तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी शोधणे व नियंत्रित करणे

वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी सुरू केलेली असल्यास, तुमचे शोध व इतर Google सेवांमधील अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केली जाते जेणेकरून, तुम्हाला अधिक जलद शोध आणि अ‍ॅप व आशयाशी संबंधित आणखी उपयुक्त शिफारशी यांसारखे जास्त पर्सनलाइझ केलेले अनुभव मिळू शकतील.

तुम्ही तुमची वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी कधीही बंद करू शकता किंवा मागील अ‍ॅक्टिव्हिटी हटवू शकता.

टीप: तुम्हाला तुमचे Google खाते ऑफिस किंवा शाळेमार्फत मिळाले असल्यास, तुम्हाला तुमच्या संस्थेसाठी वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी अतिरिक्त सेवा सुरू करण्याकरिता तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधावा लागू शकतो.

वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी सुरू किंवा बंद करणे

 1. तुमच्या काँप्युटरवर, ॲक्टिव्हिटी कंट्रोल पेजला भेट द्या. तुम्हाला तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करण्यास सांगितले जाऊ शकते.
 2. वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी सुरू किंवा बंद करा.
 3. वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी सुरू असताना:
  • तुम्ही "Google सेवा वापरणार्‍या वेबसाइट आणि अ‍ॅप्सवरील Chrome इतिहास व अ‍ॅक्टिव्हिटीचा समावेश करा" च्या बाजूच्या चौकटीत खूण करू शकता.
  • तुम्ही "ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश करा" च्या बाजूच्या चौकटीत खूण करू शकता.

टीप: काही ब्राउझर आणि डिव्हाइसमध्ये ही अ‍ॅक्टिव्हिटी कशी सेव्ह केली जाते त्यावर परिणाम करणारी आणखी सेटिंग्ज असू शकतात.

तुमची अ‍ॅक्टिव्हिटी शोधणे किंवा हटवणे

तुम्ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी ला भेट देऊन तुमची वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी शोधू व हटवू शकता. अ‍ॅक्टिव्हिटी मॅन्युअली हटवणे किंवा ऑटोमॅटिक हटवणे सेट करणे हे कसे करायचे याबद्दल अधिक जाणून घ्या.

टीप: आणखी सुरक्षा जोडण्यासाठी, तुम्हाला माझी अ‍ॅक्टिव्हिटी वर तुमचा पूर्ण इतिहास पाहण्याकरिता अतिरिक्त पडताळणी पायरी आवश्यक असू शकते.

वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी म्हणून काय सेव्ह केले जाते

Google Sites, अ‍ॅप्स आणि सेवा यांवरील तुमचे शोध आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटी

वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी सुरू असताना, Google यांसारखी माहिती सेव्ह करते:

 • तुम्ही Maps आणि Play यांसारख्या Google सेवांवर करत असलेले शोध व इतर गोष्टी
 • तुमचे स्थान, भाषा, आयपी ॲड्रेस, रेफरर आणि तुम्ही ब्राउझर वापरता की अ‍ॅप याबाबत माहिती
 • तुम्ही क्लिक करत असलेल्या जाहिराती किंवा जाहिरातदाराच्या साइटवर खरेदी करत असलेल्या गोष्टी
 • तुमच्या डिव्हाइसवरील अलीकडील अ‍ॅप्स किंवा तुम्ही शोधलेली संपर्क नावे यांबाबत माहिती

टीप: तुम्ही ऑफलाइन असतानादेखील ॲक्टिव्हिटी सेव्ह केली जाऊ शकते.

Google सेवा वापरणार्‍या साइट, अ‍ॅप्स आणि डिव्हाइस यांवरील तुमच्या ब्राउझिंग व इतर अ‍ॅक्टिव्हिटीबद्दलची माहिती

वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी सुरू असताना, तुम्ही यांसारख्या अतिरिक्त अ‍ॅक्टिव्हिटीचा समावेश करू शकता:

 • जाहिराती दाखवण्यासाठी Google सोबत भागीदारी करणार्‍या साइट आणि अ‍ॅप्स
 • अ‍ॅप्स Google सोबत शेअर करत असलेल्या डेटासह, Google सेवा वापरणार्‍या साइट आणि अ‍ॅप्स
 • तुमचा Chrome ब्राउझिंग इतिहास
 • बॅटरीची पातळी आणि सिस्टम एरर यांसारखे Android वापर आणि निदान

Google ला ही माहिती सेव्ह करू देण्यासाठी:

 • वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू असणे आवश्यक आहे.
 • "Google सेवा वापरणार्‍या साइट, अ‍ॅप्स आणि डिव्हाइसमधील Chrome इतिहास व अ‍ॅक्टिव्हिटीचा समावेश करा" च्या बाजूच्या चौकटीत खूण करणे आवश्यक आहे.

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले असेल आणि Chrome सिंक सुरू केले असेल तरच तुमचा Chrome इतिहास सेव्ह केला जातो. Chrome सिंक बद्दल जाणून घ्या.

टीप: तुम्ही शेअर केलेले डिव्हाइस वापरत असल्यास किंवा एकाहून अधिक खाती वापरून साइन इन करत असल्यास, तुम्ही वापरत असलेल्या ब्राउझर किंवा डिव्हाइसवरील डीफॉल्ट खात्यामध्ये अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह केली जाऊ शकते.

ऑडिओ रेकॉर्डिंग

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू असताना, तुम्ही Google Search, Assistant आणि Maps यांच्यासोबत केलेल्या संवादांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगचा तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून समावेश करू शकता. ऑडिओ रेकॉर्डिंगबद्दल जाणून घ्या.

Google ला ही माहिती सेव्ह करू देण्यासाठी:

 • वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू असणे आवश्यक आहे.
 • "ऑडिओ रेकॉर्डिंगचा समावेश करा" च्या बाजूच्या चौकटीत खूण करणे आवश्यक आहे.

तुमची सेव्ह केलेली अ‍ॅक्टिव्हिटी कशी वापरली जाते

Google तुमची सेव्ह केलेली अ‍ॅक्टिव्हिटी कशी वापरते आणि ती खाजगी ठेवण्यात कशी मदत करते याबद्दल अधिक जाणून घ्या.

Google सर्वसाधारणपणे शोध क्वेरी कसे हाताळते याबद्दल अधिक माहितीसाठी, गोपनीयता धोरण वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) चे पुनरावलोकन करा.

तुम्ही साइन आउट केलेले असताना वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी कशी काम करते

तुम्ही साइन आउट केलेले असतानादेखील शोधाशी संबंधित अ‍ॅक्टिव्हिटी वापरून तुमचे शोध आणि जाहिरात परिणाम कस्टमाइझ केले जाऊ शकतात. या प्रकारचे शोध कस्टमायझेशन बंद करण्यासाठी, तुम्ही खाजगीरीत्या शोधू आणि ब्राउझ करू शकता. कसे ते जाणून घ्या.

ब्राउझर इतिहास

अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल पेजमध्ये, "Chrome इतिहास आणि Google सेवा वापरणार्‍या साइट, अ‍ॅप्स आणि डिव्हाइसवरील अ‍ॅक्टिव्हिटीचा समावेश करणे" यासाठी तुम्ही चौकटीत खूणदेखील करू शकता. या चौकटीत खूण केल्यावर, तुमच्या डिव्हाइसवरील अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह केली जावी का ते तुम्ही नियंत्रित करू शकता.

तुमचे शोध आणि तुम्ही भेट दिलेल्या साइट तुमचा ब्राउझर किंवा Google Toolbar यांमध्येदेखील स्टोअर केल्या जाऊ शकतात. Chrome, Toolbar, Safari, Internet Explorer किंवा Firefox यांवर तुमचा इतिहास कसा हटवायचा याबद्दल जाणून घ्या.