पर्यवेक्षित अनुभवांसाठी आशय सेटिंग्ज सेट करणे

पालकांना त्यांच्या मुलाला YouTube वापरण्यासंदर्भात मार्गदर्शन करता यावे, यासाठी आम्ही त्यांना आशय सेटिंग्ज निवडू देतो. आमचा विश्वास आहे, की मुले YouTube वरील व्हिडिओचे जग एक्सप्लोर करतात, तेव्हा नवीन स्वारस्ये शोधू शकतात, विविध दृष्टिकोनांमधून शिकू शकतात आणि हे करत असताना त्यांना आपलेपणाची जाणीव होते. तुमचे लहान मूल YouTube वरील आशयाचे विशाल विश्व एक्सप्लोर करण्यासाठी तयार आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, येथे काही पर्याय आहेत. अधिक सुरक्षित व सोप्या अनुभवासाठी आमचे स्वतंत्र YouTube Kids अ‍ॅप वापरणे किंवा YouTube वर पर्यवेक्षित अनुभव तयार करणे आणि व्यवस्थापित करणे यांपैकी एक तुम्ही निवडू शकता.

पर्यवेक्षित अनुभव वापरणाऱ्या कुटुंबांसाठीची आशय सेटिंग्ज

नवीनतम बातम्या, अपडेट आणि टिपांसाठी, YouTube Viewers चॅनल याचे सदस्यत्व घ्या.

YouTube मध्ये आमचा असा विश्वास आहे, की वैविध्यपूर्ण आशय पाहून आणि विविध प्रकारच्या लोकांचे विचार ऐकून आपल्याला एकमेकांबद्दल जाणून घेण्यात मदत होते. या वैविध्याचा अर्थ असादेखील आहे, की तुमचा सामना अशा आशयाशी होऊ शकतो ज्याच्या दृष्टिकोनाशी तुम्ही कदाचित सहमत नसाल. सर्वांसाठी व्हिडिओ पाहण्याचा सुरक्षित अनुभव तयार करण्यात मदत व्हावी, याकरिता आमच्याकडे समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आहेत. आमच्याकडे खाली वर्णन केलेली आणखी आशय धोरणेदेखील आहेत, जी विशेषतः पर्यवेक्षित अनुभवामधील लहान दर्शकांसाठी लागू होतात. तुमच्या लहान मुलासाठी तुम्ही YouTube वरील पर्यवेक्षित अनुभवाचा पर्याय विचारात घेत असल्यास, सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबासह हा मार्गदर्शक याचे पुनरावलोकन करण्याकरिता आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो.

आमचा दृष्टिकोन

YouTube ने आशय योग्यतेसंबंधीच्या धोरणांचा एक संच विकसित केला आहे, जो सामान्यतः टीव्ही आणि चित्रपटाच्या आशय रेटिंगनुसार असतो. कुटुंबांसाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या आशय सेटिंग्जमध्ये कोणते व्हिडिओ पात्र आहेत याचे मार्गदर्शन करण्यात ही धोरणे मदत करतात. बालविकास, लहान मुलांसंबंधी मीडिया, डिजिटल लर्निंग आणि नागरिकत्व यासंबंधित विविध बाह्य तज्ञांशी सल्लामसलत करून ही धोरणे माहितीपूर्वक ठरवली जातात. त्यानंतर आशय धोरणे विचारात घेणाऱ्या आमच्या ऑटोमेटेड सिस्टीम या प्रत्येक आशय सेटिंगमध्ये समावेश करण्यासाठी कोणते व्हिडिओ योग्य आहेत ते ओळखतात. आम्हाला माहीत आहे, की आमच्या सिस्टीम परिपूर्ण नाहीत आणि त्यांच्याकडून चुका होतील. आमच्या सिस्टीममध्ये सतत सुधारणा करण्यासाठी इंजिनियर आणि मानवी परीक्षणकर्त्यांची एकत्र भागीदारी करणारी एक टीम आमच्याकडे आहे. आम्ही आमच्या धोरणांचे नियमितपणे पुनर्मूल्यांकनदेखील करतो, त्यामुळे खाली सूचीबद्ध केलेली धोरणे कदाचित परिपूर्ण नसतील.

तुमच्या मतानुसार YouTube साठी अयोग्य असलेली एखादी गोष्ट तुम्हाला आढळल्यास, तुम्ही तिची तक्रार करणे हे करू शकता.

आशय सेटिंग्ज

एक्सप्लोर करा साधारणतः वय वर्षे ९ आणि त्यावरील दर्शकांसाठी असलेल्या आशय रेटिंगनुसार आशय दाखवला जातो
आणखी एक्सप्लोर करा साधारणतः वय वर्षे १३ आणि त्यावरील दर्शकांसाठी असलेल्या आशय रेटिंगनुसार आशय दाखवला जातो
YouTube वरील सर्वाधिक व्हिडिओ १८+ म्हणून मार्क केलेला आशय आणि पर्यवेक्षित अनुभव वापरणाऱ्या दर्शकांसाठी कदाचित योग्य नसतील असे इतर व्हिडिओ वगळून YouTube वरील जवळपास सर्व व्हिडिओ दाखवले जातात

आशय धोरणे

तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी पर्यवेक्षित खाते सेट करता, तेव्हा तुमच्याकरिता उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या आशय सेटिंग्जनुसार आमची आशय धोरणे वेगळी असतात. त्यानंतर आशय धोरणे विचारात घेणाऱ्या आमच्या ऑटोमेटेड सिस्टीम या प्रत्येक आशय सेटिंगमध्ये समावेश करण्यासाठी कोणता आशय योग्य आहे ते ओळखतात. आम्हाला माहीत आहे, की आमच्या सिस्टीम परिपूर्ण नाहीत आणि त्यांच्याकडून चुका होतील. 

एक्सप्लोर करा

YouTube Kids मधून बाहेर पडून YouTube वरील आशयाचे विशाल विश्व एक्सप्लोर करण्यास सुरुवात करण्यासाठी तयार असलेल्या कुटुंबांकरिता "एक्सप्लोर करा" हे सेटिंग आहे. या सेटिंगच्या अंतर्गत, साधारणतः वय वर्षे ९ आणि त्यावरील दर्शकांसाठी असलेल्या आशय रेटिंगनुसार अनेक व्हिडिओ दाखवले जातात. या व्हिडिओमध्ये व्हीलॉग, ट्यूटोरियल, गेमिंग व्हिडिओ, संगीत व्हिडिओ, बातम्या, शैक्षणिक आशय, DIY, कला व हस्तकला, नृत्य आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. काही व्हिडिओमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:

प्रौढांसाठी असलेला आशय: शारीरिक जवळीक आणि आकर्षणाशी संबंधित सौम्य दृश्यांचा समावेश आहे असे रोमॅंटिक थीम असलेले व्हिडिओ. लैंगिक आणि लिंगाधारित ओळख व पौगंडावस्था आणि प्रजनन यांसारखे लैंगिक शिक्षणाशी संबंधित विषय यांविषयी वयानुसार योग्य शैक्षणिक व्हिडिओ.

हिंसा: सध्याच्या किंवा ऐतिहासिक घटनांशी संबंधित वयानुसार योग्य असलेले असे व्हिडिओ, जे शैक्षणिक आहेत, पण त्यांमध्ये घटनेच्या संदर्भात सौम्य हिंसा असू शकते. कार्टून, गेमिंग, टेलीव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये सामान्य असलेल्या, रचलेल्या व ॲनिमेटेड व्हिडिओमधील ग्राफिक स्वरूपात नसलेली हिंसा.

शस्त्रे: खेळणी, गेमिंग, ॲनिमेशन आणि ऐतिहासिक संदर्भ असलेली कलाकुसर केलेली शस्त्रे यांच्या संदर्भात काल्पनिक शस्त्रे दाखवणारे व्हिडिओ.

धोकादायक आशय: अल्पवयीन मुलांद्वारे सहजपणे अनुकरण न केले जाऊ शकणारे किंवा सुरक्षिततेशी संबंधित योग्य डिस्क्लोजरसह मुख्य डिस्क्लेमरचा समावेश नसलेले, स्टंट, खोड्या आणि आव्हाने यांसारख्या धोकादायक कृती दाखवणारे व्हिडिओ. थोड्याफार प्रमाणात मद्य किंवा तंबाखू दाखवणारे व्हिडिओ.

अनुचित भाषा: छळणूक न करण्याच्या संदर्भात "आईशप्पथ" किंवा "च्यायला" यासारख्या सौम्य आक्षेपार्ह भाषेचा क्वचित वापर असलेले व्हिडिओ.

आहार, फिटनेस आणि सौंदर्य: सौंदर्य उत्पादनाशी संबंधित परीक्षणे, वयानुसार योग्य मेक-अप ट्यूटोरियल आणि स्वास्थ्याशी संबंधित शैक्षणिक आशय दाखवणारे व्हिडिओ. या आशयामध्ये सकस आहार आणि व्यायाम यांचा समावेश आहे.

संवेदनशील विषय: मानसिक आरोग्य, व्यसन, खाण्याशी संबंधित विकार आणि एखाद्या व्यक्तीला गमावल्यामुळे झालेले दुःख यांसारख्या संवेदनशील समस्यांवर चर्चा करणारे वयानुसार योग्य व्हिडिओ. या सेटिंगमधील व्हिडिओत ग्राफिक इमेज दाखवलेली नसते आणि हे मानसिक विकारामधून सावरण्याचे व बरे होण्याचे सकारात्मक मार्ग व त्यांसाठी मदत मागण्याचे महत्त्व या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात.

संगीत व्हिडिओ: संगीत व्हिडिओमध्ये सौम्य आक्षेपार्ह भाषा किंवा अल्कोहोल अथवा तंबाखूचा उल्लेख असलेले बोल असू शकतात. व्हिडिओमध्ये अहेतुक नसलेल्या लैंगिक नृत्याचे आणि मद्य किंवा तंबाखूचे क्वचित प्रदर्शनदेखील असू शकते.

आणखी एक्सप्लोर करा

"आणखी एक्सप्लोर करा" हे सेटिंग YouTube चे विशाल विश्व एक्सप्लोर करण्यासाठी तयार असलेल्या लहान मुलांकरिता आहे. या सेटिंगमध्ये एक्सप्लोर करा मधील सर्व गोष्टींचा समावेश असतो, तसेच यामध्ये अनेक व्हिडिओ असतात, ज्यांची आशय रेटिंग ही सामान्यतः १३ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दर्शकांनुसार असते. या व्हिडिओमध्ये लाइव्ह स्ट्रीम, व्हीलॉग, ट्यूटोरियल, गेमिंग व्हिडिओ, बातम्या, शैक्षणिक व्हिडिओ, DIY, कला व हस्तकला, नृत्य आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. काही व्हिडिओमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:

प्रौढांसाठी असलेला आशय: लैंगिक थीम असलेले व्हिडिओ, जसे की भडक नसलेले लैंगिक अनुभव आणि शारीरिक जवळीक दाखवणे. लैंगिक आणि लिंगाधारित ओळख व लैंगिक विकास, प्रजनन आरोग्य, संयम व रोग प्रतिबंध यांसारख्या लैंगिक शिक्षण यासंबंधित विषयांवरील शैक्षणिक व्हिडिओ.

हिंसा: सद्य किंवा ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेले ग्राफिक स्वरूपात नसलेले शैक्षणिक व्हिडिओ. गेमिंग, टेलीव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये सामान्य असलेल्या, रचलेल्या व अ‍ॅनिमेटेड व्हिडिओमधील ओझरत्या ग्राफिक स्वरूपातील हिंसा.

शस्त्रे: टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये सामान्य असलेल्या, रचलेल्या व्हिडिओमध्ये वास्तविक किंवा वास्तववादी शस्त्रे दाखवणारे व्हिडिओ. खेळ किंवा शिक्षण देण्याच्या संदर्भात बंदूक हाताळण्याशी संबंधित सुरक्षिततेसाठी खऱ्या बंदुकांचा वापर केला गेला आहे असे व्हिडिओ.

धोकादायक आशय: ज्यांमुळे गंभीर शारीरिक हानी होऊ शकते, पण अल्पवयीन मुलांद्वारे ज्यांचे सहजपणे अनुकरण केले जाऊ शकत नाही अशा स्टंट, खोड्या आणि आव्हाने यांसारख्या धोकादायक कृती दाखवणारे व्हिडिओ. मद्य किंवा तंबाखूचा वारंवार वापर दाखवणारे व्हिडिओ.

अनुचित भाषा: छळणूक न करण्याच्या किंवा लैंगिक संदर्भात नसलेला "कुत्री" अथवा "गाढव" यांसारख्या आक्षेपार्ह किंवा असभ्य भाषेचा वारंवार वापर करणारे व्हिडिओ. मानहानीकारक भाषेचा क्वचितच आणि छळणूक न करण्याच्या संदर्भात वापर केला असल्यास, असा आशय स्पष्टपणे शैक्षणिक किंवा संगीत व्हिडिओच्या संदर्भात दिसू शकतो.

आहार, फिटनेस आणि सौंदर्य: मेक-अप ट्यूटोरियल, सौंदर्यासंबंधी टिपा व दैनंदिन जीवनशैलीबाबतच्या युक्त्या, तसेच आरोग्यदायी आहार आणि व्यायाम दाखवणारे व्हिडिओ.

संवेदनशील विषय: मानसिक आरोग्य, आत्महत्येचा विचार, स्वतःला हानी पोहोचवणे, व्यसन, खाण्याशी संबंधित विकार, तसेच एखादी गोष्ट गमावल्यामुळे झालेले दुःख यासंबंधित ग्राफिक स्वरूपात नसलेल्या हिंसेचे व्हिडिओ. हे व्हिडिओ मानसिक विकारामधून सावरण्याचे आणि बरे होण्याचे सकारात्मक मार्ग व त्यांसाठी मदत मागण्याचे महत्त्व या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात.

संगीत व्हिडिओ: संगीत व्हिडिओमध्ये लैंगिक संदर्भ असलेले बोल, क्वचित भडक असभ्य भाषा किंवा छळणूक न करणाऱ्या अथवा द्वेषपूर्ण नसलेल्या मानहानीकारक अपशब्दांचा समावेश असू शकतो. व्हिडिओमध्ये लैंगिक नृत्य आणि मद्य, तंबाखू किंवा मारुवानाचा वापरदेखील दाखवलेला असू शकतो.

YouTube वरील सर्वाधिक व्हिडिओ
"YouTube वरील सर्वाधिक व्हिडिओ" हे सेटिंग मोठ्या किशोरवयीन मुलांसाठी असलेल्या आशयासह YouTube चे विशाल विश्व एक्सप्लोर करण्याकरिता तयार असलेल्या लहान मुलांसाठी आहे. या सेटिंगमध्ये YouTube वरील १८+ म्हणून मार्क केलेले व्हिडिओ आणि पर्यवेक्षित अनुभव वापरणाऱ्या दर्शकांसाठी योग्य नसलेले इतर व्हिडिओ वगळता जवळपास सर्व गोष्टींचा समावेश आहे. व्हिडिओमध्ये लाइव्ह स्ट्रीम, व्हीलॉग, ट्यूटोरियल, गेमिंग व्हिडिओ, बातम्या, शैक्षणिक व्हिडिओ, DIY, कला व हस्तकला, नृत्य आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5339519747841249927
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false