सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google वर इमेज जोडा

Google शोध परिणामांमध्ये पिक्चर समाविष्ट करण्यासाठी, वेबसाइटवर तुमची इमेज वर्णनासह जोडा. तुम्हाला शोध परिणामांमाध्ये इमेज थेट अपलोड करता येत नसल्या तरी, वेबसाइटवर पोस्ट केलेल्या शोधण्यायोग्य इमेज आमच्या शोध परिणामांमध्ये दिसू शकतात.

तुमची इमेज वेबवर जोडा

  1. तुमची इमेज वेबसाइटवर पोस्ट करा

    तुम्हाला तुमचा फोटोग्राफ किंवा इमेज Google शोध परिणामांमध्ये दिसायला हवी असल्यास, तुम्हाला इमेज वेबसाइटवर पोस्ट करावी लागेल. तुमच्या मालकीची वेबसाइट नसल्यास, तुम्हाला वापरता येणार्‍या काही मोफत आशय होस्टिंग सेवा येथे दिल्या आहेत:

    • Blogger वापरून ब्लॉगवर इमेज जोडा
    • Google Sites वापरून तुमची स्वतःची वेबसाइट तयार करा
  2. तुम्ही पोस्ट करत असलेली इमेज सार्वजनिक आणि शोधण्यायोग्य आहे याची खात्री करा

    सार्वजनिक आणि शोधण्यायोग्य वेबसाइटवर इमेज पोस्ट करून, तुम्ही Google साठी तुमची इमेज शोधणे आणि ती इमेज अनुक्रमणिकेवर जोडणे शक्य करता. तुम्ही इमेज अपलोड करता तेव्हा, तुमची इमेज असलेले पेज सार्वजनिकरीत्या अ‍ॅक्सेसिबल आहे याची खात्री करा. उदाहरणार्थ, तुम्ही Google+ वर फोटो पोस्ट केल्यास, गोपनीयता सेटिंग सार्वजनिक होते याची खात्री करा.

    Google अनुक्रमित करणार असलेल्या साइटवर पोस्ट करण्याबाबत आणखी टिपांसाठी, Google वर साइट जोडण्याबद्दल वाचा.

तुमची इमेज Search मध्ये दिसण्यात मदत करण्यासाठी टिपा

तुमची इमेज Google शोध परिणामांमध्ये दिसण्यात मदत करण्यासाठी, ही इमेज प्रकाशन मार्गदर्शक तत्त्वे फॉलो करा:

  • वर्णनात्मक मजकूर समाविष्ट करा. इमेजच्या कुठेतरी जवळ मजकूर समाविष्ट करा, जसे की "alt" टॅग किंवा कॅप्शन. इमेज काय दाखवत आहे आणि ती कोणत्या शोधांशी संबंधित आहे ते समजून घेण्यात हे Google ला मदत करते.
  • उच्च दर्जाचे फोटो अपलोड करा. उत्कृष्ट इमेज आशय हा तुमच्या साइटवर ट्रॅफिक निर्माण करण्याचा अप्रतिम मार्ग आहे.

​शेवटी, संयम ठेवा. तुम्ही वेबवर अपलोड करत असलेल्या इमेज शोध परिणामांमध्ये तात्काळ दिसणार नाहीत. तुमच्या इमेज शोध परिणामांमध्ये दिसण्यापूर्वी तुमची साइट Google कडून अनुक्रमित केली जाईपर्यंत तुम्हाला वाट पहावी लागेल.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3942524286300232190
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false