सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

Google Maps टाइमलाइन

तुमची टाइमलाइन व्यवस्थापित करा

Google Maps टाइमलाइन म्हणजे असा वैयक्तिक नकाशा, जो तुमच्या स्थान इतिहासाच्या आधारावर तुम्ही वापरलेले मार्ग आणि केलेले प्रवास व तुम्ही भेट दिलेली ठिकाणे लक्षात ठेवण्यात तुम्हाला मदत करतो. तुम्ही तुमची टाइमलाइन कधीही संपादित करू शकता आणि टाइमलाइन मधील तुमचा स्थान इतिहास हटवू शकता.

तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी यांसारखी सेटिंग्ज सुरू केली असल्यास व स्थान इतिहास बंद केल्यास किंवा स्थान इतिहास यामधून स्थान डेटा हटवल्यास, तुमच्या इतर Google Sites, अ‍ॅप्स आणि सेवांच्या वापराचा भाग म्हणून स्‍थान डेटा अजूनही तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला असू शकतो. या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये तुमच्या डिव्हाइसच्या सर्वसाधारण भागावरील आणि आयपी अ‍ॅड्रेसवरील तुमच्या स्थानाबद्दलच्या माहितीचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ, तुमचे वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू असते, तेव्हा स्थान डेटा हा Search व Google Maps वरील अ‍ॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून सेव्ह केला जाऊ शकतो आणि तुमच्या कॅमेरा अ‍ॅप सेटिंग्जनुसार तुमच्या फोटोमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.

टाइमलाइन तयार करा

टाइमलाइन तयार करण्यासाठी, तुम्हाला तुमची स्थान सेवा आणि स्थान इतिहास सुरू करणे आवश्यक आहे. स्थान इतिहास हे Google खाते स्तरावरील सेटिंग आहे, जे टाइमलाइन, म्हणजे असा वैयक्तिक नकाशा तयार करते, जो तुम्ही वापरलेले मार्ग आणि केलेले प्रवास व तुम्ही गेला होतात ती ठिकाणे लक्षात ठेवण्यात तुम्हाला मदत करतो. स्थान इतिहास याबद्दल अधिक जाणून घ्या.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह  आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. वैयक्तिक आशय वर टॅप करा आणि “स्थान सेटिंग्ज” वर स्क्रोल करा.
  4. “स्थान सेटिंग्ज” अंतर्गत ते “स्थान सेवा सुरू आहे” असे म्हणत असल्याचे तपासा. ते तसे म्हणत नसल्यास, स्थान सेवा नेहमी वर सेट केलेले नाहीआणि त्यानंतर स्थान आणि त्यानंतर नेहमी वर टॅप करा.
टीप: तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर स्थान सेवा सुरू करता, तेव्हा तुमचा iPhone किंवा iPad तुम्ही वापरत असलेल्या ॲप्ससोबत त्याचे स्थान शेअर करतो. वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सारखी इतर सेटिंग्ज सुरू असताना, Google Search सारख्या इतर Google सेवांवरील तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून स्थान डेटा सेव्ह केला जाऊ शकतो.

तुमचे प्रवास शोधा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर तुमची टाइमलाइन Timeline वर टॅप करा.
  3. दुसरा दिवस किंवा महिना शोधण्यासाठी, कॅलेंडर दाखवा Event वर टॅप करा आणि त्यानंतर डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा आणि दिवसावर टॅप करा.
टीप: तुम्ही स्क्रीनच्या सर्वात वरती असलेल्या टॅबदरम्यान स्विच करू शकता, जसे की ठिकाणे, शहरे किंवा जग आणि तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांबद्दल इनसाइट शोधू शकता.

स्थान इतिहास सुरू किंवा बंद करणे

तुम्ही स्थान इतिहास सुरू करता, तेव्हा Google अ‍ॅप्स वापरली जात नसली, तरीही तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान तुमच्या डिव्हाइसवर आणि Google च्या सर्व्हरवर नियमितपणे सेव्ह केले जाते आणि तुमची टाइमलाइन तयार केली जाते.

स्थान इतिहास सुरू किंवा बंद करण्यासाठी:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, टाइमलाइन वर जा.
  2. सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर स्थान इतिहास सुरू करा किंवा स्थान इतिहास बंद करा वर क्लिक करा.

तुमचा स्थान इतिहास कसा व्यवस्थापित करावा याबद्दल अधिक जाणून घ्या.

टाइमलाइन संपादित करा

तुम्ही भेट दिलेली ठिकाणे बदला

तुमच्या टाइमलाइन वर एखादे ठिकाण चुकीचे असल्यास, तुम्ही स्थान आणि तुम्ही तेथे कधी होतात ते संपादित करू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर तुमची टाइमलाइन Timeline वर टॅप करा.
  3. तुमच्या टाइमलाइन वर चुकीचे ठिकाण शोधा आणि त्यावर टॅप करा.
  4. ठिकाण संपादित करा वर टॅप करा.
  5. ठिकाण किंवा पत्ता शोधा वर टॅप करा किंवा स्क्रोल करा आणि सूचीमधून बरोबर ठिकाण निवडा.
  6. तुम्ही तेथे कधी आणि किती वेळ होतात ते संपादित करण्यासाठी, वेळेवर टॅप करा.
टीप: वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद असल्यास, तुम्ही टाइमलाइन वर स्थाने किंवा अ‍ॅक्टिव्हिटी संपादित करू शकत नाही, पण तुम्ही दिवस किंवा तुमचा संपूर्ण स्थान इतिहास हटवू शकता.
मैल आणि किलोमीटर यांदरम्यान स्विच करा
 To change how Timeline measures distance, tap तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर Settings आणि त्यानंतर Distance units. त्यानंतर आपोआप, किलोमीटर किंवा मैल निवडा.
टाइमलाइनवर तुमचे घर आणि ऑफिस शोधा

तुम्ही तुमचे घर आणि ऑफिसचे पत्ते Google वर सेव्ह केले असल्यास, ते टाइमलाइन वर दिसतील. टाइमलाइन व्यतिरिक्त, ही माहिती इतर Google उत्पादने आणि सेवांमध्येदेखील वापरली जाऊ शकते.

तुमच्या घराचे आणि ऑफिसचे पत्ते कसे सेट करायचे ते जाणून घ्या.

दिवस हटवा
महत्त्वाचे: तुम्ही टाइमलाइन मधून स्थान इतिहास याची माहिती हटवता, तेव्हा भविष्यात तुम्ही ती पाहू शकणार नाही. तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी यांसारखी इतर सेटिंग्ज सुरू केल्यास आणि स्थान इतिहास हटवल्यास, तुमच्या इतर Google Sites, अ‍ॅप्स आणि सेवांच्या वापराचा भाग म्हणून स्‍थान डेटा अजूनही तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला असू शकतो. उदाहरणार्थ, तुमचे वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू असते, तेव्हा स्थान डेटा Search आणि Maps वरील अ‍ॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून सेव्ह केला जाऊ शकतो व तुमच्या कॅमेरा अ‍ॅप सेटिंग्जनुसार तुमच्या फोटोमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर तुमची टाइमलाइन Timeline वर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, कॅलेंडर दाखवा वर टॅप करा Event आणि त्यानंतर तुम्हाला हटवायचा असलेला दिवस निवडा.
  4. आणखी 더보기आणि त्यानंतर दिवस हटवा हटवा वर टॅप करा.
स्थान इतिहास हटवा
महत्त्वाचे: तुम्ही टाइमलाइन मधून स्थान इतिहास याची माहिती हटवता, तेव्हा भविष्यात तुम्ही ती पाहू शकणार नाही. तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी यांसारखी इतर सेटिंग्ज सुरू केल्यास आणि स्थान इतिहास हटवल्यास, तुमच्या इतर Google Sites, अ‍ॅप्स आणि सेवांच्या वापराचा भाग म्हणून स्‍थान डेटा अजूनही तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला असू शकतो. उदाहरणार्थ, तुमचे वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सेटिंग सुरू असते, तेव्हा स्थान डेटा Search आणि Maps वरील अ‍ॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून सेव्ह केला जाऊ शकतो व तुमच्या कॅमेरा अ‍ॅप सेटिंग्जनुसार तुमच्या फोटोमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.

तुम्ही तुमचा सर्व स्थान इतिहास किंवा त्याचा भाग हटवू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर तुमची टाइमलाइन Timeline वर टॅप करा.
  3. आणखी 더보기आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. “स्थान सेटिंग्ज” वर स्क्रोल करा.
    • तुमचा काही इतिहास हटवा: स्थान इतिहास ची रेंज हटवाआणि त्यानंतर रेंज सेट करा आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.
    • सर्व काही हटवा: सर्व स्थान इतिहास हटवा वर टॅप करा.

तुमचा स्थान इतिहास व्यवस्थापित कसा करावा किंवा तो कसा हटवावा याविषयी अधिक जाणून घ्या.

तुमचा स्थान इतिहास आपोआप हटवा

तुम्ही ३ महिने, १८ महिने किंवा ३६ महिन्यांपेक्षा जुना असलेला स्थान इतिहास आपोआप हटवणे निवडू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. Tap तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर Your timeline Timeline.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. “स्थान सेटिंग्ज” अंतर्गत, स्थान इतिहास आपोआप हटवा वर टॅप करा.
  5. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

तुम्ही नियंत्रक आहात

तुम्ही तुमच्या डेटाचे आणि येथे करत असलेल्या कोणत्याही निवडींचे activity.google.com येथे किंवा तुमच्या टाइमलाइन वर कधीही पुनरावलोकन करू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4826170887077006752
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false