तुम्ही कीबोर्डवर शब्द टाइप करण्याऐवजी तुमच्या बोटाने तुमच्या शोध संज्ञा लिहू शकता. तुम्ही लिहित असताना तुमचा हस्तलिखित मजकूर सर्च बॉक्समधील शब्दांमध्ये रूपांतरित होतो.
उपलब्धता
तुम्ही या डिव्हाइसवर हस्तलेखन वापरू शकता:
- Android 2.3 आणि त्यावरील आवृत्ती असलेले फोन
- Android 4.0 आणि त्यावरील आवृत्ती असलेले टॅबलेट
हस्तलेखन सुरू किंवा बंद करा
- तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर, Search सेटिंग्ज उघडा.
- "हस्तलेखन" विभागावर जा.
- हस्तलेखन सुरू करण्यासाठी, सुरू करा वर टॅप करा.
- हस्तलेखन बंद करण्यासाठी, बंद करावर टॅप करा.
- पेजच्या तळाशी, सेव्ह करा वर टॅप करा.
टीप: तुमचे बदल शोधण्यासाठी, तुमचा ब्राउझर रिफ्रेश करा.
हस्तलेखन वापरून कसे शोधायचे
- हस्तलेखन सुरू केल्यावर तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरून google.com वर भेट द्या.
- तळाशी उजवीकडे, हस्तलेखन वर टॅप करा.
- तुमच्या शोध संज्ञा स्क्रीनवर कुठेही लिहिण्यासाठी तुमच्या बोटाचा वापर करा.
- तुम्ही लिहित असताना तुमचा हस्तलिखित मजकूर सर्च बॉक्समधील मजकुरामध्ये रूपांतरित होतो.
- शोधा वर टॅप करा.
टिपा आणि युक्त्या
- अक्षरे हटवा: पेजच्या तळाशी, हटवा वर टॅप करा.
- पुन्हा सुरू करा: सर्च बॉक्समध्ये, साफ करा वर टॅप करा.
- वर्णांचे स्पष्टीकरण द्या: तुम्ही टाइप केलेले एखादे अक्षर किंवा अंक चुकून दुसराच समजला जाण्याची शक्यता असल्यास, जसे 0 (अंक) आणि O (अक्षर), पर्यायांची सूची स्क्रीनच्या तळाशी दिसून येईल.
- पूर्वानुमानाचा वापर करा: तुमचा वेळ वाचवण्यात मदत करण्यासाठी, तुम्ही लिहिता तेव्हा सर्च बॉक्समध्ये शोध पूर्वानुमानीत संज्ञा दिसू शकतात. ती संज्ञा शोधण्यासाठी पूर्वानुमानावर टॅप करा. संबंधित शोध एक्सप्लोर करण्यासाठी, अॅरो वर टॅप करा.
- चिन्हे समाविष्ट करा: चिन्हे आणि विशेष वर्ण वापरून पाहा जसे की +, @, &, आणि $.