सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

सिक्युरिटी फॉलो करणे आणि त्यांची तुलना करणे

Google Finance वापरून रीअल टाइम सिक्युरिटी कोट, चार्ट आणि अर्थविषयक बातम्या शोधा. स्टॉक, चलने आणि फ्युचर यांसारखी सिक्युरिटीशी संबंधित माहिती शोधा. स्टॉक आणि तुम्ही निवडलेल्या इतर सिक्युरिटीचा माग ठेवण्यासाठी, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पाहण्याच्या सूचीदेखील तयार करू शकता.

सिक्युरिटी फॉलो करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, google.com/finance वर जा.
  2. "डाओ जोन्स इंडस्ट्रिअल ॲवरेज" यासारखी सिक्युरिटी शोधा. तुम्हाला माग ठेवायच्या असलेल्या सिक्युरिटीवर क्लिक करा. 
  3. सिक्युरिटीच्या नावाच्या उजवीकडे, फॉलो करा वर क्लिक करा.
  4. सिक्युरिटी ही तुमच्या पाहण्याच्या डीफॉल्ट सूचीमध्ये जोडली जाईल. ती पाहण्याच्या कस्टम सूचीमध्ये जोडण्यासाठी, पाहण्याच्या सूचीमध्ये जोडली वर क्लिक करा. 
  5. तुम्हाला सिक्युरिटी जोडायची असलेल्या पाहण्याच्या सूचींवर क्लिक करा.

सिक्युरिटीची तुलना करा

  1. google.com/finance वर जा.
  2. "डाओ जोन्स इंडस्ट्रिअल ॲवरेज" यासारखी सिक्युरिटी शोधा. सिक्युरिटीच्या नावावर क्लिक करा.
  3. चार्टच्या अंतर्गत, शिफारस केलेल्या सिक्युरिटी पैकी एक निवडा. दुसरी सिक्युरिटी शोधण्यासाठी, तुलना करा निवडा. 
  4. तुलनेमधून सिक्युरिटी काढून टाकण्यासाठी, काढून टाका आयकनवर क्लिक करा.

सिक्युरिटी फॉलो करणे बंद करा

  1. google.com/finance वर जा.
  2. "डाओ जोन्स इंडस्ट्रिअल ॲवरेज" यासारखी सिक्युरिटी शोधा.
  3. सिक्युरिटीच्या नावाच्या बाजूला, फॉलो करत आहे वर क्लिक करा.
    • तुम्हाला "फॉलो करत आहे" हे न दिसल्यास, ✓ चिन्हावर क्लिक करा.
  4. तुम्हाला सिक्युरिटी काढून टाकायची असलेल्या सूचींची निवड रद्द करण्यासाठी, निळ्या ✓ चिन्हावर क्लिक करा.

बाजारांची तुलना करा

  1. google.com/finance वर जा.
  2. वेळोवेळी बाजारामधील परफॉर्मन्सच्या चार्टचा विस्तार करण्यासाठी, स्क्रीनच्या सर्वात वरती, बाजार यांची तुलना करा वर क्लिक करा. 
  3. बाजार निवडा. उदाहरणार्थ, "युरोप" किंवा "चलने."

पाहण्याच्या सूची तयार करा आणि त्यांची तुलना करा

पाहण्याच्या कस्टम सूची या तुम्हाला तुम्ही फॉलो करत असलेल्या सिक्युरिटी संगतवार लावू देतात.

पाहण्याची कस्टम सूची तयार करा

  1. google.com/finance वर जा.
  2. "तुमच्या पाहण्याच्या सूची" या अंतर्गत, नवीन पाहण्याची सूची वर टॅप करा. 
    • तुम्हाला "नवीन पाहण्याची सूची" दिसत नसल्यास, उजवीकडे स्क्रोल करून पहा.
  3. तुमच्या पाहण्याच्या सूचीला नाव द्या. उदाहरणार्थ, "माझे आवडते स्टॉक."
  4. तुमच्या पाहण्याच्या सूचीमध्ये मालमत्ता जोडण्यासाठी, गुंतवणूक जोडा वर टॅप करा.

पाहण्याच्या सूचीशी संबंधित बातम्या ब्राउझ करा

  1. google.com/finance वर जा.
  2. "तुमच्या पाहण्याच्या सूची" या अंतर्गत, पाहण्याची सूची निवडा.
  3. संबंधित बातम्या ब्राउझ करण्यासाठी, सूचीच्या अंतर्गत "बातम्यांमधील तुमची पाहण्याची सूची" वर स्क्रोल करा.

पाहण्याच्या कस्टम सूचीचे नाव बदला किंवा हटवा

  1. google.com/finance वर जा.
  2. "तुमच्या पाहण्याच्या सूची" या अंतर्गत, तुम्हाला नाव बदलायचे असलेली किंवा हटवायची असलेली पाहण्याची सूची निवडा. 
    • टीप: तुम्ही तुमच्या पाहण्याच्या कस्टम सूचींचे नाव बदलू शकता किंवा त्या हटवू शकता, पण तुम्ही तुमच्या पाहण्याच्या डीफॉल्ट सूचीचे ("पाहण्याची सूची" असे म्हटले जाते) नाव बदलू शकत नाही अथवा ती हटवू शकत नाही.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी वर टॅप करा.
  4. नाव बदला किंवा हटवा निवडा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8271231300997048089
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false