सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

शोध परिणामांमधील ठिकाणासाठी संपादने सुचवा

तुम्हाला Google शोध परिणामांमधील ठिकाणांबद्दल चुकीची माहिती आढळल्यास, तुम्ही आम्हाला कळवू शकता. तुम्ही व्यवसायाचे मालक असल्यास, तुमच्या व्यवसायाची माहिती कशी व्यवस्थापित करायची ते जाणून घ्या.

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य काही देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही.

तुम्ही संपादने सुचवू शकता असे तपशील

तुम्ही ठिकाणाबद्दल यांसारखी माहिती जोडू किंवा संपादित करू शकता:

  • नाव
  • पत्ता
  • मार्करचे स्थान
  • तास किंवा इतर माहिती

तुम्ही उपयुक्त माहितीसह यांसारखी व्यवसाय विशेषतादेखील जोडू किंवा संपादित करू शकता:

  • डिलिव्हरीचे पर्याय
  • व्हीलचेअर ॲक्सेसिबिलिटी
  • बाहेरील आसनव्यवस्था

ठिकाणासाठी संपादन सुचवणे

  1. तुमच्या काँप्युटरवरून google.com वर जा.
  2. ठिकाण शोधा. शोध परिणामांच्या वर त्या ठिकाणाचा सारांश असतो.
  3. सारांशाच्या तळाशी संपादन सुचवा वर क्लिक करा.
  4. ऑन-स्क्रीन सूचना फॉलो करा.

व्यवसाय विशेषता संपादित करा

  1. तुमच्या काँप्युटरवरून google.com वर जा.
  2. व्यवसाय शोधा. शोध परिणामांच्या उजवीकडे व्यवसायाचे प्रोफाइल आहे.
  3. व्यवसायाच्या तपशीलाखाली नवीनतम माहिती शेअर करा वर क्लिक करा.

ठिकाण बंद झाले किंवा हलवले अशी मार्क करा

तुम्ही असे ठिकाण फ्लॅगदेखील करू शकता जे:

  • कायमचे बंद आहे
  • नवीन ठिकाणी हलवले आहे
  • अस्तित्वात नाही (ठिकाण एकतर आता अस्तित्वात नाही किंवा कधीही अस्तित्वात नव्हते)
  • खाजगी ठिकाण किंवा घर (एखाद्याचे घर यासारखे ठिकाण जे दाखवले जाऊ नये)
  • स्पॅम, बनावट किंवा आक्षेपार्ह आहे (बनावट व्यवसाय किंवा दाखवले जाऊ नये असे आक्षेपार्ह आशय असलेले ठिकाण)
  • डुप्लिकेट आहे (Google Maps वरील दुसऱ्या ठिकाणाची कॉपी आहे असे ठिकाण)
टीप: तुम्हाला कायदेशीर कारणांमुळे काहीतरी काढून टाकले पाहिजे असे वाटत असल्यास,कायदेशीर विनंती सबमिट करा.

सुधारणा प्रकाशित करण्यासाठी असणारा प्रतीक्षा कालावधी

आम्ही सर्व संपादनांचे पुनरावलोकन करतो, त्यामुळे शोध परिणाम अपडेट करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

चांगल्या संपादनामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो

नाव

स्टोअरफ्रंट किंवा वेबसाइटवर वापरलेल्या ठिकाणाचे अधिकृत नाव वापरा. नावाच्या फील्डमध्ये कोणत्याही अतिरिक्त टिप्पण्या जोडू नका.

पत्ता

अधिकृत पत्ता एंटर करा. Maps ने पत्ता अपूर्ण असल्याचे सुचवल्यास, पत्त्यामध्ये अतिरिक्त तपशील जोडा.

मार्कर

तुम्ही मार्कर हलवता, तेव्हा तुम्ही पुरेसे झूम इन केले असल्याची आणि उपग्रह दृश्यावर स्विच केले असल्याची खात्री करा. यामुळे तुम्हाला इमारती पाहण्यास आणि ठिकाणाच्या स्थानावर मार्कर अचूकपणे ड्रॉप करण्यास मदत होईल.

वर्गवारी

ठिकाणाचे वर्णन करताना विशिष्ट वर्गवाऱ्या वापरा. उदाहरणार्थ, "दुकान" ऐवजी "कपड्यांचे दुकान" वापरा.

तास

ठिकाण सुरू असल्याचे तास एंटर करा. तुम्ही आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवसांसाठी वेगवेगळे तास जोडू शकता.

फोन नंबर

प्राथमिक फोन नंबर वापरा. तुम्ही सुचवलेला नंबर बरोबर आहे का ते पहिले तपासा. 

वेबसाइट

अधिकृत वेबसाइट वापरा. सोशल नेटवर्किंग साइट, पुनरावलोकन ॲग्रीगेटर किंवा त्यासारख्या इतर वेबसाइटच्या लिंक समाविष्ट करू नका.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5070935211670207649
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false