YouTube निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र याबद्दल

निर्माणकर्ता आणि कलाकार सर्वेक्षण हे यू.एस., यू.के., ब्राझील आणि भारत यामध्ये स्थित असलेल्या कलाकार आणि निर्माणकर्त्यांच्या YouTube चॅनलसाठी ऐच्छिक आहे.

हे सर्वेक्षण YouTube Studio सेटिंग्ज या विभागामध्ये निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र या अंतर्गत पाहता येईल. सध्या फक्त यू.एस., यू.के., ब्राझील, भारत यामध्ये स्थित असलेले चॅनल मालक हे सेटिंग वापरू शकतात.

तुम्हाला YouTube Studio मोबाइल ॲप च्या सेटिंग्ज विभागामध्येदेखील निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र पाहता येईल.

YouTube कलाकार आणि निर्माणकर्ते हे निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामध्ये शेअर करतात त्या डेटामुळे त्यांना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यात आम्हाला मदत होते. आम्ही गोळा केलेली विशिष्ट माहिती प्रदेशानुसार बदलते, पण निर्माणकर्ते, त्यांनी असे करणे निवडल्यास, ते आता YouTube लोकसंख्याशास्त्र आणि ओळख माहितीसह शेअर करू शकतात.

YouTube चॅनलबद्दलच्या या माहितीमुळे आम्हाला आमच्या सिस्टीम या अनवधानाने पूर्वग्रह दर्शवत नसल्याची खात्री करण्यात मदत होते.

YouTube हे सर्वसमावेशक असून, सर्वांसाठी काम करत असल्याची आम्हाला खात्री करायची आहे. सध्या आमच्या सिस्टीमची मूल्यमापन प्रक्रिया मर्यादित आहे, कारण आमच्याकडे YouTube वरील चॅनलबद्दल ओळखीशी संबंधित माहिती नाही. आमची उत्पादने आणि धोरणे ही विशिष्ट लोकसंख्याशास्त्र किंवा ओळख असलेल्या निर्माणकर्ता आणि कलाकारांच्या समुदायांच्या चॅनलसाठी कशी काम करत आहेत, याचे मोठ्या प्रमाणावर मूल्यमापन करण्याचा मार्ग आमच्याकडे नाही.

टीप: आम्हाला माहीत आहे, की ओळखीशी संबंधित माहिती ही वैयक्तिक बाब आहे आणि म्हणूनच ती शेअर करणे पर्यायी आहे. या सेटिंगमुळे आम्हाला YouTube वरील निर्माणकर्ते आणि कलाकारांच्या चॅनलबद्दल ओळखीशी संबंधित असा डेटा मिळतो, जो अन्यथा मिळला नसता. सर्वेक्षणाला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाची माहिती ही तुमच्या YouTube चॅनलमध्ये स्टोअर केली जाईल आणि इतर Google उत्पादनांद्वारे वापरली जाणार नाही. तुम्ही देता ती माहिती YouTube च्या सिस्टीममधील स्वतंत्र व्हिडिओ किंवा चॅनलच्या परफॉर्मन्सवर परिणाम करण्यासाठी वापरली जाणार नाही.

यू.के. मधील निर्माणकर्त्यांचे स्वागत आहे: निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र Studio सेटिंग्ज

आम्ही निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील डेटा कसा वापरतो

वेगवेगळ्या समुदायांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निर्माणकर्ते आणि कलाकारांच्या चॅनलसाठी YouTube कसे काम करते याचे मूल्यमापन करण्याकरिता आम्ही गोळा केलेला डेटा वापरतो. तुम्ही शेअर करता तो डेटा आम्ही पुढील गोष्टींसाठी वापरतो:

  • आमचे अल्गोरिदम आणि सिस्टीम या विविध समुदायांमधील आशय कशा हाताळतात हे तपासणे
  • YouTube वर विविध समुदाय कसे वाढत आहेत हे समजून घेणे
  • छळ आणि द्वेष यांसह गैरवर्तनाचे संभाव्य पॅटर्न ओळखणे
  • आमचे सध्याचे प्रोग्राम, मोहिमा आणि ऑफर यांमध्ये सुधारणा करणे

आमच्या सिस्टीममध्ये आम्हाला विशिष्ट समुदायांवर परिणाम करणाऱ्या समस्या आढळल्यास, त्यांचे निराकरण करण्यासाठी काम करण्याकरिता आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही या सुरू असलेल्या प्रयत्नांच्या संदर्भातील आमची प्रगती तुमच्यासोबत शेअर करत राहू.

निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामध्ये तुमची माहिती शेअर करणे तुम्ही निवडल्यास, Google LLC हे Google गोपनीयता धोरण यानुसार ती स्टोअर करेल. तुम्ही शेअर करता ती माहिती ही तुमच्या YouTube चॅनलमध्ये स्टोअर केली जाईल आणि इतर Google उत्पादनांद्वारे वापरली जाणार नाही. ती तुमच्या संमतीशिवाय सार्वजनिक केली जाणार नाही किंवा जाहिरातीच्या उद्देशांसाठी वापरली जाणार नाही.

तुम्ही शेअर करता तो डेटा आम्ही कसा वापरतो याचे आणखी तपशील पुढे दिले आहेत:

आमचे अल्गोरिदम आणि सिस्टीम या विविध समुदायांमधील आशय कशा हाताळतात हे तपासणे

आमच्या सिस्टीम वेगवेगळ्या समुदायांचा आशय कशा हाताळतात हे समजून घेण्यात हा डेटा आम्हाला मदत करेल.
आमच्या ऑटोमेटेड सिस्टीममधील संभाव्य समस्या अधिक चांगल्याप्रकारे ओळखणे हे आमचे ध्येय आहे. सिस्टीम या सर्वसमावेशक असल्याची खात्री करण्यात मदत व्हावी, यासाठी आम्हाला आढळणाऱ्या एररचेदेखील निराकरण करायचे आहे.

YouTube वर विविध समुदाय कसे वाढत आहेत हे समजून घेणे

YouTube वर वेगवेगळे निर्माणकर्ता समुदाय कसे वाढत आहेत हे समजून घेण्यात आम्हाला मदत व्हावी, यासाठीदेखील हा डेटा वापरला जाईल.

आम्ही वाढीचे मूल्यमापन कसे करतो याचे एक उदाहरण म्हणजे, YouTube वर वेगवेगळे समुदाय कसे कमाई करतात हे तपासणे. आमच्या कमाईशी संबंधित सिस्टीम या अपेक्षेनुसार काम करत नसल्याच्या काही प्रकरणांबद्दल आम्हाला निर्माणकर्ते आणि कलाकारांकडून फीडबॅक मिळाला आहे. आमच्या सिस्टीम आणि धोरणे ही सर्व निर्माणकर्ते व सर्व प्रकारच्या आशयासाठी चांगले काम करत असल्याची खात्री करण्याकरिता आम्ही काम करत आहोत.

छळ आणि द्वेष यांसह गैरवर्तनाचे संभाव्य हानिकारक पॅटर्न ओळखणे

आशय हा आमच्या द्वेष आणि छळ यांसंबंधित धोरणांचे उल्लंघन करत असल्यास, आम्ही तो काढून टाकतो. परंतु, आम्हाला असा फीडबॅक मिळाला आहे, की अनेक निर्माणकर्ते हे आक्षेपार्ह आणि दुखावणाऱ्या आशय व टिप्पण्यांचा सामना करत आहेत. याप्रकारच्या वर्तनामुळे विविध निर्माणकर्ता समुदायांवर कसा परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्यात हा डेटा आम्हाला प्रोॲक्टिव्हपणे मदत करेल. यामुळे कालांतराने आमच्या ऑटोमेटेड सिस्टीममध्येदेखील सुधारणा होईल.

आमचे सध्याचे प्रोग्राम, मोहिमा आणि ऑफर यांमध्ये सुधारणा करणे

निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र या अंतर्गत, प्रोग्राम आणि इव्हेंटची आमंत्रणे देण्यासाठी तुमची माहिती वापरण्याची संमती तुम्ही आम्हाला देऊ शकता. या माहितीमुळे आमचे सध्याचे प्रोग्राम, मोहिमा आणि ऑफर अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यात आम्हाला मदत होऊ शकते. या ऑफरमध्ये निर्माणकर्ता इव्हेंट आणि उगवत्या निर्माणकर्त्यांना प्रगती करणे हे करण्यात मदत करणाऱ्या प्रोग्रामसारख्या प्रोग्रामचा समावेश आहे. आम्ही फोकस गट, फीडबॅकची वैयक्तिक सेशन, सर्वेक्षणे आणि संशोधनाचे इतर प्रकार यांसारखे संशोधनदेखील निर्माणकर्त्यांसोबत करतो. आम्ही या कामाद्वारे आमच्या उत्पादन विकास टीमसमोर निर्माणकर्त्यांचे दृष्टीकोन आणू शकतो. निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील माहितीमुळे आम्हाला अशा अधिकाधिक निर्माणकर्त्यांना संशोधनाची आमंत्रणे देता येतील, जे YouTube वर समुदायांमधील वैविध्य दर्शवतात.

प्रतिसादामधील तुमची माहिती संपादित करण्याचा किंवा हटवण्याचा पर्याय

प्रतिसादामधील तुमची माहिती कशी हटवावी या संदर्भातील सूचना खाली वाचा. तुम्ही शेअर करता ती माहिती ४५ दिवसांच्या कालावधीच्या आत एकदा संपादित करू शकता. तुम्ही माहिती पाठवण्याचा पुन्हा प्रयत्न कधी करू शकता याची पुढील संभाव्य तारीख Studio मध्ये दिसेल. तुमचे प्रतिसाद कधीही पूर्णपणे हटवले जाऊ शकतात.

टीप: तुम्ही ही माहिती संपादित करणे किंवा हटवणे निवडल्यास, त्याचा YouTube वरील तुमच्या आशयाच्या परफॉर्मन्सवर कोणताही परिणाम होणार नाही.

YouTube Studio मध्ये निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील प्रतिसाद संपादित करणे:

  1. YouTube Studio मध्ये साइन इन करा.
  2. डाव्या बाजूला, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र निवडा.
  4. सर्वेक्षण संपादित करा निवडा.
  5. तुमचे प्रतिसाद संपादित करा.
  6. सबमिट करा निवडा.

YouTube Studio अ‍ॅपमध्ये निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील प्रतिसाद संपादित करणे:

  1. YouTube Studio अ‍ॅप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. मेनूमध्ये सेटिंग्ज  वर टॅप करा.
  4. चॅनल अंतर्गत, निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र वर टॅप करा.
  5. सर्वेक्षण संपादित करा निवडा.
  6. तुमचे प्रतिसाद संपादित करा.
  7. सबमिट करा निवडा.

YouTube Studio मध्ये निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील प्रतिसाद हटवणे:

  1. YouTube Studio मध्ये साइन इन करा.
  2. डाव्या बाजूला, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र निवडा.
  4. डेटा हटवा निवडा.
  5. कन्फर्मेशन विंडो पॉप अप झाल्यावर हटवा निवडा.

YouTube Studio अ‍ॅपमध्ये निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील प्रतिसाद हटवणे:

  1. YouTube Studio अ‍ॅप उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. मेनूमध्ये सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. चॅनल अंतर्गत, निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र वर टॅप करा.
  5. डेटा हटवा निवडा.
  6. कन्फर्मेशन विंडो पॉप अप झाल्यावर हटवा निवडा.

निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील प्रतिसाद डाउनलोड करणे:

निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील तुमचा डेटा डाउनलोड करण्यासाठी, या सूचना फॉलो करा. तुमच्या एक किंवा अधिक YouTube चॅनलचा डेटा तुम्हाला डाउनलोड करायचा असल्यास, तुम्ही ब्रँड खाते नव्हे, तर तुमचे वैयक्तिक Google खाते वापरून साइन इन करणे आवश्यक आहे.

निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र याबद्दल अधिक जाणून घ्या

मला हे सेटिंग कधी वापरता येईल?

आम्ही २०२१ मध्ये यू.एस. मधील कलाकार व निर्माणकर्त्यांसाठी हे निर्माणकर्ता आणि कलाकार लोकसंख्याशास्त्र सर्वेक्षण रोल आउट केले असून, जुलै २०२३ ला यू.के. मध्ये आणि सप्टेंबर २०२३ ला त्याचा ब्राझीलमध्ये विस्तार केला आहे. आता हे प्रश्न कॉंप्युटरवरील तुमच्या YouTube Studio सेटिंग्ज या विभागामध्ये जाऊन निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र या अंतर्गत पाहता येतील.

तुम्हाला या सेटिंगवर जायचे असल्यास, तुम्ही चॅनल मालक असणे आवश्यक आहे. तुम्ही ब्रँड खाते वापरत असल्यास, मुख्य मालक असणे आवश्यक आहे. तुम्ही YouTube चॅनलसंबंधित परवानग्या वापरत असल्यास, मालक असणे आवश्यक आहे.

तुम्ही इतर देश किंवा प्रदेश आणि अधिकाधिक लोकांपर्यंत या सेटिंगचा विस्तार कधी कराल?

आम्ही २०२३ मध्ये भारतामध्ये याचा विस्तार करत असून, लवकरच आणखी देश किंवा प्रदेशांमध्ये विस्तार करण्याची योजना आहे. आम्हाला माहीत आहे, की सर्वेक्षणामधील वर्गवाऱ्या आणि निवडी या जगभरातील लोक ज्याप्रकारे त्यांच्या ओळखी परिभषित करू शकतात, ते सर्व मार्ग दर्शवत नाहीत. आम्ही भविष्यात या वर्गवाऱ्या आणि निवडींचा विस्तार करण्याचा विचार करत आहोत.

हे सेटिंग म्हणजे सर्व निर्माणकर्ते आणि दर्शकांसाठी अनुभवामध्ये सुधारणा करण्यात आम्हाला मदत व्हावी, याकरिता इतर सद्य प्रयत्नांना दिलेली जोड आहे. उदाहरणार्थ, प्लॅटफॉर्म ॲक्सेस करणे अधिक सुलभ बनवण्यासाठी आणि YouTube वर प्रत्येकाला सर्वसमावेशक अनुभव मिळेल याची खात्री करण्यात मदत व्हावी, यासाठी YouTube हे भिन्नक्षमता असलेल्या दर्शक व निर्माणकर्त्यांसोबत काम करत राहील.

मला निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल का?

नाही, तुम्ही निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यासंबंधित सर्वेक्षण भरणे निवडल्यास, प्रत्येक प्रश्न पर्यायी आहे. तुम्ही ठरावीक प्रश्न रिक्त सोडू शकता किंवा “उत्तर द्यायचे नाही” असे निवडू शकता.

या सेटिंगचा माझ्या चॅनलच्या परफॉर्मन्सवर परिणाम होईल का?

तुम्ही शेअर करता ती माहिती YouTube च्या सिस्टीममधील स्वतंत्र आशयाच्या परफॉर्मन्सवर परिणाम करण्यासाठी वापरली जाणार नाही.

आमच्या सिस्टीम या अनवधानाने पूर्वग्रह दर्शवत नसल्याची आम्हाला खात्री करायची आहे. निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील डेटा हा आमच्या शोध, डिस्कव्हरी आणि कमाई सिस्टीमसारख्या YouTube च्या भागांचे मूल्यमापन करण्यासाठी वापरला जाईल. आम्हाला ठरावीक समुदायांवर परिणाम करणाऱ्या एरर आढळल्यास, आमच्या सिस्टीम अधिकाधिक अचूक आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी त्यांच्या प्रशिक्षणामध्ये सुधारणा करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करू.

तुम्ही निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र याची प्रश्नावली कशी तयार केली?

आम्ही नागरी आणि मानवी हक्कांचे तज्ञ व वेगवेगळ्या समुदायांचे प्रतिनिधित्व करणारे निर्माणकर्ते यांसोबत काम केले आहे.

माझे प्रतिसाद YouTube च्या बाहेर शेअर केले जातील का?

तुम्ही निर्माणकर्ता आणि कलाकार सर्वेक्षण किंवा निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र सेटिंगमध्ये शेअर करता ती माहिती तुमच्या YouTube चॅनलमध्ये स्टोअर केली जाईल व इतर Google उत्पादनांद्वारे वापरली जाणार नाही. ती तुमच्या अतिरिक्त संमतीशिवाय सार्वजनिक केली जाणार नाही आणि जाहिरातीच्या उद्देशांसाठी वापरली जाणार नाही. आम्ही ही माहिती जाहिरातदारांसोबत शेअर करणार नाही किंवा जाहिरात लक्ष्यीकरणासाठी वापरणार नाही.

प्रोग्राम आणि इव्हेंटची आमंत्रणे देण्यासाठी तुमची माहिती वापरण्याकरिता आम्हाला संमती द्यावी की नाही हे तुम्ही निवडू शकता. यामध्ये तुमचे चॅनल किंवा आशय हायलाइट केला जाणे अथवा कार्यशाळा, वापरकर्ता संशोधन किंवा इतर मोहिमांचा समावेश असू शकतो.

माझी माहिती सबमिट करण्यात आल्यानंतर मला ती अपडेट/संपादित करता येईल का?

तुम्ही निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील तुमचे प्रतिसाद ४५ दिवसांच्या कालावधीच्या आत एकदा संपादित करू शकता. तुम्ही माहिती पाठवण्याचा पुन्हा प्रयत्न कधी करू शकता याची पुढील संभाव्य तारीख Studio मध्ये दिसेल. तुमचे प्रतिसाद कधीही पूर्णपणे हटवले जाऊ शकतात.

निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील प्रतिसाद संपादित करणे:

  1. तुमच्या चॅनल मालकाचे खाते वापरून कॉंप्युटरवर YouTube मध्ये साइन इन करा किंवा YouTube Studio ॲप वापरा.
  2. YouTube Studio सेटिंग्ज वर जा आणि निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र निवडा.
    • YouTube Studio ॲप मध्ये, तुमचा प्रोफाइल फोटो प्रोफाइल आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करून निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र शोधा.
  3. सर्वेक्षण संपादित करा निवडा.
  4. तुमचे प्रतिसाद संपादित करा.
  5. सबमिट करा निवडा.

निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील प्रतिसाद हटवणे:

  1. तुमच्या चॅनल मालकाचे खाते वापरून कॉंप्युटरवर YouTube मध्ये साइन इन करा किंवा YouTube Studio ॲप वापरा.
  2. YouTube Studio सेटिंग्ज वर जा आणि निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र निवडा.
    • YouTube Studio ॲप मध्ये, तुमचा प्रोफाइल फोटो प्रोफाइल आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करून निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र शोधा.
  3. डेटा हटवा निवडा.
  4. कंफर्मेशन विंडो पॉप अप झाल्यावर हटवा निवडा.

निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील प्रतिसाद डाउनलोड करणे:

निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र यामधील तुमचा डेटा डाउनलोड करण्यासाठी, या सूचना फॉलो करा. तुमच्या एक किंवा अधिक YouTube चॅनलचा डेटा तुम्हाला डाउनलोड करायचा असल्यास, तुम्ही ब्रँड खाते नव्हे, तर तुमचे वैयक्तिक Google खाते वापरून साइन इन करणे आवश्यक आहे.

यामुळे माझ्या Google खाते बद्दलची कोणतीही माहिती बदलते का?

तुम्ही निर्माणकर्ता आणि कलाकार सर्वेक्षण किंवा निर्माणकर्ता लोकसंख्याशास्त्र सेटिंगमध्ये शेअर करता ती माहिती तुमच्या YouTube चॅनलमध्ये स्टोअर केली जाईल. ती इतर Google उत्पादनांद्वारे वापरली जाणार नाही.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5634638475906932811
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false