सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Lens मध्ये प्रदेश निवडणे

तुम्ही प्रदेश निवड वापरून इमेजच्या कोणत्याही भागावर Lens वापरू शकता.

महत्त्वाचे: हे अपडेट फक्त Android आणि iOS वर उपलब्ध आहे.

Google Lens मध्ये, तुम्ही आता पुढील गोष्टी करू शकता:

  • मजकूर निवडणे.
  • इमेजमधील एखादा भाग निवडणे.
  • मजकूर निवडा हे बटण मॅन्युअली क्लिक करणे आणि Translate Translate पर्यायामध्ये निवडलेल्या मजकुराचे भाषांतर करणे.
  • गृहपाठ  पर्याय वापरून प्रश्न सोडवणे.

मजकूर निवडा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  2. शोध बारमध्ये, Google Lens वर टॅप करा.
  3. "तुमचा कॅमेरा वापरून शोधा" या अंतर्गत, शोधा वर टॅप करा.
  4. तुमच्या शोधासाठी फोटो घ्या किंवा अपलोड करा:
    • फोटो घेण्यासाठी: तुमचा कॅमेरा एखाद्या गोष्टीवर पॉइंट करा आणि शटर वर टॅप करा.
    • फोटो अपलोड करण्यासाठी: "स्क्रीनशॉट" या अंतर्गत, फोटो निवडा.
  5. "मजकूर निवडा" हे बटण पाहण्यासाठी, मजकुरावर टॅप करा आणि तुमच्या प्रदेश बॉक्सचे कोपरे मजकुरावर ड्रॅग करा.
  6. मजकूर निवडा वर टॅप करा, तुम्हाला मजकुराभोवती मेनू दिसेल, जिथे तुम्ही पुढील अतिरिक्त कृती करू शकता:
    • कॉपी करणे
    • ऐकणे
    • भाषांतर करणे
    • शोधणे
    • मजकूर कॉपी करून पेस्ट करणे
    • ईमेल अ‍ॅड्रेस निवडलेला असल्यास, ईमेल पाठवणे
    • फोन नंबर किंवा ईमेल निवडलेला असल्यास संपर्कांमध्ये जोडणे
    • फोन नंबर निवडलेला असल्यास कॉल करणे
    • फोन नंबर निवडलेला असल्यास एसएमएस पाठवणे
    • पत्ता निवडलेला असल्यास Maps उघडणे
    • लिंक निवडलेली असल्यास वेबसाइट उघडणे
    • पॅकेज नंबर निवडलेला असल्यास शिपमेंट ट्रॅक करणे

टीप: ऐकणे निवडलेले असते, तेव्हा निवडलेला मजकूर मोठ्याने वाचणे पूर्ण होईपर्यंत किंवा वापरकर्त्याने थांबा निवडेपर्यंत थांबा दाखवले जाते, यावेळी मूळ मेनू पुन्हा दाखवला जातो.

इमेजमधील भाग निवडा

  1. तुम्हाला तुमच्या शोधासाठी वापरायचा असलेला भाग निवडा:
    • इमेजचा भाग शोधण्यासाठी, इमेजवर टॅप करा, त्यानंतर प्रदेश शोधाचे कोपरे तुमच्या निवडीभोवती ड्रॅग करा.
    • तुम्ही बॉक्सच्या मध्यभागी टॅप करून धरून ठेवूनदेखील बॉक्स आजूबाजूला ड्रॅग करू शकता.

मजकुराचे भाषांतर करा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  2. शोध बारमध्‍ये, Google Lens  वर टॅप करा.
  3. "तुमचा कॅमेरा वापरून शोधा" या अंतर्गत, Translate Translate वर टॅप करा.
    • फोटो घेण्यासाठी: तुमचा कॅमेरा वापरून ऑब्जेक्टवर पॉइंट करा आणि तुम्हाला भाषांतर करायच्या असलेल्या शब्दांचा फोटो घ्या.
    • फोटो अपलोड करण्यासाठी: "स्क्रीनशॉट" किंवा "सर्व इमेज" या अंतर्गत, फोटो निवडा आणि तुम्हाला भाषांतर करायचे असलेले शब्द निवडा.
  4. भाषा ड्रॉपडाउनमध्ये भाषा इनपुट आणि आउटपुट निवडा. तुमची प्राधान्य दिलेली भाषा निवडण्यासाठी तुम्ही भाषा निवडकदेखील वापरू शकता.
    • डाव्या बाजूच्या भागावर, भाषा निवडक हे निवडलेल्या शब्दाची भाषा डिटेक्ट करेल.
    • उजव्या बाजूला, तुम्हाला शब्दांचे भाषांतर ज्या भाषेत करायचे आहे ती भाषा निवडा.

Translate मधील मजकूर निवडण्यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:

  • इमेज शोध
  • गृहपाठ
  • संपूर्ण मजकुराचे भाषांतर करणे
  • मजकुराचे अंशतः भाषांतर करणे

गृहपाठ संबंधित मदत मिळवणे

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google अ‍ॅप Google अ‍ॅप उघडा.
  2. शोध बारमध्ये, Google Lens वर टॅप करा.
  3. "तुमचा कॅमेरा वापरून शोधा" या अंतर्गत, गृहपाठ वर टॅप करा.
    • फोटो घेण्यासाठी: तुमचा कॅमेरा वापरून ऑब्जेक्टवर पॉइंट करा आणि गृहपाठाच्या प्रश्नाचा फोटो घ्या.
    • फोटो अपलोड करण्यासाठी: "स्क्रीनशॉट" किंवा "सर्व इमेज" या अंतर्गत, फोटो निवडा आणि गृहपाठाचा प्रश्न निवडा.

गृहपाठासंबंधित मदत मिळवण्यासाठी तुम्ही गृहपाठ हे वैशिष्ट्य वापरू शकता. यांमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:

  • गणित आणि विज्ञानाचे प्रश्न.
  • शाब्दिक उदाहरणे.
  • भूमितीचे प्रश्न.
  • आकृतीसंबंधित प्रश्न

इतर टिपा आणि युक्त्या

 

संबंधित स्रोत

 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7973813698785013488
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false