सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

इशारा तयार करा

एखाद्या विषयासाठी Google Search मध्ये नवीन परिणाम दिसल्यावर तुम्हाला ईमेल मिळू शकतात. उदाहरणार्थ, तुम्हाला बातम्या, उत्पादने किंवा तुमच्या नावाचे उल्लेख यांबद्दल माहिती मिळू शकते.

इशारा तयार करा

  1. Google Alerts वर जा.
  2. वरच्या बॉक्समध्ये, तुम्हाला फॉलो करायचा असलेला विषय एंटर करा.
  3. तुमची सेटिंग्ज बदलण्यासाठी पर्याय दाखवा वर क्लिक करा. तुम्ही हे बदलू शकता:
    • तुम्हाला किती वेळा सूचना मिळतात
    • तुम्ही पाहणार असलेल्या साइटचे प्रकार
    • तुमची भाषा
    • तुम्हाला जगाच्या ज्या भागातून माहिती हवी आहे तो भाग
    • तुम्हाला किती परिणाम पहायचे आहेत
    • इशारे कोणत्या खात्यांवर मिळतात
  4. इशारा तयार करावर क्लिक करा. आम्हाला जुळणारे शोध परिणाम सापडल्यावर तुम्हाला ईमेल मिळतील.

इशारा संपादित करा

  1. Google Alerts वर जा.
  2. इशार्‍याच्या बाजूला, संपादित करा संपादित करा वर क्लिक करा.
  3. तुम्हाला कोणतेही पर्याय दिसत नसल्यास, पर्याय दाखवा वर क्लिक करा.
  4. तुमचे बदल करा.
  5. अपडेट इशारा वर क्लिक करा.
  6. तुम्हाला इशारे कसे मिळतात ते बदलण्यासाठी, सेटिंग्ज सेटिंग्ज वर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या पर्यायांवर खूण करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

इशारा हटवा

  1. Google Alerts वर जा.
  2. तुम्हाला काढायच्या असलेल्या इशार्‍याच्या बाजूला, हटवा हटवा वर क्लिक करा.
  3. पर्यायी: तुम्ही इशारा ईमेलच्या तळाशी सदस्यत्व रद्द करा वर क्लिक करूनदेखील इशारा हटवू शकता.

इशारे मिळवणे आणि पाहणे यांमधील समस्या सोडवा

पायरी १: तुम्ही कोणत्या खात्यामध्ये लॉग इन केले आहे ते तपासा
  1. Google Alerts वर जा.
  2. तुमच्या सद्य खात्यासाठी Google बार तपासा.
  3. तुम्ही योग्य खात्यावर नसल्यास, तुमची प्रोफाइल इमेज आणि त्यानंतर साइन आउट करा वर क्लिक करा.
  4. योग्य खात्याने साइन इन करा.
पायरी २: तुमच्या इशार्‍याची सेटिंग्ज तपासा
  1. Google Alerts वर जा.
  2. तुम्हाला तुमचे इशारे बंद केले गेले आहेत असे सांगणारा मेसेज दिसल्यास, सुरू करा वर क्लिक करा.
  3. "माझे इशारे" विभागामध्ये, तुम्हाला ज्यासाठी परिणाम पहायचे आहेत त्या इशार्‍यावर क्लिक करा.
  4. तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस आणि सेटिंग्ज तपासण्यासाठी, पर्याय दाखवा वर क्लिक करा.
पायरी ३: तुमची ईमेल सेटिंग्ज तपासा

तुम्ही वरील पायऱ्या फॉलो केल्या असल्यास आणि तरीही तुम्हाला नवीन इशारे मिळत नसल्यास, तुमचे ईमेल खाते तपासा:

  • तुमचा इनबॉक्स भरलेला नाही याची खात्री करा.
  • Google Alert ईमेल तुमच्या स्पॅम फोल्डरमध्ये जात नाहीत याची खात्री करा. तुम्ही Gmail वापरत असल्यास, तुमच्या संपर्कांवर googlealerts-noreply@google.com जोडा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2759872080923480346
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false