सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

शोधण्यासाठी वर्तुळ करा हे वापरून तुमची स्क्रीन शोधणे

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य Android फोनच्या निवडक मॉडेलवर उपलब्ध आहे.

मजकूर किंवा इमेज निवडण्यासाठी आणि ते Google वर शोधण्याकरिता, तुमच्या स्क्रीनवर कुठेही वर्तुळ, हायलाइट, स्क्रिबल किंवा टॅप करा.

शोधण्यासाठी वर्तुळ करा हे कसे वापरावे

तुमच्या स्क्रीनवरील मजकूर, इमेज किंवा व्हिडिओ यांबाबत शोधण्यासाठी:

  1. शोधण्यासाठी वर्तुळ करा हे सुरू करा:
    • तीन बटण नेव्हिगेशन मोडवर, होम बटण प्रेस करून ठेवा.

    • जेश्चर नेव्हिगेशन मोडवर, नेव्हिगेशन हँडल प्रेस करून ठेवा.

    तुमच्या Android फोनवर सुरुवात कशी करावी हे जाणून घ्या.

  2. तुम्हाला शोधायचा असलेला मजकूर, इमेज किंवा व्हिडिओ निवडण्यासाठी स्क्रीनवर कुठेही वर्तुळ करा, हायलाइट करा अथवा टॅप करा.
  3. हवे असल्यास, शोध बारमध्ये मजकूर जोडून तुम्ही तुमचा शोध सुधारित करू शकता.
  4. तुमचे शोध परिणाम स्क्रीनच्या तळाशी दिसतात.
    • आणखी परिणाम पाहण्यासाठी, परिणामांवर वरती स्वाइप करा.

टिपा:

  • तुमची निवड अ‍ॅडजस्ट करण्यासाठी, निवडीच्या बॉर्डरला किंवा संपूर्ण निवडीला ड्रॅग करा.
  • शोध बार द्वारे ब्लॉक केलेल्या आशयाशी संवाद साधण्यासाठी, विंडो हलवण्याकरिता दोन बोटांनी पॅन करा किंवा शोध बार हा स्क्रीनच्या सर्वात वरती अथवा तळाशी ड्रॅग करा.
  • तुमच्या संपूर्ण स्क्रीनचे तात्काळ भाषांतर करण्यासाठी, शोध बारच्या शेजारी, भाषांतर करा बटणावर टॅप करा. हे वैशिष्ट्य निवडक डिव्हाइससाठी उपलब्ध आहे.
  • तुमच्या आसपास किंवा तुमच्या डिव्हाइसवरील स्पीकरमधून प्ले होणारे संगीत शोधण्यासाठी स्वरचिन्ह वर टॅप करा.

शोधण्यासाठी वर्तुळ करा हे वापरून AI अवलोकने मिळवणे

तुमच्या मजकूर किंवा मल्टीसर्च क्वेरीच्या आधारावर तुम्ही शोधण्यासाठी वर्तुळ करा हे वापरून AI अवलोकने मिळवू शकता. मल्टीसर्चविषयी अधिक जाणून घ्या.

शोधण्यासाठी वर्तुळ करा हे बंद करणे

तीन बटण नेव्हिगेशन मोडवर

  1. तुमच्या Android फोनवर, सेटिंग्ज Settings वर जा.
  2. शोधण्यासाठी वर्तुळ करा शोधा.
  3. शोधण्यासाठी वर्तुळ करा वर टॅप करा.
  4. शोधण्यासाठी वर्तुळ करा बंद करा.

जेश्चर नेव्हिगेशन मोडवर

  1. तुमच्या Android फोनवर, सेटिंग्ज Settings वर जा.
  2. शोधण्यासाठी वर्तुळ करा शोधा.
  3. शोधण्यासाठी वर्तुळ करा वर टॅप करा.
  4. शोधण्यासाठी वर्तुळ करा हे बंद करा.

"शोधण्यासाठी वर्तुळ करा हे उपलब्ध नाही" ही एरर ट्रबलशूट करणे

सपोर्ट असलेल्या Android डिव्हाइसवर शोधण्यासाठी वर्तुळ करा हे वापरण्यासाठी, पुढील गोष्टींची खात्री करा:

तुमची परवानग्यांशी संबंधित सेटिंग्ज योग्य आहेत

  1. तुमच्या Android फोनवर, सेटिंग्ज Settings वर जा.
  2. डिजिटल असिस्टंट अ‍ॅप शोधा.
  3. डिजिटल असिस्टंट अ‍ॅप वर टॅप करा.
    • पुढील गोष्टींची खात्री करा:
      • डीफॉल्ट डिजिटल असिस्टंट "Google" वर सेट केलेला आहे.
      • “स्क्रीनशॉट वापरा” सुरू केले आहे.

तुमचे Google अ‍ॅप अप टू डेट आहे

  1. तुमच्या Android फोनवर, Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल आयकन वर टॅप करा.
  3. अ‍ॅप्स आणि डिव्हाइस व्यवस्थापित करा आणि त्यानंतर व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. Google अ‍ॅप Google Search वर टॅप करा.
    • तुम्हाला "अपडेट उपलब्ध आहे" असे लेबल दिसल्यास, अपडेट करा वर टॅप करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7071606098521946492
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false