पर्यवेक्षित खात्यांसंदर्भात पालकांद्वारे वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

पर्यवेक्षित खाते आणि नेहमीचे YouTube किंवा YouTube Music खाते यांमध्ये काय फरक आहे?

तुमच्या लहान मुलाचे पर्यवेक्षित खाते हे बरेचसे नेहमीच्या YouTube किंवा YouTube Music खात्यासारखे दिसेल, पण त्यामधील उपलब्ध वैशिष्ट्ये आणि सेटिंग्ज वेगळी असतील.

तुमचे लहान मूल कोणता आशय प्ले करू शकते ते तुम्ही त्यांच्या पर्यवेक्षित खात्यासाठी निवडलेल्या आशय सेटिंग वर अवलंबून असेल. YouTube आणि YouTube Music वर सामान्यतः उपलब्ध असलेली काही वैशिष्ट्ये उपलब्ध नसतील. उपलब्ध नसलेल्या वैशिष्ट्यांची सूची मिळवण्यासाठी, YouTube वरील पर्यवेक्षित अनुभव म्हणजे काय? वर जा.

स्वअभिव्यक्ती आणि समुदाय हा YouTube चा महत्त्वाचा भाग असल्याने, पर्यवेक्षित खात्यांसाठी कोणती वैशिष्ट्ये परिणामकारक आहेत हे ठरवताना आम्ही पालक व तज्ञांसोबत काम करतो.

YouTube Kids म्हणजे काय? ते YouTube वरील पर्यवेक्षित खात्यापेक्षा कसे वेगळे आहे?

YouTube Kids हे आमचे समर्पित ॲप मुलांचा विचार करून तयार केले आहे. पर्यवेक्षित खात्याच्या बाबतीत, YouTube आणि YouTube Music वर मुले काय शोधू व प्ले करू शकतात यांवर मर्यादा घालणारे आशय सेटिंग पालक निवडतात.

YouTube Kids वरील व्हिडिओ हे वैविध्यपूर्ण असतात, पण त्यावर नेहमीच्या YouTube वर उपलब्ध असलेल्या व्हिडिओपेक्षा कमी व्हिडिओचा संग्रह असतो. व्हिडिओ हे अनेक कॉंबिनेशनमधून निवडले जातात. हे व्हिडिओ मानवी पुनरावलोकनाद्वारे आणि तज्ञांनी निवडलेल्या प्लेलिस्टमधून निवडले जातात. योग्य व्हिडिओ निवडण्यात अल्गोरिदमिक फिल्टरिंगही मदत करेल.

YouTube Kids आणि पर्यवेक्षित खात्यांमधील फरकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कुटुंब म्हणून तुमच्या निवडी समजून घेणे यावर जा.

प्रतिबंधित मोड म्हणजे काय? ते YouTube वरील पर्यवेक्षित खात्यापेक्षा कसे वेगळे आहे?

प्रतिबंधित मोड हे YouTube वरील पर्यायी सेटिंग आहे. तुम्हाला पाहायच्या नसलेल्या किंवा तुमचे डिव्हाइस वापरणाऱ्या इतरांनी पाहू नये असे तुम्हाला वाटणाऱ्या संभाव्यतः प्रौढांसाठी असलेल्या आशयाची छाननी करण्यात ते मदत करते. ज्या वापरकर्त्यांना अधिक मर्यादित YouTube अनुभव हवा असतो, जसे की लायब्ररी, शाळा आणि सार्वजनिक संस्था, ते सहसा प्रतिबंधित मोड सुरू करतात.

१३ वर्षांपेक्षा मोठ्या किशोरवयीन गटांच्या ज्या पालकांनी त्यांच्या किशोरवयीन गटासाठी Google खाते वर पर्यवेक्षण जोडणे हे केले आहे, तेदेखील संभाव्यतः प्रौढ आशयाची छाननी करण्यात मदत व्हावी, याकरिता प्रतिबंधित मोड वापरू शकतात.

ज्यांच्या सद्य Google खाती मध्ये पर्यवेक्षण जोडलेले आहे, अशा त्यांच्या देश/प्रदेशातील संबंधित वय यापेक्षा मोठ्या किशोरवयीन गटासाठी पर्यवेक्षित खाती उपलब्ध नाहीत. पर्यवेक्षित खाती ही १३ वर्षे (किंवा त्यांच्या देश/प्रदेशातील संबंधित वय) यापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांसाठी उपलब्ध आहेत आणि ती पालकांना त्यांच्या लहान मुलाचा YouTube अनुभव व्यवस्थापित करण्याकरिता नियंत्रणे देतात.

मी माझ्या लहान मुलासाठी पर्यवेक्षित खाते सेट केल्यावर आशय सेटिंग्जकरिता माझ्याकडे कोणते पर्याय आहेत?

तुम्ही या तीन आशय सेटिंग्जमधून निवडू शकता:

  • एक्सप्लोर करा: साधारणतः वय वर्षे ९ आणि त्यावरील दर्शकांसाठी असलेल्या आशय रेटिंगनुसार आशय दाखवला जातो. या व्हिडिओमध्ये व्हीलॉग, ट्यूटोरियल, गेमिंग व्हिडिओ, संगीत व्हिडिओ, बातम्या आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. प्रिमीयर व्यतिरिक्त कोणतीही लाइव्ह स्ट्रीम दाखवली जात नाहीत. काही व्हिडिओमध्ये सौम्य हिंसा, आक्षेपार्ह भाषा आणि नियंत्रित पदार्थांचा समावेश असतो. काही व्हिडिओमध्ये शरीराची इमेज आणि त्यामधील बदल, मानसिक व लैंगिक आरोग्याशी संबंधित शैक्षणिक आशयदेखील असू शकतो.
  • आणखी एक्सप्लोर करा: साधारणतः वय वर्षे १३ आणि त्यावरील दर्शकांसाठी असलेल्या आशय रेटिंगनुसार आशय दाखवला जातो. या सेटिंगमध्ये व्हिडिओच्या आणखी मोठ्या संचाचा समावेश असेल. व्हिडिओमध्ये लाइव्ह स्ट्रीम, व्हीलॉग, ट्यूटोरियल, गेमिंग व्हिडिओ, संगीत व्हिडिओ, बातम्या, शैक्षणिक व्हिडिओ, DIY, कला व हस्तकला, नृत्य आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. काही व्हिडिओमध्ये वास्तविक जगातील हिंसा, मर्यादित स्वरूपातील असभ्य भाषा किंवा नियंत्रित पदार्थांचा समावेश असतो. भडक नसलेले लैंगिक संदर्भ आणि शारीरिक, मानसिक व लैंगिक आरोग्य, तसेच स्वास्थाशी संबंधित विषयदेखील असू शकतात.
  • YouTube वरील सर्वाधिक व्हिडिओ: या सेटिंगमध्ये १८+ म्हणून मार्क केलेले व्हिडिओ आणि पर्यवेक्षित अनुभव वापरणाऱ्या दर्शकांसाठी योग्य नसलेले इतर व्हिडिओ वगळता YouTube वरील जवळपास सर्व गोष्टी यांचा समावेश असतो. व्हिडिओमध्ये लाइव्ह स्ट्रीम, व्हीलॉग, ट्यूटोरियल, गेमिंग व्हिडिओ, संगीत व्हिडिओ, बातम्या, शैक्षणिक व्हिडिओ, DIY, कला व हस्तकला, नृत्य आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. काही व्हिडिओमध्ये ग्राफिक स्वरूपातील हिंसा, प्रौढांसाठी असलेला आशय, नग्नता, भडक असभ्य भाषा यांसारख्या मोठ्या किशोरवयीन गटांकरिता योग्य असू शकणाऱ्या संवेदनशील विषयांचा, तसेच मानसिक आजार, आहार व लैंगिक आरोग्य यांसारख्या विषयांचा समावेश असेल.

पर्यवेक्षित अनुभव वापरणाऱ्या कुटुंबांसाठीची आशय सेटिंग्ज यामध्ये अधिक जाणून घ्या.

मला माझ्या लहान मुलाच्या पर्यवेक्षित खात्याला YouTube Music किंवा YouTube TV चा ॲक्सेस देता येईल का?

पर्यवेक्षित खात्यांना YouTube Music साठी सपोर्ट आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या पर्यवेक्षित खात्यासाठी निवडलेले आशय सेटिंग हे ते ॲप किंवा वेबसाइटवर साइन इन करतील, तेव्हा YouTube Music च्या आशयावरदेखील लागू होईल.

माझ्या लहान मुलाच्या iOS डिव्हाइसवर मी YouTube किंवा YouTube Music डाउनलोड करू शकत नसल्यास काय करावे?

YouTube किंवा YouTube Music अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी, पालकांनी त्यांच्या लहान मुलाच्या iOS डिव्हाइसवर त्यांच्या आशय आणि गोपनीयता निर्बंध सेटिंग्ज चे पुनरावलोकन करायला हवे.

माझ्या लहान मुलाचे पर्यवेक्षित खाते असल्यास, ते माझ्या टीव्हीवर YouTube वापरू शकतात का?

पर्यवेक्षित खाती ही बहुतांश पात्र स्मार्ट टीव्ही, Microsoft Xbox, Nintendo Switch आणि Sony PlayStation वर YouTube वापरू शकतात. जुन्या Android TV डिव्‍हाइसवर पर्यवेक्षित खाती सपोर्ट करत नाहीत.

मी Google Assistant ने युक्त डिव्हाइस वापरून पर्यवेक्षित खाते कसे सेट करू?

तुमच्या लहान मुलाला जोडण्यासाठी, तुमच्या लहान मुलाला तुमच्या डिव्हाइसवर Google Assistant वापरू द्या यामधील पायऱ्या फॉलो करा.  तुम्ही डिव्हाइसमध्ये तुमच्या लहान मुलाचे Google खाते आणि आवाज जोडल्यास, पर्यवेक्षित खाती शेअर केलेल्या डिव्हाइसवर Google Assistant वापरू शकतात.

YouTube अयोग्य आशय कसा फिल्टर करते?

आमची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे ही YouTube वर कोणत्या गोष्टींना अनुमती आहे आणि कोणत्या गोष्टींना अनुमती नाही याची रूपरेषा देतात. ही मार्गदर्शक तत्त्वे कोणत्याही वयाच्या सर्व वापरकर्त्यांना लागू होतात. तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी पर्यवेक्षित खाते सेट केल्यास, वेगवेगळ्या आशय सेटिंग्ज करिता कोणता आशय पात्र आहे हे ओळखण्यासाठी धोरणे आहेत.

आम्ही आमच्या वापरकर्त्यांची खूप काळजी घेतो आणि अयोग्य आशय वगळण्यासाठी कठोर परिश्रम करतो, पण फिल्टरची कोणतीही ऑटोमेटेड सिस्टीम परिपूर्ण नसते. तुम्ही तुमच्या लहान मुलासाठीची ॲप परवानगी आणि आशय सेटिंग्ज कधीही बदलू शकता. तुमच्या मतानुसार YouTube साठी अयोग्य असलेली गोष्ट तुम्हाला आढळल्यास, तुम्ही तिची तक्रार करणे हे करू शकता.

पर्यवेक्षित खात्यांसह जाहिराती कशा काम करतात?

लहान मुलांचे अधिक चांगल्या रीतीने संरक्षण करण्यासाठी, विशिष्ट वर्गवाऱ्यांमधील जाहिराती प्रतिबंधित केल्या आहेत आणि पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती बंद केल्या आहेत. "मुलांसाठी बनवलेले" या आशयाचे दर्शक हे व्हिडिओ जाहिरात दाखवण्यापूर्वी व नंतर जाहिरात बंपर पाहू शकतात. जाहिरात सुरू होते आणि संपते, तेव्हा हा बंपर त्यांना सतर्क करण्यात मदत करतो. तुमच्याकडे YouTube Premium कुटुंब प्लॅन असल्यास, तुमचे लहान मूल जाहिरातमुक्त आशय आणि सदस्यत्वाच्या शेअर केलेल्या इतर फायद्यांसाठी पात्र ठरते.

असे व्हिडिओ ज्यांमध्ये सशुल्क उत्पादन स्थान नियोजन किंवा जाहिरात असल्याचे निर्माणकर्त्याने आम्हाला सांगितले आहे, ते YouTube वरील पर्यवेक्षित खात्यांना दाखवले जातील. या व्हिडिओनी मुलांसाठी बनवलेल्या व्हिडिओचे जाहिरात धोरण याचेदेखील पालन करणे आवश्यक आहे.

YouTube माझ्या लहान मुलाच्या गोपनीयतेचे संरक्षण कसे करते?

YouTube हे Google चा एक भाग आहे आणि ते Google ची गोपनीयता धोरणेतत्त्वे यांचे पालन करते. तुमच्या लहान मुलाच्या Google खाते शी संबंधित कोणती वैयक्तिक माहिती आम्ही गोळा करतो हे समजून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, हे आम्ही जाणतो. आम्हाला हेदेखील माहीत आहे, की आम्ही ती माहिती का गोळा करतो आणि तुम्ही ती कशी नियंत्रित करू व हटवू शकता हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. Google गोपनीयता धोरण आणि १३ वर्षे (किंवा त्यांच्या देश/प्रदेशातील संबंधित वय) यापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांसाठीचे Google खाते याकरिता असलेली आमची गोपनीयता सूचना या गोष्टी आमच्या गोपनीयता व्यवहारांचे स्पष्टीकरण देतात.

तुमचे लहान मूल त्यांच्या खात्यामधील "तुमचा YouTube मधील डेटा" या अंतर्गत त्यांच्या YouTube गोपनीयता सेटिंग्ज आणि नियंत्रणे व्यवस्थापित करू शकते व त्यांबद्दल अधिक जाणून घेऊ शकते. या पेजमध्ये त्यांच्या व्हिडिओ आणि अ‍ॅक्टिव्हिटी डेटाचा सारांश व हा डेटा व्यवस्थापित करण्यासाठी सेटिंग्ज यांचा समावेश आहे. त्‍यांच्या YouTube अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी त्‍यांचा डेटा कसा वापरला जातो याची तपशीलवार माहितीदेखील हे पेज देते, जसे की त्‍यांनी काय पाहिले आहे याची त्यांना आठवण करून देणे आणि शिफारशी देणे.

तुमच्या लहान मुलाच्या Google खाते चे पालक व्यवस्थापक म्हणून, तुम्ही Family Link वरून त्यांचा शोध आणि पाहण्याचा इतिहास थांबवू किंवा साफ करू शकता. तुम्ही YouTube मधील तुमच्या पालक सेटिंग्ज पेजवरूनदेखील इतिहास साफ करू शकता.

शाळा किंवा शैक्षणिक संस्थांसाठी पर्यवेक्षित खाती उपलब्ध आहेत का?

पर्यवेक्षित खाती ही सध्या वैयक्तिक खात्यांसाठी उपलब्ध आहेत. पर्यवेक्षित खाती ही शाळा किंवा शैक्षणिक संस्थांसाठी उपलब्ध नाहीत. तुम्ही तुमच्या डिव्‍हाइसमध्‍ये कसे साइन इन केले आहे याचा परिणाम YouTube वापरले जाऊ शकते की नाही यावर होऊ शकतो. पर्यवेक्षित खाती यांविषयी अधिक जाणून घ्या.

YouTube वरील पर्यवेक्षित खात्यासाठी कोण पात्र आहे?

तुम्ही तुमच्या १३ वर्षे (किंवा त्यांच्या देश/प्रदेशातील संबंधित वय) यापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांसाठी YouTube वर पर्यवेक्षित खाते सेट करू शकता.

पुढील परिस्थितीत तुम्ही YouTube वर पर्यवेक्षित खात्यासाठी पात्र ठरत नाही:

  • तुमच्या लहान मुलाचे वय १३ वर्षे (किंवा त्यांच्या देश/प्रदेशातील संबंधित वय) यापेक्षा जास्त आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलाचे पर्यवेक्षित खाते हे यांच्‍या देश/प्रदेशातील संबंधित वयाचे होण्‍यापूर्वी तयार केले असेल, तरच फक्त ही आवश्यकता असते.
  • तुम्ही युरोपियन युनियनमध्ये राहता आणि एप्रिल २०२१ पूर्वी तुमच्या लहान मुलासाठी पर्यवेक्षण सेट केले आहे. त्यावेळी तुमचे लहान मूल त्यांच्या देश/प्रदेशातील संबंधित वय यापेक्षा लहान असेल, तर पर्यवेक्षित खातेदेखील उपलब्ध होणार नाही.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10107382498875303783
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false