सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google Finance वापरून पोर्टफोलिओ तयार आणि व्यवस्थापित करा

Google Finance मधील पोर्टफोलिओसोबत तुमच्या गुंतवणुकींच्या परफॉर्मन्सचा मागोवा घ्या आणि ती समजून घ्या. तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य पहा, तुमच्या परफॉर्मन्सची इतर स्टॉक आणि इंडेक्सशी तुलना करा आणि तुमच्या गुंतवणुकीबद्दल विश्लेषणे आणि बातम्या पहा.

पोर्टफोलिओ तयार करा

कस्टम पोर्टफोलिओ तुम्हाला काळानुसार तुमचे वैयक्तिक गुंतवणूक मूल्य व्यवस्थापित आणि ट्रॅक करू देतात.

पोर्टफोलिओ तयार करा
  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, नवीन पोर्टफोलिओ वर क्लिक करा.
  3. पोर्टफोलिओचे नाव एंटर करा.
  4. पूर्ण झाले वर क्लिक करा.
  5. गुंतवणुका जोडण्यासाठी, गुंतवणुका जोडा वर क्लिक करा.
सध्याची पाहण्याची कस्टम सूची पोर्टफोलिओमध्ये बदला
  1. google.com/finance वर जा.
  2. Google Finance मुख्यपृष्ठावरील सूचीमधून पाहण्याची एक सूची निवडा.
  3. सर्वात वर उजवीकडे, आणखी वर क्लिक करा.
  4. पोर्टफोलिओ म्हणून पहा निवडा.
पोर्टफोलिओचे नाव बदला किंवा तो हटवा
  1. google.com/finance वर जा.
  2. “तुमचे पोर्टफोलिओ” अंतर्गत, तुम्हाला नाव बदलायचा किंवा हटवायचा असलेला पोर्टफोलिओ निवडा.
  3. सर्वात वर उजवीकडे, आणखी आणखी वर क्लिक करा.
  4. नाव बदला किंवा हटवा निवडा.

प्लेग्राउंड पोर्टफोलिओ तयार करणे

  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, “तुमचे पोर्टफोलिओ” याच्या अंतर्गत, नवीन पोर्टफोलिओ आणि त्यानंतर नवीन पोर्टफोलिओ वर क्लिक करा.
  3. पोर्टफोलिओचे नाव एंटर करा.
  4. प्लेग्राउंड पोर्टफोलिओ सुरू करा.
  5. सेव्ह करा वर क्लिक करा.
  6. २ टप्पी पडताळणी:
    • २४ तासांमध्येपूर्ण झाल्यास:  तुम्हाला जोडायची असलेली अनुक्रमणिका निवडण्यासाठी आणि शोधण्यासाठी, गुंतवणुका जोडा वर क्लिक करा.
    • २४ तासांमध्ये पूर्ण न झाल्यास: तुम्हाला पुन्हा ऑथेंटिकेट करण्यासाठी सुचवले जाईल.
  7. पूर्ण झाले वर क्लिक करा.

टीप: प्लेग्राउंड पोर्टफोलिओ हे सिम्युलेशनसाठी आहेत, त्यांमध्ये तुमच्या गुंतवणुकीचा समावेश नाही.

पोर्टफोलिओशी संबंधित सेटिंग्ज व्यवस्थापित करा

तुमच्या स्टॉकच्या किमतींचे परीक्षण करण्यात किंवा तुमच्या पोर्टफोलिओवरील चलन अपडेट करण्यात तुमची मदत करण्यासाठी तुम्ही तुमची सेटिंग्ज अपडेट करू शकता.

२ टप्पी पडताळणी वापरून पोर्टफोलिओ अ‍ॅक्सेस करणे

महत्त्वाचे: google.com/finance वरील विशिष्ट माहिती अ‍ॅक्सेस करणाऱ्या प्रत्येकासाठी, Google करिता २ टप्पी पडताळणी आवश्यक आहे.

२ टप्पी पडताळणी वापरून, तुम्ही तुमच्या खात्यामध्ये सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडू शकता. हे अनधिकृत लोकांना तुमचे खाते आणि वैयक्तिक माहिती अ‍ॅक्सेस करण्यापासून रोखण्यात मदत करते.

२-टप्पी पडताळणी याबद्दल अधिक जाणून घ्या.

पोर्टफोलिओ हा प्लेग्राउंड पोर्टफोलिओ म्हणून मार्क करा

  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, “तुमचे पोर्टफोलिओ” याच्या अंतर्गत, पोर्टफोलिओ निवडा.
  3. २ टप्पी पडताळणी: 
    • २४ तास यामध्ये पूर्ण झाल्यास: सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर प्लेग्राउंड म्हणून मार्क करा वर क्लिक करा.
    • २४ तासांमध्ये पूर्ण न झाल्यास: प्लेग्राउंड पोर्टफोलिओ म्हणून मार्क करा वर क्लिक करा, तुम्हाला २ टप्पी पडताळणी करण्यास सुचवले जाईल.
  4. कंफर्म करा वर क्लिक करा.

टीप: प्लेग्राउंड पोर्टफोलिओ हे सिम्युलेशनसाठी आहेत, त्यांमध्ये तुमच्या गुंतवणुकीचा समावेश नाही.

पोर्टफोलिओ हा प्लेग्राउंड पोर्टफोलिओ म्हणून अनमार्क करा

  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, “तुमचे पोर्टफोलिओ” याच्या अंतर्गत, पोर्टफोलिओ निवडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, "पोर्टफोलिओ हायलाइट” च्या वरती, आणखी आणखी आणि त्यानंतर प्लेग्राउंड म्हणून अनमार्क करा वर क्लिक करा.
  4. कंफर्म करा वर क्लिक करा.

पोर्टफोलिओ हा पाहण्याची सूची म्हणून पहा

  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, “तुमचे पोर्टफोलिओ” च्या अंतर्गत, पोर्टफोलिओ निवडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, "पोर्टफोलिओ हायलाइट” च्या वर, आणखी आणखी आणि त्यानंतर पाहण्याची सूची म्हणून पहा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही पाहण्याची सूची म्हणून तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्य पाहता तेव्हा ते हटवले जात नाही. तुमच्या गुंतवणुकीच्या मूल्याचे कधीही पुनरावलोकन करण्यासाठी तुम्ही ते पोर्टफोलिओ म्हणून पाहू शकता.

पोर्टफोलिओचे चलन बदला

महत्त्वाचे: तुमचा पोर्टफोलिओ वापरत असलेले चलन तुम्ही बदलू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ यू.एस. डॉलरवरून ईयू युरोमध्ये बदलल्यास, तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्य आणि होल्डिंग आपोआप ईयू युरोमध्ये रूपांतरित होतील.

  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, “तुमचे पोर्टफोलिओ” च्या अंतर्गत, पोर्टफोलिओ निवडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, "पोर्टफोलिओ हायलाइट” च्या वर, आणखी आणखी आणि त्यानंतर चलन अपडेट करा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला ज्या चलनामध्ये तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्य पहायचे आहे ते चलन निवडा.

तुमच्या पोर्टफोलिओमधील होल्डिंग व्यवस्थापित करा

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक, म्युच्युअल फंड किंवा क्रिप्टोकरन्सीचे शेअर्स जोडा
  1. जाहिराती जोडा वर क्लिक करा.
  2. तुम्हाला जोडायचा असलेला स्टॉक, म्युच्युअल फंड किंवा क्रिप्टोकरन्सी एंटर करा आणि तुम्ही टाइप करत असताना दिसणारा योग्य पर्याय निवडा.
  3. एंटर करा:
    • शेअरची संख्या
    • तुम्ही शेअर खरेदी केलेत ती तारीख
    • तुम्ही शेअर खरेदी केले तेव्हाची गुंतवणुकीची खरेदी किंमत
  4. तुम्ही स्टॉकचे शेअर वेगवेगळ्या तारखांना विकत घेतले असल्यास, [X] ची आणखी खरेदी वर क्लिक करा. माहिती एंटर करा.
  5. तुम्ही सर्व शेअर एंटर केल्यावर, सेव्ह करा वर क्लिक करा किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी गुंतवणुका जोडण्यासाठी सेव्ह करा आणि दुसरी जोडा निवडा.
इंडेक्स जोडा
  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, “तुमचे पोर्टफोलिओ” च्या अंतर्गत, पोर्टफोलिओ निवडा.
  3. गुंतवणूक वर क्लिक करा. तुमच्याकडे गुंतवणुका नसल्यास, गुंतवणूक जोडा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला जोडायचा असलेला इंडेक्स शोधा आणि निवडा.
  5. पूर्ण झाले वर क्लिक करा.
टीप: इंडेक्स तुमच्या पोर्टफोलिओ परताव्यामध्ये योगदान देत नाही.
गुंतवणूक काढून टाका
  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, “तुमचे पोर्टफोलिओ” च्या अंतर्गत, पोर्टफोलिओ निवडा.
  3. तुम्हाला हटवायच्या असलेल्या गुंतवणुकीच्या रेषेवर पॉइंट करा.
  4. आणखी आणखी आणि त्यानंतर हटवा वर क्लिक करा.
  5. हटवणे कंफर्म करा.

पोर्टफोलिओचा परफॉर्मन्स समजून घ्या

काळानुसार तुमची पोर्टफोलिओ शिल्लक पहा

तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्य रीअलटाइममध्ये मोजले जाते. तुमच्या पोर्टफोलिओ मूल्याखालील चार्ट तुमच्या पोर्टफोलिओच्या शिलकीमध्ये काळानुसार होणारे बदल दाखवतो.

  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, “तुमचे पोर्टफोलिओ” च्या अंतर्गत, पोर्टफोलिओ निवडा.
  3. तुमच्या पोर्टफोलिओच्या नावाखाली, तुमचे पोर्टफोलिओ मूल्य प्रदर्शित केले जाते. खाली दिलेला चार्ट काळानुसार तुमची पोर्टफोलिओ शिल्लक दाखवतो.
  4. वेगवेगळ्या कालावधींदरम्यान तुमच्या पोर्टफोलिओची शिल्लक पाहण्यासाठी, एक महिना, सहा महिने, YTD किंवा इतर पर्याय निवडा.
पोर्टफोलिओशी संबंधित बातम्या ब्राउझ करा
  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, “तुमचे पोर्टफोलिओ” च्या अंतर्गत, पोर्टफोलिओ निवडा.
  3. “बातम्यांमधील तुमचा पोर्टफोलिओ” वर स्क्रोल करा
पोर्टफोलिओचे परतावे पहा
तुमचे परतावे हे ट्रेडिंगच्या मागील दिवसापासून (“एक दिवस”) आणि त्यांच्या सुरुवातीपासून (“एकूण”) मोजले जातात. एकूण परतावे हे सध्याचे मूल्य आणि नोंदवलेला खर्च (गुंतवणूका जोडताना तुम्ही “खरेदी किंमत” मध्ये एंटर करता ती रक्कम) यांमध्ये असलेल्या फरकानुसार मोजले जातात.
  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, “तुमचे पोर्टफोलिओ” च्या अंतर्गत, पोर्टफोलिओ निवडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, "पोर्टफोलिओ हायलाइट” च्या वर, तुम्हाला तुमचे "एका दिवसाचे" आणि "एकूण" परतावे मिळू शकतात.
पोर्टफोलिओ हायलाइट पहा
  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, “तुमचे पोर्टफोलिओ” च्या अंतर्गत, पोर्टफोलिओ निवडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, "पोर्टफोलिओ हायलाइट” च्या वर, तुम्हाला तुमचे पोर्टफोलिओचे विविध मेट्रिकनुसार अ‍ॅलोकेशन मिळू शकते.
पोर्टफोलिओची इतर मालमत्तांशी तुलना करा

पोर्टफोलिओच्या तुलना वेळेनुसार असणारा परताव्याचा दर वापरतात. हे तुम्हाला बेंचमार्कशी अधिक प्रातिनिधिक तुलना देण्यासाठी कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो अ‍ॅडजस्ट करते.

  1. google.com/finance वर जा.
  2. उजवीकडे, “तुमचे पोर्टफोलिओ” च्या अंतर्गत, पोर्टफोलिओ निवडा.
  3. चार्ट अंतर्गत, विशिष्ट मालमत्ता शोधण्यासाठी सुचवलेली तुलना किंवा यासोबत तुलना करा निवडा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12799725146799182250
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false