गैरवापराविषयी प्रोग्राम धोरणे आणि अंमलबजावणी

खालील प्रोग्राम धोरणे ही तुम्ही Google Photos वर पोस्ट करत असलेला आशय, Google Photos वरील टिप्पण्या आणि Google Photos मधील प्रिंट आशय यांवर लागू होतात. Google Photos हे स्टोरेज पुरवणे आणि तुमचे फोटो व व्हिडिओ आपोआप संगतवार लावणे या गोष्टी कोणत्याही शुल्काशिवाय करते. Google उत्पादने वापरणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक अनुभव देण्यासाठी, धोरणे ही महत्त्वाची भूमिका बजावतात.

या सेवा पुरवण्याच्या आमच्या क्षमतेसाठी धोकादायक असलेल्या गैरवापरांवर नियंत्रण ठेवणे आमच्यासाठी आवश्यक आहे आणि हे ध्येय गाठण्यात आम्हाला मदत करण्यासाठी खालील धोरणांचे पालन करण्याची आम्ही सर्वांना विनंती करतो. धोरण उल्लंघन करू शकेल अशा आशयाबद्दल सूचित केले गेल्यानंतर, आम्ही त्या आशयाचे परीक्षण करू शकतो आणि आशयाचा ॲक्सेस प्रतिबंधित करणे, आशय काढून टाकणे, आशय प्रिंट करण्यास नकार देणे आणि वापरकर्त्याचा ॲक्सेस Google उत्पादनांपुरता मर्यादित करणे किंवा तो समाप्त करणे अशा प्रकारची कारवाई करू शकतो.

स्टोरेज कोट्याच्या मर्यादा ओलांडणार्‍या खात्यांवर आम्ही कारवाई करू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही नवीन अपलोडला नकार देऊ शकतो, सध्याचा आशय काँप्रेस करू शकतो किंवा तुम्ही तुमच्या स्टोरेज कोट्याची मर्यादा ओलांडल्यास अथवा पुरेसे अतिरिक्त स्टोरेज न मिळवता आल्यास, आशय हटवू शकतो. स्टोरेज कोट्याबद्दल येथे आणखी वाचा.

ही धोरणे लागू करताना, आम्ही शैक्षणिक, माहितीपर, किंवा वैज्ञानिक किंवा कलात्मक स्वरूप विचारात घेऊन त्या आधारावर किंवा जेथे आशयावर कारवाई न केल्यामुळे लोकांना इतर भरीव फायदे मिळतील तेथे अपवाद करू शकतो.

ही धोरणे बदलू शकतात, त्यामुळे वेळोवेळी पुन्हा तपासून खात्री करा. अधिक माहितीसाठी, कृपया Google च्या सेवा अटी देखील पहा. खाली सूचीबद्ध केलेल्या धोरणांव्यतिरिक्त, अनेक उत्पादने आणि वैशिष्ट्यांमध्ये अतिरिक्त धोरणे आणि अटी असू शकतात याची नोंद घ्या. उदाहरणार्थ, Google प्रोफाइल फोटोमध्ये प्रौढांसाठी असलेला किंवा आक्षेपार्ह आशय असू शकत नाही जसे की, एखाद्या व्यक्तीचे नितंब किंवा क्लीव्हेजचा क्लोज-अप असलेला फोटो.

गैरवर्तनाची तक्रार करा

कोणीतरी खाली दिलेल्या धोरणांचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, “गैरवर्तनाची तक्रार करा” ही लिंक (किंवा त्यासारखे नाव असलेली लिंक) वापरून कृपया त्याची आमच्याकडे तक्रार करा. Google Photos वर गैरवापराची तक्रार करणे आणि Google Photos वर एखाद्याला ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला उचलता येणारी अतिरिक्त पावले यांबद्दल अधिक जाणून घ्या.

कॉपीराइट उल्लंघन किंवा इतर कायदेशीर समस्यांची तक्रार करण्यासाठी, जो आशय लागू कायद्यांनुसार Google च्या सेवांवरून काढून टाकला जावा असे तुम्हाला वाटते, त्याची तक्रार करण्याच्या प्रक्रियेबाबत तुम्हाला मार्गदर्शन करणारे हे टूल कृपया वापरा.

प्रोग्राम धोरणे

खाते अपहरण
दुसर्‍या वापरकर्त्याचे खाते त्यांच्या परवानगीशिवाय अ‍ॅक्सेस करू नका. आम्हाला खाते अपहरणाबद्दल सूचित केले गेल्यास, आम्ही योग्य ती कारवाई करू शकतो, ज्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडे तुमची तक्रार करणे, आमच्या काही उत्पादनांचा अ‍ॅक्सेस काढून टाकणे किंवा तुमचे Google खाते बंद करणे यांचा समावेश असू शकतो.
खात्याची इनॅक्टिव्हिटी
अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी उत्पादन वापरा. अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये उत्पादनाचा आशय अ‍ॅक्सेस करणे किंवा उत्पादनावर किमान दर दोन वर्षांतून एकदा नवीन आशय स्टोअर करणे यांचा समावेश आहे. अ‍ॅक्टिव्ह नसणाऱ्या खात्यांवर आम्ही कारवाई करू शकतो, ज्यामध्ये उत्पादनामधून तुमचा आशय हटवण्याचाही समावेश असू शकतो. येथे आणखी वाचा.
बाल लैंगिक अत्याचार आणि शोषण

लहान मुलांचे शोषण किंवा गैरवर्तन करणारा आशय तयार, अपलोड किंवा वितरित करू नका. यामध्ये बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित सर्व साहित्याचा समावेश आहे. Google उत्पादनावरील लहान मुलाचे शोषण करू शकणार्‍या आशयाची तक्रार करण्यासाठी, "गैरवर्तनाची तक्रार करा" वर क्लिक करा. तुम्हाला इंटरनेटवर इतरत्र आशय आढळल्यास, कृपया तुमच्या देशातील योग्य त्या संस्थेशी थेट संपर्क साधा.

आणखी सविस्तरपणे, लहान मुलांना धोका पोहोचवण्यासाठी आमच्या उत्पादनांचा वापर Google प्रतिबंधित करते. यामध्ये पुढीलप्रमाणे लहान मुलांसोबत केल्या जाणार्‍या हिंसक वर्तनाचा समावेश आहे, परंतु त्यापुरतेच मर्यादित नाही:

  • 'लहान मुलांना दुष्प्रेरित करणे' (उदाहरणार्थ, लैंगिक संबंध ठेवणे आणि/किंवा त्या लहान मुलासह लैंगिक इमेजरीची ऑनलाइन किंवा ऑफलाइन देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी लहान मुलाशी ऑनलाइन मैत्री करणे);

  • 'सेक्स्टॉर्शन' (उदाहरणार्थ, लहान मुलाच्या अत्यंत व्यक्तिगत इमेजचा प्रत्यक्ष किंवा तथाकथित अ‍ॅक्सेस वापरून लहान मुलाला धमकावणे किंवा ब्लॅकमेल करणे);

  • अज्ञान मुलांचे लैंगिकीकरण (उदाहरणार्थ, लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे वर्णन करणारी, त्याला प्रोत्साहन देणारी किंवा त्याचा प्रचार करणारी इमेजरी अथवा ज्याचा परिणाम म्हणून लहान मुलांचे लैंगिक शोषण होऊ शकते अशा पद्धतीने केलेले लहान मुलांचे चित्रण) आणि

  • लहान मुलांची तस्करी (उदाहरणार्थ, व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी लहान मुलाची जाहिरात किंवा मागणी करणे).

असा आशय आम्ही काढून टाकू आणि योग्य ती कारवाई करू, ज्यामध्ये नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन कडे तक्रार करणे उत्पादन वैशिष्ट्यांचा अ‍ॅक्सेस मर्यादित करणे आणि खाती बंद करणे यांचा समावेश असू शकतो. एखाद्या लहान मुलाला गैरवर्तनाचा, शोषणाचा किंवा तस्करीचा धोका आहे किंवा ते आधीच धोक्यात आले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. तुम्ही पोलिसांकडे आधीच तक्रार केली असल्यास आणि तरीही तुम्हाला मदत हवी असल्यास किंवा आमच्या उत्पादनांमुळे लहान मुलाला धोका आहे किंवा ते आधीच धोक्यात आल्याबद्दल तुम्हाला काळजी वाटत असल्यास, तुम्ही त्या वर्तनाची Google कडे तक्रार करणे हे करू शकता.

बगल देणे
आमची धोरणांना बगल देण्याच्या हेतू असलेल्या किंवा तुमच्या खात्यावरील लावलेली निर्बंधने हटवण्याच्या कृत्यांमध्ये अडकू नका. यामध्ये एकाहून अधिक खाती तयार करणे किंवा वापरणे अथवा यापूर्वी प्रतिबंधित असलेल्या वर्तनामध्ये सहभागी होण्याचा उद्देश असलेल्या इतर पद्धतींचा समावेश आहे.
धोकादायक आणि बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी
बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटींमध्ये सामील होण्यासाठी किंवा लोकांना किंवा प्राण्यांना गंभीर आणि तत्काळ हानी पोहोचवणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटी, वस्तू, सेवा किंवा माहितीचा प्रचार करण्यासाठी हे उत्पादन वापरू नये. आम्ही शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक उद्देशांनी सर्वसाधारण माहितीला परवानगी देत असलो तरीही, हानिकारक किंवा बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटींना प्रोत्साहन देणार्‍या आशयावर मर्यादा घालतो. आम्हाला बेकायदेशीर ॲक्टिव्हिटींबद्दल सूचित केले गेल्यास, आम्ही योग्य ती कारवाई करू शकतो, ज्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडे तुमची तक्रार करणे, आमच्या काही उत्पादनांचा अ‍ॅक्सेस काढून टाकणे किंवा तुमचे Google खाते बंद करणे यांचा समावेश असू शकतो.
छळ, गुंडगिरी आणि धमक्या
इतरांना छळू किंवा धमकावू नका. आम्ही या अ‍ॅक्टिव्हिटींमध्ये सहभाग घेण्यासाठी किंवा इतरांना उत्तेजन देण्यासाठी हे उत्पादन वापरण्याची परवानगी देत नाही. एखाद्याला द्वेशयुक्त गैरवर्तनासाठी वेगळे काढणे, एखाद्याला गंभीर इजा करण्याची धमकी देणे, एखाद्याचे नको असलेल्या पद्धतीने लैंगिकीकरण करणे, धमक्या प्रत्यक्षात आणण्यासाठी वापरली जाऊ शकणारी दुसर्‍या एखाद्या व्यक्तीची खाजगी माहिती उघड करणे, हिंसा किंवा शोकात्म घटनेच्या बळींना कमी लेखणे किंवा त्यांचे महत्त्व कमी करणे, ही कृत्ये करण्यासाठी इतरांना चिथावणी देणे किंवा एखाद्याला इतर प्रकारे त्रास देणे या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. लक्षात ठेवा की ऑनलाइन छळवणूक अनेक ठिकाणी बेकायदेशीर आहे आणि छळवणूक करणारी व्यक्ती आणि शोषित व्यक्ती दोघांवरही त्याचे गंभीर ऑफलाइन परिणाम होऊ शकतात. हानीसंबंधी धमक्या किंवा इतर धोकादायक परिस्थितींबद्दल आम्हाला सूचित केले गेल्यास, आम्ही योग्य ती कारवाई करू शकतो, ज्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडे तुमची तक्रार करणे, आमच्या काही उत्पादनांचा अ‍ॅक्सेस काढून टाकणे किंवा तुमचे Google खाते बंद करणे यांचा समावेश असू शकतो.
द्वेषयुक्त भाषण
द्वेषयुक्त भाषण देऊ नका. द्वेषयुक्त भाषण म्हणजे असा आशय ज्याचे प्राथमिक उद्दिष्ट हे वंश किंवा वांशिक मूळ, धर्म, विकलांगत्व, वय, राष्ट्रीयत्व, अनुभवाची स्थिती, लैंगिक प्राधान्य, लिंग, लैंगिक ओळख किंवा पद्धतशीरपणे भेदभाव अथवा मागासपणाशी संबंधित इतर वैशिष्ट्यांच्या आधारावर एखादी व्यक्ती किंवा गटाबद्दल द्वेष उत्पन्न करणे, त्यांच्याविरूद्धच्या हिंसेला प्रोत्साहन देणे किंवा त्याकडे गांभीर्याने न पाहाणे हे असते.
ओळखीसंबंधी तोतयेगिरी आणि दिशाभूल

एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची तोतयागिरी करू नका किंवा स्वतःची दिशाभूल करू नका. तुम्ही प्रतिनिधित्व करत नसलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची तोतयेगिरी करणे किंवा वापरकर्त्याची/साइटची ओळख, पात्रता, मालकी, उद्देश, उत्पादने, सेवा किंवा व्यवसायाच्या वापराबद्दल दिशाभूल करणारी माहिती पुरवणे यांचा यामध्ये समावेश आहे.

त्यांची मालकी किंवा त्यांचा प्राथमिक हेतू चुकीच्या पद्धतीने दाखवणे किंवा लपवणे, जसे की, तुमचा मूळ देश अथवा तुमच्या स्वतःच्या देशाव्यतिरिक्त इतर देशातील वापरकर्त्यांना राजकारण, सामाजिक समस्या किंवा सार्वजनिक हिताचे मुद्दे यांबाबतचा आशय दाखवता तेव्हा तुमच्याबद्दलचे चुकीचे तपशील दाखवणे किंवा ते जाणीवपूर्वक लपवणे या गोष्टींचादेखील यामध्ये समावेश आहे. आम्ही विडंबन, उपहास आणि उपनाम किंवा टोपणनावे वापरण्याची अनुमती देतो -- फक्त तुमच्या वास्तविक ओळखीबद्दल वाचकांची दिशाभूल करू शकेल, असा आशय टाळा.

मालवेअर आणि त्यासारखा दुर्भावनापूर्ण आशय
मालवेअर किंवा नेटवर्क, सर्व्हर, अंतिम वापरकर्ता डिव्हाइस किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या ऑपरेशनला हानी पोहोचवणारा किंवा हस्तक्षेप करणारा कोणताही आशय प्रसारित करू नका. यात मालवेअर, व्हायरस, विध्वंसक कोड किंवा इतर हानीकारक किंवा नको असलेले सॉफ्टवेअर किंवा तत्सम आशयाचे थेट होस्टिंग, एम्बेड करणे किंवा प्रसारित करणे याचा समावेश आहे. यामध्ये व्हायरस पसरवणारा, पॉप-अपचे कारण ठरणारा, वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्याचा प्रयत्न करणारा किंवा द्वेषयुक्त कोड अशा आशयाचा देखील समावेश आहे. अधिक माहितीसाठी, आमची सुरक्षित ब्राउझिंग धोरणे पाहा.
दिशाभूल करणारा आशय

वापरकर्त्यांची फसवणूक करणारा, दिशाभूल करणारा किंवा संभ्रमात टाकेल असा आशय वितरित करू नका. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

नागरी आणि लोकशाही प्रक्रियांशी संबंधित दिशाभूल करणारा आशय:  उघडपणे खोटा असलेला आणि नागरी किंवा लोकशाही प्रक्रियेमधील सहभागाला किंवा विश्वासाला लक्षणीयरीत्या नुकसान पोहोचवू शकेल असा आशय. यामध्ये सार्वजनिक मतदान प्रक्रिया, राजकीय उमेदवारांची वय/जन्मस्थळावर आधारित पात्रता, निवडणुकांचे निकाल किंवा अधिकृत सरकारी रेकॉर्डशी परस्परविरोध असणार्‍या जनगणनेतील सहभाग यांबद्दलच्या माहितीचा समावेश आहे. एखाद्या राजकीय व्यक्तीचा किंवा सरकारी अधिकार्‍याचा मृत्यू झाला आहे, त्यांना अपघात झाला आहे किंवा अचानक गंभीर आजार झाला आहे अशा चुकीच्या दाव्यांचादेखील यात समावेश आहे.

आरोग्याबाबत हानिकारक प्रक्रियांशी संबंधित दिशाभूल करणारा आशय: व्यक्तींना गंभीर शारीरिक किंवा मानसिक आघात किंवा लोकांच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकणार्‍या प्रक्रियांमध्ये सहभागी होण्यासाठी इतरांना प्रवृत्त करणारा किंवा प्रोत्साहन देणारा, दिशाभूल करणारा आरोग्यासंबंधी किंवा वैद्यकीय आशय.

फेरफार केलेला मीडिया: वापरकर्त्यांची दिशाभूल करू शकेल आणि भयंकर हानीचा गंभीर धोका निर्माण करू शकेल अशा प्रकारे तंत्रज्ञान वापरून फेरफार केला गेलेला किंवा बदललेला मीडिया.

दिशाभूल करणार्‍या आशयाला शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक संदर्भात अनुमती दिली जाऊ शकते, परंतु लोकांना हा संदर्भ समजण्यात मदत होण्यासाठी कृपया पुरेशी माहिती पुरवण्याची काळजी घ्या. काही बाबींमध्ये, कोणताही संदर्भ असला तरीही, हा आशय आमच्या प्लॅटफॉर्मवर राहू दिला जाणार नाही.

विनासंमती तयार झालेली इंटिमेट इमेजरी (NCII)
एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय खाजगी नग्न, लैंगिकदृष्ट्या भडक किंवा इंटिमेट इमेज अथवा व्हिडिओ स्टोअर किंवा वितरित करू नका. कोणीतरी तुमची खाजगी नग्न, लैंगिकदृष्ट्या भडक किंवा इंटिमेट इमेज किंवा व्हिडिओ पाठवला असल्यास, या फॉर्मद्वारे तक्रार सबमिट करणे हे करा.
वैयक्तिक आणि गोपनीय माहिती
इतर लोकांची वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती अधिकृत परवानगीशिवाय स्टोअर किंवा वितरित करू नका. यामध्ये यू.एस. सोशल सिक्युरिटी नंबर, बँक खाते नंबर, क्रेडिट कार्ड नंबर, स्वाक्षर्‍यांच्या इमेज आणि वैयक्तिक आरोग्य दस्तऐवज यांसारख्या संवेदनशील माहितीचा वापर समाविष्ट आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये जेथे ही माहिती इंटरनेटवर किंवा सार्वजनिक रेकॉर्डमध्ये इतरत्र उपलब्ध आहे जसे की, सरकारी वेबसाइटवर सूचीबद्ध राष्ट्रीय आयडी क्रमांक, तेथे सामान्यत: अंमलबजावणी कृतींवर आम्ही प्रक्रिया करत नाही.
फिशिंग
हे उत्पादन फिशिंगसाठी वापरू नका. यामध्ये पासवर्ड, आर्थिक तपशील आणि सोशल सिक्युरिटी नंबर यांसारख्या संवेदनशील डेटाची मागणी करणे किंवा त्याचा संग्रह करणे याचा समावेश आहे.
विनियमित वस्तू आणि सेवा
नियमन केलेल्या वस्तू आणि सेवांची विक्री, जाहिरात किंवा सुलभीकरण करू नका. विनियमित वस्तू आणि सेवांमध्ये दारू, जुगार, औषधे, अस्वीकृत पूरक आहार, तंबाखू, फटाके, शस्त्रे किंवा आरोग्य/वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे.
लैंगिकदृष्ट्या भडक आशय
नग्नता, ग्राफिक लैंगिक कृत्ये आणि पोर्नोग्राफ असलेले साहित्य यासारखे लैंगिकरीत्या सुस्पष्ट साहित्य असलेला आशय वितरित करू नका. यामध्ये व्यावसायिक अश्लील साइटवर ट्रॅफिक आणण्याचा समावेश आहे. आम्ही शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक उद्देशांसाठी नग्नतेला अनुमती देतो.
स्पॅम
स्पॅम करू नका. यामध्ये नको असलेला प्रचारात्मक किंवा व्यावसायिक आशय, ऑटोमेटेड प्रोग्रामद्वारे तयार केलेला नको असलेला आशय, नको असलेला एकाच प्रकारचा आशय, असंबद्ध आशय किंवा सामूहिक विनवणीसारख्या कोणत्याही आशयाचा समावेश असू शकतो.
सिस्टम हस्तक्षेप आणि गैरवापर
या उत्पादनाचा गैरवापर करू नका आणि Google किंवा इतरांच्या नेटवर्क, डिव्हाइस किंवा इतर ऑपरेशनला हानी पोहोचवू नका, मानहानी करू नका किंवा त्यावर नकारात्मक परिणाम होईल असे काही करू नका. यामध्ये उत्पादनाचे कोणतेही पैलू किंवा त्याच्या सेवा अवनत करणे, बंद करणे किंवा त्यांमध्ये नकारात्मकपणे हस्तक्षेप करणे यांचा समावेश आहे. आम्हाला सिस्टममधील हस्तक्षेप आणि गैरवापराबद्दल सूचित केले गेल्यास, आम्ही योग्य ती कारवाई करू शकतो, ज्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडे तुमची तक्रार करणे, आमच्या काही उत्पादनांचा अ‍ॅक्सेस काढून टाकणे किंवा तुमचे Google खाते बंद करणे यांचा समावेश असू शकतो.
हिंसक संस्था आणि चळवळी

ज्ञात हिंसक गैर-सरकारी संस्था आणि चळवळींना हे उत्पादन कोणत्याही हेतूसाठी वापरण्याची परवानगी नाही. या गटांच्या अ‍ॅक्टिव्हिटी जसे की, भर्ती करणे, ऑनलाइन किंवा ऑफलाइन अ‍ॅक्टिव्हिटीचे समन्वय साधणे, मॅन्युअल किंवा हानी पोहोचवू शकणारे इतर साहित्य शेअर करणे, हिंसक गैर-सरकारी संस्थांच्या विचारसरणीचा प्रचार करणे, दहशतवादी कृत्यांचा प्रचार करणे, हिंसाचाराला उत्तेजन देणे किंवा हिंसक गैर-सरकारी संस्थांद्वारे केलेले हल्ले साजरे करणे या गोष्टी सुलभ करणारा किंवा त्यांना प्रोत्साहन देणारा आशय वितरित करू नका. आशयावर अवलंबून, आम्ही वापरकर्त्यावर कारवाईदेखील करू शकतो. हिंसक गैर-सरकारी संस्थांशी संबंधित आशयाला शैक्षणिक, माहितीपट, वैज्ञानिक किंवा कलात्मक संदर्भात अनुमती दिली जाऊ शकते, पण कृपया लोकांना संदर्भ समजण्यात मदत करण्यासाठी पुरेशी माहिती प्रदान करण्याचे लक्षात ठेवा.

अज्ञान मुलांच्या अनधिकृत इमेज
लहान मुलाचे पालक किंवा कायदेशीर प्रतिनिधी यांच्याकडून स्पष्ट संमती घेतल्याशिवाय अज्ञान मुलांचे फोटो स्टोअर किंवा वितरित करू नका. एखाद्याने आवश्यक संमती न घेता अज्ञान मुलाचे फोटो स्टोअर किंवा वितरित केल्यास, कृपया त्यासंदर्भात आमच्याकडे येथे तक्रार करा.
हिंसा आणि रक्तपात
प्रामुख्याने धक्कादायक, खळबळजनक किंवा अनावश्यकरीत्या वास्तविक जीवनातील लोकांचा किंवा प्राण्यांचा समावेश असलेला, हिंसक किंवा रक्तपात असलेला आशय स्टोअर किंवा वितरित करू नका. तोडलेले अवयव किंवा विद्रूप केलेल्या प्रेतांच्या क्लोज-अपचे फुटेज यांसारखे अल्ट्रा-ग्राफिक साहित्य आणि लक्षणीय प्रमाणात रक्तपात असलेल्या आशयासारखे ग्राफिक साहित्य यांचा यामध्ये समावेश आहे. आशयाला शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक संदर्भात अनुमती दिली जाऊ शकते, परंतु लोकांना हा संदर्भ समजण्यात मदत होण्यासाठी कृपया पुरेशी माहिती पुरवण्याची काळजी घ्या. काही बाबतींत, आशय एवढा हिंसक किंवा धक्कादायक असू शकतो की त्यामागे कितीही संदर्भ असला तरीही तो आशय आमच्या प्लॅटफॉर्मवर राहू दिला जाणार नाही. शेवटचे, इतरांना विशिष्ट हिंसक कृत्ये करण्यासाठी प्रोत्साहन देऊ नका.

अतिरिक्त धोरणे

आशय वितरण
Google Photos तुम्हाला व्हिडिओ आशय स्टोअर, शेअर आणि स्ट्रीम करण्याची अनुमती देते, पण व्यापक आशय वितरणासाठी वापरले जाऊ नये. मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक स्ट्रीमिंगसाठी, YouTube हा उत्तम पर्याय आहे. मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक स्ट्रीमिंगसाठी वापरले जात असल्याचे दिसून आल्यास Google Photos वापर मर्यादित करेल. वारंवार केलेल्या उल्लंघनांचा परिणाम म्हणून अतिरिक्त कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये तुमचे खाते किंवा तुमचा Google Photos चा वापर बंद करणे समाविष्ट आहे.
प्रिंट केलेल्या उत्पादनांचा आशय

प्रिंट केलेल्या उत्पादनांमधील सर्व इमेजनी कायदेशीर अधिनियम आणि आशय धोरणांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये विशिष्ट प्रकारच्या इमेज प्रिंट करण्याची अनुमती देत नाही. आम्ही खालील धोरणांचे उल्लंघन करणार्‍या इमेज असलेली कोणतीही उत्पादने प्रिंट करणार नाही.

कृपया लक्षात ठेवा की, उत्पादनामध्ये प्रिंट करण्यासाठी सबमिट केलेला कोणताही आशय या धोरणाचे उल्लंघन करतो आहे का हे ठरवण्यासाठी त्याचे पुनरावलोकन केले जाऊ शकते.

धोकादायक आणि बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी

बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटी असलेला किंवा लोकांना अथवा प्राण्यांना गंभीर आणि तत्काळ इजा पोहोचवणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटी, वस्तू, सेवा किंवा माहिती यांना प्रोत्साहन देणारा आशय आम्ही प्रिंट करणार नाही. आम्ही शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक उद्देशांनी सर्वसाधारण माहितीला परवानगी देत असलो तरीही, हानी पोहोचवणे सुलभ करणार्‍या किंवा बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटींना प्रोत्साहन देणार्‍या आशयावर आम्ही मर्यादा घालतो.

आम्ही उत्पादनांमध्ये कशाची अनुमती देत नाही याची उदाहरणे खाली दिली आहेत:

  • कॉपीराइटसह, इतर कोणत्याही व्यक्तीच्या कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या इमेज
  • धोकादायक किंवा बेकायदेशीर कृत्यांच्या सूचना दाखवणार्‍या किंवा त्यांचा समावेश असणार्‍या इमेज

छळ, गुंडगिरी आणि धमक्या

इतरांचा छळ करणारा, गुंडगिरी करणारा किंवा धमकावणारा आशय आम्ही प्रिंट करणार नाही. या कृत्यांमध्ये इतरांना सहभागी करणारा किंवा त्यांसाठी चिथावणी देणारा आशयदेखील आम्ही प्रिंट करणार नाही. एखाद्याला द्वेशयुक्त गैरवर्तनासाठी वेगळे काढणे, एखाद्याला गंभीर इजा करण्याची धमकी देणे, एखाद्याचे नको असलेल्या पद्धतीने लैंगिकीकरण करणे, धमक्या प्रत्यक्षात आणण्यासाठी वापरली जाऊ शकणारी दुसर्‍या एखाद्या व्यक्तीची खाजगी माहिती उघड करणे, हिंसा किंवा शोकात्म घटनेच्या बळींना कमी लेखणे किंवा त्यांचे महत्त्व कमी करणे, ही कृत्ये करण्यासाठी इतरांना चिथावणी देणे किंवा एखाद्याला इतर प्रकारे त्रास देणे या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. हानीसंबंधी धमक्या किंवा इतर धोकादायक परिस्थितींबद्दल आम्हाला सूचित केले गेल्यास, आम्ही योग्य ती कारवाई करू शकतो, ज्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडे तुमची तक्रार करणे, आमच्या काही उत्पादनांचा अ‍ॅक्सेस काढून टाकणे किंवा तुमचे Google खाते बंद करणे यांचा समावेश असू शकतो.

आम्ही उत्पादनांमध्ये कशाची अनुमती देत नाही याची उदाहरणे खाली दिली आहेत:

  • व्यक्ती किंवा व्यक्तींच्या गटाला त्रास देणारा, धाकदपटशा दाखवणारा किंवा त्यांच्यावर गुंडगिरी करणारा आशय

द्वेषयुक्त भाषण

आम्ही द्वेषयुक्त भाषण प्रिंट करणार नाही. द्वेषयुक्त भाषण म्हणजे असा आशय ज्याचे प्राथमिक उद्दिष्ट हे वंश किंवा वांशिक मूळ, धर्म, विकलांगत्व, वय, राष्ट्रीयत्व, अनुभवाची स्थिती, लैंगिक प्राधान्य, लिंग, लैंगिक ओळख किंवा पद्धतशीरपणे भेदभाव अथवा मागासपणाशी संबंधित इतर वैशिष्ट्यांच्या आधारावर एखादी व्यक्ती किंवा गटाबद्दल द्वेष उत्पन्न करणे, त्यांच्याविरूद्धच्या हिंसेला प्रोत्साहन देणे किंवा त्याकडे गांभीर्याने न पाहाणे हे असते.

आम्ही उत्पादनांमध्ये कशाची अनुमती देत नाही याची उदाहरणे खाली दिली आहेत:

  • वंश किंवा वांशिक मूळ, धर्म, विकलांगत्व, वय, राष्ट्रीयत्व, अनुभवाची स्थिती, लैंगिक प्राधान्य, लिंग, लैंगिक ओळख किंवा पद्धतशीरपणे भेदभाव अथवा मागासपणाशी संबंधित इतर वैशिष्ट्यांच्या आधारावर एखादी व्यक्ती किंवा गटाबद्दल द्वेष उत्पन्न करणारा आशय

लैंगिकदृष्ट्या भडक आशय

लैंगिकदृष्ट्या भडक साहित्याचा समावेश असलेला आशय आम्ही प्रिंट करणार नाही. शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक उद्देशांसाठी नग्नता आणि लैंगिक नसलेली नग्नता यांना परवानगी दिली जाऊ शकते. लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आशयाला आम्ही कधीही परवानगी देत नाही.

आम्ही उत्पादनांमध्ये कशाची अनुमती देत नाही याची उदाहरणे खाली दिली आहेत:

  • जननेंद्रियांचे वर्णन, पोर्नोग्राफी, किंवा चित्ररूपी उदाहरणे यांप्रमाणे उद्दिपित करण्याचा उद्देश असणाऱ्या ग्राफिक लैंगिक कृती असणाऱ्या इमेज
  • बतावणी करणारा असो किंवा वास्तविक, अल्पवयीन, सहमतीशिवाय केला जाणारा सेक्स किंवा अन्य बेकायदेशीर लैंगिक थीम यांचा प्रचार करणारा आशय
  • अज्ञान मुलांच्या लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणारा आशय

हिंसक संस्था आणि चळवळी

ज्ञात हिंसक गैर-सरकारी संस्था आणि चळवळींना हे उत्पादन कोणत्याही हेतूसाठी वापरण्याची परवानगी नाही. या गटांच्या अ‍ॅक्टिव्हिटी जसे की, भर्ती करणे, ऑनलाइन किंवा ऑफलाइन अ‍ॅक्टिव्हिटीचे समन्वय साधणे, मॅन्युअल किंवा हानी पोहोचवू शकणारे इतर साहित्य शेअर करणे, हिंसक गैर-सरकारी संस्थांच्या विचारसरणीचा प्रचार करणे, दहशतवादी कृत्यांचा प्रचार करणे, हिंसाचाराला उत्तेजन देणे किंवा हिंसक गैर-सरकारी संस्थांद्वारे केलेले हल्ले साजरे करणे या गोष्टी सुलभ करणारा किंवा त्यांना प्रोत्साहन देणारा आशय वितरित करू नका. आशयावर अवलंबून, आम्ही वापरकर्त्यावर कारवाईदेखील करू शकतो. हिंसक गैर-सरकारी संस्थांशी संबंधित आशयाला शैक्षणिक, माहितीपट, वैज्ञानिक किंवा कलात्मक संदर्भात अनुमती दिली जाऊ शकते, पण कृपया लोकांना संदर्भ समजण्यात मदत करण्यासाठी पुरेशी माहिती प्रदान करण्याचे लक्षात ठेवा.

हिंसा आणि रक्तपात

प्रामुख्याने धक्कादायक, खळबळजनक किंवा अनावश्यकरीत्या वास्तविक जीवनातील लोकांचा किंवा प्राण्यांचा समावेश असलेला, हिंसक किंवा रक्तपात असलेला आशय आम्ही प्रिंट करणार नाही. तोडलेले अवयव किंवा विद्रूप केलेल्या प्रेतांच्या क्लोज-अपचे फुटेज यांसारखे अल्ट्रा-ग्राफिक साहित्य आणि लक्षणीय प्रमाणात रक्तपात असलेल्या आशयासारखे ग्राफिक साहित्य यांचा यामध्ये समावेश आहे. शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक संदर्भात वापरलेला आशय आम्ही प्रिंट करू शकतो. काही बाबतींत, आशय एवढा हिंसक किंवा धक्कादायक असू शकतो की त्यामागे कितीही संदर्भ असला तरीही तो आशय प्रिंट केला जाणार नाही. अखेरीस, इतरांना विशिष्ट हिंसक कृत्ये करण्यासाठी प्रोत्साहन देणारा आशय आम्ही प्रिंट करणार नाही.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10823446058742797336
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false