणे हे कसे करावे ते जाणून घ्या किंवा तुमच्या ब्राउझरवरून www.youtube.com ॲक्सेस करा. जाहिरातमुक अनुभवासाठी, तुम्ही YouTube Premium मध्ये साइन अप करू शकता.

YouTube आणि तृतीय पक्ष ॲप्स यांविषयी

तृतीय पक्ष ॲप्स आमच्या API सेवांच्या सेवा अटी यांचे पालन करतात, तेव्हाच आम्ही त्यांना आमचे API वापरण्याची अनुमती देतो. आमच्या अटी तृतीय पक्ष ॲप्सना जाहिराती बंद करण्याची अनुमती देत नाहीत, कारण त्यामुळे निर्माणकर्त्यांना त्यांच्या दर्शकसंख्येसाठी रिवॉर्ड दिले जाण्यापासून रोखले जाते. आम्हाला आमच्या अटींचे उल्लंघन करणारे अ‍ॅप आढळल्यास, आम्ही आमचा प्लॅटफॉर्म, निर्माणकर्ते आणि दर्शकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती कृती करतो.

YouTube अ‍ॅप अपडेट करणे

तुम्ही YouTube अ‍ॅप वापरत असल्यास, ते नवीनतम आवृत्तीवर अपडेट केले असल्याची खात्री करा. YouTube अ‍ॅप अपडेट करणे हे कसे करावे ते जाणून घ्या.

टीप:

  • तुम्हाला एरर मिळणे सुरू राहिल्यास, तुमच्या डिव्हाइसवर Google Play Store अप टू डेट असल्याची खात्री करा. Google Play Store अपडेट करणे हे कसे करावे ते जाणून घ्या.
  • अ‍ॅप अपडेट न करता YouTube वापरत राहण्यासाठी, तुमच्या मोबाइल ब्राउझरवर, m.youtube.com वर जा.

जुनी डिव्हाइस

तुम्हाला तरीही एरर मेसेज मिळाल्यास, तुमच्याकडे जुने डिव्हाइस किंवा जुने डिव्हाइस कॉन्फिगरेशन असू शकते. तुमचे डिव्हाइस न बदलता YouTube वापरणे सुरू ठेवण्यासाठी, तुमच्या मोबाइल ब्राउझरवर, m.youtube.com वर जा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13761468860416706572
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false