Google Pay चे SoundPod याद्वारे ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा वापरण्यास सुरुवात करणे

Google Pay चे SoundPod हे स्पीकर डिव्हाइसद्वारे दिल्या जाणाऱ्या ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवांचा भाग आहे, जे व्यापाऱ्यांना QR कोड पेमेंटची सूचना देते (यापुढे “ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा/SoundPod सेवा” म्हणून संदर्भित केलेले). ग्राहक व्यापाऱ्याचा संबंधित QR कोड स्कॅन करतात आणि यशस्वीरीत्या पेमेंट करतात, तेव्हा SoundPod इंस्टंट व्हॉइस सूचना प्ले करते.

महत्त्वाचे: SoundPod द्वारे ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा या टप्प्याटप्प्याने लॉंच केल्या जात आहेत. ही सेवा तुमच्या प्रदेशामध्ये कदाचित अद्याप उपलब्ध नसेल.

Google Pay चे SoundPod याद्वारे ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवांचा लाभ घेणे

  1. Google Pay for Business ॲप Google Pay उघडा.
  2. सदस्यत्व सुरू करणे:
    • बॅकस्प्लॅशवरून: सर्वात वरती, तुमच्या व्यवसाय नावाच्या खाली, सुरुवात करा वर टॅप करा.
    • “क्विक लिंक” अंतर्गत, SoundPod वर टॅप करा.
  3. प्लॅन पहा वर टॅप करा.
  4. सेवा प्लॅन निवडणे:
    • दैनिक प्लॅन: ₹४९९ रुपये एक वेळचे शुल्क, त्यानंतर तुमच्या सेटलमेंट खात्यामधून महिन्यातील २५ दिवसांसाठी दररोज ₹५ रुपये वजा केले जातात.
    • वार्षिक प्लॅन: तुमच्या सेटलमेंट खात्यामधून एका वर्षासाठी ₹१४९९ रुपये (₹५०० वाचवा) वजा केले जातात.
    • टीप: तुम्ही ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवांसाठी निवडलेले वरीलपैकी कोणत्याही प्रकारचे सदस्यत्व हे अ‍ॅक्टिव्हेशनच्या तारखेपासून सुरू होते आणि दरवर्षी दिले जाते. वर नमूद केलेल्या सेवा प्लॅनमध्ये करांचा समावेश आहे.
    • टीप: तुम्हाला GPay QR कोडद्वारे एका महिन्यात ४०० पेमेंट मिळतात, तेव्हा ₹१२५ रुपयांच्या कॅशबॅकची हमी दिली जाते.
  5. पुढे सुरू ठेवा वर टॅप करा.
  6. दैनिक सेटलमेंट सुरू करा वर टॅप करा.
  7. पेमेंट प्रोफाइल निवडा.
    • सद्य प्रोफाइल निवडणे: तुम्हाला वापरायच्या असलेल्या प्रोफाइलवर टॅप करा.
    • नवीन प्रोफाइल तयार करणे: पेमेंट प्रोफाइल तयार करा वर टॅप करा. त्यानंतर, खाते माहिती एंटर करा.
  8. सबमिट करा वर टॅप करा.
  9. तुमच्या सदस्यत्वाचे तपशील आणि SoundPod च्या डिलिव्हरीची अपेक्षित तारीख यांचे पुनरावलोकन करा.
  10. पूर्ण झाले वर टॅप करा.
SoundPod सेवेचे सदस्यत्व आणि सेवा प्लॅनचे तपशील यांचे पुनरावलोकन करणे

तुमचे SoundPod मिळण्यापूर्वी त्या SoundPod सेवेच्या सदस्यत्वाचे पुनरावलोकन करण्यासाठी:

  1. Google Pay for Business ॲप Google Pay उघडा.
  2. सर्वात वरती, "तुमचे SoundPod बुक केले आहे" असे नमूद केलेले कार्ड शोधा.
  3. तपशील पहा वर टॅप करा.
    • तुम्हाला ते सापडत नसल्यास: “क्विक लिंक” अंतर्गत, SoundPod वर टॅप करा.

तुम्ही तुमचे SoundPod डिव्हाइस सेट केल्यानंतर त्याच्या प्लॅनचे स्टेटस आणि तपशील तपासण्यासाठी:

  1. अ‍ॅपमध्ये, “क्विक लिंक” अंतर्गत, SoundPod वर टॅप करा.
  2. तुमच्या प्लॅनच्या तपशिलांचे पुनरावलोकन करणे:
    • प्लॅनचे स्टेटस: ॲक्टिव्ह किंवा इनॅक्टिव्ह
    • तुमचा प्लॅन: दैनिक किंवा वार्षिक पेमेंट प्लॅन आणि दर
    • डिव्हाइस आयडी
तुमच्या SoundPod सेवेच्या सदस्यत्वाबद्दल

SoundPod किटमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • SoundPod स्पीकर
  • चार्जिंग केबल
  • सिम कार्ड
  • कस्टम QR कोड

ऑडिओ सूचना देणारी सेवा ही ६ महिन्यांच्या सेवा हमीसह येते. SoundPod द्वारे ऑडिओ सूचना देणारी सेवा ज्या दिवसापासून अ‍ॅक्टिव्हेट केली जाते, तेव्हापासून सेवा हमी सुरू होते.

SoundPod द्वारे ऑडिओ सूचना देणारी सेवा अ‍ॅक्टिव्हेट केली गेल्यानंतर, तुम्हाला आधीच वजा केलेल्या सेवा शुल्कांचा परतावा मिळणार नाही.

ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवांचा लाभ घेण्यासाठी SoundPod डिव्हाइस सेट करणे

  1. SoundPod डिव्हाइस सुरू करण्यासाठी, पॉवर की ३ सेकंदांसाठी प्रेस करून धरून ठेवा.
  2. SoundPod सुरू होऊन कनेक्ट झाल्यावर, हिरव्या रंगाचा LED लाइट चमकेल.
  3. SoundPod 4G सह नेटवर्कची क्षमता दाखवेल.
  4. तुम्हाला २ व्हॉइस सूचना मिळतील: “Google Pay चे SoundPod यामध्ये स्वागत आहे” आणि “नेटवर्कशी कनेक्ट केले आहे.”

SoundPod कनेक्ट झाल्यानंतर, हे डिव्हाइस तुम्हाला QR कोडद्वारे केलेल्या यशस्वी व्यवहारांविषयी सूचित करण्यास सुरुवात करेल.

तुम्हाला SoundPod मिळाल्यानंतर व ते सेट केल्यानंतर, तुम्ही निवडलेल्या ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा प्लॅनचे स्टेटस आणि तपशील यांचे पुनरावलोकन करणे हे करा.

SoundPod ऑपरेट करणे

Diagram of SoundPod device.

Google Pay चे SoundPod यावर ४ की आहेत:

  • पॉवर: डिव्हाइस सुरू करण्यासाठी प्रेस करून धरून ठेवा.
  • व्‍हॉल्‍यूम जास्‍त:
    • डिव्हाइसचा आवाज वाढवण्यासाठी प्रेस करा.
    • आवाज कमाल मर्यादेपर्यंत वाढवण्यासाठी प्रेस करून धरून ठेवा.
  • व्‍हॉल्‍यूम कमी:
    • डिव्हाइसचा आवाज कमी करण्यासाठी प्रेस करा.
    • आवाज किमान मर्यादेपर्यंत कमी करण्यासाठी प्रेस करून धरून ठेवा.
  • मेनू:
    • शेवटचा व्यवहार प्ले करण्यासाठी एकदा प्रेस करा.
    • शेवटचे ३ व्यवहार प्ले करण्यासाठी दोनदा प्रेस करा.
    • वन-टाइम पासवर्ड (OTP) दाखवण्यासाठी प्रेस करून धरून ठेवा.
    • त्याचा टर्मिनल आयडी (TID) दाखवण्यासाठी मेनू प्रेस करून धरून ठेवा आणि सोबत व्‍हॉल्‍यूम जास्‍त एकदा प्रेस करा.
    • त्याच्या फर्मवेअरची आवृत्ती प्रदर्शित करण्यासाठी मेनू प्रेस करून धरून ठेवा आणि सोबत व्‍हॉल्‍यूम जास्‍त दोनदा प्रेस करा.

इन्व्हॉइस पाहणे आणि डाउनलोड करणे

SoundPod सेवांच्या शुल्कांसाठीचे इन्व्हॉइस डाउनलोड करण्याकरिता:

  1. Google Pay अ‍ॅपमध्ये, इन्व्हॉइसवर नेव्हिगेट करा.
    • पर्याय १: “क्विक लिंक” अंतर्गत, SoundPod वर टॅप करा. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर इन्व्हॉइस वर टॅप करा.
    • पर्याय २: सेटिंग्ज आणि त्यानंतर इन्व्हॉइस वर जा.
  2. फक्त SoundPod शी संबंधित व्यवहारांचे इन्व्हॉइस पाहण्यासाठी, SoundPod वर टॅप करा.
  3. तुम्हाला पाहायच्या असलेल्या इन्व्हॉइसवर टॅप करा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, डाउनलोड करा Download documents वर टॅप करा.

SoundPod शी संबंधित व्यवहार पाहणे

तुम्ही Google Pay for Business अ‍ॅपमध्ये SoundPod शी संबंधित व्यवहार पाहू शकता.

महत्त्वाचे: SoundPod शी संबंधित व्यवहार म्हणजे SoundPod द्वारे दिल्या जाणाऱ्या ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवांसाठी वजा केलेली सेवा शुल्के.

अ‍ॅपच्या होमपेजवर ठरावीक कालावधीसाठीचा व्यवहाराचा सारांश दाखवला जातो.

  • मागील दिवस, आठवडा किंवा महिन्याचा सारांश पाहण्यासाठी, १ दिवस, ७ दिवस अथवा ३० दिवस वर टॅप करा.
  • विशिष्ट व्यवहाराचे तपशील पाहण्यासाठी, त्या व्यवहारावर टॅप करा.

तुम्हाला तुमच्या व्यवहाराच्या इतिहासामध्ये “SoundPod शुल्‍क कपात” हे लेबल लावलेल्या ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा शुल्काच्या कपाती दिसतील.

तुम्ही कपातीबद्दलचे तपशील पाहण्यासाठी त्या व्यवहारावर टॅप करू शकता.

ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवांचा लाभ घेणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी कॅशबॅक मोहीम

तुम्ही कॅशबॅक मिळवण्यासाठी, सक्रियपणे SoundPod द्वारे ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवांचा लाभ घेतला पाहिजे आणि GPay QRs द्वारे ४०० किंवा त्याहून अधिक व्यवहार स्वीकारले पाहिजेत. वरील आवश्यकता पूर्ण केल्यावर, तुम्हाला “ऑफर आणि रिवॉर्ड” या विभागामध्ये ₹१२५ रुपये किमतीच्या स्क्रॅच कार्डद्वारे कॅशबॅक मिळतात.

स्क्रॅच कार्ड २८ दिवसांसाठी वैध असते. स्क्रॅच कार्ड वैधता कालावधीमध्ये रिडीम न केल्यास, एक्स्पायर होते.

महत्त्वाचे:

  • मोहिमेच्या पात्रतेसाठी एका कॅलेंडर महिन्यात एका वापरकर्त्याकडील फक्त कमाल ३० व्यवहारांची गणना केली जाते.
  • अयशस्वी झालेले व्यवहार हे पात्र व्यवहार मानले जात नाहीत.
  • मोहीम ही येथे दिलेल्या अतिरिक्त अटींच्या अधीन असेल.

SoundPod द्वारे ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा रद्द करणे

SoundPod द्वारे ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा रद्द करण्यासाठी किंवा तुमच्या रद्द केलेल्या ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवांबद्दल माहिती मिळवण्यासाठी, Google ग्राहक सपोर्टच्या +१-८००-३०९-७५९७ या टोल-फ्री नंबरवर कॉल करा.

महत्त्वाचे: तुम्ही तुमचे सदस्यत्व रद्द केल्यास किंवा खाली दिलेल्या कोणत्याही कारणामुळे Google ने तुमचे सदस्यत्व रद्द केल्यास, तुम्ही आधीच भरलेल्या सेवा शुल्काचा परतावा मिळवण्यासाठी पात्र नसाल. तुम्हाला इतर सर्व अ‍ॅक्सेसरीसोबत ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवेचा भाग म्हणून दिलेले SoundPod आमच्या एजंटला व्यवस्थित काम करणाऱ्या आणि पूर्णपणे कार्यक्षम स्थितीत परत करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही Soundpod परत न केल्यास, कायद्याने परवानगी दिल्यानुसार आवश्यक कृती करण्याचा हक्क Google राखून ठेवते.

पुढील कारणांसह विविध कारणांमुळे ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात:

  • तुम्ही ग्राहक सपोर्टला तुमच्या ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा रद्द करण्यास सांगितले असणे.
  • पहिल्यांदा शुल्क मिळाले नाही त्या दिवसापासून ३० दिवसांसाठी Google ला दैनिक सेटलमेंटसह सेवा शुल्के गोळा करता न येणे.
  • तुमची व्यापारी प्रोफाइल इनॅक्टिव्ह असणे.
  • तुमचे व्यापारी खाते बंद केले गेले असणे.
  • तुमची पेमेंट प्रोफाइल इनॅक्टिव्ह असणे.
  • तुम्ही Google Pay for Business प्रोग्राम भंग केला असणे: अतिरिक्त सेवा अटी.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQS)

मी १० दिवस माझे दुकान बंद ठेवल्यास आणि दैनिक प्लॅनची निवड केली असल्यास, सेवा शुल्क कसे वजा केले जाईल?

तुम्ही तुमचे दुकान तात्पुरते बंद ठेवल्यास, ते पुन्हा उघडाल त्या दिवशीच्या दैनिक सेटलमेंटमधून बंद ठेवलेल्या दिवसांचे आणि तुम्ही पुन्हा उघडले त्या दिवसाचे सेवा शुल्क वजा केले जाईल.

उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे दुकान १० दिवस बंद ठेवल्यास:

  • १० दिवस * ₹५ रुपये = ₹५० रुपये सेवा शुल्क देणे बाकी आहे
  • उघडले त्या तारखेचे ₹५ रुपये सेवा शुल्क
  • तुम्ही दुकान उघडाल त्या दिवशी दैनिक सेटलमेंटमधून सेवा शुल्क म्हणून एकूण ₹५५ रुपये वजा केले जातील
मी महिन्याच्या मध्यावर दैनिक प्लॅन सुरू केल्यास, सेवा शुल्क कसे वजा केले जाईल?

तुम्ही SoundPod द्वारे ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा सेट करता त्या दिवसापासून दैनिक सेवा शुल्क सुरू होते.

उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या SoundPod द्वारे ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा २० जुलैला सेट केल्यास, तुमच्या Google Pay सेटलमेंट खात्यामधून संबंधित दिवशी दैनिक सेटलमेंटच्या वेळी २० जुलैपासून ३१ जुलैपर्यंत दररोज ₹५ रुपये शुल्‍क (करांसह) आणि ₹४९९ रुपये (करांसह) चे एक वेळचे शुल्क डेबिट केले जाईल.

त्यानंतरच्या महिन्यांसाठी, ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवांकरिता महिन्याच्या पहिल्या दिवसापासून दररोज सेवा शुल्क (म्हणजे ₹५ रुपये) वजा केले जातील. ₹१२५ रुपये देईपर्यंत ते दररोज (रविवार वगळता) सुरू राहतील.

मला SoundPod सूचनेची भाषा कशी बदलता येईल?

ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवांचा भाग म्हणून दिलेले Google Pay चे SoundPod हे एकाहून अधिक प्रादेशिक भाषांना सपोर्ट करते:

  • इंग्रजी
  • हिंदी
  • बंगाली
  • मराठी
  • तमिळ
  • गुजराती
  • कन्नड

इंग्रजी आणि हिंदी यादरम्यान टॉगल करण्यासाठी:

  1. मेनू मोडमध्ये एंटर करण्यासाठी, मेनू बटण प्रेस करून धरून ठेवा.
  2. भाषा मेनूवर नेव्हिगेट करण्यासाठी, व्‍हॉल्‍यूम जास्‍त बटण प्रेस करा.
  3. भाषा मेनू मोडमध्ये एंटर करण्यासाठी, मेनू बटण प्रेस करून धरून ठेवा.
  4. भाषा “इंग्रजी” वरून “हिंदी” वर किंवा त्याउलट नेव्हिगेट करण्यासाठी, व्‍हॉल्‍यूम जास्‍त बटण प्रेस करा.
  5. कोणतीही भाषा सेट करण्यासाठी, मेनू बटण दोनदा प्रेस करा. हे ४ सेकंदांच्या आत करणे आवश्यक आहे अन्यथा ते सद्य सेटिंगवर परत जाईल.

टीप: बाय डीफॉल्ट, SoundPod इंग्रजी आणि हिंदी या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला बंगाली, मराठी, तमिळ, गुजराती किंवा कन्नड यासारख्या प्रादेशिक भाषेवर स्विच करायचे असल्यास, तुम्ही इंस्टॉलेशनच्या वेळी भाषा बदलू शकता.

अधिक मदतीसाठी, सपोर्टशी संपर्क साधणे हे करा.

SoundPod डिव्हाइसचे काही नुकसान झाल्यामुळे किंवा त्याच्या कार्यक्षमतेशी संबंधित समस्येमुळे ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवांमध्ये कोणतेही व्यत्यय आल्यास, डिव्हाइस बदलण्यासाठी माझ्याकडून शुल्क आकारले जाईल का?

डिव्हाइसने काम करणे थांबवल्यास, कृपया सपोर्टशी संपर्क साधणे हे करा.

तुम्ही सेवा हमीच्या कालावधीमध्ये उत्पादनाशी संबंधित अशा दोष किंवा नुकसानाबद्दल तक्रार केली असेल, ज्यासाठी तुम्ही कारणीभूत नाही, तर बदली सपोर्ट सेवांकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हमी कालावधी संपल्यानंतर, डिव्हाइस बदलणे आवश्यक असल्यास, नवीन डिव्हाइससाठी तुमच्याकडून करांसह ₹४०० रुपये आकारले जातील.

ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवेसाठी ती सेट केल्याच्या तारखेपासून ६ महिन्यांची सेवा हमी आहे.

हमीमध्ये पुढील गोष्टी कव्हर होतात:

  • उत्पादनाशी संबंधित असा दोष आणि नुकसान, ज्यासाठी तुम्ही कारणीभूत नाही

परंतु, हमीमध्ये पुढील गोष्टींमुळे झालेले नुकसान कव्हर होत नाही:

  • पाण्यात पडणे
  • खाली पडणे
  • चुकीचा वीजपुरवठा करणे
  • तुम्ही इतर गैरवापर किंवा फेरबदल करणे

नुकसानासाठी तुम्ही जबाबदार आहात की नाही याबाबतचा Google किंवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधीचा निर्णय अंतिम असेल.

मला नुकसान झालेले SoundPod मिळाले आहे, मी काय करू?

तुम्हाला नुकसान झालेले SoundPod डिव्हाइस मिळाल्यास, तुम्ही उपयोजनाच्या तारखेपासून ४८ तास किंवा २ दिवसांच्या आत सपोर्टशी संपर्क साधणे आणि उपयोजनाच्या तारखेपासून ४ दिवस किंवा ७२ तासांच्या आत नुकसान झालेल्या डिव्हाइसच्या इमेज शेअर करणे आवश्यक आहे. आमच्या तज्ञांच्या टीमने डिव्हाइस सदोष असल्याचे म्हटल्यास, तुम्हाला बदली डिव्हाइस मिळेल.

मला ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा रद्द करायच्या असून, SoundPod परत करायचे आहे, मला परतावा कसा मिळेल?

ऑडिओ सूचना देणाऱ्या सेवा सेट केल्यानंतर कोणतेही परतावे दिले जात नाहीत. तुम्‍हाला तरीही सेवा रद्द करून Soundpod डिव्‍हाइस परत करायचे असल्‍यास, रद्द करण्‍याची विनंती केल्‍यानंतर एजंट डिव्‍हाइस गोळा करतील.

सपोर्टशी संपर्क साधणे

अधिक मदत आणि माहितीसाठी, Google ग्राहक सपोर्टच्या +१-८००-३०९-७५९७ या टोल फ्री नंबरवर कॉल करा. आमचे सपोर्ट एजंट दिवसाचे २४ तास, आठवड्याचे ७ दिवस उपलब्ध असतात.

मुख्य मेनू
9051976394600060090
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
5095468
false
false