सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Search मधील व्याकरण तपासणीबद्दल जाणून घ्या

महत्त्वाचे: भाषेचे विश्लेषण करण्यासाठी, व्याकरण तपासणी हे वैशिष्ट्य AI सिस्टीम वापरते आणि ते विशेषतः अपूर्ण वाक्यांच्या बाबतीत १००% अचूक नसू शकते.

एखादे वाक्य व्याकरणदृष्ट्या योग्य पद्धतीने लिहिले आहे की नाही किंवा ते तसे नसल्यास, त्यात सुधारणा कशी करावी हे तपासण्यासाठी तुम्ही Google चे व्याकरण तपासणी हे वैशिष्‍ट्य वापरू शकता.

Search वर व्याकरण तपासणी कसे वापरावे

तुम्ही तुमच्या शोधात "व्याकरण तपासणी" समाविष्ट केल्यास किंवा तुम्हाला व्याकरण तपासणी हवी असल्याचे Search ला समजल्यास, तुम्हाला व्याकरण तपासणी परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

टीप: हे वैशिष्ट्य फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.

व्याकरण तपासणीद्वारे पुरवलेले आउटपुट हे व्याकरण बरोबर आहे की नाही याची पडताळणी करते. योग्य नसल्यास, वाक्यामध्ये कशी सुधारणा करावी हे ते सूचित करते. ते शब्दलेखनातील चुकादेखील दुरुस्त करू शकते.

Search वरील व्याकरण तपासणीसाठी धोरणे

या व्याकरण तपासण्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरतील याची खात्री करण्याकरिता, आशय कदाचित Google Search ची एकंदर धोरणे किंवा ही Search वरील वैशिष्‍ट्यांसाठीची धोरणे यांचे उल्लंघन करत असेल, तेव्हा व्याकरण तपासण्या रोखण्यासाठी आमच्याकडे सिस्टीम आहेत:

  • धोकादायक आशय
  • छळणूक करणारा आशय
  • द्वेषपूर्ण आशय
  • वैद्यकीय आशय
  • लैंगिकदृष्ट्या भडक आशय
  • दहशतवादाशी संबंधित आशय
  • हिंसा आणि रक्तपात
  • अश्लील आणि असभ्य भाषा

Google Search च्या एकंदर आशय धोरणांबद्दल जाणून घ्या.

व्याकरण तपासणी सह तुमचा फीडबॅक शेअर करा

व्याकरण तपासणीच्या परिणामासंदर्भात तुमचा फीडबॅक सबमिट करण्यासाठी:

  1. व्याकरण तपासणी परिणाम बॉक्सच्या तळाशी उजवीकडे, फीडबॅक वर क्लिक करा.
  2. पुढीलपैकी एक निवडा:
    • हे उपयुक्त आहे.
    • हे संबंधित नाही.
    • सूचना चुकीची आहे.
    • सूचना आक्षेपार्ह आहे.
  3. टेक्स्ट बॉक्समध्ये, तुम्ही तुमच्या टिप्पण्या किंवा सूचना एंटर करू शकता.
  4. तळाशी उजवीकडे, पाठवा वर क्लिक करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10470770227140081053
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false