तुम्ही वापरू आणि शेअर करू शकता अशा इमेज शोधा

तुम्ही Google Search वापरता तेव्हा, तुम्हाला परवाना पुन्हा वापरू देणाऱ्या इमेज शोधण्यासाठी तुम्ही परिणाम फिल्टर करू शकता.

महत्त्वाचे: इमेज कदाचित कॉपीराइटच्या अधीन असू शकतात. तुम्ही पुन्हा वापर करू शकाल असा आशय कसा शोधायचा ते खाली जाणून घ्या.

परवाना आणि पुन्हा वापराच्या अटींचे पुनरावलोकन करा

तुम्ही आशय पुन्हा वापरण्यापूर्वी त्याचा परवाना कायदेशीर असल्याची खात्री करा आणि पुन्हा वापर करण्याशी संबंधित नेमक्या अटी तपासा. उदाहरणार्थ, तुम्ही इमेज वापरता तेव्हा इमेजच्या निर्माणकर्त्याला तुम्ही श्रेय द्यावे ही परवान्याची आवश्यकता असू शकते.

आम्ही तुम्हाला शिफारस करतो की:

 • परवाना माहिती जोडलेली आहे अशा इमेज शोधण्यासाठी "वापराचे हक्क" फिल्टर वापरा. Google इमेज होस्ट करणार्‍या साइटनी किंवा इमेज पुरवठादारांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे परवान्यानुसार इमेज फिल्टर करते.
 • इमेजच्या परवाना माहितीची नेहमी खात्री करून घ्या. तुम्ही "परवाना तपशील" लिंक फॉलो करू शकता आणि परवान्याच्या पुरवठादारासह आणि इमेज होस्ट साइट दोन्ही बरोबर अचूकतेसाठी त्याचे पुनरावलोकन करू शकता.

अशा इमेज शोधा ज्यामध्ये त्यांचा पुन्हा वापर कसा करावा याची माहिती उपलब्ध असेल

 1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटमधून, images.google.com वर जा.
 2. इमेज शोधा.
 3. शोध बॉक्समध्ये असलेल्या इमेजचे मर्यादित परिणाम पाहण्यासाठी, फिल्टर करा Filter आणि त्यानंतर वापराचे हक्क आणि त्यानंतर परवाना प्रकार टॅप करा.
 4. तुम्हाला हव्या असलेल्या इमेजवर टॅप करा.
 5. इमेजचा परवाना कसा मिळवावा आणि ती कशी वापरावी याची माहिती शोधण्यासाठी, इमेजच्या खाली परवाना तपशील वर टॅप करा.

इमेज शेअर करा

 1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरून images.google.com वर जा.
 2. इमेज शोधा.
 3. इमेजला स्पर्श करा आणि धरून ठेवा.
 4. शेअर करा Share वर टॅप करा.

वापर हक्कांचे प्रकार

प्रत्येक "वापराचे हक्क" या फिल्टरसाठी, तुम्ही परवान्यांचे तपशील जोडलेल्या इमेजपुरते परिणाम मर्यादित करू शकता, ज्यामध्ये तुम्ही प्रतिमेचा परवाना कसा घेऊ शकता आणि तिचा कसा वापर करू शकता या माहितीचा समावेश असेल.

परवाना तपशील शोधण्यासाठी: इमेज निवडा, त्यानंतर इमेजच्या खाली परवाना तपशील निवडा. आम्ही शिफारस करतो की, तुम्हाला वापरायच्या असलेल्या कोणत्याही इमेजच्या परवान्यांच्या आवश्यकतांचे पुनरावलोकन करा.

 • Creative Commons licenses: या इमेज सहसा विनामूल्य वापरता येतात, पण श्रेय देणे आवश्यक आहे. त्यांचा वापर तुम्ही कसा किंवा कोणत्या संदर्भात करू शकता यावरदेखील मर्यादा असू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या इमेजच्या परवान्यामध्ये सांगितले असेल की, तुम्ही त्यामध्ये कोणतेही बदल करू शकत नाही किंवा ती व्यावसायिक कारणांसाठी वापरू शकत नाही.
 • व्यावसायिक किंवा इतर परवाने: या इमेजला Creative Commons license नाहीत आणि ती विनामूल्य साइट किंवा पेमेंट करणे आवश्यक आहे अशा व्यावसायिक साइटवरील असू शकतात.

वापराचे हक्क कसे काम करते

वापराचे हक्क तुम्हाला वाजवी वापर याच्या पलीकडे वापरता येईल असा आशय शोधण्यात मदत करतात. साइट मालक त्यांच्या साइटवरील आशय पुन्हा वापरता येत असल्यास आणि तुम्ही तो कसा वापरू शकता हे तुम्हाला कळवण्यासाठी परवाने वापरू शकतात.

चुकीच्या वापर हक्कांची तक्रार करा

तुमच्या कॉपीराइटच्या गैरवापराबद्दल तक्रार करण्यासाठी कॉपीराइट उल्लंघन सूचनाकरिता आवश्यकता यांचे पुनरावलोकन करा किंवा तक्रार नोंदवा.