सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google Search वर उत्पादनाच्या किमतीचा माग ठेवणे

महत्त्वाचे: किमतीचा मागे ठेवणे हे फक्त यूएस आणि भारतामध्ये उपलब्ध आहे.

तुम्हाला Google Search वर किमतीचा माग ठेवा बटण दिसेल, तेव्हा तुम्ही उत्पादनाच्या किमतीचा माग ठेवू शकता. तुम्ही वेबसाइटवर किंवा Google अ‍ॅपमध्ये तुमच्या Google खात्यामध्ये साइन इन केले असल्यास, तुम्ही किमतीचा माग ठेवा हे वैशिष्ट्य वापरू शकता.

टिपा:

  • किमतीमध्ये लक्षणीय घट होते, तेव्हा तुम्हाला Google अ‍ॅपवरून किंवा तुमच्या फोनवर सूचना मिळेल.
  • तुम्ही माग ठेवत असलेल्या उत्पादनांच्या किमतीमधील घसरणीशी संबंधित सारांश असलेला ईमेलदेखील तुम्हाला मिळू शकतो.
  • किमतीमध्ये चढ-उतार होऊ शकतात आणि त्या बदलाच्या अधीन आहेत.
  • फक्त उत्पादन कार्डद्वारे किमतीचा माग ठेवला जाऊ शकतो.
  • तुम्ही शोधत असलेल्या उत्पादनासाठी उत्पादन कार्ड नसू शकतात.

उत्पादनाच्या किमतीचा माग ठेवणे

  1. Google अ‍ॅप किंवा तुमचा मोबाइल ब्राउझर उघडा.
  2. विशिष्ट उत्पादन शोधा, जसे की "Google Pixel 7 Pro" किंवा "सेलफोन" सारखी उत्पादनाची वर्गवारी.
  3. उत्पादन कार्ड पाहण्यासाठी किंवा उघडण्यासाठी स्क्रोल करा.
  4. किमतीचा माग ठेवा वर टॅप करा.
  5. तुम्हाला "किंमत कमी आणि संबंधित आशयाबद्दल पुश नोटिफिकेशन आणि ईमेल मिळतील" असे कन्फर्मेशन मिळेल.

टीप: तुम्ही साइन इन केले असल्याची आणि नोटिफिकेशन सुरू असल्याची खात्री करा.

किमतीचा माग ठेवणे बंद करा

  1. तुमच्या मोबाइल अ‍ॅपवर, सेव्ह केलेले वर जा.
  2. सर्व सेव्ह केलेले आयटम वर क्लिक करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, निवडा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला काढून टाकायचे असलेले आयटम निवडा.
  5. सर्वात वरती उजवीकडे, काढून टाका वर क्लिक करा.

नोटिफिकेशन आणि ईमेल सेटिंग्ज

मोबाइल सूचना बंद करणे

तुमच्या Android डिव्हाइसवर किमतीमधील घसरणीशी संबंधित सूचना बंद करण्यासाठी:

  1. Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर नोटिफिकेशन वर टॅप करा.
  4. “Shopping” बंद करा.

तुमच्या iPhone किंवा iPad वर किमतीमधील घसरणीशी संबंधित नोटिफिकेशन बंद करण्यासाठी:

  1. Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर नोटिफिकेशन वर टॅप करा.
  4. “Shopping” बंद करा.

किमतीचा माग ठेवणारे ईमेल बंद करा

  1. “Google वापरून खरेदी करा” कडून आलेला किमतीचा माग ठेवणारा कोणाताही ईमेल उघडा.
  2. ईमेलच्या तळाशी, सदस्यत्व रद्द करा वर क्लिक करा किंवा टॅप करा.

ॲक्टिव्हिटीच्या आधारावर सूचना

तुमच्या Google अ‍ॅक्टिव्हिटीच्या आधारे, तुम्ही स्वारस्य दाखवलेल्या उत्पादनांच्या किमतीमधील घसरणीशी संबंधित सूचना तुम्हाला मिळू शकतात. या सूचना बंद करण्यासाठी, "सूचना आणि ईमेल सेटिंग्ज" या विभागातील सूचना फॉलो करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12750068863950531504
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false