सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

जनरेटिव्ह AI विषयी जाणून घ्या

जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हा AI चा असा प्रकार आहे जो तुम्हाला आशय तयार करण्यात मदत करतो. हे तुम्हाला अधिक क्रीएटिव्ह, उत्पादक आणि ज्ञानी होण्यास मदत करू शकते.

या लेखामध्ये, तुम्ही जनरेटिव्ह AI, तसेच पुढील गोष्टींविषयी जाणून घेऊ शकता:

  • जनरेटिव्ह AI म्हणजे काय आणि ते कसे काम करते
  • जनरेटिव्ह AI कसे वापरावे आणि त्याच्या प्रतिसादांच्या अचूकतेचे मूल्यांकन कसे करावे
  • Google हे AI कसे विकसित करते

जनरेटिव्ह AI म्हणजे काय

जनरेटिव्ह AI हा मशीन लर्निंग मॉडेलचा प्रकार आहे. जनरेटिव्ह AI हे माणूस नाही. ते स्वतःसाठी विचार करू शकत नाही किंवा भावना अनुभवू शकत नाही. ते फक्त पॅटर्न शोधण्यात उत्तम आहे.

पूर्वी, AI चा वापर माहिती समजून घेण्यासाठी आणि शिफारस करण्यासाठी केला जात असे. आता, जनरेटिव्ह AI आपल्याला इमेज, संगीत आणि कोड यासारखा नवीन आशय तयार करण्यात मदत करू शकते.

मशीन लर्निंग मॉडेलना प्रशिक्षण कसे दिले जाते

मशीन लर्निंग मॉडेल, तसेच जनरेटिव्ह AI यांना निरीक्षण आणि पॅटर्न जुळवण्याच्या प्रक्रियेद्वारे शिकवले जाते, ज्याला प्रशिक्षण म्हणून ओळखले जाते. स्नीकर म्हणजे काय हे समजण्यासाठी मॉडेलला स्नीकरचे लाखो फोटो पुरवून प्रशिक्षण दिले जाते. कालांतराने जनरेटिव्ह AI ला समजते, की स्नीकर या अशा वस्तू आहेत ज्या लोक त्यांच्या पायात घालतात आणि ज्यावर लेस, सोल व लोगो असतो.

मॉडेल हे पुढील गोष्टी करण्यासाठी प्रशिक्षण वापरू शकते:

  1. “शेळीचे चार्म असलेल्या स्नीकरची इमेज जनरेट करणे” यासारखे इनपुट घेणे. 
  2. त्याने स्नीकर, शेळ्या आणि चार्म यांविषयी जे जाणून घेतले आहे ते कनेक्ट करणे.
  3. इमेज जनरेट करणे, त्याने त्यासारखी इमेज याआधी पाहिली नसेल तरीही.
लार्ज लँग्वेज मॉडेल ही जनरेटिव्ह AI ला कशी सक्षम करतात

जनरेटिव्ह AI आणि लार्ज लँग्वेज मॉडेल (LLMs) एकाच तंत्रज्ञानाचा भाग आहेत. जनरेटिव्ह AI ला कोणत्याही प्रकारच्या डेटावर प्रशिक्षण दिले जाऊ शकते, पण LLMs ही त्यांच्या प्रशिक्षण डेटाचा मुख्य स्रोत म्हणून शब्द वापरतात.

Gemini आणि Search जनरेटिव्ह अनुभव यांसारखे LLMs द्वारे सक्षम केलेले अनुभव, तुमचे प्रॉम्प्ट व आतापर्यंत जनरेट केलेला मजकूर यांवर आधारित पुढे येऊ शकणार्‍या शब्दांचा अंदाज लावू शकतात. त्यांना प्रशिक्षणातून मिळालेल्या पॅटर्नशी जुळणारे संभाव्य पुढील शब्द निवडण्याची मुभा दिली जाते. या मुभेमुळे ते क्रीएटिव्ह प्रतिसाद जनरेट करू शकते.

तुम्ही त्यांना "Harry [blank]" हा वाक्यांश भरण्यास सांगितल्यास, ते पुढील शब्द "Styles" किंवा "Potter" असल्याचा अंदाज लावतील.

 

जनरेटिव्ह AI कसे वापरावे

महत्त्वाचे: जनरेटिव्ह AI द्वारे सक्षम करण्यात आलेले Google चे अनुभव तुम्हाला क्रीएटिव्ह प्रक्रिया सुरू करण्यात मदत करू शकतात. ते तुमच्यासाठी सर्व काम करण्याकरिता किंवा निर्माणकर्ता म्हणून काम करण्याकरिता तयार केलेले नाहीत.

तुम्ही जनरेटिव्ह AI वापरू शकता असे ३ मार्ग पुढीलप्रमाणे आहेत:

  • तुमच्या क्रीएटिव्ह कल्पनांवर विचारविनिमय करणे. उदाहरणार्थ, तुमच्या आवडत्या चित्रपटाचा प्रीक्वेल लिहिण्यात मदत मिळवा.
  • असे प्रश्न विचारा ज्यांची उत्तरे मिळू शकतील असे तुम्हाला वाटले नव्हते. जसे की “अगोदर काय आले: कोंबडी की अंडे?”
  • अतिरिक्त मदत मिळवणे. तुम्ही लिहिलेल्या कथेसाठी शीर्षक सुचवण्यास सांगा किंवा इमेजमधील प्राणी अथवा कीटकांच्या प्रजाती ओळखण्यात मदत मिळवा.

जनरेटिव्ह AI वापरून तुम्ही एक्सप्लोर करता, तयार करता आणि नवीन गोष्टी शिकता, तेव्हा ते जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे. तपशिलांसाठी, आमच्या जनरेटिव्ह AI च्या प्रतिबंधित वापरासंबंधित धोरण याचे पुनरावलोकन करा.

AI हे चुका करू शकते आणि करेल

जनरेटिव्ह AI प्रायोगिक टप्प्यामध्ये आहे आणि काम प्रगतीपथावर आहे, त्यामुळे ते चुका करू शकते व करेल:

  • ते विश्वासार्ह नसलेली माहिती देऊ शकते. जनरेटिव्ह AI हे एखादे उत्तर बनवून देते, तेव्हा त्याला हल्युसिनेशन म्हणतात. हल्युसिनेशन होतात, कारण Google Search वेबवरून जसे माहिती मिळवते त्याच्या विपरीत, LLMs कोणतीही माहिती गोळा करत नाहीत. त्याऐवजी, LLMs ही वापरकर्त्याच्या इनपुटवर आधारित कोणते शब्द पुढे येतील याचा अंदाज लावतात. 
    • उदाहरणार्थ, "२०३२ ब्रिस्बेन उन्हाळी ऑलिंपिक्समधील महिलांच्या जिम्नॅस्टिक्समध्ये कोण जिंकणार आहे?" असे तुम्ही विचारू शकता आणि इव्हेंट अद्याप झाला नसला, तरीही प्रतिसाद मिळेल.
  • ते गोष्टी समजून घेण्यात चुकू शकते. काही वेळा, जनरेटिव्ह AI उत्पादने भाषेचा चुकीचा अर्थ लावतात, ज्यामुळे अर्थ बदलतो.
    • उदाहरणार्थ, तुम्हाला सेल, शरीरातील पेशी याविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल. तुम्ही सेलविषयी माहिती विचारल्यास, ते तुम्हाला विक्रीचा सेल किंवा बॅटरीचा सेल याविषयी सांगू शकते.
प्रतिसादांचे नेहमी मूल्यांकन करणे

जनरेटिव्ह AI टूलकडून तुम्हाला मिळणाऱ्या प्रतिसादांचा गंभीरपणे विचार करा. तथ्य म्हणून सादर केलेली माहिती तपासण्यासाठी Google आणि इतर स्रोत वापरा.

तुम्हाला काही चुकीचे आढळल्यास, त्याची तक्रार करा. आमच्या बऱ्याच जनरेटिव्ह AI उत्पादनांमध्ये तक्रार करण्याची टूल आहेत. प्रत्येकासाठी जनरेटिव्ह AI अनुभव आणखी चांगला करण्यासाठी तुमचा फीडबॅक आम्हाला मॉडेलमध्ये सुधारणा करण्यात मदत करतो.

कोड सावधगिरीने वापरणे

आमची जनरेटिव्ह कोडसंबंधित वैशिष्ट्ये अजूनही प्रायोगिक आहेत आणि सुचवलेल्या कोडच्या तुमच्या वापरासाठी किंवा कोडिंग स्पष्टीकरणांसाठी तुम्ही जबाबदार आहात. कृपया विवेकबुद्धी वापरा आणि त्यावर अवलंबून राहण्यापूर्वी कोडच्या सर्व एरर, बग व धोके यांची काळजीपूर्वक चाचणी आणि पुनरावलोकन करा. आम्ही मुक्त स्रोत कोड रिपॉझिटरीसंबंधित संदर्भ कुठे देतो यांसारख्या परवान्यासंबंधित सर्व आवश्यकतांचे पालन करणे तुमची जबाबदारी आहे. अधिक जाणून घ्या.

Google हे AI कसे विकसित करते

आम्ही प्रत्येकासाठी जग अधिक चांगले बनवणारी टूल तयार करत आहोत याची खात्री करण्यासाठी, आम्ही २०१८ मध्ये AI तत्त्वांचा संच विकसित केला. ही तत्त्वे प्रभावी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या आमच्या उद्दिष्टांचे वर्णन करतात, जे समाजातील काही मोठ्या आव्हानांना जबाबदार मार्गाने सामोरे जाऊ शकते.

उदाहरणार्थ, आम्ही पुढील गोष्टी करण्यासाठी AI वापरतो:

  • वातावरणातील बदलांना आळा घालण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे, जसे की वाहनांचे उत्सर्जन कमी करण्यासाठी थांबा आणि जा यासारखी रहदारी कमी करणे
  • नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावणे किंवा निरीक्षण करणे, जसे की २० पेक्षा जास्त देशांमध्ये पुरांचा अंदाज लावणे आणि वणव्याच्या वास्तविक कालावधीमधील सीमांचा मागोवा घेणे
  • आरोग्य सेवेसंबंधित नवकल्पनांना पाठिंबा देणे, जसे की क्षयरोग तपासणी अधिक सुलभ बनवणे आणि स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्यात मदत करणे

आम्ही AI वापरून पाठपुरावा करणार नाही अशी क्षेत्रेदेखील आमच्या AI तत्त्वांमध्ये सूचीबद्ध केलेली आहेत, जसे की संपूर्ण हानी करणारी किंवा आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन करणारी तंत्रज्ञाने.

आमच्या AI तत्त्वांची संपूर्ण सूची पाहणे.

Google ला Search मध्ये जनरेटिव्ह AI डेव्हलप करण्यासाठी डेटाची कशी मदत होते

Search आणि त्यांना सक्षम करणाऱ्या मशीन लर्निंग तंत्रज्ञानांवर जनरेटिव्ह AI अनुभव डेव्हलप करण्यासाठी व त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी, Google हे Search आणि त्या अनुभवांसोबतच्या लोकांच्या संवादाचा वापर करते. यामध्ये ते काय शोधतात आणि त्यांनी दिलेला फीडबॅक, जसे की थंब्स अप किंवा थंब्स डाउन यांसारख्या संवादांचा समावेश असू शकतो. आम्ही आमच्या परिणामांच्या आणि उत्पादनांच्या गुणवत्तेचे जबाबदारीने मूल्यांकन करण्यासाठी व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वापरत असलेल्या अनेक मार्गांपैकी मानवी परीक्षण हा एक मार्ग आहे.

प्रशिक्षित परीक्षणकर्ते हे Search च्या मशीन लर्निंग मॉडेलची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करतात, तेव्हा आम्ही वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी अनेक खबरदाऱ्या घेतो:

  • परीक्षणकर्ते पाहत असलेला आणि त्यावर भाष्य करत असलेला डेटा वापरकर्त्यांच्या खात्यांमधून डिस्कनेक्ट केला आहे.
  • ऑटोमेटेड टूल ही ओळखण्यायोग्य माहिती आणि संवेदनशील वैयक्तिक माहिती यांची विस्तृत श्रेणी ओळखण्यात व काढून टाकण्यात मदत करतात.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
Enroll in Google AI Essentials

Looking to get hands-on experience with generative AI tools like Gemini? Learn from experts at Google and get essential AI skills to boost your productivity with Google AI Essentials, zero experience required.

Get started

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18285204958306850028
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false