सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google शोध मध्ये अॅक्सेसिबिलिटी

तुम्ही शोधल्यानंतर, परिणाम पेज संगतवार लावले जाते जेणेकरून, तुम्ही ते स्क्रीन रीडर आणि कीबोर्ड यांसारखे साहाय्यकारी तंत्रज्ञान वापरून सहजपणे नेव्हिगेट करू शकता.

परिणाम पेजवर अ‍ॅक्सेसिबिलिटी लिंक वापरा

कॉंप्युटरवर, शोध परिणाम पेजच्या सर्वात वरती तीन अ‍ॅक्सेसिबिलिटी लिंक आहेत:

  • मुख्य आशयावर जा: ही पेजवरील पहिल्या आशय आयटमवर जाते, जसे की शोध परिणाम किंवा जाहिरात.
  • अ‍ॅक्सेसिबिलिटी मदत: ही मदतपर लेख उघडते.
  • अ‍ॅक्सेसिबिलिटी फीडबॅक: ही एक फॉर्म उघडते जेथे तुम्ही Google Search वरील अ‍ॅक्सेसिबिलिटीबाबत फीडबॅक देऊ शकता. तुमचा फीडबॅक एंटर करा आणि पाठवा निवडा.

अ‍ॅक्सेसिबिलिटी लिंक निवडण्यासाठी:

  • कीबोर्डसह:
    1. तुम्हाला हव्या असलेल्या लिंकवर पोहोचेपर्यंत टॅब की दाबा.
    2. एंटर की दाबा.
  • स्क्रीन रीडरसह: झटपट नेव्हिगेशन नियंत्रणे वापरा.

विभागाच्या शीर्षकांसह नेव्हिगेट करा

तुम्हाला स्क्रीन रीडर वापरून नेव्हिगेट करण्यात मदत करण्यासाठी, शोध परिणाम पेजमध्ये विभागाच्या शीर्षकांची हायरार्की दिली आहे.

कॉंप्युटरवर

  • शीर्षक पातळी १ (H1): यामध्ये शोध परिणाम, जाहिराती आणि कसे जायचे यांसारख्या पेजच्या महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे.
  • शीर्षक पातळी २ (H2): यामध्ये "क्रीडा परिणाम" आणि "व्हिडिओ" यांसारख्या गटबद्ध परिणामांच्या नावांचा समावेश आहे.
  • शीर्षक पातळी ३ (H3): यामध्ये वैयक्तिक शोध परिणामांची शीर्षके, जाहिरातींची शीर्षके आणि मर्यादित केलेले गटबद्ध परिणाम यांचा समावेश आहे.

फोन आणि टॅबलेटवर

  • शीर्षक पातळी १ (H1): यामध्ये Google चा लोगो आणि Google च्या होम पेजकडे निर्देश करणारी "Google" असे नाव असलेली लिंक यांचा समावेश आहे.
  • शीर्षक पातळी २ (H2): पहिले H2 शीर्षक हे शोध परिणाम आहे. तर दुसरे जाहिराती आहे.
  • शीर्षक पातळी ३ (H3): यामध्ये वैयक्तिक शोध परिणामांची शीर्षके आणि जाहिरातींची शीर्षके यांचा समावेश आहे.

आणखी अ‍ॅक्सेसिबिलिटी पर्याय शोधा

नवीन उपाय शोधण्यासाठी, Google सेवांबद्दल टिपा शेअर करा आणि इतर Google वापरकर्त्यांसह अ‍ॅक्सेसिबिलिटीशी संबंधित समस्यांविषयी चर्चा करा:

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9786205723837584102
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false