क्रीएशन शोधणे

महत्त्वाचे: Google Photos मध्ये, तुम्ही हायलाइट व्हिडिओसह तयार करू शकाल, अशा व्हिडिओच्या प्रकारांवर आता तुमचे अधिक नियंत्रण आहे. photos.google.com वर, हायलाइट व्हिडिओ हे चित्रपटांची जागा घेतात.

हायलाइट व्हिडिओ तयार करणे

Google Photos सह, तुम्ही तुमच्या संस्मरणीय क्षणांसह झटपट हायलाइट व्हिडिओ तयार करू शकता. तुम्हाला समावेश करायचे असलेले लोक, स्थाने, थीम किंवा तारखा निवडा आणि तुमच्यासाठी हायलाइट व्हिडिओ आपोआप तयार केला जाईल.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. उपयुक्तता निवडा.
  3. “नवीन तयार करा” या अंतर्गत, हायलाइट व्हिडिओ आणि त्यानंतर नवीन हायलाइट व्हिडिओ निवडा.
  4. तुमच्या हायलाइट व्हिडिओचा विषय निवडा.
    • शोधा यासह: सर्च बॉक्समध्ये, तुमच्या हायलाइट व्हिडिओमध्ये समावेश करण्यासाठी लोक, स्थाने, थीम किंवा तारखांबद्दल काही शब्द टाइप करा. उदाहरणार्थ, “वाढदिवस”, “संग्रहालय” किंवा “जपान.”
    • सुचवलेले लोक, स्थाने आणि टाइमफ्रेमसह: सुचवलेल्या आयटममधून, “कोण”, “कुठे”, “केव्हा” आणि आणखी बऱ्याच गोष्टी निवडा.
  5. सर्वात वरती, पुढील वर क्लिक करा.
  6. सेव्ह करा वर क्लिक करा.

टीप: तुम्हाला सूचनांमध्ये हवे असलेले लोक किंवा टाइम फ्रेम आढळत नसल्यास, व्यक्ती जोडा person add किंवा तारीख रेंज date range वर क्लिक करा.

हायलाइट व्हिडिओ मॅन्युअली तयार करणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. डावीकडे, उपयुक्तता निवडा.
  3. “नवीन तयार करा” या अंतर्गत, हायलाइट व्हिडिओ आणि त्यानंतर नवीन हायलाइट व्हिडिओ निवडा.
  4. तुम्हाला हायलाइट व्हिडिओमध्ये हवे असलेले फोटो आणि व्हिडिओ निवडण्यासाठी, क्लिक करा किंवा फोटो निवडा.
  5. तुमचे फोटो किंवा व्हिडिओ निवडा.
  6. सर्वात वरती, तयार करा वर क्लिक करा.
  7. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, सेव्ह करा वर क्लिक करा.
  8. तुमचे हायलाइट व्हिडिओ पाहण्यासाठी, प्ले करा प्ले करा वर क्लिक करा किंवा हायलाइट व्हिडिओ तयार झाल्यावर सूचना मिळण्याची वाट पहा.

हायलाइट व्हिडिओ संपादित करणे

  1. तुमच्या हायलाइट व्हिडिओवर, संपादित कराEdit वर क्लिक करा.
    • संगीत बदला: संगीत वर क्लिक करा.
    • क्लिप पुन्हा क्रमाने लावा: क्लिप वेगळ्या क्रमाने लावण्यासाठी ती ड्रॅग करण्याक रिता तिला क्लिक करून धरून ठेवा. .
    • क्लिप काढून टाका: तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या क्लिपच्या शेजारी, आणखी आणखी आणि त्यानंतर काढून टाका वर क्लिक करा.
  2. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, सेव्ह करा वर क्लिक करा.

तुम्ही Google Photos वरून फोटो किंवा व्हिडिओ हटवल्यास:

  • तुम्ही तुमच्या हायलाइट व्हिडिओपैकी एखादा फोटो किंवा व्हिडिओ हटवल्यास, तुम्ही हायलाइट व्हिडिओ संपादित करत नाही, तोपर्यंत तो फोटो किंवा व्हिडिओ हायलाइट व्हिडिओमध्ये राहील.
  • तुम्ही हटवलेला फोटो किंवा व्हिडिओ असलेला हायलाइट व्हिडिओ संपादित केल्यास, तो आयटम हायलाइट व्हिडिओमधून आपोआप काढून टाकला जाईल.

फोटो आणि व्हिडिओ कसे हटवावे याविषयी जाणून घ्या.

अ‍ॅनिमेशन तयार करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. फोटोवर कर्सर फिरवा आणि दिसणाऱ्या बरोबरच्या खूणेवर क्लिक करा.
  3. आणखी कमाल ४९ फोटो निवडा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, नवीन तयार करा Create वर क्लिक करा.
  5. अ‍ॅनिमेशन निवडा.

तुमचे हायलाइट व्हिडिओ आणि अ‍ॅनिमेशन शोधणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. डावीकडे, एक्सप्लोर करा आणि त्यानंतर चित्रपट किंवा अ‍ॅनिमेशन वर क्लिक करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5077732545284759885
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false