सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

लिंक, इमेज आणि बरेच काही सेव्ह करणे

तुम्ही लिंक, इमेज आणि ठिकाणे सेव्ह करू शकता.

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य कदाचित सर्व भाषांमध्ये आणि देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध नसेल. तुमचे संग्रह शोधण्यासाठी, तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करणे आवश्यक आहे.

Google अ‍ॅपवर किंवा सेव्ह केलेले येथे, तुम्ही पुढील गोष्टी सेव्ह करू शकता:

  • इमेज
  • ठिकाणे
  • पाककृती
  • शो
  • चित्रपट
  • वेब पेज

Google अ‍ॅपमध्ये, तुम्ही उत्पादने ट्रॅकदेखील करू शकता.

संग्रह तयार करा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  2. तळाशी, सेव्ह केलेले वर टॅप करा
  3. स्वारस्ये या पेजवर, तयार करा वर टॅप करा.
  4. टॅप करा:
    • लिंक वापरून तयार करणे: तुम्ही लिंक जोडता, तेव्हा संग्रह तयार करू शकता.
    • सेव्ह केलेल्या सर्व आयटमवरून तयार करणे: तुम्ही तुमच्या सेव्ह केलेल्या आयटमपैकी एक किंवा अधिक आयटम निवडता, तेव्हा संग्रह तयार करू शकता.
    • रिकामे टेंप्लेट वापरून तयार करणे: तुम्ही रिकामा संग्रह तयार करू शकता.
  5. संग्रहाला नाव द्या.
  6. पूर्ण झाले वर टॅप करा.
  7. सेव्ह करण्यासाठी आयटम शोधा.

तुमच्या सेव्ह केलेल्या आयटममध्ये जोडणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  2. तळाशी, संग्रह आणि त्यानंतर सेव्ह केलेले सर्व आयटम वर टॅप करा.
  3. तळाशी उजवीकडे, जोडा आणि त्यानंतर लिंक वर टॅप करा.

संग्रहामध्ये आयटम सेव्ह करा

आयटम सेव्ह करण्यासाठी:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  2. तुम्हाला सेव्ह करायचा असलेला आयटम शोधा.
  3. आयटमवर टॅप करा.
  4. सर्वात वरती, सेव्ह करा Add to वर टॅप करा.
टीप: तुम्ही एखादा लेख किंवा वेब पेज आधी टॅप न करता नंतर वापरण्यासाठी सेव्ह करू शकता. सेव्ह करण्यासाठी, लेख किंवा वेब पेजच्या शेजारी, आणखी आणखी वर टॅप करा. दिसणाऱ्या पॅनलवर, “आणखी पर्याय” च्या अंतर्गत, सेव्ह कराAdd to वर टॅप करा.

इमेज सेव्ह करण्यासाठी:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  2. तुम्हाला सेव्ह करायची असलेली इमेज शोधा.
  3. इमेजवर टॅप करा.
  4. सर्वात वरती, आणखी आणखी आणि त्यानंतर सेव्ह करा Add to वर टॅप करा. 

टीप: आयटम तुमच्या सर्वात अलीकडील संग्रहामध्ये सेव्ह केला जातो. वेगळा संग्रह निवडण्यासाठी, संपादित करा वर टॅप करा. त्यानंतर संग्रह निवडा.

तुमच्या सेव्ह केलेल्या आयटमवर टीप जोडा

तुम्ही आयटम सेव्ह करत असताना टीप जोडण्यासाठी:

  1. सेव्ह करताना, संपादित करा वर टॅप करा.
  2. तुमच्या सेव्ह केलेल्या आयटमवर टीप जोडा.
  3. सेव्ह करण्यासाठी, वरती उजवीकडे, पूर्ण झाले वर टॅप करा.

तुम्ही आयटम सेव्ह केल्यानंतर टीप जोडण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google अ‍ॅप उघडा.
  2. तळाशी, सेव्ह केलेले वर टॅप करा.
  3. “तुमचे संग्रह” च्या अंतर्गत, तुम्हाला टिपेमध्ये जोडायच्या असलेल्या सेव्ह केलेल्या आयटमवर टॅप करा.
  4. तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या सेव्ह केलेल्या आयटमवर, आणखी आणखी आणि त्यानंतर संपादित करा Edit वर क्लिक करा.
  5. तुमची टीप जोडा.
  6. सेव्ह करण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे, पूर्ण झाले वर क्लिक करा.

इतर अ‍ॅप्समधून सेव्ह केलेले मध्ये जोडा

सेव्ह केलेले मध्ये वेब पेज जोडण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, तुमचा ब्राउझर उघडा.
  2. आणखी आणखी आणि त्यानंतर शेअर करा शेअर करा वर टॅप करा.
  3. पॉपअपवर, आणखी आणखी आणि त्यानंतर सेव्ह केलेले वर टॅप करा.

इतर अ‍ॅप्सवरील लिंक सेव्ह करण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, तृतीय पक्ष ॲप उघडा.
  2. तुम्हाला सेव्ह करायच्या असलेल्या लिंकवर, शेअर करा वर टॅप करा.
  3. पॉपअपवर, डेस्टिनेशन म्हणून सेव्ह केले निवडा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11319279227694006109
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false