तुमच्या Google उत्पादनांमधून मिळालेले शोध परिणाम

तुम्ही Gmail किंवा Google Calendar सारख्या तुम्ही वापरत असलेल्या इतर Google उत्पादनांवरील माहिती शोधू शकता. आगामी उड्डाणे, रेस्टॉरंट आरक्षणे किंवा अपॉइंटमेंट्ससाठी शोधण्याचा प्रयत्न करा.

इतर उत्पादनांकडून शोध परिणाम मिळवा

 1. google.comवर जा.
  • टीप: URLमध्ये "https" ऐवजी "http" असे असल्यास तुम्हाला हे परिणाम दिसणार नाहीत.
 2. वर उजवीकडे, साइन इन करा वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमचा Google खात्यातील प्रोफाइल फोटो दिसत असल्यास, तुम्ही तुमच्या खात्यात आधीच साइन इन केले आहे.
 3. खालील नमुना शोधांपैकी एक वापरून पहा.

उदाहरण शोध

लक्षात ठेवा:काही उदाहरणे सर्वच क्षेत्रांमध्ये काम करत नाहीत.

 • इव्‍हेंट:माझे इव्हेंटशोधून Google Calendar इव्हेंट आणि अपॉइंटमेंट शोधा.
 • बिले:माझे बिले चा शोध घेऊन तुमची बिले शोधा. तुम्ही विशिष्ट प्रकारची बिले आणि ठरावीक वेळेपासूनची बिलेदेखील शोधू शकता. उदाहरणार्थ, माझी बीएसएनएलची बिले 2018.
 • पॅकेज:माझी पॅकेजमध्ये शोध घेऊन तुमचे पॅकेज कधी येईल ते शोधा.
 • आरक्षणे:माझी आरक्षणेमध्ये शोध घेऊन तुमचे रेस्टॉरंट किंवा हॉटेल आरक्षण शोधा.
 • फ्लाइट:माझ्या फ्लाइटमध्ये शोध घेऊन अद्ययावत माहिती पाहण्यासाठी तुमच्या आगामी फ्लाइट शोधा.
 • Google फोटोज: माझे फोटो किंवा 2019 मध्ये न्यूयॉर्कमधील माझे फोटोमध्ये शोध घेऊन Google फोटोंमधून तुमचे फोटो शोधा.

तुमच्या शोध परिणामांची गोपनीयता

तुमच्या Google उत्पादनांवरील परिणाम खाजगी आहेत. तुम्ही तुमची माहिती स्पष्टपणे शेअर केल्याशिवाय किंवा सार्वजनिकपणे शेअर केल्याशिवाय इतर कोणालाही ती त्यांच्या शोध परिणामांत दिसणार नाही.

उदाहरणार्थ, तुम्ही अशी एकमेव व्यक्ती आहात जी तुमच्या Google Calendar आणि Gmail मधून आलेले परिणाम पाहू शकते.

इतर उत्पादनांवरील परिणाम सुरु किंवा बंद करा

तुम्हाला इतर Google उत्पादनांमधील शोध परिणाम दिसावेत किंवा नाही हे तुमच्या नियंत्रणाखाली आहे.

टीप: या पायऱ्यांना फॉलो करण्यासाठी तुम्हाला "https://www.google.com" वर शोधणे आणि Google खात्यात साइन इन करणे आवश्यक आहे.

 1. तुमच्या काँप्युटरवर, शोध सेटिंग्ज मध्ये जा.
  • तुम्ही साइन इन केलेले नसल्यास, वर उजव्या बाजूला साइन इन करा वर क्लिक करा.
 2. "खाजगी परिणाम" अंतर्गत खाजगी परिणाम वापरू नका वर क्लिक करा. (तुम्हाला "खाजगी परिणाम" सेटिंग दिसत नसल्यास, तुमच्या URL मध्ये "http" ऐवजी "https" असल्याची खात्री करा)
 3. सेव्ह करा वर क्लिक करा.

जोपर्यंत तुम्ही तुमच्या Google खात्यात साइन इन केलेले आहे, तोपर्यंत खाजगी परिणाम बंद राहतील. तुम्ही अजूनही तुमच्या वेब आणि अ‍ॅप अॅक्टिव्हिटी आधारित परिणाम मिळवू शकता.

तुमची खाते अॅक्टिव्हिटी आणि इतर Google उत्पादनांवर आधारित शोध परिणाम बघणे थांबविण्यासाठी, वेब आणि अ‍ॅप अॅक्टिव्हिटी कशी बंद करायची ते जाणून घ्या.