सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

DMA आणि तुमच्या लिंक केलेल्या सेवा यांबद्दल

डिजिटल मार्केट कायदा (DMA) हा ईयूमधील कायदा आहे, जो ६ मार्च २०२४ रोजी लागू होईल. DMA चा परिणाम म्हणून, ईयूमध्ये, Google तुम्हाला काही Google सेवा लिंक करण्याचा पर्याय देऊ करते. त्या Google सेवांमध्ये पुढील सेवांचा समावेश आहे:

  • Search
  • YouTube
  • जाहिरात सेवा
  • Google Play
  • Chrome
  • Google Shopping
  • Google Maps

तुम्ही या सर्व सेवांना लिंक करणे निवडू शकता, यांपैकी कोणतीही सेवा लिंक न करणे निवडू शकता किंवा तुम्हाला यांपैकी कोणत्या वैयक्तिक सेवा लिंक करायच्या आहेत ते निवडू शकता.

लिंक केलेल्या असताना, या सेवा ठरावीक उद्देशांसाठी तुमचा डेटा एकमेकांसोबत आणि इतर सर्व Google सेवांसोबत शेअर करू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या सेटिंग्जनुसार तुमचा आशय आणि जाहिराती पर्सनलाइझ करण्यात मदत व्हावी, यासाठी लिंक केलेल्या Google सेवा एकत्र काम करू शकतात.

लिंक केल्या जाऊ शकत नाहीत अशा Google सेवा

ईयूमधील बहुतांश वापरकर्त्यांसाठी अशा कोणत्याही सेवा नाहीत, ज्या लिंक केल्या जाऊ शकत नाहीत. जर्मनीमधील वापरकर्त्यांसाठी काही सेवा लिंक केल्या जाऊ शकत नाहीत.

टीप: एकमेकांसोबत डेटा शेअर करणाऱ्या आणि वर सूचीबद्ध न केलेल्या इतर सर्व Google सेवा नेहमी लिंक केलेल्या असतात.

लिंक केलेल्या सेवांबद्दल

सेवा लिंक केलेल्या नसल्यास, सर्व Google सेवांवर डेटा शेअर करणे याचा समावेश असलेली काही वैशिष्ट्ये मर्यादित असतील. उदाहरणार्थ:

  • Search, YouTube आणि Chrome या लिंक केलेल्या सेवा नसताना, Search मधील “काय पाहावे” यासारख्या तुमच्या शिफारशी आणि तुमचे Discover फीड कमी पर्सनलाइझ केले जाईल.
  • Search आणि Maps या लिंक केलेल्या सेवा नसताना, Search वर केलेली आरक्षणे Google Maps मध्ये दिसणार नाहीत.

डेटा शेअर करण्याचा समावेश नसलेल्या सेवेच्या पैलूंवर परिणाम होणार नाही.

तुम्ही सेवा लिंक न करणे निवडल्यास, तुम्हाला कोणत्याही Google सेवांमधून साइन आउट केले जाणार नाही. Google सेवा लिंक करणे याचा अर्थ तुमचा डेटा तृतीय पक्ष सेवांसोबत शेअर करणे असा होत नाही.

तुमच्या लिंक केलेल्या सेवा व्यवस्थापित करणे

तुम्ही नियंत्रक आहात. वर सूचीबद्ध केलेल्या Google सेवांपैकी कोणत्या सेवा लिंक केलेल्या असाव्यात हे तुम्ही निवडू शकता. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये तुमच्या निवडींचे कधीही पुनरावलोकन करू शकता किंवा त्या कधीही बदलू शकता. तुमच्या लिंक केलेल्या सेवा कशा व्यवस्थापित कराव्यात हे जाणून घ्या.

तुमच्या डेटाबद्दल

लिंक केलेल्या सर्व Google सेवांवर तुमचा डेटा कसा वापरला जातो याविषयी अधिक जाणून घ्या.

कोणता डेटा वापरला जातो
लिंक केलेल्या Google सेवांसोबत तुमच्या संवादांविषयीचा गोळा केलेला वैयक्तिक डेटा कोणत्याही लिंक केलेल्या सेवांवर शेअर केला जाऊ शकतो. यामध्ये शोध, तुम्ही YouTube वर पाहता ते व्हिडिओ, Google Play वरून इंस्टॉल करता ती ॲप्स, तुमच्या डिव्हाइसच्या माहितीसारखी संबंधित माहिती आणि आमचे गोपनीयता धोरण यामध्ये वर्णन केलेल्या इतर सर्व प्रकारच्या माहितीचा समावेश आहे
Google हा डेटा कसा वापरते

लिंक केलेल्या सेवांवर शेअर केलेला हा डेटा Google हे आमचे गोपनीयता धोरण यामध्ये नमूद केलेल्या उद्देशांनी वापरते:

  • तुमच्या सेटिंग्जनुसार, आशय आणि जाहिरातींसह, पर्सनलाइझ केलेल्या सेवा पुरवणे
  • आमच्या सेवांची देखभाल करणे आणि त्यांमध्ये सुधारणा करणे
  • नवीन सेवा विकसित करणे
  • आमच्या सेवांच्या परफॉर्मन्सची खात्री करण्यासाठी आणि त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी, लोक आमच्या सेवा कशा वापरतात हे समजून घेणे

लिंक केलेल्या सेवांबद्दल तुम्ही करत असलेल्या निवडींमुळे तुमची इतर सेटिंग्ज बदलत नाहीत, जसे की Google सेवा पर्सनलाइझ करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या निवडी. त्या फक्त तुमचा डेटा कसा शेअर केला जावा हे नियंत्रित करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या पर्यायांचा विस्तार करतात.

Google काही बाबतींत डेटा शेअर करणे सुरू ठेवेल

तुमच्या सर्व Google सेवा लिंक केलेल्या आहेत का हे लक्षात न घेता, फसवणूक रोखणे, स्पॅम आणि गैरवापर यांपासून संरक्षण करणे व कायद्याचे पालन करणे यांसारख्या ठरावीक उद्देशांसाठी त्यांमधील डेटा तरीही सर्व सेवांवर शेअर केला जाऊ शकतो.

दोन सेवा एकत्र ऑफर केल्या जातात, तेव्हा टास्क पूर्ण करण्यात प्रभावीपणे मदत करता यावी, यासाठी तुमचा डेटा सर्व Google सेवांवरदेखील शेअर केला जाऊ शकतो. 

Related resources 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
920601765723806903
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false