Gmail वरून प्रवासाचे शोध परिणाम मिळवा

Google वरती, तुम्ही Gmail मधून तुमची आगामी फ्लाइट किंवा हॉटेल आरक्षणे यांसारखी माहिती शोधू शकता.

 1. google.com वर जा.
  • URL मध्ये "https" ऐवजी "http" असल्यास, तुम्हाला हे परिणाम मिळणार नाहीत.
 2. सर्वात वर उजवीकडे, साइन इन करा वर क्लिक करा.
  • तुमचा Google खाते प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षर असल्यास, तुम्ही तुमच्या खात्यामध्ये आधीच साइन इन केलेले आहे.
 3. खाली उदाहरण म्हणून दिलेल्या शोधापैकी एक वापरून पाहा.

उदाहरण शोध

टीप: शोधासंबंधीची काही उदाहरणे सर्व प्रदेशांमध्ये काम करणार नाहीत.

 • हॉटेल आरक्षणे: माझी आरक्षणे शोधून तुमची हॉटेलची आरक्षणे शोधा.
 • फ्लाइट: माझ्या फ्लाइट शोधून, अप टू डेट माहिती मिळवण्यासाठी तुमच्या आगामी फ्लाइट शोधा.
 • परिवहन: माझे कारचे आरक्षण, बसची तिकिटे किंवा माझी ट्रेनची तिकिटे शोधून तुमची कार, बस किंवा ट्रेनची आरक्षणे शोधा.

तुमच्या शोध परिणामांची गोपनीयता

तुमच्या Google उत्पादनांवरील परिणाम खाजगी आहेत. तुम्ही तुमची माहिती स्पष्टपणे शेअर करत नाही किंवा ती सार्वजनिकरीत्या उपलब्ध होत नाही तोपर्यंत, इतर कोणालाही त्यांच्या शोध परिणामांमध्ये ती मिळणार नाही.

तुमच्या Gmail मधून आलेले परिणाम फक्त तुम्हाला मिळतील.

Gmail वरील परिणाम सुरू किंवा बंद करा

तुम्हाला Gmail मधील शोध परिणाम मिळावेत की नाही हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

टीप: तुम्ही https://www.google.com वर शोधणे आवश्यक आहे आणि या पायऱ्या फॉलो करण्यासाठी Google खाते मध्ये साइन इन करा.

 1. तुमच्या काँप्युटरवर, तुमच्या Search मधील तुमचा डेटा वर जा.
  • तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा.
 2. वैयक्तिक परिणाम वर क्लिक करा.
  • तुम्हाला वैयक्तिक परिणाम सेटिंग सापडत नसल्यास, तुमच्या URL मध्ये "http" च्या ऐवजी "https" असल्याची खात्री करा.
 3. वैयक्तिक परिणाम सुरू किंवा बंद करा.

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करत नाही तोपर्यंत, वैयक्तिक परिणाम बंद राहतील. तुम्हाला तरीही तुमच्या वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटीवर आधारित परिणाम मिळू शकतात.

तुमची खाते ॲक्टिव्हिटी आणि इतर Google उत्पादनांवर आधारित शोध परिणाम मिळवणे थांबवण्यासाठी, वेब आणि अ‍ॅप ॲक्टिव्हिटी कशी बंद करावी हे जाणून घ्या.