सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

Google Maps टाइमलाइन

तुमची टाइमलाइन व्यवस्थापित करा

Google Maps टाइमलाइन म्हणजे असा वैयक्तिक नकाशा, जो तुमच्या स्थान इतिहासाच्या आधारावर तुम्ही वापरलेले मार्ग आणि केलेले प्रवास व तुम्ही भेट दिलेली ठिकाणे लक्षात ठेवण्यात तुम्हाला मदत करतो. तुम्ही तुमची टाइमलाइन कधीही संपादित करू शकता आणि टाइमलाइन मधील तुमचा स्थान इतिहास हटवू शकता.

तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी यांसारखी सेटिंग्ज सुरू केली असल्यास व स्थान इतिहास बंद केल्यास किंवा स्थान इतिहास यामधून स्थान डेटा हटवल्यास, तुमच्या इतर Google Sites, अ‍ॅप्स आणि सेवांच्या वापराचा भाग म्हणून स्‍थान डेटा अजूनही तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला असू शकतो. या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये तुमच्या डिव्हाइसच्या सर्वसाधारण भागावरील आणि आयपी अ‍ॅड्रेसवरील तुमच्या स्थानाबद्दलच्या माहितीचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ, तुमचे वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू असते, तेव्हा स्थान डेटा हा Search व Google Maps वरील अ‍ॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून सेव्ह केला जाऊ शकतो आणि तुमच्या कॅमेरा अ‍ॅप सेटिंग्जनुसार तुमच्या फोटोमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.

तुमचे प्रवास शोधा

तुम्ही किती दूरचा प्रवास केला आहे आणि तुम्ही कोणत्या मार्गाने प्रवास केला आहे, जसे की चालणे, बाइक चालवणे, वाहन चालवणे किंवा सार्वजनिक वाहतूक वापरणे हे तुम्ही शोधू शकता. टाइमलाइन तुमच्या देश किंवा प्रदेशावर आधारित अंतर मैल किंवा किलोमीटरमध्ये मोजते.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. तुम्ही तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर वापरत असलेल्या Google खात्यानेच साइन इन करा.
  3. सर्वात वर डावीकडे, मेनू मेनू वर क्लिक करा.
  4. टाइमलाइन Timeline वर क्लिक करा.
  5. दुसरी तारीख शोधण्यासाठी, सर्वात वरती, दिवस, महिना आणि वर्ष निवडा.

टाइमलाइनवर तुमचे घर आणि ऑफिस शोधा

तुम्ही तुमचे घर आणि ऑफिसचे पत्ते सेव्ह केले असल्यास, ते टाइमलाइन वर दिसतील. टाइमलाइन व्यतिरिक्त, ही माहिती इतर Google उत्पादने आणि सेवांमध्येदेखील वापरली जाऊ शकते.

तुमच्या घराचे आणि ऑफिसचे पत्ते कसे सेट करायचे ते जाणून घ्या.

टीप: तुम्ही अलीकडे भेट दिलेली ठिकाणे शोधण्यासाठी, सेव्ह केलेले ठिकाण सेव्ह करा आणि त्यानंतर भेट दिलेले वर क्लिक करा.

टाइमलाइन संपादित करा

तुमच्या टाइमलाइन वर एखादे ठिकाण चुकीचे असल्यास, तुम्ही स्थान आणि तुम्ही तेथे कधी होतात ते संपादित करू शकता. 

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, टाइमलाइन वर जा.
  2. तुम्हाला टाइमलाइन वर बदलायचे असलेले ठिकाण शोधा आणि डाउन अ‍ॅरो डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  3. बरोबर ठिकाण निवडा किंवा शोध बॉक्समध्ये ठिकाण शोधा.
  4. तुम्ही तेथे कधी होतात ते संपादित करण्यासाठी, वेळ वर क्लिक करा.
दिवस हटवा
महत्त्वाचे: तुम्ही टाइमलाइन मधून स्थान इतिहास याची माहिती हटवता, तेव्हा भविष्यात तुम्ही ती पाहू शकणार नाही. तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी यांसारखी इतर सेटिंग्ज सुरू केल्यास आणि स्थान इतिहास हटवल्यास, तुमच्या इतर Google Sites, अ‍ॅप्स आणि सेवांच्या वापराचा भाग म्हणून स्‍थान डेटा अजूनही तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला असू शकतो. उदाहरणार्थ, तुमचे वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू असते, तेव्हा स्थान डेटा Search आणि Maps वरील अ‍ॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून सेव्ह केला जाऊ शकतो व तुमच्या कॅमेरा अ‍ॅप सेटिंग्जनुसार तुमच्या फोटोमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, टाइमलाइन वर जा.
  2. तुम्हाला हटवायच्या असलेल्या दिवसावर क्लिक करा.
  3. डावीकडील पॅनलमध्ये, सर्वात वरती उजवीकडे जा आणि हटवा हटवा वर क्लिक करा.
  4. दिवस हटवा वर क्लिक करा.
स्थान इतिहास हटवा
महत्त्वाचे: तुम्ही टाइमलाइन मधून स्थान इतिहास याची माहिती हटवता, तेव्हा भविष्यात तुम्ही ती पाहू शकणार नाही. तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी यांसारखी इतर सेटिंग्ज सुरू केल्यास आणि स्थान इतिहास हटवल्यास, तुमच्या इतर Google Sites, अ‍ॅप्स आणि सेवांच्या वापराचा भाग म्हणून स्‍थान डेटा अजूनही तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला असू शकतो. उदाहरणार्थ, तुमचे वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू असते, तेव्हा स्थान डेटा Search आणि Maps वरील अ‍ॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून सेव्ह केला जाऊ शकतो व तुमच्या कॅमेरा अ‍ॅप सेटिंग्जनुसार तुमच्या फोटोमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.

स्थान इतिहास हटवण्यासाठी:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, टाइमलाइन वर जा.
  2. तळाशी उजवीकडे, हटवा हटवा वर क्लिक करा. तुम्ही सेटिंग्ज सेटिंग्जआणि त्यानंतर सर्व स्थान इतिहास हटवा वरदेखील क्लिक करू शकता.
  3. स्थान इतिहास हटवा वर क्लिक करा.

 

तुमचा स्थान इतिहास आपोआप हटवा

तुम्ही ३ महिने, १८ महिने किंवा ३६ महिन्यांपेक्षा जुना स्थान इतिहास आपोआप हटवू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, टाइमलाइन वर जा.
  2. तळाशी उजवीकडे, सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर स्थान इतिहास आपोआप हटवा वर क्लिक करा.
  3. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

स्थान इतिहास सुरू किंवा बंद करणे

तुम्ही स्थान इतिहास सुरू करता, तेव्हा Google अ‍ॅप्स वापरली जात नसली, तरीही तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान तुमच्या डिव्हाइसवर आणि Google च्या सर्व्हरवर नियमितपणे सेव्ह केले जाते आणि तुमची टाइमलाइन तयार केली जाते.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, टाइमलाइन वर जा.
  2. सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर स्थान इतिहास सुरू करा किंवा स्थान इतिहास बंद करा वर क्लिक करा.

तुमचा स्थान इतिहास कसा व्यवस्थापित करायचा याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही नियंत्रक आहात

तुम्ही तुमच्या डेटाचे आणि येथे करत असलेल्या कोणत्याही निवडींचे activity.google.com येथे किंवा तुमच्या टाइमलाइन वर कधीही पुनरावलोकन करू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4879260594237391906
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false