तुम्ही स्वारस्य पेज वर सेव्ह केलेल्या लिंक, इमेज आणि ठिकाणे व्यवस्थापित करू शकता.
महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य कदाचित सर्व भाषांमध्ये आणि देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध नसेल. तुमचे संग्रह शोधण्यासाठी, तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करणे आवश्यक आहे.
तुमचे सेव्ह केलेले आयटम व्यवस्थापित करणे
तुमचे सेव्ह केलेले सर्व आयटम संग्रहामध्ये नसले, तरीही तुम्ही ते एकाच ठिकाणी शोधू आणि व्यवस्थापित करू शकता.
सेव्ह केलेले सर्व आयटम शोधणे
- तुमच्या काँप्युटरवर, स्वारस्ये पेज वर जा.
- सेव्ह केलेले सर्व आयटम वर क्लिक करा.
सेव्ह केलेला आयटम संग्रहामध्ये हलवणे
- तुमच्या काँप्युटरवर, स्वारस्ये पेज वर जा.
- सेव्ह केलेले सर्व आयटम वर क्लिक करा.
- सर्वात वरती उजवीकडे, निवडा वर क्लिक करा.
- तुम्हाला संग्रहामध्ये हलवायचा असलेला आयटम निवडा.
- कॉपी करा वर क्लिक करा.
- सूचीमधून संग्रह निवडा किंवा नवीन जोडा.
सेव्ह केलेला आयटम संपादित करणे
महत्त्वाचे: सेव्ह केलेले आयटम संपादित करण्यासाठी ते संग्रहामध्ये असणे आवश्यक आहे.
- तुमच्या काँप्युटरवर, स्वारस्ये पेज वर जा.
- तुम्हाला संपादित करायचा असलेला आयटम असलेल्या संग्रहावर क्लिक करा.
- तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या सेव्ह केलेल्या आयटमवर, अधिक वर क्लिक करा.
- संपादित करा वर क्लिक करा.
- शीर्षक संपादित करण्यासाठी: "शीर्षक" फील्ड ओव्हरराइट करा.
- वर्णन जोडण्यासाठी: "टीप जोडा" फील्डमध्ये एंटर करा.
- थंबनेल संपादित करण्यासाठी: थंबनेल बदला वर क्लिक करा.
- उपलब्ध असल्यास, दुसरा थंबनेल पर्याय निवडा.
- पूर्ण झाले वर क्लिक करा.
सेव्ह केलेले आयटम काढून टाकणे
महत्त्वाचे: या पायरीमुळे सेव्ह केलेले आयटम सर्व संग्रहांमधून आणि तुमच्या खात्यामधून पूर्णपणे हटवले जातात.
- तुमच्या काँप्युटरवर, स्वारस्ये पेज वर जा.
- सेव्ह केलेले सर्व आयटम वर क्लिक करा.
- सर्वात वरती उजवीकडे, निवडा वर क्लिक करा.
- तुम्हाला काढून टाकायचे असलेले आयटम निवडा.
- काढून टाका वर क्लिक करा.
तुमचे सेव्ह केलेले आयटम संग्रहामधून काढून टाकणे
- तुमच्या काँप्युटरवर, स्वारस्ये पेज वर जा.
- संग्रहावर क्लिक करा.
- आयटम काढून टाकण्यासाठी, निवडा वर क्लिक करा.
- तुम्हाला काढून टाकायचे असलेले आयटम निवडा.
- सर्वात वरती उजवीकडे, हटवा वर क्लिक करा.
संपूर्ण संग्रह काढून टाकणे
महत्त्वाचे: तुम्ही तयार केलेले संग्रह आणि तुमच्यासोबत शेअर केलेले संग्रह तुम्ही हटवू शकता. कुकबुक किंवा पाहण्याची सूची यांसारखे आम्ही तयार केलेले संग्रह तुम्ही हटवू शकत नाही.
- तुमच्या काँप्युटरवर, स्वारस्ये पेज वर जा.
- संग्रहावर क्लिक करा.
- सर्वात वरती उजवीकडे, आणखी हटवा वर क्लिक करा.
सेव्ह केलेले आयटम संग्रहामधून हलवणे
- तुमच्या काँप्युटरवर, स्वारस्ये पेज वर जा.
- संग्रहावर क्लिक करा.
- सर्वात वरती उजवीकडे, निवडा वर क्लिक करा.
- एक किंवा अधिक आयटम निवडा.
- संग्रहामध्ये हलवण्यासाठी:
- संग्रहामध्ये हलवा वर क्लिक करा.
- अस्तित्वात असलेला संग्रह किंवा नवीन संग्रह निवडा.
- तुमचे सेव्ह केलेले आयटम तिथे हलवले जातात आणि ते सध्या ज्या संग्रहामध्ये आहेत तिथून काढून टाकले जातात.
- संग्रहामध्ये जोडण्यासाठी:
- संग्रह मध्ये जोडा वर क्लिक करा.
- अस्तित्वात असलेला संग्रह किंवा नवीन संग्रह निवडा.
- तुमचे सेव्ह केलेले आयटम त्या संग्रहामध्ये जोडले जातात आणि सध्याच्या संग्रहामध्ये राहतात.
- संग्रहामध्ये हलवण्यासाठी:
तुमच्या संग्रहाचे नाव बदलणे
महत्त्वाचे: कुकबुक किंवा पाहण्याची सूची यांसारख्या आम्ही तयार केलेल्या संग्रहाची नावे तुम्ही बदलू शकत नाही.
- तुमच्या काँप्युटरवर, स्वारस्ये पेज वर जा.
- संग्रहावर क्लिक करा.
- सर्वात वरती, आणखी संपादित करा वर क्लिक करा.
- नवीन शीर्षक एंटर करा.
- पूर्ण झाले वर क्लिक करा.
टीप: शीर्षक संपादित करण्यासाठी, सर्वात वर, तुम्ही संग्रहाच्या शीर्षकावरदेखील क्लिक करू शकता.
संग्रह शेअर करणे
- तुमच्या काँप्युटरवर, स्वारस्ये पेज वर जा.
- तुम्हाला शेअर करायच्या असलेल्या संग्रहावर क्लिक करा.
- सर्वात वरती उजवीकडे, शेअर करा वर क्लिक करा.
- शेअरिंग सुरू करा.
- तुम्हाला शेअर करायची असलेली लिंक निवडा.
- इतरांना तुमचा संग्रह संपादित करू देण्यासाठी: कंट्रिब्युटर लिंक वर क्लिक करा.
- इतरांना तुमचा संग्रह पाहू देण्यासाठी: फक्त पहा लिंक निवडा.
- तुम्हाला ज्यांच्यासोबत शेअर करायचे आहे त्यांचे नाव आणि ईमेल जोडा.
- तुम्ही इतरत्र शेअर करण्यासाठी लिंक कॉपीदेखील करू शकता.
- पाठवा वर क्लिक करा.