फोटो आणि व्हिडिओ शेअर करा

तुमच्या संपर्कांमधील कोणीही Google Photos अ‍ॅप वापरत नसले, तरीही तुम्ही त्यांच्यासोबत फोटो, व्हिडिओ, अल्बम आणि हायलाइट व्हिडिओ शेअर करू शकता.

एखाद्या संभाषणामध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com उघडा.
  2. तुमच्या Google खाते यामध्ये साइन इन करा.
  3. तुमचा कर्सर फोटो किंवा व्हिडिओवर ठेवा आणि निवडा Done वर क्लिक करा.
  4. शेअर करा Share वर क्लिक करा.
  5. "Google Photos मध्ये पाठवा" अंतर्गत, शेअर करण्यासाठी लोक निवडा.
    • एका व्यक्तीसोबत शेअर करण्यासाठी, त्यांच्या नावावर क्लिक करा.
    • विशिष्ट व्यक्तीला शोधण्यासाठी, शोधा वर क्लिक करा. त्यांचे नाव, फोन नंबर किंवा ईमेल ॲड्रेस एंटर करा.
    • गटासोबत शेअर करण्यासाठी, नवीन गट वर क्लिक करा, आणि एकाहून अधिक लोक निवडा.
    • शेअर करणे आणखी सोपे करण्यासाठी, Google लोकांना तुमच्या संवादांच्या आधारावर शेअर करण्याचे सुचवते.
  6. पर्यायी: तुमच्या शेअर केलेल्या मीडियासह पाठवण्यासाठी मेसेज लिहा.
  7. पाठवा वर क्लिक करा.

टीप: संभाषणांवर २०,००० फोटोची मर्यादा आहे.

शेअर केलेला अल्बम तयार करणे

महत्त्वाचे: तुम्ही अल्बम शेअर करता, तेव्हा अल्बमचा ॲक्सेस असलेले कोणीही फोटो पाहू शकतात आणि ते अल्बममध्ये जोडू शकतात. शेअर करण्यासंबंधित नियंत्रणे तुमच्या फोटोला आणखी गोपनीयता कशी देतात हे जाणून घ्या.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com उघडा.
  2. तुमच्या Google खाते यामध्ये साइन इन करा.
  3. डावीकडे, Photos वर क्लिक करा.
  4. तुमचा कर्सर फोटो किंवा व्हिडिओवर ठेवा आणि निवडा Done वर क्लिक करा.
  5. सर्वात वरती, यामध्ये जोडा किंवा नवीन तयार करा Add वर क्लिक करा.
  6. शेअर केलेला अल्बम आणि त्यानंतर शेअर केलेला नवीन अल्बम वर क्लिक करा.
  7. अल्बमचे शीर्षक एंटर करा.
  8. सर्वात वरती उजवीकडे, शेअर करा वर क्लिक करा.
  9. कोणासोबत अल्बम शेअर करायचा आहे ते निवडा आणि पाठवा Send वर क्लिक करा.
लिंक पाठवणे किंवा इतर ॲप्सद्वारे शेअर करणे

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या फोटोची लिंक शेअर करता, तेव्हा लिंक असलेले कोणीही ते पाहू शकतात. शेअर केलेल्या अल्बमची नियंत्रणे तुमच्या फोटोना अधिक गोपनीयता कशी देतात याविषयी जाणून घ्या.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com उघडा.
  2. तुमच्या Google खाते यामध्ये साइन इन करा.
  3. तुमचा कर्सर फोटो किंवा व्हिडिओवर ठेवा आणि निवडा Done वर क्लिक करा. 
  4. लिंक पाठवण्यासाठी, शेअर करा Share वर क्लिक करा.
  5. तुमची लिंक कशी शेअर करावी हे निवडा.
    • लिंक शेअर करण्यासाठी, लिंक तयार करा वर क्लिक करा.
    • इतर ॲप्सद्वारे शेअर करण्यासाठी, तुम्हाला वापरायचे असलेले ॲप निवडा.

तुमचे अल्बम आणि संभाषणे व्यवस्थापित करणे, त्यांचे परीक्षण करणे किंवा ती सोडणे

तुम्ही शेअर केलेले अल्बम आणि संभाषणे शोधणे
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. सर्वात वरती डावीकडे, शेअरिंग वर क्लिक करा. तुम्हाला तुमचे शेअर केलेले अल्बम, संभाषणे आणि टिप्पण्या व अलीकडे जोडलेले फोटो यांसारख्या शेअरिंग ॲक्टिव्हिटी दिसतील.
अल्बम सोडणे

महत्त्वाचे: तुम्ही शेअर केलेला अल्बम सोडता, तेव्हा तुम्ही जोडलेले सर्व फोटो, व्हिडिओ, टिप्पण्या आणि लाइक काढून टाकले जातील.

  1. अल्बमवर क्लिक करा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर अल्बम सोडा वर क्लिक करा.
संभाषण सोडणे

महत्त्वाचे: तुम्ही संभाषण सोडता, तेव्हा तुम्ही जोडलेले सर्व फोटो, व्हिडिओ, टिप्पण्या आणि लाइक काढून टाकले जातील.

  1. संभाषणावर क्लिक करा.
  2. संभाषणामध्ये, तुमच्या खात्याचा आयकन किंवा आद्याक्षरांवर क्लिक करा.
  3. तुमच्या नावाच्या शेजारी, सोडा वर क्लिक करा.

अल्बम आणि संभाषणांमधून लोक किंवा आयटम काढून टाकणे

एखादी व्यक्ती अल्बममधून काढून टाकणे

महत्त्वाचे: एखाद्या व्यक्तीला काढून टाकण्यासाठी तुम्ही अल्बमचे मालक असणे आवश्यक आहे.

  1. तुम्हाला ज्या अल्बममधून एखाद्या व्यक्तीला काढून टाकायचे आहे तो उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर पर्याय वर क्लिक करा.
  3. तुम्हाला काढून टाकायचा असलेला संपर्क शोधण्यासाठी स्क्रोल करा.
  4. आणखी More आणि त्यानंतर व्यक्तीला काढून टाका वर क्लिक करा.
फोटो आणि व्हिडिओ काढून टाकणे
  1. शेअर केलेला अल्बम किंवा संभाषण थ्रेडमध्ये, फोटो अथवा व्हिडिओवर क्लिक करा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर काढून टाका वर क्लिक करा.
टिप्पण्या आणि लाइक काढून टाकणे
  1. शेअर केलेल्या अल्बम किंवा संभाषण थ्रेडमध्ये, टिप्पणी अथवा लाइकच्या बाजूच्या तारखेवर क्लिक करा.
  2. हटवा वर क्लिक करा.

तुम्ही फोटो आणि व्हिडिओ शेअर करता तेव्हा काय होते याविषयी जाणून घ्या

तुम्ही Google Photos मध्ये संपर्काला पाठवता तेव्हा:

  • लोकांना ॲपमधील नोटिफिकेशन आणि पुश नोटिफिकेशन मिळते. तो नवीन अल्बम किंवा संभाषण असल्यास, त्यांना ईमेल नोटिफिकेशन मिळेल.
  • शेअर केलेले आयटम त्यांच्या शेअरिंग पेजवर दिसतील.
  • त्यांच्या खात्यावरील प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे अल्बम किंवा संभाषणामध्ये जोडले जाईल आणि त्यांनी अल्बम किंवा संभाषण बघेपर्यंत ते पुसट दिसतील.
  • ते अल्बम किंवा संभाषण पाहतात तेव्हा, ॲक्टिव्हिटी दृश्यामध्ये त्यांच्या खात्यावरील प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे त्यांनी पाहिलेल्या नवीनतम फोटो, टिप्पण्या किंवा लाइकच्या शेजारी दिसतील.
  • ते शेअर केलेला अल्बम किंवा संभाषणामध्ये सामील झाल्यास, लाइक केल्यास, त्यावर टिप्पणी केल्यास अथवा त्यामध्ये फोटो जोडल्यास, त्यांचा प्रोफाइल फोटो हा त्यांच्या खात्यावरील प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे यावर बदलतो.
  • यापूर्वी लिंक शेअरिंगद्वारे शेअर केलेला फोटो तुम्ही संपादित केल्यास, लोकांना मूळ लिंकद्वारे संपादित न केलेली आवृत्ती तात्पुरती पाहता येऊ शकते.
शेअर केलेले अल्बम किंवा संभाषण यांमध्ये तुम्ही फोटो अथवा व्हिडिओ जोडता, तेव्हा
  • तुम्ही जोडलेल्या सर्व फोटोवर तुमचे प्रोफाइल नाव दिसेल.
  • तुम्ही जोडलेल्या नवीनतम फोटोशेजारी तुमच्या खात्यावरील प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे दिसतील.
  • पूर्णपणे किंवा अंशतः स्लो मोशनमध्ये कॅप्चर केलेला व्हिडिओ तुम्ही शेअर केल्यास, दर्शकांना व्हिडिओचा कोणताही भाग त्यांच्या स्वतःच्या प्लेअरमध्ये आणखी हळू वेगाने पाहता येईल.
एखादी व्यक्ती तुमच्यासोबत अल्बम किंवा संभाषण शेअर करते, तेव्हा

महत्त्वाचे: एखादी व्यक्ती तुम्हाला स्पॅम करत आहे किंवा गैरवापरविषयक इतर धोरणांचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांना ब्लॉक करणे किंवा त्यांची तक्रार करणे हे करू शकता. गैरवापराविषयी आमच्या धोरणांबद्दल अधिक जाणून घ्या.

  • तुम्हाला ॲपमधील नोटिफिकेशन आणि पुश नोटिफिकेशन मिळेल. तो एक नवीन अल्बम किंवा संभाषण असल्यास, तुम्हाला ईमेल नोटिफिकेशन मिळेल.
  • शेअर केलेला आयटम तुमच्या शेअरिंग पेजवर दिसेल.
  • तुम्ही अल्बम किंवा संभाषण पाहता, तेव्हा तुमच्या खात्यावरील प्रोफाइल फोटो अथवा अल्बममधील आद्याक्षरे प्रकाशमान होतील आणि तुम्ही पाहिलेला नवीनतम फोटो, टिप्पण्या किंवा लाइक यांच्या बाजूला दिसतील.
  • तुम्ही शेअर केलेल्या अल्बम किंवा संभाषणामध्ये सामील झाल्यास, ते लाइक केल्यास, त्यावर टिप्पणी दिल्यास अथवा त्यामध्ये फोटो जोडल्यास, तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे हे तुम्ही केलेल्या कृतीच्या शेजारी दिसतील.
  • एखाद्या व्यक्तीने तुमच्यासह फोटोची लिंक शेअर केल्यानंतर तो फोटो संपादित केल्यास, मूळ लिंक शेअरिंग हे फोटोच्या नवीन आवृत्तीवर कदाचित त्वरित अपडेट होणार नाही.
तुमच्यासोबत शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करा

तुमच्यासोबत शेअर केलेला फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या लायब्ररीमध्ये त्याची प्रत मिळते. शेअर केलेला मूळ फोटो सेव्ह केल्यानंतर त्यावर केलेली कोणतीही संपादने तुमच्या सेव्ह केलेल्या प्रतीवर लागू होणार नाही. ठरावीक भागीदार शेअरिंग प्रतींव्यतिरिक्त सेव्ह केलेले फोटो आणि व्हिडिओ तुमच्या कोटामध्ये मोजले जातात. भागीदार शेअरिंगविषयी अधिक जाणून घ्या.

तुमच्या डिव्हाइस गॅलरी अ‍ॅपमध्ये फोटो आणि व्हिडिओ शोधण्यासाठी, तुम्ही ते डाउनलोड करणे आवश्यक आहे. फोटो आणि व्हिडिओ कसे डाउनलोड करावे हे जाणून घ्या.

तुमच्यासोबत संभाषणामध्ये शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी:

  1. संभाषणामध्ये, तुम्हाला सेव्ह करायच्या असलेल्या फोटो किंवा व्हिडिओवर स्क्रोल करा.
  2. फोटो किंवा व्हिडिओच्या खाली, सेव्ह करा  वर क्लिक करा.

शेअर केलेल्या अल्बममध्ये, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुमच्या लायब्ररीमध्ये फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणे: अल्बममध्ये, तुम्हाला सेव्ह करायच्या असलेल्या फोटो किंवा व्हिडिओवर क्लिक करा. सर्वात वरती, सेव्ह करा वर क्लिक करा.
  • तुमच्या लायब्ररीमधील अल्बममध्ये सर्व फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करणे: अल्बममध्ये, सर्वात वरती उजवीकडे, सेव्ह करा  वर क्लिक करा.
  • अल्बम तुमच्या अल्बम टॅबमध्ये सेव्ह करणे: अल्बममध्ये, आणखी आणि त्यानंतर अल्बम मध्ये दाखवा वर क्लिक करा.

टीप: शेअर केलेला अल्बम तुम्ही तुमच्या अल्बम टॅबमध्ये सेव्ह करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या अल्बम टॅबमध्ये अल्बमची प्रत मिळते. यामुळे अल्बममधील आशय तुमच्या लायब्ररीमध्ये सेव्ह केला जात नाही.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5879822147236652974
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false