Google Maps वरील परीक्षणे आणि रेटिंग जोडणे, संपादित करणे किंवा हटवणे

Google Maps मध्ये, तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांची परीक्षणे तुम्ही लिहू शकता. तुम्ही ठिकाणाबद्दल ते शांत आणि रोमँटिक आहे किंवा त्याचे नूतनीकरण होत आहे, यासारखी माहिती अथवा फोटो किंवा व्हिडिओ अपडेटदेखील पोस्ट करू शकता.

महत्त्वाचे: धोरणाचे उल्लंघन करणाऱ्यांना Google Maps पासून दूर ठेवण्यासाठी, आम्ही वापरकर्त्यांची परीक्षणे आणि त्यांसंबंधित आशय नियंत्रित करतो. आम्हाला आढळलेली सर्व उल्लंघने पुनरावलोकन करून काढून टाकली जाण्याच्या अधीन आहेत.
वापरकर्त्याने जनरेट केलेल्या Google Maps वरील आशयाशी संबंधित धोरण याबाबत अधिक जाणून घ्या आणि निषिद्ध व प्रतिबंधित आशय आणि वर्तनांबाबत अधिक जाणून घ्या.

टीप: तुमची परीक्षणे आणि मते ही ऐच्छिक आहेत. आम्ही Google Maps वर परीक्षणे लिहिण्यासाठी परीक्षणकर्त्यांना पैसे देत नाही.

सार्वजनिक माहितीविषयी

सर्व परीक्षणे सार्वजनिक आहेत आणि तुम्ही जे जोडता ते कोणीही पाहू शकते. तुम्हाला निनावी परीक्षण जोडता येणार नाही.

तुम्ही परीक्षण लिहिता तेव्हा, इतरांना दिसू शकते अशी काही आणखी माहिती येथे आहे:

टीप: तुम्ही स्थानिक मार्गदर्शक असल्यास, तुम्ही Google Maps वर फोटो आणि व्हिडिओ जोडता तेव्हा तुम्ही गुण मिळवणे हे करू शकता. उच्च गुणवत्तेची परीक्षणे आणि फोटो कसे द्यावेत हे जाणून घ्या.

रेटिंग किंवा परीक्षण जोडणे

अनुभव शेअर करण्यात तुम्हाला मदत व्हावी यासाठी किंवा निवड करण्यात अथवा आणखी चांगल्या प्रकारे निर्णय घेण्यात इतरांना मदत व्हावी यासाठी, तुम्ही रेटिंग किंवा परीक्षणे जोडू शकता.

रेटिंग किंवा परीक्षण जोडण्यापूर्वी, तुम्ही आशय धोरणाचे पालन करत असल्याची खात्री करा. स्पॅम किंवा अयोग्य आशय यांसारख्या धोरण उल्लंघनांमुळे परीक्षणे अथवा रेटिंग पेजवरून काढून टाकली जाऊ शकतात आणि बहुतांश बाबतीत ती काढून टाकली जातात.

धोरण उल्लंघनांमुळे काढून टाकलेली परीक्षणे आम्ही रिस्टोअर करत नाही. काढून टाकण्याच्या या उपायांमुळे, Google मालमत्तांवरील परीक्षणे ही उपयुक्त, उपयोगी आणि विश्वासार्ह राहतील याची खात्री करण्यात आम्हाला मदत होते. परीक्षणासाठी प्रतिबंधित आशयाविषयी जाणून घ्या.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Maps मध्ये साइन इन करा.
  2. ठिकाण शोधा.

"Googleplex" is typed in the search bar on Google Maps. A list of results is displayed below.

  1. डावीकडे, स्क्रोल करा आणि परीक्षण लिहा वर क्लिक करा.
In Google Maps, a review summary of a Googleplex location is displayed in the left sidebar. It shows the average review ratings, review highlights, a button that says "Write a review," and a list of all reviews.
  1. ठिकाणाला रेटिंग देण्यासाठी, तार्‍यांवर क्लिक करा. तुम्ही परीक्षणदेखील लिहू शकता.

In Google Maps, a pop-up window displays a form to write a review for Googleplex. There are 5 stars selected for the rating, a text field to write review details, and a button with a camera to upload photos. At the bottom of the pop-up window, there is a "Cancel" button and a "Post" button.

तुम्ही तुमचे परीक्षण काढून टाकेपर्यंत ते Google Maps वर दिसेल. तुमचे परीक्षण प्रकाशित झाल्यानंतर, तुम्ही ते संपादित करू शकता किंवा तुम्ही समाविष्ट केलेले रेटिंग आणि फोटो बदलू शकता.

तुमची परीक्षणे शोधणे आणि शेअर करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू वर क्लिक करा.
  3. तुमची योगदाने वर क्लिक करा.
  4. परीक्षण शेअर करण्यासाठी, परीक्षणाच्या तळाशी, शेअर करा Share वर टॅप करा.

तुमचे परीक्षण संपादित करणे किंवा हटवणे

तुमची परीक्षणे शोधा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू वर क्लिक करा.
  3. तुमची योगदाने आणि त्यानंतर परीक्षणे वर क्लिक करा.
  4. तुम्हाला संपादित करायच्या किंवा हटवायच्या असलेल्या परीक्षणाच्या बाजूला, आणखी आणखी वर क्लिक करा.
  5. परीक्षण संपादित करा किंवा परीक्षण हटवा निवडा आणि स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.

इतर लोकांची परीक्षणे वाचा आणि त्यावर प्रतिक्रिया द्या

इतर लोकांची परीक्षणे वाचणे

तुम्हाला Google Maps मध्ये दिसणारी परीक्षणे आणि रेटिंग इतर वापरकर्त्यांनी जोडलेली आहेत.

टीप: परीक्षणावर असलेली तारीख ही प्रकाशित झाल्याची तारीख आहे.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा.
  3. ठिकाणाच्या नावाखाली, तुम्हाला रेटिंग दिसू शकते.
  4. परीक्षणे वाचण्यासाठी, रेटिंगच्या उजवीकडे, परीक्षणांच्या संख्येवर क्लिक करा.

दुसऱ्या भाषेमध्ये परीक्षणे वाचण्यासाठी

  1. तुमच्या Google खाते मध्ये, तुमची भाषा सेटिंग्ज वर जा.
  2. उजवीकडे, संपादित करा संपादित करा वर क्लिक करा आणि भाषा निवडा.
  3. Google Maps रीलोड करा आणि परीक्षण पुन्हा तपासा.

तुमच्या व्यवसायाच्या परीक्षणाला उत्तर देणे

तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवर Google Maps वरील तुमची Business Profile उघडता तेव्हा, तुम्ही स्वतंत्र परीक्षणांना उत्तर देऊ शकता.

टीप: परीक्षणांना उत्तर देण्यासाठी, तुम्हाला तुमच्या व्यवसाय प्रोफाइलची पडताळणी करणे आवश्यक आहे.

Google Maps वर तुमच्या Business Profile वरील परीक्षणांना उत्तर देण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. तुमचे व्यवसाय नाव एंटर करा. त्यानंतर, शोधा शोध वर क्लिक करा किंवा एंटर दाबा.
  3. तुमच्या व्यवसाय प्रोफाइलवर, “परीक्षणे" वर स्क्रोल करा.
  4. परीक्षणाला उत्तर देण्यासाठी, उत्तर द्या वर क्लिक करा.

परीक्षणाला उपयुक्त म्हणून मार्क करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. ठिकाण शोधा.
  3. ठिकाणाच्या नावाखाली, परीक्षणांच्या संख्येवर क्लिक करा.
  4. परीक्षण उपयुक्त म्हणून मार्क करण्यासाठी उपयुक्त वर क्लिक करा. लेखकाला सूचित केले जाते, पण तुमचे नाव आणि माहिती दाखवली जात नाही. एकूण उपयुक्त मतांची संख्या दाखवली आहे. 

टिपा:

  • तुमचे मत काढून टाकण्यासाठी, आयकनवर पुन्हा टॅप करा.
  • परीक्षण अनधिकृत असल्यास किंवा Google च्या धोरणाचे उल्लंघन करत असल्यास, तुम्ही परीक्षणाची तक्रार नोंदवू शकता.

परीक्षणाची तक्रार करणे

तुम्ही अयोग्य परीक्षण लिहिलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकत नाही, पण तुम्ही Google ला ते काढून टाकण्याची विनंती करू शकता. इतरांनी परीक्षणांना अयोग्य म्हणून लेबल केल्यास किंवा तीGoogle ची परीक्षण धोरणे यांचे पालन करत नसल्यास, ती काढून टाकण्यात येतील.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Maps उघडा.
  2. Google ची परीक्षण धोरणे यांचे उल्लंघन करणारे परीक्षण शोधा.
  3. परीक्षणाच्या बाजूला, आणखी आणखी आणि त्यानंतर अयोग्य म्हणून फ्लॅग करा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला ज्या कारणामुळे परीक्षणाची तक्रार करायची आहे ते निवडा.

टीप: तुम्ही व्यवसाय मालक असल्यास, Google वरील तुमच्या Business Profile वरून परीक्षणे काढून टाकणे हे करण्याची विनंती करू शकता

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13990774766003851165
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false