धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवाहन दाखल करणे

आम्ही गैरवापराविषयी आमच्या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या आशयाचा अ‍ॅक्सेस प्रतिबंधित करू. प्रतिबंधित आशय आमच्या नियमांचे उल्लंघन करत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आवाहन दाखल करू शकता. गैरवापराविषयी आमच्या धोरणांबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या प्रतिबंधित आशयासाठी आवाहन दाखल करणे

शेअर केलेले अल्बम

आम्ही आमची गैरवापराविषयी धोरणे यांचे उल्लंघन करणाऱ्या, शेअर केलेल्या अल्बमचा अ‍ॅक्सेस प्रतिबंधित करू. उदाहरणार्थ, इतर वापरकर्ते तुमची मागील योगदाने अ‍ॅक्सेस करू शकत नाहीत आणि त्यात कोणतेही नवीन फोटो किंवा व्हिडिओ जोडले जाऊ शकत नाहीत.

  • आवाहन दाखल करणे:
    • तुम्ही अल्बमचे मालक असल्यास आणि अल्बम आमच्या नियमांचे उल्लंघन करत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास: तुम्ही आवाहन दाखल करू शकता. आवाहनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, photos.google.com येथे अल्बम वर जा.
    • तुम्ही अल्बमचे मालक नसल्यास आणि अल्बम आमच्या नियमांचे उल्लंघन करत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास: मालकाशी संपर्क साधा आणि त्यांना आवाहन दाखल करण्यास सांगा.
    • आवाहन मंजूर होईपर्यंत, शेअर केलेला अल्बम प्रतिबंधित राहील.
संभाषणे

आम्ही गैरवापराविषयी आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारी संभाषणे प्रतिबंधित करू. उदाहरणार्थ, इतर वापरकर्ते तुमची मागील योगदाने अ‍ॅक्सेस करू शकत नाहीत आणि त्यात कोणतेही नवीन फोटो किंवा व्हिडिओ जोडले जाऊ शकत नाहीत.

  • आवाहन दाखल करणे:
    • संभाषण आमच्या नियमांचे उल्लंघन करत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास: तुम्ही आवाहन दाखल करू शकता. आवाहनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, photos.google.com येथे संभाषणावर जा. आवाहन मंजूर होईपर्यंत, संभाषण प्रतिबंधित राहील.
फोटो आणि व्हिडिओ

आम्ही गैरवापराविषयी आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारे फोटो आणि व्हिडिओ प्रतिबंधित करू. परिणामी, इतर वापरकर्ते शेअर केलेल्या अल्बममध्ये आणि संभाषणांमध्ये हे फोटो व व्हिडिओ अ‍ॅक्सेस करू शकणार नाहीत. तो फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या लायब्ररीचा भाग राहील आणि तरीही तो डाउनलोड करता येईल अथवा हटवता येईल.

  • आवाहन दाखल करणे:
    • फोटो किंवा व्हिडिओ आमच्या नियमांचे उल्लंघन करत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास: तुम्ही आवाहन दाखल करू शकता. आवाहनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, photos.google.com येथे फोटो किंवा व्हिडिओवर जा. आवाहन मंजूर होईपर्यंत, फोटो अथवा व्हिडिओ प्रतिबंधित राहील.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17014799586715006728
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false