सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

पार्किंगची स्थाने शोधणे आणि सेव्ह करणे

तुम्ही ड्रायव्हिंग सुरू करण्यापूर्वी, तुम्ही तुमची कार पार्क करण्यासाठी ठिकाणे शोधू शकता. तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर, तुम्ही तुमचे पार्किंगचे स्थान सेव्ह करू शकता जेणेकरून, तुम्हाला ते नंतर शोधता येईल.

टिपा:

  • तुम्ही फक्त यू.एस. मधील काही शहरांमध्ये तुमच्या गंतव्यस्थानाजवळ पार्किंग शोधू शकता.
  • तुम्ही पार्क करण्यासाठी iPhone किंवा iPad वर ठिकाणे शोधू शकत नाही.

तुमच्या मार्गावर पार्किंग लॉट किंवा गॅरेज जोडणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सर्वात वरती, गंतव्यस्थान शोधा.
  3. तळाशी, दिशानिर्देश वर टॅप करा.
  4. तळाशी, पायऱ्या आणि पार्किंग वर टॅप करा. 
  5. गंतव्यस्थानाजवळ पार्किंग शोधा वर टॅप करा.
  6. पार्किंग लॉट किंवा गॅरेज निवडा आणि पार्किंग जोडा वर टॅप करा.
  7. तळाशी, सुरू करा वर टॅप करा.

तुम्ही जेथे पार्क केले आहे ते स्थान सेव्ह करणे

तुम्ही तुमचे पार्किंगचे स्थान सेव्ह करू शकता जेणेकरून, तुम्ही कार कुठे पार्क केली आहे ते तुमच्या लक्षात राहील.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचे स्थान दाखवणाऱ्या निळ्या बिंदूवर टॅप करा.
  3. तुमचे पार्किंगचे स्थान सेव्ह करा वर टॅप करा.

तुम्ही तुमचे पार्किंगचे स्थान काढून टाकेपर्यंत ते Google Maps मध्ये सेव्ह केले जाईल.

तुमचे पार्किंगचे स्थान हलवणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. शोध बार आणि त्यानंतर पार्किंगचे स्थान वर टॅप करा.
  3. तळाशी, पार्किंगचे स्थान आणि त्यानंतर स्थान बदला वर टॅप करा.

Maps वरून तुमचे पार्किंगचे स्थान काढून टाकण्यासाठी, साफ करा Clear वर टॅप करा.

तुमच्या पार्किंगच्या स्थानाविषयी टिपा जोडणे

तुमची कार कोणत्या मजल्यावर आहे किंवा किती वेळ बाकी आहे यासारख्या माहितीबद्दल तुम्ही फोटो आणि टिपा जोडू शकता.
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. शोध बार आणि त्यानंतर पार्किंगचे स्थान वर टॅप करा.
  3. फोटो किंवा टीप जोडण्यासाठी, अधिक माहिती वर टॅप करा.

तुमचे पार्किंगचे स्थान इतरांसोबत शेअर करणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. शोध बार आणि त्यानंतर पार्किंगचे स्थान वर टॅप करा.
  3. अधिक माहिती आणि त्यानंतर शेअर करा शेअर करा वर टॅप करा.

तुम्ही कुठे पार्क केले आहे ते शोधणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. शोध बार आणि त्यानंतर पार्किंगचे स्थान वर टॅप करा.
  3. तळाशी, दिशानिर्देश Directions वर टॅप करा.

Google Maps वापरून पार्किंगचे पैसे भरा

  1. तुमच्या पार्किंग स्पॉटपर्यंत ड्राइव्ह करा.
  2. तळाशी, पार्किंग चे पैसे भरा वर टॅप करा.
  3. Google Pay उघडल्यानंतर, तुम्ही तुमच्या पार्किंगचे पैसे भरू शकता.

Google Pay बद्दल अधिक जाणून घ्या.

सूचना सुरू किंवा बंद करणे

तुम्ही कुठे आणि किती वेळासाठी पार्क केले यांसारख्या पार्किंगसंबंधित माहितीच्या सूचना तुम्ही मिळवू शकता.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह  आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. सूचना आणि त्यानंतर ठिकाणे वर टॅप करा.
  4. खाली स्क्रोल करा, त्यानंतर सेव्ह केलेले पार्किंग सुरू किंवा बंद करा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18417061829698290663
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false