सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google वर कसे शोधायचे

Google वर माहिती सहज शोधण्यात तुम्हाला मदत होण्यासाठी काही टिपा आणि युक्त्या जाणून घ्या.

टीप १: प्राथमिक गोष्टींसोबत सुरुवात करा

तुम्ही काहीही शोधत असलात, तरी सर्वात जवळचे विमानतळ कुठे आहे? यासारख्या साध्या शोधाने सुरुवात करा. आवश्यक असल्यास तुम्ही कधीही काही वर्णनात्मक शब्द जोडू शकता.

तुम्ही एखाद्या विशिष्ट स्थानामध्ये ठिकाण किंवा उत्पादन शोधत असल्यास, स्थान जोडा. उदाहरणार्थ, बेकरी सिअ‍ॅटल

टीप २: तुमचा आवाज वापरून शोधा

टायपिंगला कंटाळले आहेत का? तुमचा आवाज वापरून शोधण्यासाठी, मायक्रोफोन वर टॅप करा. तुमचा आवाज वापरून कसे शोधावे याबद्दल जाणून घ्या.

टीप ३: शब्द काळजीपूर्वक निवडा

तुम्ही सर्च बॉक्समध्ये कोणते शब्द टाकायचे हे ठरवल्यावर, तुम्ही शोधत असलेल्या साइटवर दिसण्याची शक्यता असलेले शब्द वापरून पहा. उदाहरणार्थ, माझे डोके दुखत आहे असे म्हणण्याऐवजी, डोकेदुखी म्हणा, कारण वैद्यकीय साइटवर तो शब्द वापरला जातो.

टीप ४: लहानसहान गोष्टींबद्दल काळजी करू नका

  • शब्दलेखन: Google चे स्पेल चेकर दिलेल्या शब्दाचे सर्वात सामान्य शब्दलेखन आपोआप वापरते, तुम्ही त्याचे शब्दलेखन अचूकपणे केले असले किंवा नसले तरीही. 
  • कॅपिटलायझेशन: New York Times शोधणे हे new york times शोधण्यासारखेच आहे.

टीप ५: झटपट उत्तरे शोधा

अनेक शोधांसाठी, Google तुमच्यासाठी काम करेल आणि शोध परिणामांमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर दाखवेल. क्रीडा टीमबद्दल माहितीसारखी काही वैशिष्ट्ये सर्व प्रदेशांमध्ये उपलब्ध नाहीत. 

  • हवामान: तुमच्या स्थानामधील हवामान पाहण्यासाठी हवामान शोधा किंवा विशिष्ट ठिकाणासाठी हवामान पाहण्याकरिता शहराचे नाव जोडा, जसे की हवामान सिएटल.
  • शब्दकोश: कोणत्याही शब्दाची व्याख्या पाहण्यासाठी त्याच्यापुढे व्याख्या करा टाका. 
  • गणना: ३*९१२३ सारखे गणितीय समीकरण एंटर करा, किंवा मिश्र ग्राफिंग समीकरणे सोडवा.
  • युनिट रुपांतर: कोणतेही रूपांतर एंटर करा, जसे की युरोमध्ये ३ डॉलर.
  • क्रीडा: शेड्युल, खेळाचे स्कोअर आणि बरेच काही पाहण्यासाठी, तुमच्या टीमचे नाव शोधा. 
  • झटपट तथ्ये: संबंधित माहिती मिळवण्यासाठी सेलिब्रिटी, स्थान, चित्रपट किंवा गाणे शोधा. 

तज्ञांकडून शोध टिपा

तुम्हाला प्रोसारखे शोधण्यात मदत करण्यासाठी आणखी टिपा आणि युक्त्या हव्या आहेत? आणखी प्रगत शोध तंत्रे जाणून घेण्यासाठी खालील लिंक पहा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15546650107599873447
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false