सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google व्हॉइस शोध वापरणे

उपयुक्त माहिती शोधण्यासाठी तुम्ही तुमचा आवाज वापरू शकता.

व्हॉइस शोध सुरू करणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  2. मायक्रोफोन Speak वर टॅप करा.
  3. प्रश्न विचारा.

टीप: Google अ‍ॅपवर गाणे प्ले करून, गुणगुणून किंवा गाऊन ते कसे शोधावे हे जाणून घ्या.

सामान्य व्हॉइस शोध

तुमची भाषा, देश आणि प्रदेश यांमध्ये व्हॉइस शोध उपलब्ध असल्यास, तुम्ही यांपैकी बहुतांश उदाहरणे बोलू शकता.

टीप: यांपैकी काही उदाहरणे फक्त ठरावीक भाषा, देश किंवा प्रदेशांमध्ये कार्य करतात.

मनोरंजन (संगीत, चित्रपट आणि इमेज)

नवीन संगीत शोधा: "इंडियन ओशन कोणती गाणी गातात?"

चित्रपट शोधा: "आज रात्री कोणते चित्रपट लागणार आहेत?" किंवा "थ्री इडियट्स कुठे लागणार आहे?"

इमेज शोधा: "मला वरळी सी लिंकचे फोटो दाखवा."

प्रवास आणि नेव्हिगेशन

दिशानिर्देश मिळवा: "बिग बाजारवर नेव्हिगेट करा" किंवा "रिलायबल टेक पार्क, ऐरोली, नवी मुंबई येथे जाण्यासाठी दिशानिर्देश."

जवळपासची ठिकाणे शोधा: "सर्वात जवळ कोणते कॉफी शॉप आहे?"

तुमच्या प्रवासाची योजना आखा: "जयपूर शहरामधील काही आकर्षणे कोणती आहेत?"

तथ्य आणि झटपट उत्तरे

वेळ जाणून घ्या: "लंडनमध्ये सध्या किती वाजले आहेत?"

हवामान तपासा: "आज मला जॅकेटची गरज भासेल का?" किंवा "उद्या सकाळचे हवामान कसे असेल?"

ट्रिव्हिया प्रश्नांची उत्तरे द्या: "अल्बर्ट आइनस्टाइनचा जन्म कुठे झाला?" किंवा "सुनिधी चौहानचे वय किती आहे?"

शब्द किंवा वाक्यांचे भाषांतर करा: "स्पॅनिशमध्ये काकडीला काय म्हणतात?"

शब्दाची व्याख्या सांगा: "खादाडपणा म्हणजे काय?"

एकक रूपांतरित करा: "१६ औंसाचे किती पाउंड्स होतील?"

गणित सोडवा: "२२०९ चे वर्गमूळ किती आहे?"

दुसरी भाषा जोडा

एकापेक्षा जास्त भाषांमध्ये व्हॉइस शोध वापरण्यासाठी तुमच्या सेटिंग्जमधून भाषा जोडा.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतरVoice आणि Assistant वर टॅप करा.
  3. भाषा आणि त्यानंतर भाषा जोडा वर टॅप करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9150031537165096039
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false