Google Maps वरील परीक्षणे आणि रेटिंग जोडणे, संपादित करणे किंवा हटवणे

Google Maps मध्ये, तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांची परीक्षणे तुम्ही लिहू शकता. तुम्ही ठिकाणाबद्दल ते शांत आणि रोमँटिक आहे किंवा त्याचे नूतनीकरण होत आहे, यासारखी माहिती अथवा फोटो किंवा व्हिडिओ अपडेटदेखील पोस्ट करू शकता.

महत्त्वाचे: धोरणाचे उल्लंघन करणाऱ्यांना Google Maps पासून दूर ठेवण्यासाठी, आम्ही वापरकर्त्यांची परीक्षणे आणि त्यांसंबंधित आशय नियंत्रित करतो. आम्हाला आढळलेली सर्व उल्लंघने पुनरावलोकन करून काढून टाकली जाण्याच्या अधीन आहेत.
वापरकर्त्याने जनरेट केलेल्या Google Maps वरील आशयाशी संबंधित धोरण याबाबत अधिक जाणून घ्या आणि निषिद्ध व प्रतिबंधित आशय आणि वर्तनांबाबत अधिक जाणून घ्या.

टीप: तुमची परीक्षणे आणि मते ही ऐच्छिक आहेत. आम्ही Google Maps वर परीक्षणे लिहिण्यासाठी परीक्षणकर्त्यांना पैसे देत नाही.

सार्वजनिक माहितीविषयी

सर्व परीक्षणे सार्वजनिक आहेत आणि तुम्ही जे जोडता ते कोणीही पाहू शकते. तुम्हाला निनावी परीक्षण जोडता येणार नाही.

तुम्ही परीक्षण लिहिता तेव्हा, इतरांना दिसू शकते अशी काही आणखी माहिती येथे आहे:

टीप: तुम्ही स्थानिक मार्गदर्शक असल्यास, तुम्ही Google Maps वर फोटो आणि व्हिडिओ जोडता तेव्हा तुम्ही गुण मिळवणे हे करू शकता. उच्च गुणवत्तेची परीक्षणे आणि फोटो कसे द्यावेत हे जाणून घ्या.

रेटिंग किंवा परीक्षण जोडा

अनुभव शेअर करण्यात तुम्हाला मदत व्हावी यासाठी किंवा निवड करण्यात अथवा आणखी चांगल्या प्रकारे निर्णय घेण्यात इतरांना मदत व्हावी यासाठी, तुम्ही रेटिंग किंवा परीक्षणे जोडू शकता.

रेटिंग किंवा परीक्षण जोडण्यापूर्वी, तुम्ही आशय धोरणाचे पालन करत असल्याची खात्री करा. स्पॅम किंवा अयोग्य आशय यांसारख्या धोरण उल्लंघनांमुळे परीक्षणे अथवा रेटिंग पेजवरून काढून टाकली जाऊ शकतात आणि बहुतांश बाबतीत ती काढून टाकली जातात.

धोरण उल्लंघनांमुळे काढून टाकलेली परीक्षणे आम्ही रिस्टोअर करत नाही. काढून टाकण्याच्या या उपायांमुळे, Google मालमत्तांवरील परीक्षणे ही उपयुक्त, उपयोगी आणि विश्वासार्ह राहतील याची खात्री करण्यात आम्हाला मदत होते. परीक्षणासाठी प्रतिबंधित आशयाविषयी जाणून घ्या.
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. एखादे ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर टॅप करा.
    • तुमच्या शोधामध्ये तुम्हाला एकाहून अधिक स्थाने मिळाल्यास, तुम्हाला अपडेट करायच्या असलेल्या स्थानावर टॅप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या नावावर किंवा पत्त्यावर टॅप करा.
  4. सर्वात वरती, परीक्षणे वर टॅप करा.
  5. पाच रिकाम्या ताऱ्यांवर स्क्रोल करा.
  6. तुमचे परीक्षण लिहा:
      • ठिकाणाला रेटिंग देण्यासाठी: तार्‍यांवर टॅप करा.
      • परीक्षण लिहिण्यासाठी: “तुमच्या अनुभवाबद्दल आणखी शेअर करा” अंतर्गत, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते एंटर करा.
      • तुमच्या अनुभवाबद्दल तपशील जोडण्यासाठी: दिसत असलेल्या प्रश्नांच्या खाली तुमच्या अनुभवाला अनुरूप असलेले सर्वात योग्य तपशील निवडा. तुम्ही परीक्षण लिहित असलेल्या प्रत्येक ठिकाणासाठी तुम्हाला कदाचित प्रश्न दिसणार नाहीत.

एखाद्या ठिकाणाबद्दलचे तुमचे परीक्षण, रेटिंग आणि तपशील हे तुम्ही काढून टाकत नाही तोपर्यंत, Google Maps आणि तुमच्या प्रोफाइलवर दिसतात. तुमचे परीक्षण प्रकाशित झाल्यानंतर, तुम्ही ते संपादित करू शकता किंवा तुम्ही समाविष्ट केलेले रेटिंग आणि फोटो बदलू शकता. त्याऐवजी फोटो अपडेट कसे पोस्ट करावे याबद्दल जाणून घ्या.

तुमची परीक्षणे शोधा आणि शेअर करा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. योगदान द्या Contribute वर टॅप करा.
    • तुम्ही ज्यांसाठी परीक्षण लिहिले आहे अशी ठिकाणे शोधण्याकरितातुमची प्रोफाइल पहा वर टॅप करा.
    • तुम्ही ज्यांसाठी परीक्षण लिहू शकता अशी ठिकाणे शोधण्याकरिता, परीक्षण लिहा वर टॅप करा
  3. परीक्षण शेअर करण्यासाठी, परीक्षणाच्या तळाशी जा आणि शेअर करा Share वर टॅप करा.

तुमचे परीक्षण संपादित करा किंवा हटवा

तुमची परीक्षणे शोधा

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2.  योगदान द्या Contribute आणि त्यानंतर तुमची प्रोफाइल पहा वर टॅप करा.
  3. स्क्रोल करा आणि सर्व परीक्षणे पहा वर टॅप करा.
  4. तुम्हाला संपादित करायच्या किंवा हटवायच्या असलेल्या परीक्षणाच्या बाजूला, आणखी 더보기 वर टॅप करा.
  5. परीक्षण संपादित करा किंवा परीक्षण हटवा निवडा आणि स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.

इतर लोकांची परीक्षणे वाचा आणि त्यावर प्रतिक्रिया द्या

इतर लोकांची परीक्षणे वाचा

तुम्हाला Google Maps मध्ये दिसणारी परीक्षणे आणि रेटिंग इतर वापरकर्त्यांनी जोडलेली आहेत. परीक्षणे शोधण्यासाठी:

टीप: परीक्षणावर असलेली तारीख ही प्रकाशित झाल्याची तारीख आहे.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. एखादे ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर टॅप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या नावावर किंवा पत्त्यावर टॅप करा.
  4. सर्वात वरती, परीक्षणे वर टॅप करा.

दुसऱ्या भाषेमध्ये परीक्षणे वाचण्यासाठी:

  1. तुमच्या Google खाते मध्ये, तुमची भाषा सेटिंग्ज वर जा.
  2. उजवीकडे, संपादित करा संपादित करा वर टॅप करा आणि भाषा निवडा.
  3. Google Maps रीलोड करा आणि परीक्षण पुन्हा तपासा.
टीप: उच्च गुणवत्तेची परीक्षणे शोधण्यासाठी, स्थानिक मार्गदर्शक शोधा. या आयकनचा अर्थ असा आहे, की हे परीक्षण स्थानिक मार्गदर्शक ने लिहिले आहे.

परीक्षणाला उपयुक्त म्हणून मार्क करणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. एखादे ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर टॅप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या नावावर किंवा पत्त्यावर टॅप करा.
  4. परीक्षणांवर स्क्रोल करा.
  5. परीक्षण उपयुक्त म्हणून मार्क करण्यासाठी, उपयुक्त वर टॅप करा. लेखकाला सूचित केले जाते, पण तुमचे नाव आणि माहिती दाखवली जात नाही. एकूण उपयुक्त मतांची संख्या दाखवली आहे. 

टिपा:

  • तुमचे मत काढून टाकण्यासाठी, आयकनवर पुन्हा टॅप करा.
  • परीक्षण अनधिकृत असल्यास किंवा Google च्या धोरणाचे उल्लंघन करत असल्यास, तुम्ही परीक्षणाची तक्रार नोंदवू शकता.

परीक्षणाची तक्रार नोंदवा

तुम्ही अयोग्य परीक्षण लिहिलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकत नाही, पण तुम्ही Google ला ते काढून टाकण्याची विनंती करू शकता. इतरांनी परीक्षणांना अयोग्य म्हणून लेबल केल्यास किंवा ती Google ची परीक्षण धोरणे यांचे पालन करत नसल्यास, काढून टाकण्यात येतील. 

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. Google ची परीक्षण धोरणे यांचे उल्लंघन करणारे परीक्षण शोधा.
  3. परीक्षणाच्या बाजूला, आणखी 더보기 आणि त्यानंतर परीक्षणाची तक्रार नोंदवा वर टॅप करा.
  4. तुम्हाला ज्या कारणामुळे परीक्षणाची तक्रार करायची आहे ते निवडा.

टीप: तुम्ही व्यवसाय मालक असल्यास, Google वरील तुमच्या Business Profile वरून परीक्षणे काढून टाकणे हे करण्याची विनंती करू शकता.

 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13461215155951837228
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false