सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

तुमचे रीअल-टाइम स्थान इतरांसोबत शेअर करणे

Google स्थान शेअरिंग सह, तुमचे स्थान कोणाला दिसू शकते आणि तुम्हाला तुमचे स्थान किती वेळ शेअर करायचे हे तुम्ही निवडू शकता.

टीप: इतर Google उत्पादनेदेखील तुम्हाला इतरांसोबत एका वेळेचे स्थान शेअर करू देऊ शकतात. 

तुम्ही तुमचे स्थान ज्यांच्याशी शेअर करता ते लोक नेहमी पुढील गोष्टी पाहू शकतात:

  • तुमचे नाव आणि फोटो.
  • Google ॲप्स वापरली जात नसतानाही तुमच्या डिव्हाइसचे सध्याचे स्थान.
  • तुमच्या डिव्हाइसची बॅटरी पॉवर आणि ते चार्ज होत आहे का.
  • त्यांनी स्थान शेअरिंग सूचना जोडल्यास, तुमची आगमन आणि प्रस्थान वेळ.

तुम्ही कसे शेअर करत आहात त्यानुसार ते कदाचित इतर माहितीदेखील पाहू शकतील.

स्थान शेअरिंग उपलब्धता

स्थान इतिहास बंद केला असला, तरीही स्थान शेअरिंग काम करते.

तुम्ही स्थान शेअरिंग उघडाल, तेव्हा तुम्हाला चेतावणी दिसू शकते. सामान्य कारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

स्थान शेअरिंग तुमच्यासाठी काम करत नसल्यास, आम्हाला फीडबॅक पाठवा.

महत्त्वाचे: स्थान शेअरिंग द्वारे तुमचे रीअल-टाइम स्थान शेअर करण्यासाठी तुम्ही मोबाइल डिव्हाइस वापरणे आवश्यक आहे. तथापि, तुम्ही तुमची स्थान शेअरिंग सेटिंग्ज कॉंप्युटरवरून नियंत्रित करू शकता. तुमचा Android फोन किंवा टॅबलेट अथवा iPhone किंवा iPad यांवरून तुमचे स्थान कसे शेअर करावे हे जाणून घ्या.

एखाद्या व्यक्तीचे स्थान शोधा

एखादी व्यक्ती तुमच्यासोबत तिचे स्थान शेअर करते तेव्हा, तुम्हाला ती तुमच्या नकाशावर दिसू शकते.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps Maps उघडा.
  2. मेनू Menu आणि त्यानंतर स्थान शेअरिंग वर क्लिक करा.
  3. एखादी व्यक्ती निवडा.

एखाद्या व्यक्तीचे स्थान दाखवा किंवा लपवा

तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे रीअल-टाइम स्थान तुमच्या नकाशावर नको असल्यास, तुम्ही ते लपवू शकता. तुम्ही तिचे स्थान पुन्हा कधीही सुरू करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google MapsMaps उघडा.
  2. मेनू Menu आणि त्यानंतर स्थान शेअरिंग वर क्लिक करा.
  3. तिच्या आयकनवर टॅप करा.
  4. एखाद्या व्यक्तीला तात्पुरते लपवण्यासाठी, नकाशावरून लपवा वर टॅप करा.

टीप: तुम्ही एखाद्या व्यक्तीचे स्थान तुमच्या नकाशावरून कायमचे ब्लॉक करू शकता. दुसऱ्या व्यक्तीचे खाते कसे ब्लॉक करावे करणे हे जाणून घ्या.

एखाद्या व्यक्तीचे तुम्ही लपवलेले स्थान सुरू करा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps Maps उघडा.
  2. मेनू Menuआणि त्यानंतर स्थान शेअरिंग वर क्लिक करा.
  3. एखाद्या व्यक्तीच्या शेजारी असलेल्या लपवा या आयकनवर कर्सर फिरवा.
  4. नकाशावर दाखवा वर क्लिक करा.

शेअर करणे थांबवा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, तुमची स्थान शेअरिंग सेटिंग्ज उघडा.
  2. तुम्‍हाला ज्‍या व्‍यक्‍तीसोबत शेअर करणे थांबवायचे आहे, तिच्या शेजारी काढून टाका Remove वर क्लिक करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
296870626683454919
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false