तुम्ही बातमी प्रकाशक शोधता तेव्हा, नॉलेज पॅनल मध्ये तुम्हाला त्यांची विश्वसनीयता आणि त्यांच्या आशयाची गुणवत्ता समजून घेण्यात मदत करणारी माहिती दिसेल.
कोणती माहिती दिसते
प्रकाशकांबद्दल माहिती दाखवण्यासाठी Google अल्गोरिदम वापरते. उपलब्ध माहितीचे प्रमाण आणि गुणवत्तेवर अवलंबून, तुम्हाला हे टॅब दिसू शकतात:
- याबद्दल लिहितात: प्रकाशक वारंवार अंतर्भूत करत असलेले विषय.
- पुरस्कार: प्रकाशकाला मिळालेले उल्लेखनीय पुरस्कार.
- परीक्षण केलेले दावे: प्रकाशकाच्या अलीकडच्या मोठ्या प्रमाणावरील आशयाचे अधिकारयुक्त तथ्य तपासनीसाकडून परीक्षण केले गेल्यावर हे दिसते.
टीप: प्रकाशकासाठी नॉलेज पॅनल दिसल्यामुळे त्या प्रकाशकाच्या Google Search परिणामांमधील पेजच्या रँकिंगवर परिणाम होत नाही. प्रकाशक नॉलेज पॅनल वापरण्याची निवड रद्द करू शकत नाहीत.
नॉलेज पॅनल बद्दल फीडबॅक पाठवा
नॉलेज पॅनल बद्दल फीडबॅक पाठवण्यासाठी, त्याखालील फीडबॅक? वर टॅप किंवा क्लिक करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रकाशकाला नॉलेज पॅनल वर माहिती कशी जोडता येईल?
शोध परिणामांप्रमाणे, नॉलेज पॅनल मध्ये काय दाखवले जाते त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. सातत्याने ताजा, बातम्यांशी संबंधित ऑनलाइन आशय तयार करणारे प्रकाशक नॉलेज पॅनल वापरण्याच्या त्यांच्या संधींमध्ये सुधारणा करू शकतात.
Search मधील प्रकाशकाच्या रँकिंगवर नॉलेज पॅनल परिणाम करत नाहीत.