सूचना

आगामी महिन्यांमध्ये, स्थान इतिहास सेटिंगचे नाव बदलून टाइमलाइन केले जाईल. तुमच्या खात्यासाठी स्थान इतिहास सुरू केलेले असल्यास, तुम्हाला कदाचित तुमच्या ॲप आणि खाते सेटिंग्जमध्ये टाइमलाइन दिसेल.

निर्देशक जाणून घ्या किंवा अक्षांश आणि रेखांशानुसार शोधा

ठिकाण शोधण्यासाठी, GPS वरील अक्षांश आणि रेखांश निर्देशक हे Google Maps वर एंटर करा. तुम्हाला या आधी सापडलेल्या ठिकाणांचे निर्देशकदेखील तुम्ही शोधू शकता. 

अक्षांश आणि रेखांशांव्यतिरिक्त, तुम्ही पत्त्याशिवाय ठिकाण शेअर करण्यासाठी Plus Codes वापरणे हेदेखील करू शकता.

ठिकाण शोधण्यासाठी निर्देशक एंटर करा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. सर्च बॉक्समध्ये तुमचे निर्देशक एंटर करा. काम करणार्‍या फॉरमॅटची उदाहरणे पुढे दिली आहेत:
    • दशांश अंश (DD): 41.40338, 2.17403
    • अंश, मिनिटे आणि सेकंद (DMS): 41°24'12.2"N 2°10'26.5"E
    • अंश आणि दशांश मिनिटे (DMM): 41 24.2028, 2 10.4418

ठिकाणाचे निर्देशक मिळवा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. लाल पिन ड्रॉप करण्यासाठी, नकाशाच्या लेबल न केलेल्या भागाला स्‍पर्श करा आणि धरून ठेवा.
  3.  तुम्हाला सर्च बॉक्समध्ये निर्देशक दिसतील.

तुमचे निर्देशक फॉरमॅट करा

तुमचे निर्देशक Google Maps मध्ये काम करावेत यासाठी फॉरमॅट करण्याकरिता, दशांश अंश पुढील फॉरमॅटमध्ये वापरा:

  • योग्य फॉरमॅट: 41.40338, 2.17403
  • चुकीचा फॉरमॅट: 41,40338, 2,17403

टिपा:

  • तुमचे अक्षांश निर्देशक हे रेखांश निर्देशकांच्या आधी सूचीबद्ध करा.
  • तुमच्या अक्षांश निर्देशकामधील पहिली संख्या ही -९० आणि ९० यांदरम्यान असल्याचे तपासा.
  • तुमच्या रेखांश निर्देशकामधील पहिली संख्या ही -१८० आणि १८० यांदरम्यान असल्याचे तपासा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4688480496101151582
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false