तुम्ही तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरून कोणत्याही गोष्टी शोधू आणि शेअर करू शकता, जसे की जवळपासची रेस्टॉरंट, व्हिडिओ किंवा हवामानाचे अंदाज.
- तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Gboard इंस्टॉल करा.
- तुम्हाला ज्यावर टाइप करता येईल असे Gmail किंवा Keep यांसारखे कोणतेही अॅप उघडा.
- जेथे तुम्हाला मजकूर एंटर करता येईल तेथे टॅप करा.
- तुमच्या कीबोर्डच्या वरच्या बाजूला, वैशिष्ट्ये मेनू उघडा वर टॅप करा.
- शोधा वर टॅप करा.
- शोध बारमध्ये, तुमची विनंती टाइप करा.
- तळाशी, शोधा वर टॅप करा.
- खाली किंवा शोध परिणामाच्या बाजूला, शेअर करा वर टॅप करा. मेसेज फील्डमध्ये पेजची लिंक दिसेल.
टीप: शोध परिणामाखाली सूचना दिसत असल्यास, संबंधित माहिती पाहण्यासाठी तुम्ही एखाद्या सूचनेवर टॅप करू शकता.