सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये तुमचा व्हिज्युअल शोध इतिहास व्यवस्थापित करणे

तुम्ही Google अ‍ॅप मधील Google Lens सारख्या पात्र Google सेवांवर इमेज शोधता, तेव्हा तुम्ही साइन इन केलेले असताना Google हे तुमचा व्हिज्युअल शोध इतिहास तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये सेव्ह करते की नाही हे तुम्ही निवडू शकता. तुम्ही व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग सुरू केल्यास, तुम्ही तुमचा मागील व्हिज्युअल शोध इतिहास पाहू आणि हटवू शकता. तुमच्या इमेज कुठून सेव्ह केल्या जाऊ शकतात याविषयी जाणून घ्या.

Google सेवांवरील तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी तुमचा व्हिज्युअल शोध इतिहास वापरला जाऊ शकतो, जसे की तुम्हाला तुमचे मागील शोध पुन्हा पाहण्याची अनुमती देणे. Google चे व्हिज्युअल रेकग्निशन आणि शोध तंत्रज्ञाने, तसेच ती वापरणाऱ्या Google सेवा विकसित करण्यासाठी व त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी व्हिज्युअल शोध इतिहास वापरला जाऊ शकतो.

टीप: व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग बाय डीफॉल्ट बंद असते.

व्हिज्युअल शोध इतिहास सुरू किंवा बंद करणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, डेटा आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. "इतिहास सेटिंग्ज" या अंतर्गत, वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी वर टॅप करा.
  5. "व्हिज्युअल शोध इतिहास समाविष्ट करा" च्या बाजूला, चौकटीत खूण करा किंवा काढा.

व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग बंद असल्यास, तुम्ही शोधण्यासाठी वापरलेल्या इमेज तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये सेव्ह केल्या जाणार नाहीत. व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग आधी सुरू असल्यास आणि तुम्ही ते बंद केल्यास, तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी चा भाग म्हणून सेव्ह केलेल्या इमेज या तुम्ही तुमच्या खात्यामधून हटवल्या नसल्यास, व्हिज्युअल रेकग्निशन व शोध तंत्रज्ञाने यांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरल्या जाणे पुढे सुरू राहू शकते. तुम्ही माझी Google अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये तुमचा व्हिज्युअल शोध इतिहास पाहू आणि हटवू शकता.

तुमच्या इमेज पाहणे आणि हटवणे

तुमच्या इमेज पाहणे
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, डेटा आणि गोपनीयता वर टॅप करा.
  4. "इतिहास सेटिंग्ज" या अंतर्गत, वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि त्यानंतर संपूर्ण वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी व्यवस्थापित करा वर टॅप करा.
    • या पेजवर, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
      • तुमच्या मागील अ‍ॅक्टिव्हिटीची सूची पाहणे: तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केलेल्या इमेज दाखवल्या जातात.
      • इमेज डाउनलोड करणे: इमेज डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला डाउनलोड करायच्या असलेल्या इमेजवर टॅप करा.

तुमच्या Google खाते मध्ये, तुम्ही Google Takeout वापरून तुमच्या सेव्ह केलेल्या इमेज डाउनलोड करू शकता. तुमचा Google डेटा कसा डाउनलोड करावा हे जाणून घ्या.

टीप: आणखी सुरक्षा जोडण्याकरिता, तुम्ही तुमचा पूर्ण इतिहास पाहण्यासाठी अतिरिक्त पडताळणी पायरी आवश्यक करणे हे करू शकता.

तुमची अ‍ॅक्टिव्हिटी कशी हटवावी हे जाणून घ्या.

व्हिज्युअल शोध तंत्रज्ञाने वापरणाऱ्या सेवा विकसित करण्यासाठी आणि त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी तुमच्या इमेज यापुढे आवश्यक नसल्यास, Google हे तुम्ही निवडलेल्या कालावधीपूर्वीच तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मधून त्या हटवू शकते. तुम्ही Google Takeout वापरून तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेल्या इमेज डाउनलोड करू शकता. तुमचा Google डेटा कसा डाउनलोड करावा हे जाणून घ्या.

व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंगविषयी

तुम्ही शोधण्यासाठी इमेज वापरता, तेव्हा इमेजवर प्रक्रिया करण्यासाठी Google हे त्याची व्हिज्युअल शोध तंत्रज्ञाने वापरते, जसे की तुम्ही Google Lens वापरून शोधल्यास. उदाहरणार्थ, तुम्ही फुलाची इमेज शोधण्यासाठी Google Lens वापरल्यास, Google ची व्हिज्युअल शोध तंत्रज्ञाने इमेजवर प्रक्रिया करतात आणि सुसंबद्ध परिणाम देतात.

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी तुम्ही Google साइट, अ‍ॅप्स आणि सेवांवर करत असलेल्या गोष्टी तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करते.

हे पर्यायी व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग वापरून, तुम्ही पात्र Google सेवांसह संवाद साधतानादेखील तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये इमेज सेव्ह करू शकता. व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग बाय डीफॉल्ट बंद असते.

तुमच्या इमेज कुठून सेव्ह केल्या जाऊ शकतात

व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग सुरू असते, तेव्हा तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले असताना तुम्ही शोधण्यासाठी वापरलेल्या इमेज पुढील पात्र Google सेवांवरील तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये सेव्ह केल्या जाऊ शकतात:

  • Android, iPhone आणि iPad वरील Google अ‍ॅप मधील Google Lens
  • Android वरील क्विक सर्च बॉक्स आणि सर्व ॲप्स ट्रे
  • Lens अ‍ॅप

तुम्ही शोधण्यासाठी वापरलेल्या इमेज या अ‍ॅप आणि डिव्हाइसच्या ठरावीक आवृत्त्यांकरिता वरील Google सेवांवरून सेव्ह केलेल्या नसू शकतात.

टीप: Gemini अ‍ॅप्स अ‍ॅक्टिव्हिटी सारख्या इतर सेटिंगद्वारे सेव्ह केलेल्या इमेजवर व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंगचा परिणाम होत नाही.

इमेज कशा वापरल्या जातात

Google सेवांवरील तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी तुमचा व्हिज्युअल शोध इतिहास वापरला जाऊ शकतो, जसे की तुम्हाला तुमचे मागील शोध पुन्हा पाहण्याची अनुमती देणे. हे सेटिंग सुरू असताना सेव्ह केलेल्या इमेज या Google त्याचा व्हिज्युअल शोध आणि रेकग्निशन तंत्रज्ञाने व ती वापरणाऱ्या Google सेवा, जसे की Google Lens विकसित करण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वापरते.

व्हिज्युअल शोध तंत्रज्ञाने

Google ची काही व्हिज्युअल शोध तंत्रज्ञाने ही तुम्ही शोधण्यासाठी वापरलेल्या इमेजमधील ऑब्जेक्ट ओळखू शकतात आणि इमेजसंबंधित तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतात. तुमचे व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग सुरू असल्यास, Google ची व्हिज्युअल शोध तंत्रज्ञाने विकसित करणाऱ्या आणि त्यांमध्ये सुधारणा करणाऱ्या मॉडेलना प्रशिक्षण देण्यासाठी, तुम्ही पात्र Google सेवांवर शोधण्यासाठी वापरत असलेल्या इमेज Google वापरू शकते.

टीप: व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग हे सर्व लोकॅलमधील सर्व प्रकारच्या खात्यांसाठी उपलब्ध नसू शकते.

व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग्ज सुरू असल्यास
व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग सुरू असल्यास, तुम्ही Google अ‍ॅप वरील Google Lens किंवा Android वरील क्विक सर्च बॉक्स यांसारख्या पात्र Google सेवा वापरून शोधता, तेव्हा Google हे तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये इमेज सेव्ह करते. तुमच्या इमेज कुठून सेव्ह केल्या जाऊ शकतात याविषयी जाणून घ्या.

तुम्ही इंटरनेट कनेक्शन नसलेले डिव्हाइस वापरत असल्यास, तुम्ही ऑनलाइन आल्यावर व्हिज्युअल शोध इतिहास तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केला जाऊ शकतो

व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग्ज बंद असल्यास
व्हिज्युअल शोध इतिहास बंद असतो, तेव्हा Google हे तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी चा भाग म्हणून इमेज सेव्ह करणार नाही. व्हिज्युअल शोध इतिहास बंद असला, तरीही Google Lens सारखी व्हिज्युअल शोध तंत्रज्ञाने वापरणाऱ्या Google सेवांमध्ये तुम्ही इमेज वापरून शोधू शकता. तुम्ही व्हिज्युअल शोध इतिहास सेटिंग बंद केल्यास:
  • Google Lens इमेज सेटिंग्ज बंद होत नाहीत.
  • वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद होत नाही, जी तुमची शोध अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या Google सेवांवर अजूनही सेव्ह करू शकते.
  • व्हिज्युअल शोध तंत्रज्ञानांमध्ये सुधारणा करण्यासाठी आधी सेव्ह केलेल्या इमेज अजूनही वापरल्या जाऊ शकतात.
तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये सेव्ह केलेल्या इमेज तुम्ही activity.google.com इथे हटवू शकता.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11232385843681400777
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false