हरवलेले फोटो आणि व्हिडिओ शोधणे

तुम्ही बॅकअप घेणे सुरू करता, तेव्हा तुमचे फोटो photos.google.com मध्ये स्टोअर केले जातात.

महत्त्वाचे:

पहिली पायरी: तुमचे खाते तपासा

तुम्ही दुसरे खाते वापरत असल्यास काही फोटो नाहीसे होऊ शकतात.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा. 
  3. सर्वात वरती, तुम्ही फोटोंचा बॅकअप घेतलेल्या खात्यामध्ये साइन केले आहे का, ते तपासा.

दुसरी पायरी: Facebook किंवा Instagram यांसारख्या ॲप्सवरून फोटो शोधा

तो तुमच्या डिव्हाइस फोल्डरमध्ये असू शकतो.
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तळाशी, लायब्ररी वर टॅप करा.
  3. "डिव्हाइसवरील फोटो" या अंतर्गत, तुमची डिव्हाइस फोल्डर तपासा.
तुमच्या Photos व्ह्यूमध्ये इतर अ‍ॅप्सवरील फोटो पाहण्यासाठी तुमच्या डिव्हाइस फोल्डरचा बॅकअप घ्या. तुमच्या डिव्हाइस फोल्डरचा बॅकअप कसा घ्यावा याबद्दल जाणून घ्या.

तिसरी पायरी: तुमचा फोटो हटवला आहे का हे तपासा

  • तुमचा फोटो अद्याप ट्रॅशमध्ये असल्यास, तुम्ही तो कदाचित परत मिळवू शकता. हटवलेला फोटो रिस्टोअर कसा करावा याबद्दल जाणून घ्या.
  • तुमचा फोटो ६० दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी ट्रॅशमध्ये असल्यास, फोटो कायमचा हटवला जाऊ शकतो.
  • तुम्ही दुसरे फोटो अ‍ॅप किंवा गॅलरी वापरत असल्यास आणि तेथून फोटो हटवल्यास, Google Photos ने तुमच्या फोटोचा बॅकअप घेण्याआधीच तुम्ही फोटो हटवलेला असू शकतो.

तुमचे फोटो शोधण्यासाठी इतर मार्ग वापरून पहा

तुम्ही वेगळी गॅलरी वापरत असल्यास, पण Google Photos मध्ये "जागा मोकळी करा" वर टॅप केल्यास
महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून फोटो हटवण्यापूर्वी, Google Photos ला तुमच्या फोटोचा बॅकअप घेण्याची अनुमती दिली आहे याची खात्री करा. बॅकअप कसा सुरू करावा याबद्दल जाणून घ्या.
तुम्ही Google Photos मध्ये “जागा मोकळी करा” वर टॅप केल्यास, तुमच्या डिव्हाइसमधून फोटो किंवा व्हिडिओ कदाचित हटवला गेला असेल. तथापि, तुम्हाला ते Google Photos अ‍ॅपमध्ये सापडू शकतात. तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर जागा मोकळी करता तेव्हा काय होते याबद्दल जाणून घ्या.
बॅकअप घेणे सुरू आहे का ते तपासा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुम्ही योग्य खात्यामध्ये साइन इन केले आहे याची खात्री करा.
  3. तुमचे बॅकअप स्टेटस जाणून घेण्यासाठी तुमच्या खात्याच्या प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे यांवर टॅप करा.

बॅकअप घेणे सुरू असल्यास

  • तुमचा फोटो अजूनही बॅकअपच्या प्रक्रियेत असू शकतो. तुमचे डिव्हाइस “वाय-फायची प्रतीक्षा करत आहे” असे दाखवत असल्यास किंवा तेथे एखादी संख्या असल्यास, याचा अर्थ असा असू शकतो, की तुमच्या फोटोचा बॅकअप अद्याप घेतलेला नाही.
  • तुमच्या फोटो किंवा व्हिडिओच्या फाइलचा आकार बॅकअप घेण्यायोग्य आहे याची खात्री करा. बॅकअप घेण्यायोग्य फाइलच्या आकारांबद्दल अधिक जाणून घ्या.

बॅकअप बंद असल्यास

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून फोटो हटवण्यापूर्वी, Google Photos ला तुमच्या फोटोचा बॅकअप घेण्याची अनुमती दिली आहे याची खात्री करा. बॅकअप कसा सुरू करावा याबद्दल जाणून घ्या.
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून फोटो हटवल्यास, तुम्हाला तो कदाचित रिकव्हर करता येणार नाही. Google Photos हे फोटो लगेच रिकव्हर करत नाही.
संग्रहित केलेला फोटो शोधा
तुम्ही नियमित पाहत नसलेला एखादा फोटो तुम्हाला सापडत नसल्यास, तो तुमच्या संग्रहणामध्ये असू शकतो. तुमच्या संग्रहणाबद्दल अधिक जाणून घ्या.
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुम्ही योग्य खात्यामध्ये साइन इन केले आहे याची खात्री करा.
  3. तळाशी, लायब्ररी आणि त्यानंतर संग्रहण वर टॅप करा.
फोटो किंवा व्हिडिओ शोधा

महत्त्वाचे:

  • बॅकअप सुरू असल्याची खात्री करा. तुम्ही फक्त बॅकअप घेतलेले फोटो शोधू शकता. बॅकअप कसा सुरू करावा हे जाणून घ्या.
  • तुम्ही अचानक फोटो गमवल्यास, त्यांची तारीख वेगळी असू शकते.
  • सकाळी ४ च्या आधी घेतलेले फोटो मागील दिवशी क्रमाने लावले जातात.
  • तुम्ही तारीख आणि वेळेची वेगळी सेटिंग्ज असलेल्या डिव्हाइसवरून फोटो डाउनलोड किंवा स्कॅन केल्यास, टाइमस्टॅंप चुकीचा असू शकतो. फोटोवरील टाइमस्टॅंप कसा बदलावा हे जाणून घ्या.

फोटो किंवा व्हिडिओ शोधणे

हरवलेला फोटो किंवा व्हिडिओ शोधण्यासाठी योग्य तारखा किंवा कीवर्ड शोधा. काही वेळा, तारीख आणि वेळेशी संबंधित चुकीची सेटिंग्ज असलेल्या डिव्हाइसवरून तुम्ही फोटो स्कॅन किंवा डाउनलोड करता तेव्हा, टाइमस्टॅंप वेगळा असतो. फोटोवरील टाइमस्टॅंप कसे बदलायचे ते जाणून घ्या.

अलीकडे जोडलेला फोटो किंवा व्हिडिओ शोधण्यासाठी: 

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos अ‍ॅप  उघडा.
  2. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा. 
  3. तळाशी, शोधा  वर टॅप करा.
  4. अलीकडे जोडलेले टाइप करा. 
  5. तुमचे अलीकडे जोडलेले आयटम ब्राउझ करा. 
तुमचा आयटम अलीकडे जोडलेले मध्ये नसल्यास, तुम्ही फोटोमधील व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तू शोधू शकता:
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos ॲप उघडा.
  2. तळाशी, शोधा  वर टॅप करा.
  3. तुम्हाला जे शोधायचे आहे ते टाइप करा, उदाहरणार्थ “कुत्रे”, “न्यू यॉर्क सिटी” किंवा तुम्ही तुमचे फोटो टॅग केले असल्यास, एखाद्या व्यक्तीचे नाव.
तुम्ही फोटो शोधूनदेखील न सापडल्यास, पुढील गोष्टी करून पहा:
  • वेगळा कीवर्ड वापरून शोधा.
  • तीन ते पाच दिवसांनी पुन्हा शोधा. फोटो शोधसुलभ होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

तुमचे फोटो स्टॅक्स तपासणे

तुम्हाला फोटो सापडत नसल्यास, तो फोटो स्टॅकमध्ये असू शकतो. ग्रिडमधून फोटो स्टॅकमधील सर्व फोटो शोधण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. फोटो स्टॅक वर टॅप करा.
  3. स्टॅक्स ग्रिड वर टॅप करा.
टीप: ग्रिडमध्ये, फोटोच्या गटावर कृती करण्यासाठी, तुम्ही एकाहून अधिक आयटम निवडू शकता. एकसारखे फोटो कसे स्टॅक करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1255772385654253326
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false