सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

लायब्ररी प्रोजेक्ट मधील तुमच्या पुस्तकांवर दावा करा किंवा वगळा

लायब्ररी प्रोजेक्ट चा भाग म्हणून स्कॅन केलेल्या पुस्तकाचे अधिकार तुमच्याकडे असल्यास, तुम्ही त्यावर दावा करू शकता आणि त्याच्या भागीदार केंद्र खात्याशी सहयोग करू शकता. तुमच्या स्कॅन केलेल्या पुस्तकावर दावा कसा करावा ते जाणून घ्या.

तुम्ही एखाद्या पुस्तकावर दावा करता तेव्हा ते Google Books वर कसे दिसते यावर तुमचे अधिक नियंत्रण असू शकते. तुम्ही पीडीएफ डाउनलोड करण्याच्या पर्यायासह Google ने २०% ते १००% यादरम्यान पुस्तकाचा किती भाग प्रदर्शित करावा ते ठरवू शकता.

तुमची पुस्तके लायब्ररी प्रोजेक्ट मधून वगळा

लायब्ररी प्रोजेक्ट ने स्कॅन केलेल्या कॉपीराइट असलेल्या पुस्तकांसाठी वाचक फक्त ग्रंथसूचीविषयक माहिती आणि पुस्तकाच्या पुनरावलोकनामध्ये दाखवल्या जाणाऱ्या शोध संज्ञेशी जुळणाऱ्या काही लहान वाक्यांचे पूर्वावलोकन करू शकतात. हक्कधारकांच्या स्पष्ट परवानगीशिवाय Google Books या पुस्तकांची संपूर्ण पेज कधीही दाखवत नाहीत.

तुम्ही लायब्ररी प्रोजेक्ट साठी स्कॅन करण्यापासून तुमचे पुस्तक वगळू शकता किंवा आधी स्कॅन केलेल्या एखाद्या पुस्तकासाठी शोध पर्याय काढून टाकू शकता. तुम्ही नमूद केल्याशिवाय, तुम्ही फक्त त्या विशिष्ट पुस्तकांचे मालक आहात याची फक्त पडताळणी करण्यासाठी आम्ही तुमची माहिती वापरू. कृपया आणखी तपशिलांसाठी आमचे गोपनीयता धोरण पाहा.

तुमच्याकडे एखादे Google Play Books भागीदार केंद्र खाते नसल्यास, कृपया तुमची पुस्तके काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेली माहिती सबमिट करा.

तुमच्याकडे एखादे Google Play Books भागीदार केंद्र खाते असल्यास, तुम्ही तुमच्या खात्यामध्ये साइन इन करून आणि तुमच्या वेगळ्या टेम्पलेटमध्ये वगळायची असलेली तुमची पुस्तके जोडू शकता. एकदा हे पूर्ण केल्यावर, टेम्पलेटच्या नावासह आमच्याशी संपर्क साधा.

महत्त्वाचे: तुम्हाला या पुस्तकांसाठी कोणत्याही आशय फाइल सबमिट करण्याची आवश्यकता नाही.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मी त्यावर अधिकारांचा दावा केल्यास, माझ्या पुस्तकाचा आणखी किती भाग दृश्यमान असेल?

एकदा तुम्ही लायब्ररी प्रोजेक्ट ने स्कॅन केलेल्या एखाद्या पुस्तकावर अधिकारांचा दावा केल्यास, तुम्ही Google ला फक्त २०%, ५०% किंवा संपूर्ण पुस्तक प्रदर्शित करण्याची विनंती करू शकता.  तुमच्याकडे वाचकांसाठी ते पीडीएफ डाउनलोड म्हणून उपलब्ध करुन देण्याचा पर्यायदेखील आहे.

बदल लाइव्ह होण्यासाठी किती वेळ लागेल?

तुमचे पुस्तक तुमच्या खात्याशी जोडण्यासाठी एक आठवडा लागू शकेल आणि Google Books वर ते लाइव्ह होण्यासाठी आणखी दोन आठवडे लागू शकतात. तुमचे पुस्तक लाइव्ह झाल्यानंतर आमची सपोर्ट टीम तुम्हाला सूचित करेल.

मला स्कॅन केलेल्या पुस्तकाची पीडीएफ मिळू शकेल का?

आम्ही आमच्या स्कॅन केलेल्या फाइलसाठी मॅन्‍युअल विनंत्या पूर्ण करू शकत नाही. तरीही, तुम्हाला तुमच्या भागीदार केंद्र खात्यामध्ये पुस्तक जोडायचे असल्यास आणि ते १००% ब्राउझ करण्यायोग्य आणि सर्व वापरकर्त्यांकरिता डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यास तयार असल्यास, तुम्ही Google Book वर तुमच्या पुस्तकाच्या पेजला भेट देऊन पीडीएफ मिळवू करू शकता.

स्कॅन केलेल्या फाइल वापरून मी Google Play वर माझ्या पुस्तकाची डिजिटल आवृत्ती विकू शकतो का?

आमच्या स्कॅन केलेल्या फाइल Google Play वापरकर्त्यांना विकाव्या इतक्या नेहमी उच्च गुणवत्तेच्या नसतात. त्याऐवजी आम्ही शिफारस करतो की, तुम्ही आम्हाला एखादी योग्य डिजिटल फाइल पाठवा (पीडीएफ किंवा EPUB फॉरमॅटमध्ये).

मी एखादी स्कॅन केलेली फाइल उच्च प्रतीच्या फाइलशी बदलू शकतो का?

आमच्या सिस्टमवरील तांत्रिक बंधानांमुळे आम्ही स्कॅन केलेल्या फाइलमध्ये सुधारणा करू शकत नाही किंवा ती ओव्हरराइट करू शकत नाही. तुम्ही आम्हाला डिजिटल फाइल किंवा मूळ प्रत पाठवण्याचा विचार करत असल्यास, तुम्ही तुमचे पुस्तक थेट आमच्याकडे सबमिट करेपर्यंत प्रतिक्षा करावी अशी आम्ही शिफारस करतो. तुम्ही सबमिट केलेल्या स्कॅनसह लायब्ररी स्कॅन अजूनही Google Books मध्ये शोधण्यायोग्य असेल.

तुम्ही माझे पुस्तक स्कॅन करू शकता का?

तुम्हाला तुमच्या पुस्तकाचे पूर्वावलोकन Google Books मध्ये जोडायचे असल्यास पण तुमच्याकडे कोणतीही एखादी प्रत नसल्यास आणि अजूनही ती Google ने स्कॅन केलेली नसल्यास, तुम्ही आमच्या लायब्ररी भागीदारापैकी एकामधून ते आम्ही स्कॅन करावे याची विनंती करू शकता. तुम्ही हक्कधारक आहात याची पडताळणी केल्यानंतर आम्ही हे पुस्तक स्कॅनिंग भागीदाराकडे आहे का ते तपासून पाहू आणि तसे असल्यास ते स्कॅनिंगसाठी उपलब्ध आहे का हे आम्ही लायब्ररीला विचारू. लायब्ररी प्रोजेक्ट चा एक भाग म्हणून Google ने डिजिटल केलेल्या सर्व पुस्तकांप्रमाणे, स्त्रोत लायब्ररी स्कॅन केलेल्या कामाची एखादी प्रत डाउनलोड करणे निवडू शकते.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12806900313786282760
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false